Submitted by चैतन्य दीक्षित on 14 January, 2013 - 12:13
परवा आयुष्यात दुसर्यांदा तिला लाइव्ह ऐकलं. घरातून निघायला उशीर झाला होता त्यामुळे सुरुवातीला तिने गायिलेला 'जोग' हुकलाच. पण पोहोचलो तेव्हा बागेश्री सुरु होता आणि गाणं ऐन रंगात आलं होतं. मध्यलय झपताल संपवून द्रुत तीनतालात बागेश्री दिमाखदारपणे पुढे चालला होता. आधी त्या स्वरांनी सगळी धावपळ, उशीर झाल्यामुळे झालेली चिडचिड थांबली आणि मग डोळेही निवले.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
From Swarzankaar
From Swarzankaar
From Swarzankaar
From Swarzankaar
From Swarzankaar
From Swarzankaar
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आहाहा ! सुरेखच ! दुसरा फारच
आहाहा ! सुरेखच !![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
दुसरा फारच गोड. हातही कित्ती सुरेख आहे
धन्स रे
कोण आहेत ह्या फारच सुंदर
कोण आहेत ह्या
फारच सुंदर आहेत
फोटोही नजर खिळवून ठेवणारे आलेत
निवडक दहात !!
क्या बात है!!!! धन्स चैतन्य
क्या बात है!!!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धन्स चैतन्य इथे शेअर केल्याबद्दल.
नावामूळे अतीशय कुतूहलाने आत
नावामूळे अतीशय कुतूहलाने आत डोकावलो. अगदी सूंदर.
अवल, वैभव, जिप्सी,
अवल, वैभव, जिप्सी, कंसराज![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धन्यवाद
>>हातही कित्ती सुरेख आहे
अवल, अनुमोदन
वैभव-
ह्या पं. अजय चक्रवर्ती यांची कन्या कौशिकी चक्रवर्ती आहेत.
ओह.. तू पण कौशिकी फॅन का
ओह.. तू पण कौशिकी फॅन का चैतन्य.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सगळे फोटो मस्तच... पण दुसरा
सगळे फोटो मस्तच... पण दुसरा केवळ, केवळ....
अरे व्वा... माझ्या नावाचा राग
अरे व्वा... माझ्या नावाचा राग![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तच... मस्त रिफ्रेशिंग फोटो
मस्तच... मस्त रिफ्रेशिंग फोटो वाटतायेत![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अगदी खरं! गाणारं सौंदर्यच हे!
अगदी खरं! गाणारं सौंदर्यच हे! ह्या कार्यक्रमात कौशिकीला ऐकले आणि मी तिची फॅन झाले आहे. जितकी अप्रतिम तिची गायकी आहे तितकीच ती गोड आहे.
ह्या सुंदर फोटोजसाठी खूप खूप आभार!
फारच सुंदर आहेत...........
फारच सुंदर आहेत...........
खरंच सुंदर. आता एक लेख
खरंच सुंदर.
आता एक लेख वाजवणार्या सौंदर्यावर (अनुष्का) पण येऊ दे![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
शास्त्रीय गाण्यातल मला काहिच
शास्त्रीय गाण्यातल मला काहिच कळत नाही ...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पण फोटो केवळ अप्रतिम .... सुंदरच ... प्रत्येक फोटो परत परत पहावसा वाटतो.
प्रत्येक फोटोतले चेहर्यावरचे भाव एकदम खास...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अमेलियाशी सहमत. ''गाणारं
अमेलियाशी सहमत. ''गाणारं सौंदर्य'' व्वा क्या बात !
प्रतिभावंताची प्रतिभावंत कन्या, शिवाय सुस्वरूप. देव एखाद्याला सगळंच देतो .
आभार चैतन्यजी या फोटोंसाठी.
तुझ्या नावाचा राग नव्हे.
तुझ्या नावाचा राग नव्हे. रागावरुन तुझं नाव ठेवलय.
अरे वा.. खरंच की.. गाणारं
अरे वा.. खरंच की.. गाणारं सौंदर्य![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
"माझ्या संगीतसाधनेत व्यतय
"माझ्या संगीतसाधनेत व्यतय येण्याची शक्यता असल्याने मी आपले निमंत्रण स्वीकारू शकत नाही....' ऋतुपर्ण घोष या प्रसिद्ध बंगाली दिग्दर्शकाने ['रेनकोट, चोखेर बाली'] देवू केलेल्या प्रमुख नायिकेच्या ऑफरला नम्रपणे नकार देणार्या कौशिकी चक्रवर्तीच्या शास्त्रीय संगीत सेवेला सलाम केला पाहिजे. वयाच्या २ र्या वर्षापासून त्यानी भारतीय संगीत कलेची सेवा सुरू केली असून आज हे नाव त्यांची या क्षेत्रातील तपस्या तसेच सौंदर्य या दोन्हीमुळे देशविदेशात गाजत आहे.
त्यांचे पती पार्थ देशीकान हे स्वतः उस्ताद बडे गुलाम अली खाँ यांच्या परंपरेतील उदयोन्मुख गायक असून त्यानीही कौशिकीप्रमाणेच आपले श्वशुर पं.अजय चक्रवर्ती यांचेच शिष्यत्व पत्करले आहे.
श्री.चैतन्य दीक्षित यानी धाग्याला दिलेले शीर्षक आणि दिलेले फोटो 'कौशिकी' च्या नावाला शोभणारे असेच आहेत.
अशोक पाटील
अजुन लाईव्ह ऐकायला मिळालेच
अजुन लाईव्ह ऐकायला मिळालेच नाहीये.. पण काही रेकॉर्डींग्स ऐकली आहेत... फारच मस्त आहेत..
चैतन्य फोटो फारच सुंदर आलेत.
कुळकर्णी, यशवंतराव चव्हाण ला
कुळकर्णी, यशवंतराव चव्हाण ला वर्षातुन १-२ कार्यक्रम होतात ह्यांचे. लक्ष ठेवा. हवं तर आतिथ्यशील कोथ्रुडकरांना सांगुन ठेवा वर्दी देण्यास.
प्रतिसादाबद्दल सर्वांचे
प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार.
श्री.अशोक पाटील यांचे विशेष आभार ह्या माहितीबद्दल.
केवळ अप्रतिम!!........ फोटो
केवळ अप्रतिम!!........ फोटो आणि कौशिकी......... दोन्ही.....:स्मित:
भिषॉण सुंदोर !
भिषॉण सुंदोर !
अशोकरावांनी दिलेला फोटोही
अशोकरावांनी दिलेला फोटोही कसला अप्रतिम आलाय - ओ हो हो हो......
तबल्यावर रामदास पळसुले
तबल्यावर रामदास पळसुले दिसताहेत.
चैतन्य, गाण्याविषयी लिहा की.
खरच सगळेच फोटो अप्रतीम
खरच सगळेच फोटो अप्रतीम आहेत..लेखाच नाव अगदी चपखल आहे..अस्सल भारतीय सात्विक सौंदर्य!
सुंदर! शीर्षक साजेसं.
सुंदर! शीर्षक साजेसं.
छान फोटो आहेत. आता गाणं
छान फोटो आहेत. आता गाणं ऐकायला पाहिजेच!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पुनश्च
पुनश्च धन्यवाद![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
वि.दि.पा,
गाण्याबद्दल म्हणण्यापेक्षा संपूर्ण स्वरझंकार महोत्सवाबद्दल लिहायचं डोक्यात आहे, पण अजून मुहूर्त लागत नाहिये
चैतन्य...........काय सुंदर
चैतन्य...........काय सुंदर फोटो आहेत! गाण्याबद्दल तर जितकं बोलू कमीच पडेल!!
तिची एक खमाजमधली (बहुतेक)ठुमरीच ....अशी डोळ्यापुढेही आहे आणि कानात तर आहेच. अगदी पहिल्या हार्मोनियमच्या अप्रतीम तुकड्यासकट!
पं अजय चक्रवर्तीही खूप आवडतात.
अशोक यांनी दिलेली माहिती इन्टरेस्टिंग!
खुपच सुंदर! कौशिकि चक्रवर्तीं
खुपच सुंदर! कौशिकि चक्रवर्तीं चा राग मधुवंती सुरेख म्हणजे सुरेखच! मधुवंतीचा अर्थ कळतो ऐकताना!
Pages