Submitted by चिन्नु on 28 December, 2012 - 05:09
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
३० मिनिटे
लागणारे जिन्नस:
तूर डाळ - १ वाटी
मुग डाळ - १/२ वाटी
हरबरा डाळ - १/२ वाटी
लसूण - १/२ वाटी किंवा २०-२५ पाकळ्या
जीरे - १ टे. स्पून
तिखट - ३ टे. स्पून / इच्छेनुसार
मीठ
क्रमवार पाककृती:
सर्व डाळी मंद आचेवर गुलाबी रंग येइपर्यंत भाजून घ्या.
जीरे भाजून घ्या.
डाळी थंड झाल्यावर तिखट, मीठ, लसूण पाकळ्या, जीरे घालून मिक्सरमध्ये बारीक पावडर करा.
वाढणी/प्रमाण:
चटणी/पोडीच्या वाढपीप्रमाणे
अधिक टिपा:
गरम इडली, तूप आणि ही पोडी म्हणजे वाह!
दोसे, पेसरट्टू बरोबर या पोडीची चांगली गट्टी जमते.
पोळीबरोबर तेल टाकून, बरोबर कांदा/पात.. yummy!
गरम भात, तूपाबरोबर पण छान.
पोरीयल टाईप किंवा परतून केलेल्या कोरड्या भाज्यांमध्ये लज्जत वाढते या पोडीने.
ही पोडी वर्षभर टिकते.
माहितीचा स्रोत:
सासुबाई
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सह्ही!
सह्ही!
ए पोडी नको म्हणूस ग मला
ए पोडी नको म्हणूस ग

मला केरळची आठवण येते
खरेच तो. पा. सु. लसूण
खरेच तो. पा. सु. लसूण घातलेली पोडी, मला माहीत नव्हती. मी कोरड्याच खाल्ल्या आहेत.
लसुन कच्चाच घालतात? मग वर्षभर
लसुन कच्चाच घालतात? मग वर्षभर कसे टिकेल
शैतै थँक यू. रिया, पोडी
शैतै थँक यू.
रिया, पोडी म्हणजे पावडर गं. केरळच का, माझ्या मते दक्षिण राज्यात सगळीकडे कोरड्या चटणीला पोडीच म्हणतात.
रच्याकने, पोडी वेगळं आणि पोssssssडी वेगळं बर्का
दिनेशदा लसूण मिक्स होतो
दिनेशदा लसूण मिक्स होतो पावडरीमध्ये. ओलसरपणा जाणवत नाही.
वर्षा, अगं आंध्रामध्ये लहान मुलांच्या घरी मस्ट असा पदार्थ आहे हा. ही पोडी टिकते पण केल्याबरोबर लगेच संपते - कारण इडली, दोसे, वडे सर्वांबरोबर लागतेच शिवाय भाज्यांमध्येही टाकतो.
हो. लसूण कच्चा घालतात.
हो. लसूण कच्चा घालतात.
ह्यालाच गन पावडर म्हणतात
ह्यालाच गन पावडर म्हणतात का???
गन पावडरमध्ये अजून काही घालत
गन पावडरमध्ये अजून काही घालत असावे असे वाटते. नक्की माहीत नाही, साधनाताई.
चिन्नु येस रच्याकने मी हा
चिन्नु येस


रच्याकने मी हा प्रकार खुप खाल्लाय केरळमधे असताना
माझ्या रूममेट कडे असायचा
आणि आम्ही डोस्यासोबत खायचो
एकदम यम्मी
(No subject)
अरे वा मस्तच !! ए पण ह्यात
अरे वा मस्तच !!
ए पण ह्यात चिंच, गूळ आणि सुकं खोबरं पण घालतात ना !!
नेटवर गन पावडर पाहिले त्यात
नेटवर गन पावडर पाहिले त्यात तुर डाळीच्या जागी उडीद डाळ आहे, बाकी रेसिपी सेम.
मला आज सकाळीच आठवण झालेली ह्या डाळवाल्या चटणीची. थँक्स चिन्नु, आज करुन पाहिन.
नाही गं जयुताई, ही पोडी
नाही गं जयुताई, ही पोडी कोरडीच असते.
गन पावडरबद्दल थँक्स साधनाताई.
मस्त आणि सोपी कृती.
मस्त आणि सोपी कृती.
तो पप्पुलं शब्द कित्ती गोड
तो पप्पुलं शब्द कित्ती गोड आहे!
थँक्स अकु. निंबे
थँक्स अकु.
पप्पु/पप्पुलु म्हणजे डाळ in telugu.
निंबे
चटणी पूड छानच आहे. पोडी
चटणी पूड छानच आहे.
पोडी म्हणजे आपली पुडी किंवा पूड. पूर्वी आयुर्वेदिक औषधांची घरच्याघरी पुडी केली जात असे. नंतर नंतर कागदाचा सुकाळ झाल्यावर आणि ओबडधोबड हत्यारांच्या जागी चांगले खलबत्ते,उखळ-मुसळे, करवती अशी सुघड साधने उपलब्ध झाल्यावर वैद्यलोक ही 'पुडी' स्वतः करून कागदात बांधून देऊ लागले. त्यालाही आपण पुडीच म्हणू लागलो. पुडी हा शब्द दाक्षिणात्य भाषांतून मराठीत आला आहे. मुळिगापुडी तर प्रसिद्धच आहे.जुन्या मराठी पुस्तकांतून पुडी हा शब्द पूड या अर्थाने वापरलेला आढळतो.तसेही मराठीत ईकारान्त स्त्रीलिंगी शब्द बोलीभाषेत अकारान्त होतात.उदा. उदकशांति केली ऐवजी उदकशांत केली, शंकराची पिंडी ऐवजी शंकराची पिंड, भाकरीच्या ऐवजी भाकर,पांढरी(जमीन)च्या ऐवजी पांढर इ.
गनपावडर वेगळी. त्यामधे सुक्या
गनपावडर वेगळी. त्यामधे सुक्या मिरच्या वापरतात. लालभडक रंग हा त्याचा युएसपी. (नायतर गनपावडर नाव कशाला असते??)
बंगलोर मैसूरकडे जास्त करतात.
अकु, तू जे म्हणते आहेस ती चटणीपुडी (च चटईतला नव्हे!!!) वेगळी. त्याची रेसिपी आहे माझ्याकडे. पण मी कधी केली नाही. आमच्याकडे आत्याच्या घरून वर्षभरासाठी येते ही चटणीपुडी.
चिन्नू, आता कधीतरी तुझ्या या रेसिपीने चटणीपुडी करून बघेन.
मला पण पोडी म्हणजेच गन पावडर
मला पण पोडी म्हणजेच गन पावडर असं वाटत होतं इतके दिवस.
थँक्स हीरा नंदु, नक्की करून
थँक्स हीरा
नंदु, नक्की करून बघ.
सिंडी, पोडी हा खूप general शब्द आहे. प्रांतानुसार ही पोडी बदलत जाते. माझ्या एका मामींच्या घरी यात धने आणि उडदडाळ पण घालतात. नंदुने सांगितले तसे सुक्या मिरच्यापण घालतात काहीजण.
मस्त.
मस्त.
गन पावडरबद्द्ल बोलणारे साउथी
गन पावडरबद्द्ल बोलणारे साउथी नेहमी तिच्या तिखटपणाचे किस्से सांगत. माझ्या ऑफिसातली एक साउथी शेअर करण्यासाठी वेगळे डोसे आणि तिला खाण्यासाठी गनपावडरवाले डोसे आणायची. कधी विचारले तर तुम्ही खाऊ शकणार नाही म्हणुन सांगायची. ती अजुन एका कसल्यातरी मुळाचे लोणचे आणयची, तेही ती कधी शेअर करायची नाही. 'तुम्ही खाऊ शकणार नाही' हेच सांगायची. (माईनमुळाचे तर नव्हे??)
थँक्स सुलु. साधनाताई, तुम्ही
थँक्स सुलु.
साधनाताई, तुम्ही शेअर केल्यामुळे मला बरीच माहिती मिळत आहे.
छानच.
छानच.
थँक्स जागु
थँक्स जागु
चिन्नु, ईडली आणि पप्पुलं पोडी
चिन्नु, ईडली आणि पप्पुलं पोडी + खोबरेल तेल माझ आवडत खाद्य.
मी स्पारमधून आणते पप्पुलं पोडी.
धन्स आता घरी बनवेन.
sure आरती
sure आरती