Submitted by रेव्यु on 5 January, 2013 - 12:40
मी व पत्नी मे १३ च्या पहिल्या वा दुसर्या आठवड्यात अमेरिकेतील येलोस्टोनला जायचे म्हणतोय. आम्ही सॅन फ्रँसिस्कोहून विमानाने जायचे म्हणतोय. सगळं पहायचा बेत आहे. कुणी गाईड करू शकाल का? रु. १५०००० चे बजेट आहे (पण एवढा पैसा कष्टाने जमवलेला आहे - व नीट खर्च व्हावा अशी इच्छा आहे). सॅन फ्रँसिस्कोहून सॉल्ट लेक सिटी पर्यंत विमानाने जायचे म्हणतोय. दुसरा काही स्वस्त पर्याय ( ट्रेन वगैरे) आहे का?
कुणी मार्गदर्शन कराल का?
विषय:
प्रांत/गाव:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
रेव्ह्यु इथे माहिती मिळाली
रेव्ह्यु इथे माहिती मिळाली नाही तर यासाठी बे एरीया California येथील माबोकरांशी संपर्क साधा ते बरीच माहिती देतील.
यलोस्टोन ला जायला सॅन
यलोस्टोन ला जायला सॅन फ्रान्सिस्कोला आधी येणे हा सर्वात चांगला पर्याय आहे की नाही हे नक्की माहीत नाही. कदाचित शिकागो बरे पडेल. सॉल्ट लेक सिटी ला थेट फ्लाईट भारतातून मिळाली तर स्वस्त पडते का पाहा.
दुसरे म्हणजे १,५०,००० मधे भारत अमेरिकेचे तिकीट आहे, का हे ते सोडून?
मे मधे येलो स्टोनला बर्फ
मे मधे येलो स्टोनला बर्फ पडलेलं असू शकतं आणि त्यामुळे काही भाग बंद असू शकतात.
(आम्ही मे एंड/जून मधे गेलेलो, तेव्हा बर्फ पडलेलं)
फाSSSर सुंदर जागा आहे - त्यामुळे बघणं हा उत्तम डिसिजन आहे...
जर मॉर्निंग ग्लोरी वगैरे बघायची असेल तर मे मधे जाण्यापेक्षा जुलै बरा पडेल असं मला वाटतं..
तुम्हाला खुप driving करायची
तुम्हाला खुप driving करायची तयारी ठेवावी लागेल. त्यापेक्शा चिनी लुलु ट्रिप ने जा.स्वस्त आणि मस्त. बरोबर खाण्याचे बरेच घेवुन जा.
https://en.lulutrip.com/index.php?m=scene_tour&sceneid=1&city=SFO&days=0
मे मध्ये यल्लो स्टोनला बर्फच
मे मध्ये यल्लो स्टोनला बर्फच बर्फ. सगळं पार्क बघणं मुश्किल आहे. पहिल्यांदाच व खास भारतातून येणार असाल तर मे ही योग्य वेळ नाही. जुलै/ऑगस्ट मध्ये जा.
मे पहिल्या वा दुसर्या
मे पहिल्या वा दुसर्या आठवड्यात येलो स्टोनला बर्फ पडलेलं असू शकतं आणि त्यामुळे काही भाग बंद असू शकतात किंवा खुप थंड असेल. हायकिंग करायचे असेल तर बर्याच ट्रेल बंद असतिल. थोडे उशिरा जाल तर चांगले बघायला मिळेल. मी एकदा मे end ला आणि एकदा July मधे गेले आहे. मे मधे बरेच थंड होते. July मधे छान होते.
सॅन फ्रँसिस्कोहून सॉल्ट लेक सिटी पर्यंत विमानाने जायचा एक ऑप्शन आहे किंवा सॅन फ्रँसिस्कोहून बोझेमन (माँटॅना) लासुद्धा जाउ शकता. जिथुन चांगलि डिल मिळेल ते बघा. कार रेंटल charges सुद्धा बघा दोन्हिहि ठि़काणि किति आहे ते.
पार्कमधे रहायचे असेल तर आतापासुन बुकिंग करुन ठेवावे लागेल. ६-७ महिने आधिपासुन लोक पार्क मधे बुकिंग करुन ठेवतात. लास्ट मिनिट मिळेल पण कोणि कॅन्सल केले तर मिळेल त्यासाठि सारखे फोन करावे लागतात.
http://www.yellowstonenationalparklodges.com/ हि वेबसाईट बघा. इथे पार्क मधले सगळे रहायचे /जेवायचे ऑप्शनस आहेत.प्रत्येक Restaurant चा मेन्यु सुद्धा आहे. मी ग्रँट विलेज आणि Old Faithful मधे राहिले आहे.दोन्हिही चांगल्या आहेत. मला लास्ट मिन बुकिंग मिळाले होते दोन्हि ठिकाणि.
येलो स्टोनला जाता आहात तर गँड टिटन जरुर बघा. खुप सुंदर आहे. Drive from Yellow Stone to Grand Teton is very beautiful. गँड टिटॉनला white water rafting चे ऑप्शन जास्त चांगले आहेत.
फारएंड्,नानबा,सुयोग्,प्रिया,र
फारएंड्,नानबा,सुयोग्,प्रिया,रायगड
धन्यवाद मंडळी-
आम्ही सॅन फ्रँसिस्कोला एप्रिल मध्येच येत आहोत.
तिथेच वास्तव्य आहे.
भारतात परत - परतीचे ३१ मेचे तिकिट आहे.मी दिलेल्या अंदाजात भारत्-अमेरिका-भारत हे तिकिट धरलेले नाही. तो खर्च फक्त या सहलीसाठीच आहे.
रहायला आम्ही कॅलिफोर्निया मध्ये असू.
त्यामुळे जून नंतर भेट अशक्य आहे-भारतात जूनच्या पहिल्या आठवड्यात परतणे अनिवार्य आहे.
या पार्श्वभूमीवर जरा मार्गदर्शन कराल का? विशेषतः हॉटेल बुकिंग वगैरे.
पुनः सर्वांचे आभार
ही टूर कशी वाटते
http://www.bundubashers.com/tour.php?id=tour-from-san-francisco-to-yello...
बादवे मी तिथे ड्राईव्ह करणार
बादवे
मी तिथे ड्राईव्ह करणार नाहिये.
ओके. मग एक टूर कंपनीची माहिती
ओके. मग एक टूर कंपनीची माहिती वरती सुयोग यांनी दिलेलीच आहे. माझ्या माहितीत अजून एक चायनीज ऑपरेटर आहे "लासन टूर्स", त्यांच्याकडेही चौकशी करा. ते थेट बसने नेतात.
http://www.lassentours.com/
लासन च्या सर्व टूर्स मध्ये
लासन च्या सर्व टूर्स मध्ये योसेमिटी आणि ग्रँड कॅन्यन इन्क्लुडेड आहेत.
मी दिलेली लिंक कशी वाटते?
ती लिन्क बघितली. साधारण इतर
ती लिन्क बघितली. साधारण इतर टूर्स च्या लिन्क्ससारखीच माहिती आहे.
एक मुख्य मिसिंग गोष्ट - सॉल्ट लेक सिटीवरून सॅन फ्रॅ. ला तुम्हाला परतीची फ्लाईट त्यात दिसत नाही. त्यासाठी तुम्हाला वेगळे वन वे तिकीट काढावे लागेल. ते तुम्हाला त्यांच्याकडूनच मिळते का पाहा. कदाचित तसे स्वस्त पडेल. नाहीतर स्वतंत्र जरा महाग पडेल ($२००+).
बाकी व्हेज फूड वगैरेही विचारून घ्या.
दोन्ही तिकिटे आम्हीच काढायची
दोन्ही तिकिटे आम्हीच काढायची आहेत- एस एफ ओ हून जायची आणि यायची पण जर टूर कन्फर्म केली तर ते स्वस्तात काढून देतात असं ते म्हणाले
>>येलो स्टोनला जाता आहात तर
>>येलो स्टोनला जाता आहात तर गँड टिटन जरुर बघा. खुप सुंदर आहे. Drive from Yellow Stone to Grand Teton is very beautiful.
अनुमोदन!
तिकडे गेल्यावर जमल्यास लोकल टूर घ्या. गाईड चांगली माहिती देतात, तसेच स्वस्तात पडतं. रहायचे असल्यास (केबिन वगेरे) ग्रँड टिटन्लाच राहणे. येलो स्टोनमध्ये हिंडतांना सल्फर?चा सतत वास पाठलाग करत राहतो. sensitive असाल तर नाक दाबूनच ठेवावे लागेल![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
ड्राईव्ह करणार नसाल तर चायनिज
ड्राईव्ह करणार नसाल तर चायनिज टुर शिवाय इतर विचार करु नका.