धागा काढणे, वर टिकवणे ही कला आहे

Submitted by वर्षा_म on 21 December, 2012 - 04:49

सकाळी सकाळी सरांची गझल उघडली.. म्हटले एव्हडे प्रतिसाद.. म्हणजे छानच असेल... तर अरे देवा....... Uhoh

http://www.maayboli.com/node/39853

==========================================
धागा काढणे, वर टिकवणे ही कला आहे!
ही हवीशी वाटणारी शृंखला आहे!!

ते कुठे वृत्त? मतला कोठे?
आज माबोच्या मानगुटीला गझला आहे?

का न व्हाव्या चित्रदर्शी माझिया गझला?
ही न नुसती लेखणी, हा कुंचला आहे! >>> नो चेंज.. गझल स्मायलींनी चित्रदर्शी केली आहे Proud

घडी पानाची विस्कटली, ना नयन शांती.....
आयडी माझाच फक्त चांगला आहे!

कोणताही खेळ खेळी मायबोली आता.....
सगळ्यांना छळण्याचाच झाला फैसला आहे!

द्रृष्ट कुणाची लागली माझ्याच आयडीला;
जीव आताशी माझा टांगला आहे!

स्मायलीची हौस तुजला, मी असा साधा!
ठेव तू नावे मला, मी वेडावला आहे!!

जोम लेखनात माझ्या तोच पूर्वीचा.....
मान्य, हा नवखेपणा आता संपला आहे!

सोस आहे, आव आहे गझल लिहिण्याचा!
आता कुठे गझलेच्या दिशेने रांगला आहे?

वाचते माझी मतीही भाषणे सारी!
सोहळा (आयडीच्या) श्रद्धांजलीचा रंगला आहे!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वर्षा .. मस्तंय !!

नवीन विकसित तंत्रानुसार आधी गझल हा पहिला भाग. मग प्रतिसादकांकडून गझलकाराचा समाचार हा दुसरा भाग आणि शेवटी गझलकाराकडून प्रतिसादकांचा समाचार हा सिक्वेन्स पाळला जायला हवा.

तुला माहिती आहे का, तू डिफॉल्ट "महान" आहेस ते...
कसलं झालंय हे विडंबन यार्र.. खल्लास्स!
_/\_

सोस आहे, आव आहे गझल लिहिण्याचा!
आता कुठे गझलेच्या दिशेने रांगला आहे?
-------- छान.... रांगणे हे पालथा पडण्याची पुढची पायरी आहे.

प्रतिसादांमधे रंगीबेरंगी स्मायली दिसत नाहीत. Sad

>>छान.... रांगणे हे पालथा पडण्याची पुढची पायरी आ>><<
अरे बापरे.. अजून रांगणेच?
... मग दुडूदुडू चालणे.. मग पळणे.. बर्‍याच पायर्‍या मायबोली बघणार तर... Proud

मस्तच !!

छान.... रांगणे हे पालथा पडण्याची पुढची पायरी आहे.>>>> अभिनव विचार !! सहमत !!
रंगीबेरंगी स्मायली दिसत नाहीत>>>>१० पिवळे एक पिस्ताकलर एक निळा स्माईली आहे उदयजी फक्त ते माबोबाह्य नसल्याने तुम्हाला तसे वाटत असावे (अतिपरिचयात् अवज्ञा म्हणतात ते हेच)

__/\__
Biggrin Biggrin

<<घडी पानाची विस्कटली, ना नयन शांती.....
आयडी माझाच फक्त चांगला आहे!
>>
धन्य आहे............

Rofl
__/\__

प्रतिसादास कारण की.... शिर्षक वाचा रे Wink

धन्स सगळ्यांना Happy

दिनेशदा मी अजुन (लिखाणाच्या) बालवाडीतच आहे.. फोन पण नाही माझ्याकडे Proud

रांगणे हे पालथा पडण्याची पुढची पायरी आहे.>>>> अभिनव विचार !! सहमत !!
>>> Rofl

मी अजुन (लिखाणाच्या) बालवाडीतच आहे.. फोन पण नाही माझ्याकडे >> वर्षे Lol

@सतीश देवपुरकर.

सतीशा, नकोस पाडु ह्या वेगानी गजला !
मायबोली तुझ्याच नावानी भरली आहे !!

काढुन द्या रे याला कोणी स्वतंत्र ग्रुप !
टाळण्याचा तूला तो च मार्ग उरला आहे !!