आपल्या लहान मुलाला घेऊन तुम्ही आणि तुमची बायको बाहेर फिरायला जाता.. समजा, बाजारात जाता.. (किंवा कुठेही, त्याने काही फरक पडत नाही म्हणा!) आणि तिथे एक फुगेवाला दिसतो. वेगवेगळ्या आकारांचे, रंगांचे सुंदर फुगे ! साहजिकच लहानगा/गी फुग्याचा हट्ट करतो/ते.. किंवा न करताही तुम्ही एक छानपैकी वेगवेगळ्या रंगांचा मोठा फुगा घेता. फुगा घेऊन घरी येता आणि खेळता खेळता 'फट्ट'दिशी फुगा फुटतो ! का फुटतो ? कळतच नाही ! तुमचं मूल, तुम्ही आणि तुमची बायको एकमेकांकडे बुचकळ्यात पडल्यागत पाहाता, क्षणभरच.. आणि मग भोकाड..............! फुगा फुटला कसा ? हा प्रश्न बाजूला राहातो आणि आता मुलाला/ मुलीला आवरू कसा ? हा प्रश्न पडतो..! रामबाण उपाय..... 'आपण उद्या अजून एक फुगा आणू या, ठीकेय ?' कसंबसं मूल शांत.
असंच काहीसं मी, माझी बायको आणि माझ्यातलाच 'मी' बाळ ह्यांचं झालं.. 'मटरू...' बघितल्यावर. फुगा रंगीत होता... मोठ्ठा होता... छान होता... पण तिच्या मारी.. फुटला ! आणि का फुटला, तेही कळलं नाही.. आता मीच मला समजावतोय, 'पुढच्या आठवड्यात अजून एक सिनेमा पाहू या, ठीकेय ?' कसाबसा 'मी' शांत !
तर हा फुगा असा आहे/ होता..
हरियाणातील एक शेतकरीबहुल गाव... 'मंडोला'. गावाचं नाव, गावातला पिढीजात अब्जाधीश/ खर्वाधीश 'हरी मंडोला' (पंकज कपूर) च्या आडनावावरून असतं. हा मंडोला म्हणजे एक नंबरचा पक्का 'पेताड' असतो. म्हणजे त्याला पिणं सुरू करणं माहित असतं, थांबणं माहित नसतं. शुद्धीत असताना मिस्टर मंडोला किंवा हरी (harry) असणारा हा पीवट प्यायल्यावर 'हरिया' बनत असतो. शुद्धीतला मंडोला पक्का बिझिनेसमन असतो. त्याला फायदा, पैसा, सत्ता, धंदा, ई. पुढे आणि शिवाय काही दिसत नसतं आणि टुन्न 'हरिया' कधी काय करेल ह्याचा नेम नसतो.. स्वत:च्याच विरोधात मोर्चा काढतो.. दारूचे दुकान लिमोझिन घुसवून फोडतो.. काहीही, अगदी काहीही ! गावातलाच एक तरुण 'मटरू' (इम्रान खान) मंडोलाकडे कामाला असतो. मटरु दिल्लीला शिकलेला असतो, शिक्षणासाठी त्याने मंडोलाकडूनच कर्ज घेतलं असतं पण शिक्षण झाल्यावर त्याचं शहरात मन रमत नाही म्हणून तो गावात परततो आणि कर्जाची परतफेड करण्यासाठी मंडोलाकडे काम करायला लागतो. त्याचा ड्रायव्हर आणि केअर टेकर म्हणून. मंडोलाची बिनधास्त मुलगी बिजली (अनुष्का शर्मा) आणि मटरु लहानपणापासूनचे मित्र असतात. व्यावसायिक फायद्यासाठी बिजलीचं लग्न, स्थानिक राजकारणी चौधरी देवी (शबाना आझमी)चा बावळा मुलगा बादल (आर्य बब्बर) शी नक्की केलेलं असतं. गावातल्या शेतकऱ्यांच्या जमीनी हडप करून तिथे एक मोठा मोटार कारखाना करायचं मंडोलाचं स्वप्न, त्यात चौधरी देवीचं सशर्त सहकार्य, मटरुचा मंडोलावरील राग व त्याचं खरं 'माओ'वादी रूप, बिजली-बादलचं नकली प्रेम, अश्या सर्व प्रवासांतून ही कहाणी एका 'प्रेडिक्टेबल' सुखाच्या शेवटाला पोहोचते आणि सगळे कलाकार फेर धरून नाचतात.
चित्रपटाच्या काही भागांत पथनाट्याची झाक दिसते. एका गंभीर विषयाची जराशी वेगळी हाताळणी असल्याने सिनेमा बऱ्यापैकी आवडतो. पण मांडणी काही वेळा जराशी विस्कळीत वाटते.
गुलजारच्या शब्दांपेक्षा विशाल भारद्वाजचं संगीत खूपच उजवं आणि संवादही खुसखुशीत वाटतात.
पंकज कपूरने तोंडातल्या तोंडात हरयाणवीत पुटपुटलेले बरेच संवाद कळत नाहीत.
अनुष्का शर्मा पुन्हा एकदा छाप सोडते. तिचा पडद्यावरील वावर खूप सहज आहे.
इम्रान खान 'मटरु' दिसण्यासाठी त्याला भरगच्च दाढी असणं आवश्यक होतंच. पण त्या दाढीवरून जेव्हा अनुष्का शर्मा त्याला 'कीस' करते, तेव्हा तिची केवळ दया येते.. इंडस्ट्रीत स्थान बनवण्यासाठी काय काय करावं लागतं !
शबाना आझमी लौकिकास साजेसं काम करते आणि आर्य बब्बर बाप-लैकिकास.
'गुलाबो' ब्रांड ची दारू पिणाऱ्या मंडोलाला, दारू एकदम बंद केल्यानंतर दिसणारी गुलाबी म्हैस गंमतीदार आहे.
- पण फुगा का फुटला, ह्याचं कारण मला अजूनही मिळालं नाहीये. असो.. फुटला, तर फुटला.. पण जितका वेळ खेळलो, तितका वेळ मजा आली, एव्हढं मात्र नक्कीच !
रेटिंग - * * १/२
असं पण इम्रान खान आणी अनुश्का
असं पण इम्रान खान आणी अनुश्का साठी पैसे खर्च करणार्यातील मी नव्हे.....पण आता केबल वर हा मुव्ही लागला तरी बघायचं धाडस होइल की नाही..शंकाच आहे...
गावातल्या शेतकऱ्यांच्या जमीनी
गावातल्या शेतकऱ्यांच्या जमीनी हडप करून तिथे एक मोठा मोटार कारखाना करायचं मंडोलाचं स्वप्न, त्यात चौधरी देवीचं सशर्त सहकार्य, मटरुचा मंडोलावरील राग व त्याचं खरं 'माओ'वादी रूप, >>> टाटा नॅनो च्या सिंगुर प्रकरणावरुन जसेच्या तसे उचलल्याप्रमाणे वाटतोय हा प्लॉट
फुकट तिकीट दिले तरी बघू नये
फुकट तिकीट दिले तरी बघू नये असा चित्रपट..
टाटा नॅनो च्या सिंगुर
टाटा नॅनो च्या सिंगुर प्रकरणावरुन जसेच्या तसे उचलल्याप्रमाणे वाटतोय हा प्लॉट >> अगदी... किंवा 'मारुती'वादावरूनही असेल..
गाण्याबददल मात्र काही च लिहल
गाण्याबददल मात्र काही च लिहल नाही तुम्ही.... ओ माय चार्ली किंवा मटरु की बिजली का मंडोला.. मस्त गाणी आहेत
"गुलजारच्या शब्दांपेक्षा
"गुलजारच्या शब्दांपेक्षा विशाल भारद्वाजचं संगीत खूपच उजवं"
एव्हढं एकच वाक्य लिहावंसं वाटलं.... 'अंकु'जी..!
फुकट तिकीट दिले तरी बघू नये
फुकट तिकीट दिले तरी बघू नये असा चित्रपट..
>>>>> त्यात माझे २ शब्द...
फुकट तिकीट दिले तरी बघू नये असा 'अजून एक' चित्रपट..
फुकट तिकीट दिले तरी बघू नये
फुकट तिकीट दिले तरी बघू नये असा चित्रपट..>>
इतकाही होपलेस नाहीये, सारीका..
अनेक दृष्यांत खळखळून हसायलाही येतं आणि अनेक दृष्यं 'पटतात'ही.... मांडणी विस्कळित (जराशी) असली तरी, पंकज कपूर त्याचा 'क्लास' दाखवतोच आणि अनुष्का शर्मा लै भारी !
इतकाही होपलेस नाहीये,
इतकाही होपलेस नाहीये, सारीका..
अनेक दृष्यांत खळखळून हसायलाही येतं आणि अनेक दृष्यं 'पटतात'ही.... मांडणी विस्कळित (जराशी) असली तरी, पंकज कपूर त्याचा 'क्लास' दाखवतोच आणि अनुष्का शर्मा लै भारी !>>>> आवड आपली आपली
हा चित्रपट बघताना एक सारखं वाटत होतं की विशाल भारद्वाजला एकतर शिरिश कुंदर तरी चावलाय किंवा त्याला मेंटल कॉन्स्टीपेशन तरी झालंय..
मेंटल कॉन्स्टीपेशन
मेंटल कॉन्स्टीपेशन
जितका वेळ खेळलो, तितका वेळ
जितका वेळ खेळलो, तितका वेळ मजा आली, एव्हढं मात्र नक्कीच !>>
इतकाही होपलेस नाहीये, सारीका..
अनेक दृष्यांत खळखळून हसायलाही येतं आणि अनेक दृष्यं 'पटतात'ही....>>
म्हणजे रसप, तुम्हाला बर्यापैकी आवडलाय चित्रपट. मग शीर्षकात 'आयचा घो' का? उगाचच अॅग्रेसिव्ह वाटतं हे. असं वैम.
जुळवायचं तर 'मटरूच्या बिजलीने मननाडोला' वगैरे करा की.
घाई करताय रसप तुम्ही परिक्षण
घाई करताय रसप तुम्ही परिक्षण टाकायची असं वाटतय. जे लोक अशी परिक्षण वाचून ठरवत असतात सिनेमा पहायचा की नाही (वरील प्रतिक्रियांवरुन तरी अशी लोकं खरंच असतात असं दिसतय) त्यांच्याकरता तरी तटस्थपणे सिनेमातल्या आवडलेल्या, न आवडलेल्या गोष्टी, स्क्रिप्ट, दिग्दर्शन वगैरेंबद्दल काही लिहित जा अशी नम्र विनंती.
पौर्णिमाशी सहमत.
हो, मला पण ते शीर्षक आणि
हो, मला पण ते शीर्षक आणि परिक्षण एकमेकांशी विसंगत वाटले
खर म्हणजे मायबोलीवरचे परीक्षण किंवा चित्रपट कसा वाटला मधल्या पोस्टी वाचून चित्रपट बघायचा की नाही हे ठरवते मी बर्याचदा आणि फारशी कधी पस्तावत नाही..... एक विश्वास असतो की किमानपक्षी हे पेड रिव्ह्यूज तरी नसतात
आयचा घो = बाप मन्डोला हा
आयचा घो = बाप
मन्डोला हा बिजलीचा बाप आहे.... म्हणून तसं लिहिलं आहे.
शर्मिला जी,
मी दर आठवड्याला एक सिनेमा पाहातो. पण दर सिनेमावर परिक्षण लिहितोच असे नाही.... जेव्हा लिहावंसं वाटतं तेव्हाच लिहितो. कदाचित होत असेल घाई.. पण ती लिहिण्याची नाही, पाहाण्याची असावी.
खुप छान आढावा घेतला आहे अमोल
खुप छान आढावा घेतला आहे
अमोल केळकर
मला इथे भेटा
रसप. आयचा घो "बाप" या अर्थाने
रसप. आयचा घो "बाप" या अर्थाने वापरत नाहीत, नानची टांग वगैरे तत्सम रूपात वापरलं जातं. (बहुतांशी समोरच्याची अक्कल काधण्याच्या दृष्टीने) अधिक माहिती गजाली बाफवरचे लोक देतीलच.
सॉलिड कन्फ्युस झालोय...बघायचा
सॉलिड कन्फ्युस झालोय...बघायचा की नाही हा सिनेमा?
"रसप. आयचा घो "बाप" या
"रसप. आयचा घो "बाप" या अर्थाने वापरत नाहीत, नानची टांग वगैरे तत्सम रूपात वापरलं जातं. "
बरोबर आहे नन्दिनी... पण तिथे 'श्लेष' आहे हो !
रसप टेबल नंबर २ पहायचा होतास
रसप टेबल नंबर २ पहायचा होतास ना...
मी तुला विपू करणार होते, तो पहा आणि परिक्षण लिही
पण तू "हा" पाहिलास
अरेरे
ते मटरू की बिजली का मंडोला गाणं ऐकूनच मला या सिनेमाची शिसारी आलेली अक्षरशः
असो!
मी कधीच पहाणार नाही हा सिनेमा
रिया........... अपमान...
रिया...........
अपमान... अपमान !!
तुला असं वाटलंच कसं की नवा सिनेमा येईल आणि मी तो पाहाणार नाही !! पाहिलाच की तो पण 'फर्स्ट डे'च ! पण काही लिहावंसं वाटलं नाही........
(तसं 'चित्रपट कसा वाटला' ह्या बाफवर लिहिलंही होतं!
एकूणात शीर्षकात श्लेष करायची
एकूणात शीर्षकात श्लेष करायची आवड दिसते तुम्हाला. तलाशमध्ये भूत आणि भविष्य, इथे आयचा घो
मंडोला हे त्याचं आडनाव आहे आणि तो पंकज कपूर तिचा पिता आहे हेच मुळात तुमचं परिक्षण वाचून कळलं असो.
जे लोक अशी परिक्षण वाचून ठरवत
जे लोक अशी परिक्षण वाचून ठरवत असतात सिनेमा पहायचा की नाही (वरील प्रतिक्रियांवरुन तरी अशी लोकं खरंच असतात असं दिसतय) त्यांच्याकरता तरी तटस्थपणे सिनेमातल्या आवडलेल्या, न आवडलेल्या गोष्टी, स्क्रिप्ट, दिग्दर्शन वगैरेंबद्दल काही लिहित जा अशी नम्र विनंती.
>> +१.
पुढील लिखाणात अधिक सखोल
पुढील लिखाणात अधिक सखोल लिहिण्याचा प्रयत्न करीन. परंतु, हा फुगा का फुटला माझं मलाच नीटसं कळलं नव्हतं, त्यामुळे ह्याहून जास्त लिहू शकलो नाही.. एव्हढे बोलून आय रेस्ट माय आर्ग्युमेन्ट ! :-|
सखोल काय - पार सगळी स्टोरी
सखोल काय - पार सगळी स्टोरी विथ एन्ड पण लिहा हो . फक्त टायटल च्या बाबतीत संयम पाळा. आधीही अनेकांनी हे सांगून झालेय , जरा विचार करा.
बाफ च्या टायटल मधे कोणातेही विशेषण , अलंकार, उपमा, लिहू नका कृपया !!! इतरांचा रसभंग होतो. तलाश च्या बाबतीत ते झालेच आहे. That was not fair to others!
बाफच्या टायटल मध्ये फक्त आणि फक्त सिनेमाचे नाव लिहिलेत तर ज्याला अधिक वाचायचे असेल तोच फक्त उघडेल बाफ. पण BB टायटल्स सगळ्यांना लगेच दिसतात, इच्छा असो वा नसो..
आता तरी पुढची परीक्षणे लिहिताना विचार करा.
कुणी आपल्या लेखाचे शिर्षक काय
कुणी आपल्या लेखाचे शिर्षक काय द्यावे हा पूर्णतः त्याचा स्वताचा निर्णय असावा..... कधी कधी फक्त चित्रपटाचे नाव लिहण्यापेक्षा काहितरी वेगळे शिर्षक नक्कीच लक्ष वेधून घेते.
आणि बहुतांशी वर्तमानपत्रातही तसेच असते.....तीच रुढ पद्धत आहे.
हो, मान्य आहे, लेखकाचा निर्णय
हो, मान्य आहे, लेखकाचा निर्णय असतो, पण याचा अर्थ त्यानेइतरांव्चा रसभंग करण्याचे लायसन मिळाल्यासारखे कथा किंवा एखादे रहस्य च त्यात सांगून टाकावे असे नव्हे. हे सांगायचीच्वेळ यावी हेच अनाकलनीय आहे.
ईथे कसेही परीक्षण लिहीले गेले
ईथे कसेही परीक्षण लिहीले गेले असले तरी शेवटी ऊपलब्ध वेळ, मूड, ई. बघून चित्रपट पहातो वा नाही पहात... आजवर माबो वर परीक्षण वाचले म्हणून एखादा चित्रपट बघितला वा एखादा बघितला नाही असं आजवर झालेलं नाही.. तेव्हा शीर्षक काहिही लिहीलत तरी फार फरक पडत नाही- ही वैयक्तीक बाब आहे.
हां आता काही परीक्षणे मात्र चित्रपटाच्या निव्वळ मसाल्याच्या पलिकडे जाऊन तंत्र, मत्र ई. सर्वाबद्दल लिहीतात, तेव्हा त्या चित्रपटाबद्दल एक वेगळा 'माहितीपूर्ण' दृष्टिकोन बनतो हे नक्की! पण असे परीक्षण लिहीणारे 'जातीचे' परीपूर्ण परीक्षक ईथे ऊपलब्ध नाहीत/ माझ्या तरी वाचण्यात नाहीत... निव्वळ this is not paid review is not the basis (at least for me) to decide whether to watch the movie or not..
'विशाल भारद्वाज' अशा सारख्या नावाकडून काही वेगळ्या अपेक्षा असतातच... त्याला रोहित शेट्टी च्या चित्रपटांची निव्व्वळ 'मनोरंजन' ही फूटपट्टी लावणे चुकीचे(च) आहे. त्या अपेक्षेवर चित्रपट ऊतरला नसेल तर दुर्दैवच!
रसप राव.. तुम्हाला पाहिजे तसे
रसप राव.. तुम्हाला पाहिजे तसे लिहा... फक्त वेळ असेल तर जरा अजून विस्तारीत लिहा - मज्जा येते तुमचे परीक्षण वाचताना...
माबोकरांनो - चित्रपट पाहायच्या की नाही तो निर्णय एका व्यक्तीच्या परीक्षणावर घेऊ नका... प्रत्येक व्यक्तीची अभिरुची वेगळी असते आणि म्हणून त्याने केलेल्या चित्रपटचे मूल्यांकन वेगळे असू शकते... अजून खूप पर्याय उपलब्ध आहेत निर्णय घेण्यासाठी...
हेहे पाहिलास का? यापेक्षा तो
हेहे
पाहिलास का?
यापेक्षा तो बराच बेटर आहे की रे
बाकी अपमानाबद्दल क्षमा असावी
आणि तुला हवं तसच आणो तेच लिहित जा शिर्षक आणि परिक्षणातही!
आम्हाला आवडतं वाचायला
रियांना अनुमोदन. रसप तुम्हाला
रियांना अनुमोदन.
रसप तुम्हाला हवं तसंच आणि तेच लिहित जा शीर्षक आणि परिक्षणातही!
आम्हाला आवडतं वाचायला.
Pages