Submitted by सतीश देवपूरकर on 8 January, 2013 - 22:19
गझल
एवढा मी धावलो की, चालणेही शक्य नाही!
बेगडी शहरात ह्या मज थांबणेही शक्य नाही!!
चेह-याने आजवर त्याच्या परीने खूप केले....
आज जखमांना परंतू झाकणेही शक्य नाही!
एकटे गाठून मजला घेरले सा-या स्मृतींनी....
या पिशाच्चांना तसे समजावणेही शक्य नाही!
जे तिन्हीत्रीकाळ असती वेदनांनी वेढलेले;
हुंदके गझलेत त्यांना टाळणेही शक्य नाही!
माणसे नाहीत सारे वर्तुळांचे केन्द्रबिन्दू!
वर्तुळाबाहेर त्यांना गाठणेही शक्य नाही!!
कोणतीही वाट नसते फक्त काट्यांची परंतू;
टाळुनी काटे, फुलांना वेचणेही शक्य नाही!
-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ठीक वाटली ! २ र्या शेरातील
ठीक वाटली !
२ र्या शेरातील परंतू ची गरज कळली नाही
शेवटच्या शेरातील टाळुनी काटे. टाळू =मस्तकाची आठवण झाली दुसरा शब्द योग्य वाटला असता.
टाळुन काटे, फुले वेचणे असे वाचल्या जाते . गै. स. नसावा
चेह-याने आजवर त्याच्या परीने
चेह-याने आजवर त्याच्या परीने खूप केले....
आज जखमांना परंतू झाकणेही शक्य नाही!.. ..... ... जखमा/ भाव
माणसे नाहीत... सारे वर्तुळांचे केन्द्रबिन्दू!
वर्तुळाबाहेर त्यांना गाठणेही शक्य नाही!!
........ मस्त शेर!
खूप झाले, जास्त झाले, वाढु
खूप झाले, जास्त झाले, वाढु नकोस आणखी !
पोट फुटेल माझे, पाणी पिणे ही शक्य नाही ||
विडंबन http://www.maayboli.co
विडंबन
http://www.maayboli.com/node/40131
@ शा. पै. - छान जमले आहे. पण
@ शा. पै. - छान जमले आहे.
पण माझ्या मते प्रोफेसर जे गजल च्या नावानी पाडतात ते च आधी गजल चे विडंबन आहे. तुम्ही विडंबनाचे विडंबन केलेत.
धन्यवाद
धन्यवाद
शामजी! आभारी आहे!
शामजी!
आभारी आहे!
सर्व विटंबनाकारांचे
सर्व विटंबनाकारांचे आभार,
आपली प्रज्ञा व प्रतिभा खर्ची पाडल्याबद्दल!
>>एवढा मी धावलो की, चालणेही
>>एवढा मी धावलो की, चालणेही शक्य नाही!
>.बेगडी शहरात ह्या मज थांबणेही शक्य नाही!!
वाह, नकाच थांबू, चालत रहा, पुढील वाटचाल सुखमय होवो !
महेश! धन्यवाद एक हितचिंतक
महेश!
धन्यवाद एक हितचिंतक म्हणून प्रौढ सल्ला दिल्याबद्दल!
प्रोफेसर online झाले आता
प्रोफेसर online झाले
आता अजुन ३-४ गजल येणार माबो वर.
विटंबनाकारांचे नाही हो
विटंबनाकारांचे नाही हो विडंबनकारांचे
प्रसाद! फारच विडंबनात्मक
प्रसाद!
फारच विडंबनात्मक बोलता हो आपण!
चहूकडे विडंबन/विटंबनाच दिसते बहुधा आपल्याला!
छान ! लगे रहो.....
शायर पैलवान, येथील विडंबनकार
शायर पैलवान,

येथील विडंबनकार म्हणजे विटंबनाकारच आहेत!
आणि ज्या शायरांना गझलांचा
आणि ज्या शायरांना गझलांचा डायरिया झालाय त्यांना काय म्हणाल?
गजलपुरेकर
गजलपुरेकर
गझलायटिस गझलेरिया गझलोसिस
गझलायटिस
गझलेरिया
गझलोसिस भांडकुदळेरिया
छान
छान
छान आहे. आवडली.
छान आहे. आवडली.
छान आहे .........
छान आहे .........
सर्व प्रतिसाद दात्यांचा आभारी
सर्व प्रतिसाद दात्यांचा आभारी आहे!
असाच लोभ असू द्यावा!