=======================================================================
=======================================================================
आवडतो मज अफ़ाट सागर, अथांग पाणी निळे
निळ्या जांभळ्या जळात केशर सायंकाळी मिळे
फेस फुलांचे सफेत शिंपित, वाटेवरती सडे
हजार लाटा नाचत येती, गात किनार्याकडे
मऊ मऊ रेतीत रे कधी मी, खेळ खेळतो किती
दंगल दर्यावर करणार्या वार्याच्या संगती
तुफान केंव्हा भांडत येते सागर ही गर्जतो
त्यावेळी मी चतुरपणाने दूर जरा राहतो
संथ सावळी दिसती जेंव्हा क्षितिजावर गलबते
देश दूरचे बघावयाला जावेसे वाटते
क्षितिजावर मी कधी पाहतो मावळणारा रवी,
ढगाढगाला फुटते तेव्हा सोनेरी पालवी
प्रकाशदाता जातो जेव्हा जळाखालच्या घरी
नकळत माझे हात जुळोनी येती छातीवरी
- कुसुमाग्रज
=======================================================================
=======================================================================
आमचे FB मित्र श्री मधुकर धुरी यांनी केलेले मालवणचे अप्रतिम वर्णनः
(सदर वर्णन इथे देण्यास परवानगी दिल्याबद्दल धन्यवाद मधुकर )
मालवणची भौगोलिक रचना खास आहे. पश्चिमेला अथांग अरबी समुद्र. पूर्वेला कासारटाक्याची घाटी. उत्तरेला गड नदीची खाडी, तर दक्षिणेला कर्ली नदीची खाडी. या दोन्ही नद्या समुद्राला मिळण्याआधी समुद्राला समांतर वाहतात. त्यातून जमिनीची एक चिंचोळी पट्टी तयार झाली आहे. शंभरएक मीटर रुंदीची. या चिंचोळ्या पट्टीच्या पश्चिमेला आहे समुद्रकिनारा, तर पूर्वेला नदी किनारा. एका बाजूला समुद्राची गाज, तर दुसऱ्या बाजूला माडांच्या बनातून वाहणारी शांत नदी. कर्ली नदीच्या चिंचोळ्या पट्टीत तारकर्ली वसलंय. नदीच्या मुखाजवळ आहे देवबाग, तर समोरच्या किनार्यावर आहे भोगवे. गडनदीच्या पट्टीतलं गाव तोंडवळी, मुखाजवळ आहे तळाशील आणि दुसऱ्या किनाऱ्यावर वसलंय रेवंडी. मालवणच्या दक्षिणेला सात किलोमीटरवर आहे तारकर्ली. लांबच लांब विस्तीर्ण समुद्रकिनारा तारकर्लीला लाभलेला आहे. एमआयडीसीने तारकर्लीला प्रसिद्धी मिळवून देण्यात विशेष हातभार लावलाय. तारकर्लीपासून पाच किलोमीटर दक्षिणेला असणार्या देवबागपर्यंत कर्ली नदी समुद्राला भेटायला वाहत येते. तारकर्ली ते देवबाग गाडीरस्ता उपलब्ध आहे. देवबागला बोटीत बसायचं आणि कर्ली नदी समुद्राला मिळते त्याच्या दुसर्या किनार्यावर असणार्या भोगवे बीचवर उतरायचं. देवबाग भोगवे सफरीदरम्यान शेकडो सीगल पक्षी तुम्हाला पाहायला मिळतात. भोगवे किनारा पाहून झाला, की पुन्हा बोटीत बसायचं, निघायचं निवतीकडे. समुद्रकिनारी टेकडीवर निवतीचा किल्ला आहे बीचला लागूनच. निवती, भोगवे दोन्ही समुद्रकिनारे अतिशय रमणीय व सुंदर आहेत. देवबागहून बोटीने या किनार्याना भेट देण्यात विशेष मजा आहे. या बोट सफरीचं अजून एक आकर्षण आहे, ते म्हणजे डॉल्फिन. निवतीजवळच्या समुद्रात डॉल्फिन हमखास बघायला मिळतात आणि देवबागचे बोटवाले तुम्हाला डॉल्फिन दाखविल्याशिवाय हार मानत नाहीत. मात्र तुम्ही नेमकी वेळ गाठायला हवी आणि थोडीफार नशिबाने साथ द्यायला हवी. तीन-चार तासांच्या या सफरीचं 10 जणांचं मिळून 800 रु. भाडं आहे. तुमचे स्वतःचे 10 जण नसतील, तर मात्र दरडोई अधिक खर्च सोसायची तयारी हवी. देवबाग, तारकर्ली करीत कर्ली नदीतून लक्ष्मीनारायणाचं सुप्रसिद्ध मंदिर असणाऱ्या वालावलपर्यंत जर तुम्हाला बोटिंग करण्याची संधी मिळाली, तर मात्र सोन्याहून पिवळं; पण त्यासाठी योग्य ती किंमत मोजायची तयारी हवी. देवबागची नदी व समुद्रकिनारा दृष्ट लागण्याइतका स्वच्छ व नितळ पाण्याचा आहे. देवबाग कर्ली नदीइतकाच सुंदर किनारा आहे तळाशील गड नदीचा. गड नदी समुद्राला भेटायला येते ती तोंडवलीपासून. तळाशीलपर्यंत समुद्राला समांतर वाहते. मालवण, हडी, तोंडवली, तळाशील असा गाडीरस्ता उपलब्ध आहे. नदीच्या एका बाजूला तोंडवली, तळाशील, तर दुसऱ्या बाजूला ओझर, रेवंडी, कोळंब आहे. ओझरची ब्रह्मानंद स्वामींची असणारी गुहा व पाण्याचा झरा बघण्यासारखा आहे. ओझरजवळ आहे रेवंडी. मालवणचा सुपुत्र "वस्त्रहरण'कार मच्छिंद्र कांबळींचं गाव. गावात भद्रकालीचं मंदिर आहे. रेवंडीतल्या तरीवरून तळाशीलला बोटिंगची सुविधा उपलब्ध आहे. तळाशीलची मच्छिमारांची वस्ती संपली, की बांद्याच्या पुढे ओसाड बेट आहे. त्यावरून गड नदीच्या मुखाचं सुंदर दर्शन होतं. रेवंडीतूनसुद्धा गड नदी समुद्राला मिळते ती जागा बघण्यासारखी आहे. तोंडवळीचा सुरूचा किनारा, तळाशीलचा माडांच्या चिंचोळ्या पट्टीचा किनारा खास बघण्यासारखा. खुद्द मालवणात सिंधुदुर्ग किल्ल्याबरोबरच बघण्यासारखी बरीच ठिकाणं आहेत. तिथला मासळीबाजार, अनेक मंदिरं, रॉक गार्डन, चिवळा आणि त्याला लागून असलेला कोळंबचा समुद्रकिनारा अशा ठिकाणी सहज जाता येतं. महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेलं मालवण गाव. इथे येऊन सिंधुदुर्ग किल्ला न पाहिला तर काय पाहिलं? मालवणच्या जेटीवरून किल्ल्यात जायला बोटी उपलब्ध आहेत. राजाराम महाराजांनी स्थापन केलेलं महाराजांचं मंदिर, फांदी असणारं माडाचं झाड, दुधबाव, दहीबाव, महाराजांच्या हाताचा व पायाचा ठसा, राणीची वेळा इत्यादी पाहताना वेळ कसा पटकन निघून जातो. मालवणला रेल्वे स्टेशन नाही. रेल्वे पकडण्यासाठी कुडाळला जावं लागतं. मालवणहून कुडाळला जाताना रस्त्यात धामापूर लागतं. धामापूरचा तलाव मन प्रसन्न करणारा आहे. तलावात बोटिंगची सोय आहे. झाडीभरला हा तलाव नुसत्या दर्शनानेच तुम्हाला ताजतवानं करतो. आठवडाभराची सुट्टी असेल, तर मालवणनंतरचा मुक्काम करायचा सावंतवाडी अथवा वेंगुर्ल्याला. त्याशिवाय देवगड अथवा कणकवली असासुद्धा पर्याय आहे. आठवड्याची सुट्टी नसली, तर कोकण रेल्वे आहेच तुम्हाला झटपट मालवणला पोहोचायला. मगे येतालास ना? येवा, कोकण आपलाच आसा!
=======================================================================
=======================================================================
या रम्य भूप्रदेशी मित्रांसवे पुन्हा या
गेल्यावेळेसच्या कोकण भटकंतीतील वरील निमंत्रणाचा मान ठेवून, नाताळ आणि वर्षाअखेरीस जोडुन आलेल्या सुट्ट्यांचा फायदा घेत पुन्हा एकदा कोकण भटकंती करून आलो. नविन वर्षाच्या स्वागतासाठी आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी, मुंबईच्या कोलाहलापासुन दूर कोकणातील "मालवण" या ठिकाणी आम्ही पाचजण - मी, संदेश, राहुल, प्रतिक आणि आमची "स्विफ्टुकली" गेलो होतो. यावेळेस आम्ही मुंबई ते मालवण व्हाया कोल्हापूर (गगनबावडा, करूळ घाट) असा प्रवास केला. मालवणचा मासळी बाजार/लिलाव, रॉक गार्डन, देवबाग, किल्ले निवती, निवती रॉक्स, मेढा निवती, सागरतीर्थ (आरवली - वेंगुर्ला), तोंडवळी-तळाशील समुद्रकिनारा अशी या वेळची आमची भटकंती होती. संदेश याचे घर मालवणातील देऊळवाडा येथे होते, पण आम्ही चौघेजण मात्र त्याच्या सड्यावरच्या घरात, (कोकणी भाषेत मांगर) कुंभारमाठ येथे राहणार होतो. जहां तक नजर जायेगी वहा तक सिर्फ और सिर्फ आंब्याची झाडे आणि त्यात फक्त एकच संदेशचं घर. आजुबाजुला एकही घर नाही कि कोलाहल नाही. फक्त आम्ही चौघे. पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात सड्यावरून आंब्याच्या मोहराचा सुवास घेत चालतानाचा अनुभव वर्णनातीत आहे.
आमच्यातील एकही जण ३१ डिसेंबर "सेलिब्रेट" करणारा नसल्याने मालवणला समुद्राची गाज ऐकत जुन्या वर्षाला निरोप आणि नविन वर्षाचे स्वागत असा बेत होता. पण नेमकं त्याचवेळेस मालवण (खासकरून तारकर्ली) पर्यटकांनी जबरदस्त गजबजलं होतं. मालवणचे रस्ते, बाजारपेठ, हॉटेल्स पर्यटकांनी ओसंडुन वाहत होते. नेमका याच वेळी मालवणात आम्हाला "सांताक्लॉज" भेटला आणि आमच्या ज्या ज्या इच्छा (शांत निवांत, पर्यटकांची गजबज नसलेला समुद्रकिनारा, मनसोक्त फोटोग्राफी, गरमागरम खमंग मत्स्याहारी जेवण) होत्या त्या त्याने पूर्ण केल्या.
आता हाच सांताक्लॉज तुम्हाला मालवणची सफर घडवून आणणार आहे तर मग येताय ना त्याच्यासोबत समुद्राची हि गाज ऐकायला?
सर्वांची उत्सुकता ताणुन ठेवण्यासाठी सांताक्लॉजने या सिरीजमधल्या ठिकाणांची नावे न सांगण्याचे बजावले आहे. त्यामुळे सगळ्यांनी आपआपले अंदाज बांधा. यातील फोटो त्या त्या भागात येणार असल्याने त्या त्या ठिकाणांची नावे समजतीलच. मालवण ठिकाण मध्यवर्ती ठेवून इतर भटकंती केल्याने या मालिकेचे नाव "मालवणमय".
प्रचि ०१
प्रचि ०२
प्रचि ०३
प्रचि ०४
प्रचि ०५
प्रचि ०६
प्रचि ०७
प्रचि ०८
प्रचि ०९
प्रचि १०
प्रचि ११
प्रचि १२
प्रचि १३
प्रचि १४
प्रचि १५
प्रचि १६
प्रचि १७
प्रचि १८
प्रचि १९
प्रचि २०
प्रचि २१
प्रचि २२
प्रचि २३
प्रचि २४
प्रचि २५
प्रचि २६
प्रचि २७पुढच्या भागात "सांताक्लॉज" तुम्हाला मालवणच्या मासळी बाजारात घेऊन जाणार आहे.
__/\__
__/\__
प्रचि ३ व १० जबरदस्त. १७
प्रचि ३ व १० जबरदस्त.
१७ नंबरचया प्रचिमधला समुद्रकिनारा कुठला?
फक्त फोटो पाहिलेत.. वर्णन
फक्त फोटो पाहिलेत.. वर्णन सवडीने वाचेन![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
माश्यांचे प्रचि अगदीच क्लास आहेत
मस्त प्रचि नेहमीप्रमाणेच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त मस्त मस्त.
मस्त मस्त मस्त.
योग्या तु नोकरी सोड. माझा
योग्या तु नोकरी सोड.
माझा फोटोग्राफिचा क्लास घे.
आता शब्द नाहित कौतुकाला माझ्याकडे.
प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे
प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे मनापासुन आभार!!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अरे कितीही वेळा हे फोटो
अरे कितीही वेळा हे फोटो पाहिले तरी समाधान होत नाहीये.....
दक्षिणाला अनुमोदन....
परत परत तेच लिहितोय म्हणशील,
परत परत तेच लिहितोय म्हणशील, माझ्या वडीलांनी घेतेलेले घर आता आमचे राहिले नाही, आणि आता मालवणला जाणेही होत नाही. ओळखीचे तरी अनोळखी वाटतंय सगळं.
वा!
वा!
आवडलं..मस्तच..
आवडलं..मस्तच..
दिल मालवण मालवण हो गया
दिल मालवण मालवण हो गया![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जिप्सी खुप छान आले आहेत फोटो.
जिप्सी खुप छान आले आहेत फोटो. आणि तो देउळपाडा नाही देऊळवाडा. त्या भागात भरपुर मंदीर आहे, श्रावणात अर्ध मालवण तिकडेच असत.
आणि माझे अंदाज
२. सुवर्ण गणेश मंदीर, मेठा मालवण,
३. गगनबावडा घाट
५. कदाचीत सिंधुदुर्ग किल्ल्यावरची वाट
७,८,९. मालवण धक्का आणि बाजार मधील समुद्र किनारा
१३. देवबाग किंवा कोरजाई
२२. रॉक गार्डन
अप्रतिम!!!!!
अप्रतिम!!!!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
येस्स, रीमा ते "देऊळवाडाच"
येस्स, रीमा ते "देऊळवाडाच" आहे.
चेंजेस डन
आणि बहुतेक अंदाज एक्दम बरोब्बर ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
चला या ठिकाणांची नावे सांगुनच टाकतो![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
१. सागरतीर्थ समुद्रकिनार्यावर, आरवली.
२. सुवर्ण गणेश मंदिर
३. गगनबावडा घाट
४. किल्ले निवती
५. रामेश्वर मंदिराजवळ
६. तोंडवली-तळाशील समुद्रकिनारा
७, ८, ९, १० मालवण धक्का आणि बाजार मधील समुद्र किनारा
११ किल्ले निवती
१२ मालवण धक्का आणि बाजार मधील समुद्र किनारा
१३ देवबाग
१४ किल्ले निवती समुद्रकिनारा
१५ किल्ले निवती
१६ किल्ले निवती
१७ भोगवे समुद्रकिनारा
१८ मेढा निवती
१९ सागरतीर्थ
२० मालवण (जेट्टीवरून काढलेला फोटो)
२१ तोंडवली-तळाशीलला जाणारा रस्ता
२२ रॉक गार्डन
एकतर कोकण सुंदर त्यात
एकतर कोकण सुंदर त्यात तुझ्यासारखा उत्तम नजर असलेला कसलेला फोटुग्राफर.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आमची मजाय.
अप्रतिम, अप्रतिम ,अप्रतिम
अप्रतिम, अप्रतिम ,अप्रतिम !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
आणी स्पेशल धन्यवाद कुसुमाग्रजांच्या कविता साथी
अतिसुंदर...............
अतिसुंदर...............
अतिशय सुंदर कवितेने आगाज़
अतिशय सुंदर कवितेने आगाज़ केलेले अप्रतिम प्रचि...
वर्ष नवीन उजाडलं असलं तरी तुझी तारीफ करण्याला माझ्याकडचे शब्द मात्र तेच राहणारेत.. ग्वाड मानून घे जा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
दक्षिणा मी पण येईन
दक्षिणा मी पण येईन तुझ्याबरोबर class ला. मी काढलेले फोटो इतके चांगले कधीच येत नाहीत.
i am really jelaous of jipsi's fotography skills.
सुंदरच मालवण-देवबाग-तारकर्ली
सुंदरच
मालवण-देवबाग-तारकर्ली अतिशय सुंदर ठिकाणे आहेत. जिप्स्या, प्रचि १३, १६, १९ आणि २१ फार आवडले. आणि कुसुमाग्रजांची कविता, मधुकर धुरी यांनी दिलेले वर्णन आणि तुझे मनोगत, अगदी सुरेख संगम.
__/\__ बेश्ट्च...............
__/\__
बेश्ट्च......................![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अप्रतिम
अप्रतिम
वर्णन सही आहे, तसेच सर्व
वर्णन सही आहे, तसेच सर्व प्र.चि. सुंदर, तरीपण प्र्.चि. ३, १४, १५, १९, २१ व २२ विशेष आवडली. माझ्या गेल्या वर्षीच्या मालवण सहलीच्या आठवणी जाग्या झाल्या.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जिप्स्या, बर्याच जणांनी तुला गेल्या वर्षी तसेच याही वर्षी दोनाचे चार होऊदेत असा आशिर्वाद दिला आहे. पण नंतर तुला असे भटकता येईल का? व आम्हाला व्हर्च्युअल सहलीचा आनंद मिळेल का? असे मला वाटते. बाकी बघ बाबा, तुझा निर्णय.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
अप्रतिम..
अप्रतिम..
खुप आवडलं.. अप्रतिम.
खुप आवडलं.. अप्रतिम.
आम्हाला सांता खुप आवडला !!!!
आम्हाला सांता खुप आवडला !!!!
प्रचि नेहेमी प्रमाणे खासच!!!!!!!
एकदम कडक !!! खुपच छान !!
एकदम कडक !!!
खुपच छान !!
सुप्पर्ब!!! दक्षिणा +१
सुप्पर्ब!!!
दक्षिणा +१![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुंदर!
सुंदर!
अतुलनीय>> का रे जिप्स्याला
अतुलनीय>> का रे जिप्स्याला उगाचच बाबु ( आपला बागुलबुवा ना>>ही !!!
) दाखवतोयेस>>???
Pages