मार्टिन आउअर : दोन कविता
भाषा
त्यांच्या भाषेत प्रेमाला एकही शब्द नव्हता.
त्यांना भक्तिची सप्तपदी अवगत होती
आदराचे अकरा स्तर ते जाणून होते अन्
जाणून होते ते परिचयाच्या वीस पातळ्या...
ते म्हणायचे,
परस्परसंबंधांच्या असतात सतरा छटा अन्
परस्परावलंबित्वाचे असतात प्रकार आठ...
लग्नासारख्या घटनेलाही त्यांच्या भाषेत एक वाक्प्रयोग होता...
आणि परस्परलाभ सुचवण्याची मात्र त्यांच्याकडे बत्तीस आडवळणे होती.
(तसे म्हटले तर त्यांना भक्तीचे सात टप्पे माहिती होते,
आदराचे अकरा स्तर ते जाणून होते अन्
जाणून होते ते एकमेकांशी ओळखीच्या वीस पातळ्या...
ते म्हणायचे,
माणसांतले संबंध सतरा अवस्थांमधून जातात अन्
माणसं एकमेकांवर आठ प्रकारे अवलंबून असतात.
एकमेकांचा फायदा ? बत्तीस शब्द होते त्यांच्या भाषेत ! आणि हो,
लग्नासारख्या घटनेलाही त्यांच्या भाषेत एक वाक्प्रयोग होता...
फक्त
त्यांच्या भाषेत प्रेमाला एकही शब्द नव्हता.)
वरील कविता आउअरच्या जर्मन काव्ययंत्रात वाचली पण टिपून ठेवण्याचे लक्षात आले नाही. ती नंतर इंग्रजी यंत्रात सापडल्याने तीच आवृत्ती देतो. कोणाला जर मूळ जर्मन कविता सापडली व इथे ती दिली तर आभारी राहीन. कवितेचे नाव मी दिलेले आहे. इंग्रजी आवृत्ती देणे काही कारणाने आवश्यक वाटते -
In their language they had no word for love.
They knew seven degrees of devotion,
eleven grades of respect,
twenty levels of acquaintance,
seventeen stages of alliance,
eight variants of dependence,
one expression for marriage
and thirtythree terms for mutual advantage.
-- Martin Auer
मूळ जर्मन कविता (रैना, आभार) -
In dieser Sprache gab es kein Wort für Liebe.
Sie kannten sieben Abstufungen von Ehrfurcht
und elf Grade des Respekts,
zwanzig Stufen der Bekanntschaft
und siebzehn Nuancen von Zugehörigkeit,
acht Varianten von Abhängigkeit,
einen Ausdruck für Ehe,
und zweiunddreißig Umschreibungen für gegenseitigen Nutzen.
-- Martin Auer
-------------------------------------------------------
मुलांना देण्याच्या भेटवस्तूंची कविता
पक्ष्याच्या अंड्यासारखा दगड एक
तर एखादा दगड जणू हाडूक एक
एखादं गोगलगायीचं घर पाठीचं
आतून लिंपण ज्याला मातीचं
कधी एखादा दगड सुरीसारखा
तर कधी एखादा किडाच वाटेल
कधी फांदीला फुटलेली फांदी
न जाणो, कुठे खजिना भेटेल ! *
एखादा दगड अगदी शुभ्रधवल द्यावा
कधी एखादा काळा कुळकुळीत न्यावा
(पण त्याच्यावर थुंकून तो छान चकचकीत करायचा बरं का !)
मूळ कविता -
Kindergeschenke
Ein Stein wie ein Vogelei,
ein Stein wie ein Knochen.
Ein Schneckenhaus,
aber mit Erde innen.
Ein Stein wie ein Messer,
ein Stein wie ein Käfer.
Eine Astgabel
um Schätze zu finden.
Ein ganz weißer Stein
und ein ganz schwarzer.
(Aber man muß darauf spucken, damit er glänzt.)
-- Martin Auer
* फांदीला फुटलेली फांदी म्हणजे साधारण गलोलीसारखी. याचा माती उकरण्यासाठी वापर करून खजिने शोधता येतील.
सर्व सूचनांचे हार्दिक स्वागत.
स्लार्टी,
स्लार्टी, मूळ भाषा कवितेत मार्टिन ऑयर यांनी 'स्तरांविषयी' आणखीन उलगडून सांगितले आहे का? ते वाचायला जास्त आवडेल.
स्लार्टी, प
स्लार्टी,
पहिलं भाषांतर खूपच मस्त जमलं आहे.. दुसरीही छान.
In dieser Sprache gab es
In dieser Sprache gab es kein Wort für Liebe.
Sie kannten sieben Abstufungen von Ehrfurcht
und elf Grade des Respekts,
zwanzig Stufen der Bekanntschaft
und siebzehn Nuancen von Zugehörigkeit,
acht Varianten von Abhängigkeit,
einen Ausdruck für Ehe,
und zweiunddreißig Umschreibungen für gegenseitigen Nutzen.
ही मूळ जर्मन. स्लार्ट्या- जरा घाईत आहे. नंतर व्यवस्थित वाचते.
मुलांना
मुलांना नेण्यासाठीचे प्रकार काय मस्त आहेत एकदम! मुलांनाच कशाला मुलींना पण अन त्यांच्या आयांनापण आवडतील.
पहिली कविता सावकाश वाचावी लागेल परत.
स्लार्टी प
स्लार्टी
पहिल्या कवितेचे मराठी भाषांतर आवडले. (ट्रान्सक्रिएशन ला मराठी शब्द माहीत आहे का कुणाला?)
सही. पहिली
सही.
पहिली कळल्यासारखी वाटतेय...त्या संख्या कशा होतात ते माहीती करुन घ्यायला उत्सुक !
दुसरी , डोक्याला टँजंट जाताजाता शिवून गेली
(संदर्भासहित स्पष्टिकरणाच्या प्रतिक्षेत! )
मस्त.
मस्त.
धन्यवाद, स्लार्टी.
या कविता (unlike समीर आणि बाळ) कोणत्याही संदर्भाशिवाय पोचल्या म्हणून आवडल्या.
स्लार्टी-
स्लार्टी- दुसरीचा अनुवाद खूप आवडला. मुलांना असली गिफ्टस नेणारी पाव्हणी आपल्या सुद्धा संग्रही असायला हवीत.
ह्या
ह्या आवडल्या आणि पटल्या पण इथे मुलांना म्हणजे लहान मुलांना असा अर्थ आहे असे मला वाटते. मुलं/मुली असा भेदभाव नसावा.
छान
छान भाषांतर. मार्टिन आउअरची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद!
- गौरी
मस्त
मस्त स्लार्ट्या..
~~~~~~~~~
सही कविता
सही कविता दोन्ही! पहिलीत जबरदस्त उपरोधिकपणा आणि दुसरीत अफाट कल्पनाशक्तीला वाव
वा!
दोन्ही
दोन्ही कविता मस्तच.. पहिली जास्त आवडली..
________________________
अपने हाथोंकी ल़कीरोंपर इतना विश्वास मत करना,
जिनके हाथ नही होते उनकी भी तकदीर होती है
दोन्ही
दोन्ही आवडल्या. पण पहिली एकदमच सुंदर.
>>>
फक्त
त्यांच्या भाषेत प्रेमाला एकही शब्द नव्हता.
>>>>>
एकदमच खल्लास.
स्लार्टि,
स्लार्टि, छान आहेत भाषांतरं.
भाषा: मार्टिन प्रेमाचा उल्लेख पहिल्याच ओळीत करुन ते हातवेगळे करतो व मुख्य मुद्दा परस्पर फायद्याचा वाटला. तुझ्या कवितेत मात्र कसा प्रेमाला शब्द नाही हे मुख्य वाटते. मुळ जर्मन मध्ये असलेल्या ३२ चे ईंग्रजीत व मराठीत ३३ झाले आहे. ५६ पण चालले असते.
७ स्वर, ११ पायर्या, २० थाट हे कुठवर ताणता येऊ शकेल?
--------------------------------------------------------------
... वेद यदि वा न वेद
सर्वांना
सर्वांना धन्यवाद.
मी अनुवाद इंग्रजी कवितेवरुन केला कारण ती मूळ कविता मला मिळेना... याच कारणासाठी मी इंग्रजी कविता दिली होती. रैनाने दिलेल्या कवितेवरून पुन्हा अनुवाद करत आहे. (हे त्यातील शब्दांच्या योग्य अनुवादासाठी... ३२ चे ३३ होणे वगैरे)
महत्त्वाचे म्हणजे - वैभव, आशिष, bull's eye ! स्वैर अनुवाद किती स्वैर असावा ? अनुवादकाला किती स्वातंत्र्य असते ? वैभवने वापरलेला transcreation शब्द अतिशय सूचक आहे. तर यावर काही चर्चा व्हावी अशी अपेक्षा असल्याने ते मुद्दामच केले होते.
बाकी माझ्या डोक्यात तरी आकड्यांचे हे अर्थ नाही आले. मला ते 'सत्राशे साठ' सारखे वाटले. पण आशिष म्हणतो तसे ताणता येऊ शकेल.
***
Finagle's First Law : If an experiment works, something has gone wrong.
स्लार्ट्य
स्लार्ट्या- तुझ्या पानावर सारखं सारखं लिहीणे प्रशस्त वाटेना- पण आशिषला जो प्रश्न पडलाय तोच मलाही, आणि आता असं वाटतय की तुलाही.
आकड्यांच्या अर्थावर मी खूप विचार केला आणि बरेच गुगलले. पण फार काय हाती लागले नाही. तर मलाही तू म्हणतोस तसा सत्राशेसाठ असाच निष्कर्ष काढावा लागला. पण कवीला विचारायचे धारिष्ट्य करता येईल का ?
आणि आश्चिग म्हणतायेत ते पर्फेक्ट- पहिल्या ओळीतला सारांश पूर्ण कवितेला वेगळ्या पातळीवर नेतो.
तसेच जर्मन मधील ३२ ईंग्रजीत ३३ का झाले? आशिषच्या यादित १२ स्वर आणि २२ श्रूतीही. सात जन्म आणि ३३ कोटी देव, XX लक्ष ( नक्की किती) फेरे ?
तसेच gegenzeitige Nutzen ला चपखल शब्द मिळाला तर कविता सुफळ संपूर्ण होईल.
In dieser Sprache- चा अर्थ या भाषेत की त्यांच्या भाषेत. ? ईंग्रजी अनुवादच जरा कच्चा वाटतो तो भावाच्या दृष्टीने.
रुपांतर,स्वैर अनुवाद, भावानुवाद, अनुवाद, भाषांतर यांच्या सीमारेषा किती धुसर आहेत?
ईंग्रजी
ईंग्रजी अनुवादच जरा कच्चा वाटतो तो भावाच्या दृष्टीने. >>> असे मलाही वाटते.
कवीला आकड्यांचे विचारतो. gegenzeitige Nutzen बद्दलही अनुमोदन. आणखी विचार करतो
***
Finagle's First Law : If an experiment works, something has gone wrong.
8 वसु, ११
8 वसु, ११ रुद्र, ३३ देव असेही होऊ शकते (Brihadaranyaka Upanishad, III.IX.1 ).
http://aschig.blogspot.com/2006/12/on-multitheism.html
कवीला तसे अभिप्रेत असावे असे वाटत नाही
एस्कीमोज बर्फाकरता २२ शब्द वापरतात म्हणे (अर्बन लिजेंड). प्रेमाकरता किती वापरतात पहायला हवे.
दुसरी कवीता उगीचच मागे पडते आहे. ती पण जिनीयस आहे (Ein Stein)
--------------------------------------------------------------
... वेद यदि वा न वेद
आकड्यांमा
आकड्यांमागे काही अर्थ असेल असे मलाही वाटले नव्हते. अगदी व्हेग, रँडम किंवा वर तुम्ही म्हणता तसे १७६० या अर्थानेच मला ते आकडे वाटले होते. ते असे असल्यामूळेच 'उपरोध' हा फोकस 'जपला' गेला आहे असे वाटले.
आता या आकड्यांचे अर्थ आणि काहीतरी 'सिग्निफिकन्स' असू शकतात, हे अश्चिगच्या पोस्टवरून पहिल्यांदाच कळले. पण असे आकड्यांचे काही अर्थ निघाले, तर अर्थ (किंवा कवितेचा 'उपरोध' हा फोकस. 'आत्मा' म्हण पाहिजे तर. मला नीट सांगता येत नाहीये.) बदलेल का?
दुसरीही कविता आवडली.
--
कसा चंद्र! कसं वय! कशी तुझी चांदणसय..!
कसा निघेल इथून पाय! वेड लागेल, नाहीतर काय!
मला तर
मला तर वाटले कि त्या आकड्यांतच कवितेची खरी खोलाइ असेल....स्लार्टी, कविचे अभिप्रेत मत जाणुन घ्यायला आवडेल.
भक्तिचे सात टप्यांच्या शोधत असताना हे गवसले
१.Subheccha (desire for truth)
२.Vicharana (investigation, enquiry)
३.Tanumanasi (thread-like mind)
४.Sattvapatti (attainment of purity)
५.Asamsakti (utter detachment)
६.Padartha (unbroken awareness of the Absolute Self)
७.Turiya (the fourth state beyond waking, dream and sleep, beyond self and non-self)
दोन्ही कविता एकत्र दिल्यामुळे दुसरीकडे दुर्लक्ष होत आहे.
एखाद्या
एखाद्या साहित्याचा आपण जेंव्हा अनुवाद करतो तेंव्हा ते साहित्य आपल्याला रुचले असते कळलेले असते. इथे अनुवादकाला साहित्य पुर्णपणे कळले नाही. त्यात कवितेचा अनुवाद करताना ती कविता पुर्णपणे हृदयात उतरावी लागते. मला कळले नाही न कळलेल्या कवितेचा अनुवाद करण्यामागचे कारण. उणेबिणे लेखायचे नाही.. खरी प्रतिक्रिया देतो आहे.
प्रेमाला तर अनेक शब्द आहेत, प्रत्येक भाषेमधे आहेत. हा कवी कुणाच्या भाषेबद्दल बोलतो आहे कळले नाही.
बी, थोडे unfair
बी, थोडे unfair वाटते हे. एखादी कविता आवडणे हे रुपांतरा करता पुरेसे असावे. आणि कोणती गोष्ट पुर्णपणे कुणाला कळते? तसेच येथील एक महत्वाचा भाग हा त्या कवीची ओळख करुन देणे आहे. ईतरांना वेगळा अर्थ लागल्यास त्याचे पण स्वागत केल्या जातेच की!
--------------------------------------------------------------
... वेद यदि वा न वेद
माझा जर्मन
माझा जर्मन भाषेचा काहीच संबंध नाही परंतु, मार्टिन आउअर च्या या दोन्ही कविता खूप भावल्या..!!
मुख्यत्वे करुन, दुसरी मांडलेली कविता तर अप्रतीम आहे. लहान मुलांवर ज्यांचा सखोल अभ्यास आहे त्यांना ही नक्की भावेल..!!
मी वेगळ्या
मी वेगळ्या अर्थाचीच वाट होतो पण नाही लिहिला कुणी. मला नेमकी पहिल्या कवितेची पहिली ओळ शेवटी लिहिली तो भाग खूपच आवडला. मी जर अनुवाद केला असता तर ही ओळ अखेरीस घेतली असती.
मला असं वाटतं की अलिकडे मायबोलिवर मराठी व्याकरणावर जी चर्चा आणि वाद होत आहेत त्यामुळे यानी ही कविता इथे लिहिली. कारण कवितेचा विषय भाषा असा आहे. लहान मुलांचाही विषय शीर्षकात देता आला असता.
भाषेवर मला बहिणाबाईंची 'माझी माय सरोस्वती' ही कविता सर्वाधिक आवडते. वरील अनुवादीत कवितेत आकड्यांचे अर्थ हे जर्मन संस्कृती शिकली तरच बहुतेक कळलीत. आपल्यात नाही का आपण अठरा-वीसे दारिद्र्य, सप्तपदी, सात जन्म, हिन्दी नौ दो ग्यारा असे शब्द/वाक्प्रचार वापरतो.
माझी माय
माझी माय सरसोती मले शिकविते बोली,
लेक बहिनाच्या मनी किती गुपित पेरली.
ही कविता पुर्ण हवी आहे. आभारी आहे..
बहिनाबाईं
बहिनाबाईंच्या काही कवितांमधे काही शब्द शुद्ध का आहेत? वर 'शिकविते 'हा शुद्ध शब्द आहे. मला वर्हाडी/खांदेशी मराठी भाषेचा जो अनुभव आहे त्यानुसार शिकवितेचे अशुद्ध रुप शिकोते असे होते.
अरे संसार संसार या कवितेत देखील 'तेंव्हा मिळते भाकर' अशी ओळ येते. ही ओळ माझी आई जेंव्हा गाते ती तेंव्हा 'तवा मिळते भाकर' तर माझी मावशी 'तवा मियते भाकरे' अशी म्हणते. तेंव्हाचे अशुद्ध रुप तवा असे होते. मी अशुद्ध रुप म्हणतो आहे पण खरे तर तसे न म्हणता वर्हाडी/खांदेशी रुप असे म्हंटलेले जास्त योग्य होईल.
.
.
काय समजू
काय समजू मी . चा अर्थ?
अरे बी ती
अरे बी ती चर्चा मला इथे योग्य वाटली नाही!(तुझी विपु पहा!)
Pages