Submitted by समीर चव्हाण on 27 December, 2012 - 03:09
संपादित संपादित संपादित संपादित संपादित संपादित संपादित संपादित संपादित संपादित संपादित संपादित संपादित संपादितसंपादितसंपादितसंपादितसंपादितसंपादितसंपादितसंपादितसंपादितसंपादितसंपादितसंपादितसंपादितसंपादितसंपादितसंपादितसंपादित
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुंदरच. ऐलपैलवर वाचले
सुंदरच.
ऐलपैलवर वाचले होतेच.
तुकारामाविषयी एकदा चर्चा करायची आहे आपल्याशी
समीर, जबरदस्त कलेक्शन म्हणावे
समीर,
जबरदस्त कलेक्शन म्हणावे लागेल हे! अनेक धन्यवाद हे येथे शेअर केल्याबद्दल.
प्रत्येक ओवी, ओळ विचारप्रवर्तक वाटली.
अजून येऊद्यात अशी विनंती.
धन्यवाद!
-'बेफिकीर'!
समीर, धन्यवाद इतकेच म्हणू
समीर, धन्यवाद इतकेच म्हणू शकेन...खूप खूप धन्यवाद!!
अगदी समोर बसून एक एक शब्द ऐकला, असे संवादमय लिखाण झालेय..
तुकोबांच्या ओव्यांचे आजी रसाळ वर्णन करायची... (कधीमधे अपभ्रंशित ओव्या गाऊन दाखवायची, तेव्हा एक शब्द समजत नसे, पण गोडवा जाणवायचा) कधीतरी आपणही वाचूच त्या... असे नेहमी वाटायचे.. आज अगदी मेजवानी झाली... ध्यान लागल्यासारखे वाटले, हा लेख वाचताना
पुनश्च धन्यवाद!
छान लिहिलेत समीरजी, पुनःपुनः
छान लिहिलेत समीरजी,
पुनःपुनः तुकाराम.. दि पु चित्रेंची आठवण झाली.. कवी असण्याचा इतका अभिमान,इतके अवधान..
गाथेत हात बुडवला की दरवेळी नवी रत्ने, नव्यानव्या पैलूंचे झळाळ.
एक न कळणारी व्याकूळता.
सगळ्यांचेच आभार. माझ्या
सगळ्यांचेच आभार.
माझ्या लेखाचा मेन रेफरन्स भालचंद्र नेमाडेंचा (चंद्रकांत पाटील अनुवादित) तुकाराम, आणि अर्थातच तुकारामाची गाथा आहे. चित्रेंचा तुकाराम अलीकडेच वाचायला घेतला आहे. दुर्दैवाने त्यांनी ओव्या वा ओव्यांचा क्रमांक न दिल्याने इंग्रजी अनुवादाशी मूळ ओवीचा मेळ घालणे कठीण होत आहे. त्यांचे चयन पाहायला हवेच.
असो, आपल्या सगळ्यांच्या प्रतिसादामुळे अधिक कामाला पुरेसा उत्साह मिळेल ह्याबद्दल शंका नाही.
धन्यवाद.
समीर चव्हाण
क्या बात है समीर, आपल्या
क्या बात है समीर,
आपल्या अजूनही लेखनाच्या प्रतीक्षेत...
तोवरि तोवरि शोभतील गारा | जंव
तोवरि तोवरि शोभतील गारा | जंव नाही हिरा प्रकाशला ||
तोवरि तोवरि शोभतील दीपिका | नुगवता एका भास्करासी ||
तोवरि तोवरि सांगती संताचिया गोष्टी | जंव नाही भेटी तुक्यासवे ||
असे थोर तुकोबाराय - त्यांच्याबद्दल, त्यांच्या अभंगाबद्दल तुम्ही अतिप्रेमाने लिहिलेत - दंडवतच तुम्हाला.
मला वैयक्तिक त्यांची ही ओळ फार म्हणजे फारच आवडते -
"तुका म्हणे चवी आले | जे का मिश्रित विठ्ठले ||"
.....राम कृष्ण हरि ||
मस्त ! ओवी !
मस्त ! ओवी !
चांगला उपक्रम आणि चांगला धागा
चांगला उपक्रम आणि चांगला धागा सुरु केला आहे. अभिनंदन.
एक गोष्ट थोडीशी टोचली -
"त्याचे विचार, त्याच्या कविता, त्याचे आयुष्य"
"तुकाराम समजला "
"तुकाराम समजून घेणे "
"तुकाराम नि:संदेह महाकवी होता"
तुकारामांना आयुष्य|त कधी मान मिळाला नाही. आता त्यांच्या मागे, आपण किमान त्यांचा आदरार्थी उल्लेख करू शकतो का?
आता अचानक तुकाराम आपल्यापुढे प्रकट झाले, तर आपण त्यांना "अरे, कुठून आलास बुवा?" असे म्हणू का?
साक्षात शिवाजी महाराज पण त्यांना कधी "तुकाराम, पाय पुढे कर पाहू, नमस्कार करतो .." असे म्हणाले नसतील.
...
आगाऊपणाबद्दल आधीच क्षमस्व.
वाटले तर पुसून टाका.
मुद्दा पटण्यासारखाच आहे आकाश
मुद्दा पटण्यासारखाच आहे आकाश नील! पण मला असे वाटते की तुकारामांवर अतीव प्रेम जडल्यामुळे आलेले संबोधन असणार ते. मागे कोणीतरी (कणेकर की कोणी) असेच महाराजांबद्दल लिहिले होते. की 'मला छत्रपती, महाराज अश्या पदव्या लावून संबोधण्यापेक्षा शिवाजी म्हणणे हे अधिक आदराचे व आपुलकीचे वाटते'. अर्थात, ज्याचे त्याचे मत म्हणा!
अजून वाचायला आवडेल!
अजून वाचायला आवडेल!
आकाशनील, एखाद्या थोर
आकाशनील,
एखाद्या थोर व्यक्तीचा उल्लेख एकेरी दोन प्रकारे होउ शकतो..
१.त्या व्यक्तीचा उपमर्द करण्यासाठी
२.ती व्यक्ती आपल्याला अगदी जवळची वाटत असेल तर प्रेमाने..
प्रस्तुत लेखात तो उल्लेख क्र २ मुळे झाला आहे यात मला तरी शंका वाटत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख "आमचा शिवबा" असा केला तर तो त्यांचा अपमान होइल का?
संतश्रेष्ठ तुकारामांबद्दल किती वाचले, बोलले, ऐकले तरी कमीच वाटते. फारच सुंदर लेख. कृपया आणखी लिहा.
तुका म्हणे आता
करी कृपादान
पाउले समान
दावी डोळा..
आकाश नील: आगाऊपणाबद्दल आधीच
आकाश नील:
आगाऊपणाबद्दल आधीच क्षमस्व.
वाटले तर पुसून टाका.
त्यात कसला आला आगाऊपणा.
तुम्ही म्हणता त्या गोष्टीवर मी खूप विचार केला.
पाहिलेतर आपण बोलतो-लिहितो ती भाषा तुकारामाची आहे.
का माहीत नाही, तुकाराम मला फार निकटचा वाटतो,
अगदी आईसारखा.
खरे आहे. श्री. बेफिकीर, मनोज
खरे आहे. श्री. बेफिकीर, मनोज आणि समीर यांचे म्हणणे पण योग्य आहे.... त्याला थोडासा संतवचनांचा आधारहि आहे - जसे "ती विठाई" किंवा "तो राम, तो गणपती वगैरे."
पण काही संतांविषयी "तो" शब्द मला जमतच नाही उदा. रामदास स्वामी, ज्ञानेश्वर, गोंदवलेकर महाराज, अक्कलकोट स्वामी, नवनाथांपैकी कोणीही , गाडगे बाबा, ..... जाऊ दे.
पण या बाबतीत तुमचे म्हणणे पटले ....
तुमचा अभ्यास चालू ठेवा आणि लिहित चला .....
उत्तम लेख ,शिवाय आलेले
उत्तम लेख ,शिवाय आलेले प्रतिसाद देखील अतिशय संयत आहेत.
पुढील लेखनाच्या प्रतिक्षेत.
तुकोबांचे नाव घेणे हीच मोठी
तुकोबांचे नाव घेणे हीच मोठी पवित्र गोष्ट आहे - केव्हाही घ्यावे, कसेही घ्यावे - पण घ्यावे जरुर.
हा गे अनुभव | भक्तिभाव भाग्याचा |
केला ऋणी नारायण | नव्हे क्षण वेगळा |
घालोनिया भार माथा | अवघी चिंता वारली |
तुका म्हणे वचन साटी | नाम कंठी धरोनि ||
अशा महात्म्याचे नाम कंठात धारण करणे - म्हणजे परमेश्वराचेच स्मरण करणे.
समीर साहेब, तुम्ही तुकारामाची
समीर साहेब,
तुम्ही तुकारामाची एकच बाजू सांगताय.
बायको मरो... मुलगा मरो... देवा. अशा अर्थाची एक ओवी त्यांच्या गाथेत आहे. आशा करतो की तुम्ही ती वाचलात. आता मला ज्या संताचे विचार असे होते तो महान कसा काय बुवा? आजूनही ब-याच गाथा आहेत ज्या खुपच आक्षेपार्ह आहेत. कुणाला शंका असल्यास मी परत एकदा गाथा वाचायला घेतो म्हणजे इथे संदर्भा सहित टाकता येतिल. पण ज्यानी तुकाराम गाथा वाचली त्याना मात्र हे नक्कीच माहित आहे.
लालशाहः मी इथे तुकारामातील
लालशाहः
मी इथे तुकारामातील महान कवी पुढे ठेवीत आहे, संत अनुषंगाने येत राहणे, डोकावणे स्वाभाविक आहे.
तसेच आपण त्याला संत बनवलेय, हे विसरायला नको.
तो म्हणतो, कुठून थोरपण आले, अगोदर मी होतोतरी. आता तेही नाही.
तुम्ही तुकारामाची एकच बाजू सांगताय.
हे बरोबर नाही. एका ओवीत, जी वर दिली आहे, तो म्हणतो माझ्यासाठी देव मेला.
असे त्याला आयुष्याच्या कुठल्याश्या टप्प्यावर वाटणे योग्यही असावे.
माणूस उदात्त भावना घेऊन अवघं आयुष्य काढू शकत नाही.
तसेही जन्मजात तो ज्ञानी नसतो. त्याचा प्रोग्रेस पळापळाला होत राहतो.
कवीचे विचार तुटकपणे न पाहता संर्दभ समजून एकत्रितपणे पाहिले जावे.
जडणघडणीच्या काळातले लिखाण, करप्ट वर्शन शोधणे जवळपास अशक्य असल्याने आहे तसा वाचावा लागतो.
तुकारामाची कविता ही मानवी कृती असूनही अदभुत, अकल्पनीय आहे.
तुकारामाच्या शिव्यांबद्दल बोलायचे तर शिव्या देणे असंस्कृत हे एकोणिसाव्या शतकातले संस्कारशोध आहेत.
अलीकडेच समजले की ज्ञानेश्वरीतही शिवी आहे.
तुकारामाचे महात्म्य एकाच ओळीत सांगता येईल की जी भाषा आपण बोलतो ती
ना ज्ञानेश्वरांची ना एकनाथांची ना रामदासांची तर आमच्या तुकोबारायाची आहे.
(कृपया संत/कवी म्हणून ज्ञानेश्वर-एकनाथ-तुकाराम-रामदास ह्यांची तुलना अपेक्षित नाही. प्रत्येकजण आपापल्या जागी मोठाच आहे. माझा मुद्दा आहे बोलीची भाषा).
असो. धन्यवाद.
समीर चव्हाण
लालशाह जी अशाप्राकारच्या
लालशाह जी
अशाप्राकारच्या मुद्द्यावर की अमुक अमुक ओवीत अमुक म्हणणारा तुकाराम तमुक कसे म्हणाला वगैरे माझी एका अभ्यासकासोबत (माझा काहीही अभ्यास नसताना ...!!)चर्चा झाली होती मी त्यानाही हेच स्संगीतले जे खाली लिहिले आहे
_______________________
एक लक्षात घेणे जरूरी आहे की आधी तुकाराम एक कवी आहे मग एक संत !! त्याने कविता करायचीच आहे म्हणून ती केली संत व्हायचे म्हणून आवर्जून कधीच काहीही केले नाही
असो असे कसे हा तुमच मुद्दा रास्तच आहे
एखाद्या कवीकडून असे होणे शक्य आहे ,साहजिकही !!
कवी वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या भावनिकतेत वावरतो एकदा केलेला खयाल दुसर्याबाजूनेही करून पाहत असतो त्यामुळे असे होणे शक्य आहे
अशावेळी तो जे सांगतो ते एक शाश्वत सत्य प्रतीत करणारे असे काही आहे का अन् तो जे म्हणतो आहे ते म्हणण्याशी तो त्या क्षणी प्रामाणिकतेने तादात्म्य पावू शकला अहे का हे मुद्दे महत्त्वाचे असतात
_______________________
मी स्व्तःस एक कवी मानतो ...माझ्या अनेक शेरातही मला जेव्हा असेच काहीसे आढ़ळले त्यावर विचार करत होतो तेव्हा वर लिहिले आहे त्याच बाबी माझ्या मनात आल्या होत्या ...त्यानंतर त्या महोदयांशी जी चर्चा झाली त्यात मी हा मुद्दा उपस्थित केला .
एका कवीच्या भवनिकतेतूनच नव्हे तर मानसिकतेतूनही हा विचार मी करू शकलो ..बाकी काही नाही !!
___________________________
धन्यवाद !!!!
_____________________________
समीरजी हे ऐलपैल वर वाचलेच होते
इथे प्रकाशित केल्याबद्दल समस्त मयबोलीकरांतर्फे अनेकानेक धन्स !
___________________________
अजून येवूद्यात !!
________________________
मान-अपमान गोवे | अवघे
मान-अपमान गोवे | अवघे गुंडाळुनी ठेवावे ||
हेचि देवाचे दर्शन | सदा राहे समाधान ||
शांतीची वसती | तेथे खुंटे काळगती ||
आली उर्मी साहे | तुका म्हणे थोडे आहे ||
शांतीची वसती | तेथे खुंटे
शांतीची वसती | तेथे खुंटे काळगती ||
काय जबरदस्त कल्पना आहे.
ओवी माहीतकरून दिल्याबद्दल धन्यवाद.
समजण्यास सोप असं निरुपण
समजण्यास सोप असं निरुपण असलेली तुकाराम गाथा कुणी सुचवू शकेल का?
समजण्यास सोप असं निरुपण
समजण्यास सोप असं निरुपण असलेली तुकाराम गाथा कुणी सुचवू शकेल का? >>> मुळात गाथा समजण्यास अगदीच सोपी आहे... तिला निरूपणाची गरज नाही, वाचून अनुभव करावा असे लिखाण आहे ते.
तुकारामांच्या एखाद्या ओवीवरून आपल्याला हवे तसे अर्थ लावून ... काहीतरी भम्पक निष्कर्ष काढून ... असा काय तो ? असे मोघम प्रश्न विचारणे, ही अत्यंत संकुचित बुद्धीची पावती आहे.
समीर म्हणतात तसे
"कवीचे विचार तुटकपणे न पाहता संर्दभ समजून एकत्रितपणे पाहिले जावे."
उदा...
बरे झाले देवा बाईला कर्कशा | बरी ही दुर्दशा जनांमध्ये ||
ही ओवी वाचून ,बाई विषयी तुकारामांचे अत्यंत वाईट विचार होते असे एखादा म्हणेल परंतु हा संपूर्ण अभंग तुकारामांच्या तत्कालीन मनोवस्थेचे उत्तम वर्णन करणारा आहे हे अभंग वाचल्यावरच कळते.
तुकारामांनी जे लिहले ते उस्फुर्तपणे .. त्यांना कवी व संत व्हायचे नव्हते. विरक्तीने त्यांना संतकवी बनवले असेच त्यांच्या लिखाणातून सातत्याने आले आहे.
कळले माझा तुज नव्हे रे आठव
काय काज जीव ठेवू आता
आता कोण करी माझा अंगिकार
कळले निष्ठुर झालासी तू
....... असे देवाला म्हणणारा पुढे
माझे लेखी देव मेला | असो त्याला असेल|| असे म्हटल्यास नवल ते काय?
शामः पहिला मुद्दा सोडला तर
शामः
पहिला मुद्दा सोडला तर आपल्याशी सहमत आहे.
मुळात गाथा समजण्यास अगदीच सोपी आहे... तिला निरूपणाची गरज नाही, वाचून अनुभव करावा असे लिखाण आहे ते.
गाथेचा मोठा भाग समजण्यास सोपा नक्कीच आहे.
मात्र पूर्ण गाथा नक्कीच नाही.
गाथा समजण्यास सोपी आहे असे विधान त्या काळी कोणी केले असते तर कदाचित (?) ठीक ठरले असते.
गाथा लिहिली गेली ह्याला काही शतके झाल्याने अनेक शब्दांचे अर्थ लागत नाही.
काही शब्दांचे अर्थ तर साधारणतः १८५० मध्ये लिहिलेल्या मोल्सवर्थमध्येही सापडत नाही.
अर्थात शब्दांचे अर्थ समजूनही कधी-कधी कविता समजत नाही.
कारणे बरीच असू शकतात. तेव्हाच्या चालीरीती वा ऐतिहासिक वा भौगोलिक पार्श्वभूमी ह्यांचीही गरज पडू शकते.
तसेही कवीच्या सगळ्याच कविता समजायला हव्यात ही अपेक्षाही अवाजवी ठरावी.
भाग-२ मध्ये काही अश्या कविता दिल्या आहेत की त्यांचा अर्थ विचारांती लागला नाही.
स्वतःच्या मर्यादांची जाणीव आहेच.
धन्यवाद.
समीर