"सगळं विजोड असूनही संसार का टिकतात?"

Submitted by सौ. वंदना बर्वे on 30 December, 2012 - 21:51

"सगळं विजोड असूनही संसार का टिकतात?"

चिटक्या मोडता मोडता निलमने सोडलेली पुडी बऱ्याच वादांना जन्म देऊन गेली. तसं पहायला गेल्यास अनुरूपता ही कुठल्याच जोडप्यात असत नाही. बहुतांशी जोडपी ही विजोडच असतात. तशी ती असावी अशीच बहुतेक त्या नियंत्याची योजना असावी.

एकेकीचे अनुभव कथन तर फारच विलक्षण होते. "आमगेलो हो", "घो म्हणपाचो ना", "मावशेक ना म्हणचे पड्टा म्हणोन आवयन हय म्हटलें आनी हांव त्रासान पड्ले." इथपासून ते "सामको बोणेर", "भाणशिरें", "मात्तूय अक्कल म्हंटा ती ना" इथपर्यंत स्वत:च्या यजमानाची संभावना या बौध्दीक चर्चे दरम्यान झाली. आम्ही स्त्रिया जे संसारासाठी भोगतो ते सहसा मी पुरूष म्हणणाऱ्या कर्तृत्ववान माणसासही सहजी जमणार नाही. मला मान्य आहे की आम्ही सामाजिक क्षेत्रात, सांस्कृतिक क्षेत्रात, ज्ञानाच्या क्षेत्रात फारसं काही नाही करत. आम्ही लहान आहोत. आमचं कार्यक्षेत्र मर्यादित आहे. पण घर संभाळणारी स्त्री ही उच्चपदस्थ स्त्री किंवा कर्तृत्ववान स्त्रीपेक्षा दुय्यम असते, हे म्हणणं पटत नाही. भले गृहीणेचे प्रोब्लेम्स काम करणाऱ्या स्त्रीहून निराळे असतील पण प्रोब्लेम्स असतातच. अगदी लहान लहान अडचणी असतात. गृहीणीचा झगडा हा नित्यनूतन आणि नित्यनवा असतो. अनुरूपतेविषयी त्यांच्या प्रतिक्रिया त्यांना शब्दांच्या कोंदणात नाही मांडता येत. म्हणूनच त्यांच्या प्रतिक्रिया ह्या थेट येतात.

बहुतेक मैत्रिणींचा म्हणण्याचा सूर हा मी आहे म्हणून संसार चालला आहे असाच होता. बहुतांशी ते खरच आहे. जसे समाजाला सांसारिक स्त्रीच्या लहानसहान अडचणी समजत नाहीत तसेच लहानसहान त्यागही समजत नाही. गृहीणीला कायम गृहीतच धरलं जातं. त्यामानाने नोकरी, उद्योग करणारी स्त्री ही थोडी तरी दुय्यमतेच्या मर्यादा ओलांडते. काही ठिकाणी तर ती कमावते तरीही दुय्यमच राहते.

विजोड असण्याचे अनेकविध अनुभव ऐकायला मिळाले. सगळं नीट नेटकं, व्यवस्थित ठेवणाऱ्या स्त्रीचा जोडीदार कमालीचा अव्यस्थित. त्याला सकाळी बाहेर जाताना चपलांची आठवण होते तेंव्हा काल घरी परतल्यावर भिरकवटलेल्या होत्या हे नाही आठवत. अशा नवरोबाला, बायकोला किमान दिवसातून पंचवीस वेळा हाका माराव्या लागतात. नमुनेदार उदाहरण म्हणजे अंघोळीला जाताना टॉवेल घेउन न जाणं, अंग पुसायची वेळ झाली की मग त्याची आठवण होणं. दिवसभरात अशा गोष्टींची यादीच असते. कंजुष स्त्रीला उधळ्या नवरा मिळतो तर उधळ्या स्त्रीला कंजुष नवरा. सडपातळ स्त्रीला ढेरपोट्या जाड्या नवरा व सिक्स पॅक अ‍ॅब असलेल्या नवऱ्याला, वन पॅक थ्री टायर स्त्री. कुठे शारिरीक ठेवण विजोड असते तर कुठे विचार विजोड असतात. मला हाच प्रश्न नेहमी पडतो, असं पराकोटीचं विजोडत्व असूनही आधीच्या काळी संसार कसे वर्षानुवर्षे टिकून रहात? व थोड्या प्रमाणात आत्ताही कसे टिकून आहेत?

नवरा बायकोचा संसार टिकण्यासाठी परस्परांविषयी आदर असणे, प्रेम असणे अत्यंत आवश्यक आहे.

शिक्षण अहंकार निर्माण करतं. अहंकार हा आदराचा सर्वात मोठा शत्रू आहे. "त्यात काय विशेष, हे मी सुध्दा करेन" ही जोडीदाराबद्दलची भावनाच अनादराला जन्म देते. म्हणूनच जोडीदारामध्ये एकमेकांची कार्यक्षेत्रे भिन्न असली पाहिजेत. भिन्नत्व आदर निर्माण करतच असही नाही. उलटपक्षी असूया उत्पन्न होऊन दुय्यम स्थान देणे किंवा हेटाळणी करणे हेच प्रकार जास्त अनुभवास येतात. सुशिक्षित, नोकरी करणाऱ्या नवऱ्याला बायकोचा जास्त पगार खुपतो किंवा तिचे त्याच्या नोकरीच्या ठिकाणी असलेल्या पदापेक्षा, तिच्या नोकरीच्या ठिकाणी उच्चपदस्थ असणे असह्य होते. बऱ्याचदा अशा बायकोने केलेली साधी संसारोपयोगी सुचनासुध्दा नवऱ्याला "डॉमिनेटिंग" वाटते.

प्रेमविवाह हे संसार सुखी करतात हे देखिल काही प्रमाणात सत्य असलेलं गोड अर्धसत्य आहे. विवाहानंतर जोडीदाराविषयी निर्माण झालेलं प्रेम हे बऱ्याच अंशी संसार टिकवून ठेवतं. लग्नाआधी एकमेकांना समजून घेतलं, आवड निवड, स्वभाव अनुरूप आहेत की नाही ह्याची चाचपणी केली तर पुढे संसार सुखी होतो असा समज आहे. प्रेम असण्यात तशीच अपेक्षा असते. पण गंमत म्हणजे लग्नाआधी प्रेम असतं तिथे नेहमी चांगलीच बाजू बघितली जाते. लग्नानंतर जोडीदाराची वाइट बाजूच दिसू लागते. अवास्तव अपेक्षा व तडजोड ही प्राधान्यक्रमाने प्रेमात घडते. लग्न झाल्यावर संसारात प्राथमिकता बदलत जातात. लग्नाआधी चांद तारे तोडून आणायला तयार असणारा प्रियकर नवरा झाला की साधी कोथिंबिरीची जुडी आणायलाही कचरतो. "विवाहप्रेमात" म्हणजे विवाह झाल्यानंतर जिथे प्रेम निर्माण होतं ते अनेक सांसारीक अनुभवानी समृध्द होत जातं. जोडीदाराची ती सवय नाही, तसा स्वभाव नाही तरी देखिल दोघेही एकमेकांच्यासाठी आपापल्या सवयींना, स्वभावांना मुरड घालतात हीच भावना प्रेम जुळवत जाते. जोडीदार गुणदोषांपलिकडे जाऊन आवडायला लागतो. हे आवडणं, हेच प्रेम टिकतं. विजोडत्वाकडून अनुरूपतेकडचा हा प्रवास खडतर, भांडणानी भरलेला असला तरीही नात्यांची वीण घट्ट करणारा असतो. हे खरं "मी" पासून "आम्ही" होणं असतं, खरं अनुरूप होणं असतं.

चर्चेच्या ओघात नवऱ्याला नावं ठेवणाऱ्या मैत्रिणी, "तसं असेल तर नवऱ्याला सोडून का नाही देत?" ह्या प्रश्नावर बुमरॅंन्ग झाल्यासारख्या त्याचे चांगले गुण सांगू लागल्या. लोकांनी कायम वापरूनच घेतलेला "भाणशिरें" नवरा मुलांच्यावर जीवापाड प्रेम करणारा होता. व्यवहारशून्य "बोंडेर" नवरा बायकोच्या आजारपणात रात्र रात्र जागून काळजी घेणारा होता. तोडून टाकावं हा पर्याय न स्विकारण्यासाठी त्यांच्या पोतडीत बरेच अनुभव, गोष्टी होत्या. पदरही जळू नये आणि निखाराही विझू नये असा पदर होता.

"लोक काय म्हणतील", "इतकी वर्ष झाली लग्नाला आता काय तोडायचं नातं" असेही सूर होते. घटस्फोटितेकडे पाहण्याची समाजाची नजर ही दुषित असते. सामाजिक असुरक्षितता संसार टिकून राहण्याचं कारण होतं. काडीमोड झाल्यावर स्वत:च्या पायावर उभं राहण्याएवढं शिक्षण, तेवढी धमक नाही म्हणून संसार चाललेला होता. संसार तोडला तरी आणि टिकवला तरी हाल हे स्त्रीचेच होतात. तिलाच दोषी धरलं जातं. दारूपायी महिना पंचवीस हजार जोडून आणणाऱ्या नवऱ्याच्या बायकोच्या गळ्यात फुटका मणी होता. त्यातही पुन्हा दिवसरात्र मारबडव, मुलगा नाही म्हणून सासूचा छळवाद. ना सुटकेला केलेले संसार हे असून नसल्यासारखेच असतात. नाण्याची ही दुसरी बाजू विषण्ण करणारी होती.

अनुरूप नसणे हा सहजीवनातला, संसारातला दोष नाही. एकमेकांच्या कष्टाची जाणीव, तडजोडीची जाणीव, आदर, प्रेम हे संसार टिकवतात, फुलवतात.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<कष्ट भोगण्याचं कौतुक कशाला ?>
यात कुठे आलय कौतुक? कष्टांची जाणीव नाही असे म्हणणे म्हणजे कष्टांचे कौतुक असेल तर मग असेलही

<महात्मा फुले, सावित्रीबाई आणि धोंडो केशव कर्वे यांनी स्त्रीशिक्षणासाठी कष्ट घेतले यातच तुम्हाला चूक दिसत असेल तर खरंच गेट वेल सून.>
चूक दिसली असं मी कुठे लिहिले आहे. काळ ठरवेल असं म्हटलं. मुद्दाच मांडायचा तर फुले, कर्वे यांना अपेक्षित शिक्षण आज मिळतय का? हा आहे.
पूर्वग्रहामुळे आपण वाक्यही नीट वाचत नाही आहात. डबक्यातून बाहेर तुम्ही या. म्हणजे समजेल तुम्ही ज्याला जग समजताय तेच डबकं आहे

सौ. वंदना बर्वे

बागुलबुवाजी,

<आरोप वैयक्तिक होत चालल्येत.> सहमत.

माझेही चुकलेच मला मुद्दा मांडला पाहिजे. वैयक्तिक टीका नाही. क्षमस्व.

सौ. वंद्ना बर्वे.

तुम्हाला मुळात माझं पहिलं पोस्ट समजलंच नाहीये हे कळलं. समजलं असतं तर नक्की विरोध कुठे केलाय ते कळलं असतं. पण आता तुम्ही पुरेश्या हास्यास्पद होत चालला आहात. तस्मात मी वाचून मनोरंजन करून घेईन. लगे रहो....

निधपजी,

आपणासही उदात्तीकरणाबाबत लिहिताना माझा मुद्दा कळला होता असे वाटत नाही. मनोरंजन माझेही होत आहे. धन्यवाद.

सौ. वंदना बर्वे

बहुतांशी जोडपी ही विजोडच असतात. तशी ती असावी अशीच बहुतेक त्या नियंत्याची योजना असावी.
<<<<<<<

कोणतीही जोडी विजोड नसते. तुम्ही उदाहरण दिलेल्या विजोड जोडया या फक्त तुम्ही बाह्य रंगरुपावरुन ठरवल्या आहेत. ( उदा. नवरा जाड असला तर बायको बारीक). जेव्हा लग्नासाठी होकार दिला जातो मग तो प्रेमविवाह असु दे अथवा ठरवुन केलेला विवाह बाकी काही नाही बघितले तरी बाह्य देखाव्याची तरी अनुरुपता बघितली जाते. उदा. रंगरुप, शिक्षण, पैसा, बौद्धिक कुवत
त्यामुळे बहुतांशी जोडपी विजोड असतात हे काही पटले नाही उलट बहुतांशी जोडपी बाह्यतः तरी अनुरुपच असतात/ वाटतात.

गृहिणीला कायम गृहीतच धरलं जातं. काही ठिकाणी तर ती कमावते तरीही दुय्यमच राहते.<<<<<<<<<

गृहिणी व्हा नाहीतर उत्तम करियर करा ...... तुमची जागा काय आहे हे दुसरया व्यक्तिला दाखवुन देणे हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे. तुमच्या इच्छेविरुद्ध कोणीही तुम्हाला गृहित धरावे अशी वेळ तुमच्यावर येणे याला तुम्ही स्वतःच जबाबदार असता असे नाही वाटत का तुम्हाला ?..... किती दिवस असे दुसरयाला जबाबदार धरण्याची पराभुत वृत्ती बाळगायची.

शिक्षण अहंकार निर्माण करतं <<<<<<

शिक्षण अहंकार निर्माण करत नाही तर योग्य अयोग्याची जाणीव करुन देते. उलट हेकेकोर स्वभाव, माझे तेच खरे हि वृत्ती अहंकार निर्माण करते. अशिक्षीत माणुसदेखील अहंकारी असतो. बाकी तुमची संसार टिकवुन ठेवायची कळकळ समजते पण यासाठीदेखील योग्य शिक्षण आवश्यकच आहे.

प्रेमविवाह म्हणजे तो वाईटच असतो व ठरवुन केलेला विवाह हाच यशस्वी होतो असेही काही नसते. कोणाला कधी,कश्यामुळे एखादया व्यक्तिचे वागणे बोलणे आवडणार नाही याला त्याची स्वतःची वैचारिक, बौद्धिक,भावनिक स्थिती व आजुबाजुची परिस्थितीदेखील तेवढीच कारणीभुत असते.

ज्या स्त्रिया आधी नवरयाची वाईट बाजु मांडत होत्या त्याच पुन्हा त्याने केलेल्या चांगल्या कामाचीदेखील वाखाणणी करु लागल्या. सर्वसाधारणपणे सर्वच मनुष्यप्राण्याचा हा स्वभाव आहे कि गॉसीप करायला सुरुवात केली कि वाईट बाजुच सांगितली जाते. पण ज्यावेळी कोणी या गॉसिपला एकदम सिरियस घेउ लागते त्यावेळी मात्र लगेच बोलण्याच रोख बदलला जातो.

असो.... तुमच्या लेखनाला शुभेच्छा Happy

यशस्विनीजी,
<अशिक्षीत माणुसदेखील अहंकारी असतो.> सहमत.

सौ. वंदना बर्वे

वरदा, उत्तम पोस्ट. आवडलं.

संसार करायच्या ऐवजी जेव्हा `टिकवला' जातो तेव्हा बहुधा त्यापेक्षा `बेटर ऑप्शन' उपलब्ध नसतो.
>>> Happy

नीधपजी,

<बरं बाई तुमचंच खरं. आमचे अनुभव एकदम खोटे. तुम्ही म्हणता म्हणून तुमचंच खरं..>

नाही असे बिलकूल नाही.;तुम्ही चुकीच्या की मी चुकीची किंवा कोण बरोबर यापेक्षाही
"अनुरूप नसणे हा सहजीवनातला, संसारातला दोष नाही. एकमेकांच्या कष्टाची जाणीव, तडजोडीची जाणीव, आदर, प्रेम हे संसार टिकवतात, फुलवतात."
हा विचार महत्वाचा आहे असे वाटते. माझा हेतू तुम्हाला दुखवायचा किंवा अनादर करण्याचा बिलकूल नव्हता. तुम्ही मुद्दे अवश्य मांडा. माझ्या सभोवताली जी परिस्थिती दिसते, मला जे अनुभव येतात त्यावरून आणि संस्कारातून माझी मते बनतात. मी म्हणते तेच खरे आहे याव्यतिरिक्त दुसरी परिस्थिती नाही असा माझा बिलकूल दावा नाही. तसा माझ्या लिखाणाचा हेतुही नाही, पूर्वग्रहही नाही. कोणीही सर्वव्यापी लिखाण करू शकत नाही. त्याच माझ्याही मर्यादा आहेत. आज जो लेख लिहीला आहे तो कदाचित मीच आणखी एका वर्षाने वाचेन तेंव्हा मलाच तो हास्यास्पद वाटण्याची शक्यता नाकारता येत नाही. तुम्ही अवश्य माझे मुद्दे खोडा. मला जास्त आनंद होईल.

सौ. वंदना बर्वे.

निंबुडा,
तू मराठीची मास्तरीण-बिस्तरीन हायेस की क्वाय? माझ्या मास्तरिणची आठवण झाली ग तुझ्या र्‍हस्व/दीर्घच्या चुकांची यादी पाहून.

नीधपजी,

<मस्त आवडली कोलांटी उडी...
लगे रहो.>:G Biggrin Biggrin

आपणास ही कोलांटी उडी वाटली यातच आपला दृष्टीकोन समजला.

धन्यवाद.

सौ. वंदना बर्वे.

साती, अवनी, श्रुती - घर चालवणे यात व्यवस्थित मॅनेजमेन्ट, सराव अशा घटकांचाच भाग मोठा असतो. साती किंवा अवनीला घर चालवता येत नाही असं कानांचं मत असेल तर ते त्यांच्यापाशी. तुमच्याकडे त्याच्यासाठी अ‍ॅप्टीट्यूड किंवा आवड नसेल पण म्हणून ते न जमणार्‍यातलं कौशल्य अजिबात नाही. ही आवड/ अ‍ॅप्टीट्यूड माझ्याकडेही नाही पण मला व्यवस्थित घर चालवता येतं. >>>>> अगदी बरोबर. मलाही फारशी आवड आधी नव्हती पण आता सगळं अगदी सहज होतं. मी गृहीणी आहे पण म्हणुन मला कुणी गृहीत धरत नाही. मी ते होऊ दिलं नाही कधीच. मुळात मला "इतरांच्या दृष्टीनं चांगलं" व्हायचं नाही आणि बिचारी तर मुळीच नाही. मी माझ्या बाजुनी शक्य तितकं चांगल वागते सगळ्यांशी. कुठल्याही प्रश्नाच्या बाबतीत सगळ्या बाजुंचा विचार करून, नवर्‍याशी बोलुन मग निर्णय घेते त्यामुळे मी काहीतरी लेट गो करतेय (त्याग नाही) याची त्यालाही जाणीव असते मग गृहीत धरण्याचा प्रश्न येत नाही.

नित्यनवा लढा वगैरे मलाही काही पटलं नाहीये. सगळं नीट विचार करून व्यवस्थित पूर्वतयारीनिशी करत राहीलं तर धावपळ सुद्धा फारशी होऊ नये. कधीतरी होणारच. ते चालतय की.

ज्या<ना नोकरी टिकवण्यातल्या तडजोडी मान्य आहेत त्यांना संसार टिकवणं मान्य नाही हे पाहून काहीच आश्चर्य वाटलं नाही. समानता किंवा समता निसर्गालाच मान्य नाही. आपली ताकद ओळखून तडजोकरनंण निसग्सर्गतःच सर्व प्राणिमात्रांना शिकवलेलं असतं. उपजत असतं<

नवरा हा पुरुष आहे. त्ञाची शारीरीक ताकद पाहून त्याला बाहेरची कामे दिली आहेत. त्याला मूल होत नाही हे निसर्गाने ठरवलं आहे. मूल मादीला होतं हे पाहून प्राचीन मानवाने निसर्गाला अनुकूल जीवनशैली अंगिकारली आहे.

नवरा हा पुरुष आहे. त्ञाची शारीरीक ताकद पाहून त्याला बाहेरची कामे दिली आहेत. त्याला मूल होत नाही हे निसर्गाने ठरवलं आहे. मूल मादीला होतं हे पाहून प्राचीन मानवाने निसर्गाला अनुकूल जीवनशैली अंगिकारली आहे.

कलोक निसर्गाच्या विरुद्ध का जातात ? आपला सनातनप्धर्म तर निसर्गाच्याजवळ जानारा नाही का ? त्याच्या उलट वागणे हे प्रगत कसे याचे उत्तर मला सापडले

कलोक निसर्गाच्या विरुद्ध का जातात ? आपला सनातनप्धर्म तर निसर्गाच्याजवळ जानारा नाही का ? त्याच्या उलट वागणे हे प्रगत कसे याचे उत्तर मला सापडले

याला कारण शिक्षण. शिक्षण पाश्चात्य अंमलाखाली आहे. त्यातून कॉन्व्हेंटमधे शिकल्याने ब्रेनवॉशिंग होते आहे. म्हणूनचपुरुषांण्वर टीका करणे, नव-याला आदर न दाखवमर्यादेपनाच्या नैसर्गिक मर्यादांबाहेर काही करू पाहणे याला स्वातंत्र्य समजले जात आहे. प्रगत संस्कृती समजले जात आहे.

माझे म्हणणे बाकि आहे अजून.

अमूक तमूक डेर्स घालू नका यात चूक काय आहे ?
निसर्गाने ठरवले आहे. जिथे स्त्रीपुरुष अल्पवस्त्रात राहतात तिथसासमस्या नाही. पण आपंअ ती रानटी संस्कृती सोडून दिली आहे. आता आपण कपडे घालायला शिकलो आहेउलप्रचलित च्गालीच्या विरुद्ध काही घडत असेल तर ते लक्ष वेधून घेते. दिल्लीच्याप्घतनेनंतर सिनेमातलं स्त्री देहाचं प्रदर्शन हेच मुख्य कारण असल्याचं आता या आंग्लाळलेल्या विद्वानांनीही मान्य केलं आहे

इंटरनेटवर नको ते सगळं दर्शन होतंय. भावना चाळवल्या जातील नाही तर काय ? या चंगळवादी जीवनशैलीची ही अपत्यं आहेत. तडजोडीत खरी मजा असते. हे आयुष्याच्याशेअवटी कलतं. ज्यांना संसार टिकवता येत नाहीत त्यांचे विचार भरकतत जातात. त्यांनी मनःशांतीसाठी प्रयत्न करावेत. फायदा होतो. निसर्गाच्या पुढे कुनाचं काय चाललं आहे ?

समाप्त

इंटरनेटवर नको ते सगळं दर्शन होतंय. भावना चाळवल्या जातील नाही तर काय ? या चंगळवादी जीवनशैलीची ही अपत्यं आहेत. तडजोडीत खरी मजा असते. हे आयुष्याच्याशेअवटी कलतं. ज्यांना संसार टिकवता येत नाहीत त्यांचे विचार भरकतत जातात. त्यांनी मनःशांतीसाठी प्रयत्न करावेत. फायदा होतो. निसर्गाच्या पुढे कुनाचं काय चाललं आहे ?

समाप्त

बाब्या Rofl

वरच्या स.मा च्या पोस्टी खोडसाळपणाने इतरांना उचकवायला टाकल्या आहेत हे उघडच आहे तेव्हा इग्नोर मारा आणि चर्चा (करावीशी वाटलीच तर!) चालू ठेवा

Pages

Back to top