भाजी ब्रिगेडच्या थोर (?) विचारवंतानी लिहिलेल्या लिखाणाला कोणीही साहित्य हा दर्जा देत नसल्यामुळे साहित्यिक म्हणून साहित्यसंमेलनाला कोणी साधं बोलावणही धाडत नाही त्यामुळे ब्रिगेडचा जळफळाट होतोय आणि त्यामुळेच ते साहित्य संमेलन उधळण्याचा प्रयत्न करत असावेत..
चिपळूण साहित्य संमेलनाचे अध्यक्ष नागनाथ कोतापल्ले हे बहुजन विचारवंत असतानाही तसेच सुनील तटकरे हे स्वागताध्यक्ष असतानाही भाजी ब्रिगेड साहित्य संमेलन उधळण्याचा जो केविलवाणा प्रयत्न करत आहेत (कारण असा प्रयत्न करून कोकणात हे बेदम मार खाण्याचे चान्सेस जास्तीच आहेत म्हणा) त्यावरून त्यांना बहुजन समाज व साहित्यिकांच्या विषयी किती आपुलकी आहे हे दिसूनच येतंय...
आता खरी कसोटी ही राज्य सरकारची आहे कारण ब्रिगेड खुलेआम संमेलन उधळण्याच्या धमक्या देत असताना राज्य सरकार व पोलिस ब्रिगेडच्या सगळ्या नेते आणि पदाधिकार्यांना स्थानबद्ध करत कारवाई करत का हे ही पाहण तितकच महत्वाच आहे.
कायदा हातात घेणार्याची गय केली जाणार नाही असे मिडीयाला फुटकळ बाईट देणारे आर.आर. आबा आत्ता काही धाडसी निर्णय घेणार का याची आम्हा सामान्य साहित्यप्रेमींना उत्सुकता आहेच म्हणा.
असो
जाता जाता ब्रिगेड वाल्यांना एक मौलिक सल्ला... जन्म कोकणात झाल्याने आणि आयुष्यातली जवळपास २१ वर्ष कोकणच्या लाल मातीत गेल्याने एकच सांगतोय कि "साहित्य संमेलन ह्या आपल्या घरातला लग्नकार्य आसा असा कोकणी माणूस समाजता.. आणि ता व्यवस्थित पार पडाक व्हया म्हनान तो कायय करुक तयार आसा... तेव्हा कोकणी माणसाक उगाच डिचवू नकात... तेका अहिंसा ह्या शब्दाचो अर्थ तितकोसो समजना नाय.. त्याच्या कमरेक कायम आकडी बांधलेली असता आणि त्यात पाजळलेलो धारदार कोयतो असता... कायतरी करुक जाशात तर तो त्याच कोयत्यान तुमची मान कापुक कमी करुचो नाय..."
भाजी ब्रिगेडच्या थोर (?)
भाजी ब्रिगेडच्या थोर (?) विचारवंतानी लिहिलेल्या लिखाणाला कोणीही साहित्य हा दर्जा देत नसल्यामुळे साहित्यिक म्हणून साहित्यसंमेलनाला कोणी साधं बोलावणही धाडत नाही त्यामुळे ब्रिगेडचा जळफळाट होतोय आणि त्यामुळेच ते साहित्य संमेलन उधळण्याचा प्रयत्न करत असावेत.. >>>>>> +१००००
पहिल्याच वाक्यात सिक्सर मारली तुम्हि!
अनेकविध वादांमुळे सातत्याने
अनेकविध वादांमुळे सातत्याने चर्चेत असलेल्या ८६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद् घाटनआज , शुक्रवारी संध्याकाळी होणार असून हा सोहळा आणि तीन दिवसांचे हे संमेलन निर्विघ्न पार पडू दे , अशी इच्छा तमाम साहित्यप्रेमी मनी बाळगून आहेत .
येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराने आयोजिन केलेल्या संमेलनासाठी गुरुवारी दिवहभर यजमानांची आणि पाहुण्यांची गजबज , लगबग सुरू होती . मावळते संमेलनाध्यक्ष वसंत आबाजी डहाके , नियोजित अध्यक्ष डॉ . नागनाथ कोतापल्ले यांच्यासह काही साहित्यिक चिपळुणात दाखल झाले होते . तर काही चिपळूणच्या वाटेवर होते .
आज , शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजता आयोजित करण्यात आलेल्या ग्रंथदिंडीने साहित्य संमेलनाची द्वाही शहरात फिरवली जाईल . दुपारी साडेतीन वाजता संमेलनस्थळी पवन तलाव मैदानात साहित्य महामंडळाचा ध्वज फिरवला जाईल आणि त्यानंतर उद् घाटन सोहळा रंगेल . केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार हे संमेलनाचे उद् घाटन असून स्वागताध्यक्ष सुनील तटकरे , वसंत डाखरे , निलेश राणे , भास्कर जाधव आदी राजकारणी मंडळींचाच भरणा या सोहळ्यात दिसेल , अशी चिन्हे आहेत . या गर्दीत डहाके आणि कोतापल्ले असे दोनच साहित्यिक मंचावर असतील , अशी रास्त शंका आहे . या संमेलनाबाबत निर्माण झालेल्या विविध वादांवर उद् घाटन सोहळ्यात कोण काय भूमिका घेतो , मुळात भूमिका घेतो का , याकडे सगळ्यांचे लक्ष आहे . या निमित्ताने संमेलनस्थळी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे .
संभाजी ब्रिगेडकडून बहिष्कार मागे
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नव्या निमंत्रण पत्रिका छापण्यात आल्या असून , त्यावरील परशुरामाची प्रतिमा आणि परशु काढल्याने संमेलनात कोणताही अडथळा करणार नसल्याचे संभाजी ब्रिगेडने गुरुवारी जाहीर केले . त्यामुळे परशुरामाच्या प्रतिमेवरून निर्माण झालेल्या वादावर पडदा पडला आहे .
संमेलनस्थळी आपले कार्यकर्ते जाणार नसल्याचेही संभाजी ब्रिगेडने स्पष्ट केले . याबाबत संमेलनाध्यक्ष डॉ . नागनाथ कोतापल्ले यांच्याशी चर्चा झाल्याची माहिती ब्रिगेडचे प्रदेश कार्याध्यक्ष शांताराम कुंजीर यांनी दिली . संमेलनस्थळी जिजाऊ , श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे तैलचित्र लावण्याचे आश्वासन देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले . छावा संघटनेनीही या निर्णयाचे स्वागत केले असून , संमेलन पार पाडण्यास सहकार्य करू , असे संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी म्हटले आहे .
दरम्यान , निमंत्रणपत्रिकेची तिसरी आवृत्ती काढण्यात आली असून त्याच्या १२ हजार प्रती छापल्या आहेत . यामध्ये परशु आ णि परशुरामाचे चित्रही काढून टाकण्यात आले आहे . मात्र आम्ही पत्रिका मागे घेतलेली नाही तर नवीन पत्रिका काढली आहे एवढेच . पत्रिकेवर एखादे चित्र आहे की नाही , याला महत्त्वच नाही . मुळातच आता हा वाद संपवूया आणि कार्यक्रम नीट पार पाडूया , अशी भूमिका कार्याध्यक्ष प्रकाश देशपांडे यांनी मांडली आहे . तसेच त्यांनी संभाजी ब्रिगेडलाही धन्यवाद दिले असून त्यांना संमेलनाचे आमंत्रण दिले आहे .
-------------------------------------------------------------------------------
अखेर जातीयवादी शक्ती नमली.
संभाजी ब्रिगेड व कोतापल्ले यांचे अभिनंदन ...
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/17971953.cms
<< अखेर जातीयवादी शक्ती
<< अखेर जातीयवादी शक्ती नमली.>> कीं जिंकली ? कीं साहित्य संमेलनावर राजकारणाने झेंडा फडकावला ? सगळंच वादग्रस्त ! घरांत बसून पुस्तकांशीं संवाद साधणं हेंच आपलं साहित्यसंमेलन समजणं उत्तम !!
काही घटनाक्रम बघा. १) अफजलखान
काही घटनाक्रम बघा.
१) अफजलखान वधाचा पोस्टर हटवला:- यातून सलोख्याचा संदेश गेला. ते बरेच झाले.
२) लाल महालातनं दादोजी हटाविला:- त्यातूनही सलोख्याच संदेश गेला, हे ही बरेच झाले.
३) पत्रिकेतनं परशूराम हटविला:- एका क्रुर हत्याकांड घडविणा-याचं साहित्यसंमेलनात काय काम? हे ही बरच झालं.
वरील घटनांचे दोन अर्थ निघतात.
१) सनातनवाद्याना वाटतं की आमची श्रद्धास्थानं व प्रतिकं मिटविण्याचा हा डाव आहे:
२) ही श्रद्धास्थान व प्रतिक समाज घातकी ठरत गेली. सलोखा अबाधित राखण्यासाठी ती हटविणे गरजेचे होते.
ज्याला जो अर्थ घ्यायचा आहे त्यानी तो घ्यावा.
क्लासिक निगोशिएशन! मूळ
क्लासिक निगोशिएशन! मूळ आमंत्रण पत्रिका तशाच ठेवल्या. नवीन १२ हजार म्हंटले तर पत्रिका (म.टा), म्हंटले तर पॉकेट बुक (लोकसत्ता) काढल्या. त्यात एका बाजूला खटकणार्या काही गोष्टी वगळल्या. एक बाजू म्हणू शकते आम्ही जिंकलो, तर दुसरी म्हणू शकते आम्ही हरलो नाही. इतर काही बाजूंना खटकणारे इतर काही मुद्दे (ठाकरे, पुष्पा भावे, हमीद दलवाई ई.) सर्वांनी सोडून दिलेले दिसतात.
पण परशुरामाचे चित्र काढल्याचे ऐकून वाईट वाटले. ते ज्या कारणाने काढले ते ऐकून जास्तच. देवदेवतांवर श्रद्धा असणारे, त्यांना मानणारे लोक त्यांची सर्व क्रूत्ये समर्थनीय मानतात असे नाही.
पुढच्या २-३ दिवसांत यातून वेळ मिळाला, जमले तर साहित्याबद्दल नवीन काहीतरी बोला म्हणावं
पण परशुरामाचे चित्र काढल्याचे
पण परशुरामाचे चित्र काढल्याचे ऐकून वाईट वाटले. ते ज्या कारणाने काढले ते ऐकून जास्तच.
का हो?? सार्वजनिक कामात सर्वाना मान्य होतील अशी प्रतिके वापरावीत... परशुराम देव असला तरी साहित्यात त्याचे योगदान काय? सरस्वती, वीणा, पुस्तक, पेन, डोळा, सूर्य ... हे चालू शकले असते,
उद्या एखादा म्हणेल मला यमराज पूजनीय आहे. म्हणून खोखो स्पर्धेच्या निमंत्रण पत्रिकेवर फास आणि रेडा छापतो, तर ते चालेल का?
गोमूत्रराव, तुमचो कोयतो
गोमूत्रराव,
तुमचो कोयतो तुमच्या कमरेलाच ठेवो.. त्याची इतरांक गरज नायो.
साहित्य-बाह्य कारणांनी
साहित्य-बाह्य कारणांनी साहित्य संमेलन गाजावे असा पायंडा पडला आहे. याचे कारण बहुदा हे असावे की हे संमेलनच मुळात साहित्य-बाह्य झाले आहे! हा तर वार्षिक उरुस असतो. ज्याची साहित्य-प्रेमींनी दखल घ्यावी असे काही त्यात घडत नाही. त्यामुळे ही संमेलने उधळली काय आणि उजळली काय, साहित्य-दृष्ट्या काहीच फरक पडत नाही. फक्त मराठी संस्कृतीतल्या त्याज्य [हलकट?] प्रवृत्ती तेवढ्या निर्लज्जपणे आणि नेमाने प्रकट होतात, वरती टि.आर.पी. खाऊन जातात. त्यामुळे याला शिमग्याचे कवित्व म्हणणे जास्त योग्य ठरावे. तेवढाच संमेलनाचा आणि साहित्याचा संबंध!
-प्रभाकर [बापू] करंदीकर
चिपळूण - ८६ व्या अखिल भारतीय
चिपळूण - ८६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ठिकाणी साहित्यिकांची थोडक्यात माहिती लावण्यात आली आहे. यामध्ये जोतिबा फुले ते ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांच्या कालखंडातील साहित्यिकांची माहिती देण्यात आली आहे. यामध्ये जोतिबा फुले यांच्या ब्राह्मणद्वेषाचे आक्षेपार्ह चित्र लावण्यात आले आहे.
या चित्राच्या खाली म्हटले आहे, ‘सामान्य घरात जन्म घेऊनही माणूस जन्माने नव्हे; तर कर्म आणि शिक्षणानेच मोठा होऊ शकतो. याचे उत्तम आदर्श म्हणजे जोतिबा फुले. त्यांनी संघर्षातून शिक्षण पूर्ण केले. तत्कालीन धार्मिक गळचेपीचा सूक्ष्म अभ्यास करून धार्मिक रूढी, परंपरा या नावावर चाललेल्या बाजाराचा आपल्या लेखणीने कोथळा काढला. सत्यशोधक मंडळाची स्थापना केली. शिक्षण हा सर्वाधिकार असून तो समाजातल्या सर्व स्तराला मिळालाच पाहिजे; म्हणून स्त्री शिक्षणाचा प्रारंभ त्यांनी केला. आपल्या ज्वलंत लेखणीतून ‘ब्राह्मणाचे कसब’, ‘गुलामगिरी’, ‘शेतकर्यांचा आसूड’, ‘सार्वजनिक धर्मसत्य’, ‘तृतीय रत्न’ (नाटक), असे ज्वलंत साहित्य लिहून अज्ञानाच्या अंधारात खितपत पडलेल्या समाजाला प्रकाशाकडे नेण्याचे काम त्यांनी केले. त्यामुळेच समाजाने त्यांना ‘महात्मा’ ही पदवी बहाल केली. जोतिबांनी अखेरपर्यंत आपला देह समाजप्रबोधनासाठी झिजवला.’
http://dainiksanatanprabhat.blogspot.in/2013/01/blog-post_8529.html
तिळगूळ घ्या, गोडगोड बोला !
तिळगूळ घ्या, गोडगोड बोला !
भगवान परशुरामही खूनी नव्हते.
भगवान परशुरामही खूनी नव्हते. त्यांनी फक्त अत्याचारी राजांनाच मारले. तसेच जे राजे अत्याचारी नव्हते त्यांना मारले नाही. तसेच बायका पोरांनाही हात लावला नाही. खरेच नि:क्षत्रिय केली असती पृथ्वी तर आज क्षत्रियच उरले नसते हे साधे समजत नाही तुम्हाला?
परशुरामावर कोण्या विशिष्ट
परशुरामावर कोण्या विशिष्ट जातीची मक्तेदारी नाही. परशुरामाची मंदिरे भारतभर सापडतात. >> अनुमोदन
आम्ब्या, तू कसा काय रे पोचलास
आम्ब्या, तू कसा काय रे पोचलास सनातनप्रभात वाल्यान्च्या सायटीवरती?
की तू देखिल "डिपार्टमेण्टचा" माणूस हायेस? नजर ठेवायला?
काय हल्लीच काय सान्गता येत नाय बोवा, शेजारी कोण उभारला असेल, तर डी ग्यान्गचा हे की डिपार्टमेण्टचा (आयला, दोन्हीमधे डी कॉमनच की!) काय समजतच नाय.
जौद्या ते.
सर्वान्नी तिळगुळ घ्या गोड बोला. (त्या ब्रिगेडीन्ना तिळगुळ देखिल नकोच असेल नै? हिन्दू प्रथाहे ना ती... तिच्यामागे देखिल बामणी कावा शोधत बसतील ते )
>>> उद्या एखादा म्हणेल मला
>>> उद्या एखादा म्हणेल मला यमराज पूजनीय आहे. म्हणून खोखो स्पर्धेच्या निमंत्रण पत्रिकेवर फास आणि रेडा छापतो, तर ते चालेल का? <<<<<
आयला, खर्रच की रे आम्ब्या! अरे खोखोचे माहित नाही, पण आमच्या इकडे की नै, वर्षातल्या सग्ळ्या सणसमारम्भान्ना "नागरिकान्च्या" अभिनन्दनाचे ब्यानर्/फ्लेक्स लावतात ना, त्यावर यमसदृष वा रेडासदृषान्चेच ढिगभर फोटो छापलेले अस्तात, अन त्यात कोणतरी एखादा यम वा रेडा जास्तच पूजनीय अस्तो तो मोठ्या आकारात दाखवितात.... निदान सामान्य माणसास तरी ते यमसदृष वा यमाच्यारेड्यासदृषच भासतात
[बाकी ज्ञानदेव नामक कुलकर्ण्याच्या पोराच्याकडून वेद वदलेल्या रेड्यासारखे मात्र ते दिसत नाहीत बर्का! कृपया नोन्द घ्यावीच]
लिम्ब्स
लिम्ब्स
आयला, खर्रच की रे आम्ब्या!
आयला, खर्रच की रे आम्ब्या! अरे खोखोचे माहित नाही, पण आमच्या इकडे की नै, वर्षातल्या सग्ळ्या सणसमारम्भान्ना "नागरिकान्च्या" अभिनन्दनाचे ब्यानर्/फ्लेक्स लावतात ना, त्यावर यमसदृष वा रेडासदृषान्चेच ढिगभर फोटो छापलेले अस्तात, अन त्यात कोणतरी एखादा यम वा रेडा जास्तच पूजनीय अस्तो तो मोठ्या आकारात दाखवितात.... निदान सामान्य माणसास तरी ते यमसदृष वा यमाच्यारेड्यासदृषच भासतात >>>> एकदम सहमत.
त्यातला एखादा फोटो नासक्या आंब्याचा पण असेल.
लिम्ब्स
लिम्ब्स
[वैयक्तिक टीकेच्या विरोधात मी
[वैयक्तिक टीकेच्या विरोधात मी नेहेमीच आहे, पण हे वाक्य वैयक्तिक नसेल असे धरुन या वाक्याचा संदर्भ घेऊन]
>>> त्यातला एखादा फोटो नासक्या आंब्याचा पण असेल. <<<<
हो नक्कीच असेल, पण केव्हा? जेव्हा आम्ब्यांमधिल श्रीकृष्णाचे 'चातुर्वर्ण्यं मया सृष्ट्यम, गुणकर्मविभागशः', जसे की देवगड/रत्नागिरी हापुस (तो श्रेष्ठ अन तो फक्त आखातीदेशात्/परदेशातच मिळतो, देशात विकत नाहीत ), मग पायरी, मग तोतापुरी अन बाकी इतर दखल न घेण्याजोगे असा कळेल, तेव्हा नासक्या आम्ब्यान्चे फोटो देखिल झळकायला लागतील हे निश्चित!
हे बरेचसे, 'गाढवाला गाढव का म्हणता? छोटा हत्ती म्हणा' या चालीवरचे आहे! चालायचेच.
आयला, खर्रच की रे आम्ब्या!
आयला, खर्रच की रे आम्ब्या! अरे खोखोचे माहित नाही, पण आमच्या इकडे की नै, वर्षातल्या सग्ळ्या सणसमारम्भान्ना "नागरिकान्च्या" अभिनन्दनाचे ब्यानर्/फ्लेक्स लावतात ना, त्यावर यमसदृष वा रेडासदृषान्चेच ढिगभर फोटो छापलेले अस्तात, अन त्यात कोणतरी एखादा यम वा रेडा जास्तच पूजनीय अस्तो तो मोठ्या आकारात दाखवितात.... निदान सामान्य माणसास तरी ते यमसदृष वा यमाच्यारेड्यासदृषच भासतात >>>> एकदम सहमत.>>>>>> एकदम सहमत
(No subject)
जसे की देवगड/रत्नागिरी हापुस
जसे की देवगड/रत्नागिरी हापुस (तो श्रेष्ठ अन तो फक्त आखातीदेशात्/परदेशातच मिळतो, देशात विकत नाहीत
नाही हो. इथेही मिळतो... खेड्यापाड्यातही मिळतो.
आणि लिंबुआण्णा, नासका आंबा नासका असला तरी त्याला हिणवू नका... तुमचा कर्मविपाक बिघडेल आणि पुढचा जन्म विष्णु तुम्हाला नासक्या आंब्याचा देईल, समजले का? मग खाणारा तुमची कोयत्याने फोड कापेल आणि छी छी करुन टाकून देईल ...
-- साधासुधा चतुर वर्णी आंबा.