श्री. कौतिकराव ठाले-पाटील यांचे भाषण

Submitted by चिनूक्स on 13 May, 2009 - 14:22

महाबळेश्वर येथे पार पडलेल्या ८२व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाच्या वेळी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्री. कौतिकराव ठाले-पाटील यांनी केलेले भाषण.

KTP.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चिनूक्स, धन्यवाद.
अत्यन्त रटाळ भाषण.
इन्दिरा सन्त यांना सुमार लेखकाकडून पराभव स्विकारावा लागला

पण हा पराभव साहित्य मन्डळाच्या तात्कालीन सभासदांनीच केला होता ना?
यावरून ते सभासद गाजर पारखी होते असा अर्थ निघतो.
साहित्य संमेलनाच्या दिवन्गत अध्यक्षांवर संमेलानाच्या व्यासपीठावरून टीका करू नये हे साधे तारतम्य नाही या माणसाकडे.
निम्मे भाषण तर झालेल्या अध्यक्शान्च्या जातिनिहाय वर्गवारीतच सम्पले.

चिनूक्स धन्यवाद येथे उपलब्ध करून दिल्याबद्दल! अत्यंत स्पष्ट आवाज ऐकू येतो, कसलाही व्यत्यय, खरखर नाही. एकूण तांत्रिक दर्जा अतिशय छान आहे.

इतर कोणत्याही (भारतीय) भाषेपेक्षा सर्वात जास्त म्हणजे १३२ वर्षांची परंपरा मराठी साहित्य संमेलनाची आहे आणि या काळात ८२ संमेलने झाली हे ऐकून चांगले वाटले.

मी पूर्वीची भाषणे फारशी वाचलेली नाहीत (ऐकलेली तर नाहीतच), पण हे भाषण विचित्र वाटले ऐकताना. साहित्य, लेखक, प्रकाशक, वाचक यांच्यापुढची सध्याची आव्हाने, संधी, संमेलनाच्या काळातील साहित्यविषयक घडामोडी कसलाच उल्लेख नाही.

आणि ते सुमार लेखक कोण? आधी मुळात ते सुमार हे ठरवायचा हक्क यांना कोणी दिला?

ती जातीनिहाय वर्गवारी सांगण्याचे औचित्यही कळले नाही. आणि मुळात त्यातून त्यांना नक्की संदेश काय द्यायचा होता प्रेक्षकांना ते ही.

नंतर एक धागा असा वाटला की साहित्यिकांनी संमेलनाच्या माध्यमातून त्यावेळच्या राजकीय, सामाजिक घडामोडींबद्दल काय केले. पण आढावा पूर्ण होता की यांना आठवलेल्या किंवा सोयीच्या असलेल्या गोष्टींबद्दल भाष्य होते माहीत नाही. ते पुलं आणि यशवंतराव चव्हाण वगैरे गोष्टींचा आत्ता उल्लेख करायचे काय कारण होते ते ही कळत नाही.

दरवर्षीची भाषणे साधारण अशीच असतात का? जरा जाणकारांनी थोडे लिहीले तर बरे होईल.

>>आणि ते सुमार लेखक कोण?
रमेश मंत्री. कोल्हापूर सम्मेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणूकीत त्यांनी इन्दिरा संत यांचा पराभव केला होता.

चिनुक्स- पहिल्यांदा तुझे आभार हे इतकं तांत्रिकदृष्ट्या निर्दोष उपलब्ध करुन दिल्याबद्दल.
भाषणापेक्षा सनई आवडली. Proud
अभिव्यक्तिस्वातंत्र्याला पानातल्या मीठायेवढे स्थान शेवटी शेवटी दिलेले पाहून गंमत वाटली.
कुलकर्णींनी म्हणल्याप्रमाणे निम्म्याहून अधिक भाषण जातीनिहाय वर्गवारीत संपले.

फारेंडाच्याच शंका मला पण.
-आणि "खर्चिक जवाबदारी" स्वागताध्यक्ष (बहूतांश बहूजनसमाजवादी) न कुरकुरता घेतो म्हणजे काय ?
-मराठी साहित्याचा थोडक्यात आढावा घेणे अपेक्षीत असते का?
- हे भाषण शंभर वर्षांनी कोणाला सापडले तर त्यावरची चर्चा म्हणजे - साहित्य म्हणजे उदाहर्णार्थ ज्यांची जात वगैरे.............. अशीच शेवटी जाईल.
- कुठल्याही चळवळीचा अंत असाच भीषण का होतो? अपक्षय! कोंडा बाजूला करुन गहू पाखडावा म्हणलं तर गहू कमी, कोंडाच जास्त. कोंड्याच्या मांडा करुन भाक-या करणारे त्या चितेवरसुद्धा भाजायला कमी करणार नाहीत. ४ टाळकी एकत्र आली की अस्सेच होणार म्हणलं, तर चळवळीच झाल्या नाहीत तर ते एक अजूनच भयावह. असो. (आजचे साहित्य ही उद्याची रद्दी आहे, की आजची रद्दी हे उद्याचे साहित्य ?)
Light 1 Light 1

इथे एक स्पष्टीकरण द्यावसं वाटतं. या भाषणात महामंडळाने झालेल्या गोंधळाबद्दल आपली भूमिका स्पष्ट करणं गरजेचं होतं. ठाले-पाटील यांनी त्यासंबंधी काहीच वक्तव्य केलं नाही. शिवाय रमेश मंत्री यांबद्दल केलेले विधान, आनंद यादव यांच्या भाषणाची प्रत न देणे यावरून त्यांच्या भाषणादरम्यान काही मिनिटे गोंधळ झाला. तो भाग आयोजकांच्या सूचनेवरून काढून टाकला आहे.

कौतिकरावांच्या कृपेने मंडळाच्या सदस्यांना फुकट अमेरिका वारी घडली असल्याने त्यांनी या आचरट भाषणाला आक्षेप घेतला नसावा.
या संमेलनाला शासन दरवर्शी पन्चवीस लाख रुपये देते.
त्यामुळे मंत्री,आमदार यांना बोलावून त्यांची हुजरेगिरी करणे भाग पडते.
इतर अनेक संमेलने अनुदानाशिवाय होत असताना या संमेलनाला अनुदान देण्याची गरज नाही.
आणी हे अनुदान बन्द झाले तर अनुदानावर डल्ला मारण्यासाठी घुसलेले निघून जातील आणी संमेलन
"साहित्यिक" होईल.

यापूर्वी महामंडळाचे काही अध्यक्श [उदा. अष्टेकर] विविध कारणांमुळे वादग्रस्त ठरले होते पण ह्या पदाची जी अप्रतिष्ठा ठाले-पटलांच्या काळांत झाली ती अभूतपर्व आहे! साण्गलीच्या साहित्य संमेलनांत पूर्वाध्यक्श श्री. अरुण साधु यांना मानहानीकारक वागणूक मिळाली तेम्व्हा ह्या महमंडळाच्या अध्यक्शांनी सईस्कर मौन पाळले होते. नंतर त्यांना दिलेल्या वेलेपेक्शा कितीतरी जास्त वेळ हे गृहस्थ तारे तोडत राहीले होते. शेवटी संमेलनाच्या उदघाटकांच्या - मा. राष्ट्रपतींच्या- ए.डी.सींना त्यांच्या शर्टाचे टोक ओढून थांबवावं लागलं होते!

यंदाचे वर्ष अमेरिकेतल्या संमेलनामुळे गाजले. शेवटी ठाले-पाटलांना लोकमताच्या रेट्यापुढे माघार घेऊन सॅन होसे चं संमेलन अधिकृत अखिल भारतीय साहित्य संमेलन नसून 'विश्व मराठी संमेलन' असल्याचं जाहीर करावं लागलं. मग रीतसर वार्षिक संमेलन घेण्याचंही ठरवावं लागलं. तेच हे महाबळेश्वरचं 'फ्लॉप' संमेलन! मुळांतच 'पटावरचं श्राद्ध' या पद्धतीनं हे संमेलन 'उरकून' घेण्याचा महमंडळाचा विचार होता. त्यांत नियोजित अध्यक्श - श्री. आनन्द यादव- यांच्या विरुद्ध वारकरी संप्रदायाने पुकारलेल्या आंदोलनामुळे ह्या संमेलनाला अगदी वेगळंच वळण लागलं आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा मुद्दा ऐरणीवर आला. यादव ह्या प्रकरणांत अगदी एकाकी पडले आणि शेवटी कंटाळून यादवांनी अध्यक्शपदावर आरुढ होण्यापूर्वीच आपला राजीनामा देऊन टाकला! पण महामंडळाने ह्या प्रश्नावर कोणतीच भूमिका घेतली नाही. अगदी यादवांचा राजीनामा स्वीकारला अथवा नाही हे सुद्धा महामंडळाने जाहीर केलं नाही. 'तो राजीनामा स्थगित ठेवला आहे' असं वक्त्यव्य ठाले-पाटलांनी केलं! त्याचा काय अर्थ होतो ते फक्त तेच जाणोत!

खरे तर महामंडळाच्या अतर्क्य, अनाकलनीय आणि बोटचेप्या 'विश्वामित्री' पवित्र्यामुळेच यादवांनी राजीनामा देऊन संमेलन निर्विघ्नपणे पार पडण्याची वाट मोकळी करून दिली. त्यामुळे हे संमेलन अध्यक्शांविनाच साजरे झाले! पूर्वाध्यक्श प्रा. हातकणंगलेकरांनाही ठाले-पाटलांनी अपमानित केल्यामुळे तेही माण्डवाबाहेरूनच परत फिरले. पूर्वाध्यक्शांनी संमेलनांतून अवमानित अवस्थेंत निघून जाण्याचा हा प्रकार लागोपाठ दुसर्‍या वर्षी घडला. महामंडळाला आजी अध्यक्शांचीच जिथे पर्वा नाही तिथे अर्थातच पूर्वध्यक्शांशी काही तेणं-घेणं असण्याचा प्रश्नच उद भवत नाही!

यादवांचे अध्यक्शीय भाषण त्यांच्या अनुपस्थितीत का होईना पण वाचून दाखवावे ही मागणी पूर्ण करण्याचेही सौजन्य ठाले-पाटलांनी दाखवले नाही! एव्हढेच नव्हे तर त्या भाषणाच्या प्रती वितरीत करायलाही नकार दिला. त्या ऐवजी त्यांचं रटाळ आणि दिशाहीन भाषण उपस्थितांना ऐकावं लागलं. त्यांतही श्रोत्यांनी अडथळे आणून यादव-प्रकरणाबाबत महमंडळाने आपली भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली असताही ठाले-पाटलांनी मौन सोडलं नाही. अशा कणाहीन आणि वावदूक अध्यक्शांचे किती म्हणून 'कवतिक' करावे?

आपल्या प्रदीर्घ आणि रसहीन भाषणांत ह्या महाशयांनी आपल्या जातीयवादी मनोवृत्तीचं मात्र पुरेपूर दर्शन घडवून दिलं. 'पारंपारीक मानसिकता' हा नवा शब्दप्रयोग त्यांनी ब्राम्हण जातींत जन्मा घेतलेल्या साहित्यिकांना उद्देशून केला. बाकी सर्व जण पुरोगामीत्वाचे पाईक असल्याचा जावईशोधही त्यांनी लावला!
याचा अर्थ असा होतो की लेखक किंवा कवीचे विचार [आणि आचार] नव्हे तर त्याची जन्मजात ह्या एकमेव निकषावर तो [किंवा ती] पुरोगामी आहे अथवा नाही हे ठरवलं जाणार! एखाद्या जातीयवादी संघटनेच्या किंवा पक्शाच्या पुढार्‍याने असलं आचरट वक्तव्य केलं तर एक वेळ आपण समजू शकतो पण महामण्डळाच्या अध्यक्शांनी असल्या हीन, असाहित्यिक आणि त्याज्य वृत्तीचं जाहीर प्रदर्शन सम्मेलनाच्या व्यासपीठावरून करावं हे मराठी भाषेचं आणि संस्कृतीचं दुर्दैव आहे! हा महाराष्ट्राच्या अस्मितेवरचा कलंक आहे!

आज प्रकर्षाने आठवण होते, ती आचार्य अत्र्यांची! एकूणच गेली काही वर्षं ज्या पद्धतीनं महामण्डळाचा कारभार ठाले-पाटिल आणि त्यांचा कंपूनं चालवला आहे, आणि ज्या प्रकारची मुक्ताफळं उधळली जातायत त्यावर आचार्य अत्र्यांनी कठोर कोरडे खेचले असते आणि ह्या वावदूकरावांना दिवसा-ढवळ्या घराबाहेर तोंड काढण्याची चोरी झाली असती! पण आज ते धारिष्ट्य दाखवणारा एकही संपादक किंवा लेखक हयात नाही.

कौरवांच्या दरबारांत द्रौपदीला विवस्त्र करण्याचा निंदनीय प्रकार दुर्योधन आणि दु:श्शासन करत होते त्यावेळी कौरव-पांडव दोन्ही पक्शांचे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ वीर माना खाली घालून स्तब्ध बसले होते. त्यावेळी द्रौपदीला जे वाटलं असेल तेच आज मराठी संस्कृतीला वाटत असेल!

-बापू करंदीकर

धन्यवाद रे चिन्मय. Happy

भाषण आधीच ऐकलं होतं, परंतू कौतिकरावांच्या कंटाळवाण्या भाषणाने कंटाळा येऊन प्रतिसाद द्यायचा राहून गेला होता. आता वरील प्रतिसाद वाचण्याच्या निमित्ताने पुन्हा हे पान उघडले. Happy

--
कसा चंद्र! कसं वय! कशी तुझी चांदणसय..!
कसा निघेल इथून पाय! वेड लागेल, नाहीतर काय!

करंदीकर तुमचा प्रतिसाद आवडला. यादवांचे गाढव गेले आणि ब्रह्मचर्यही. अर्थातच यादवही काही कमी नाहीत. माझ्या आवडत्या कवयित्री अनुराधा पाटील ह्यांचे पती एवढीच कौतिकरावांची माझ्यासाठी ओळख उरावी.

...........................................................................................................
अगदी नीट रोख धरून | म्हैस मागी येता धावून | एकदम छत्री उघडून | तिला पळविता येतसे || जुन्यानव्याची चोरी करून | भिकार कवि येता कविता घेऊन |कशी तरी एकदा वाचून | चुकविता येतसे ||सर्वांस उपाय येत दिसून | परि एका गोष्टीस आहे न्यून | तोंडाळ बायको कडकडून — | येता, काय करावे ||

८३ वे साहित्य संमेलन पुण्यात
http://beta.esakal.com/2009/09/21200211/marathwada-marathi-sahitya-sam.html

(या लिन्क च्या यू आर एल मधे 'मराठवाडा' का दिसतो कोणास ठाउक?)

त्या आनंद यादवांच्या राजीनाम्याचा घोळ अजूनही चालूच आहे असे दिसते याच बातमीवरून. पुढच्या वेळच्या अध्यक्षांनी 'आत्तापर्यंत राजीनामे दिलेले अध्यक्ष' ही लिस्ट वाचावी. नाहीतरी आजकाल उद्घाटनाचे भाषण म्हणजे लिस्टा वाचणेच असावे असे यावर्षीच्या भाषणावरून वाटले होते.

यू आर एल मधे 'मराठवाडा' का दिसतो कोणास ठाउक? >> माझ्या (अल्पश्या) माहिती प्रमाणे ..
दर ३ वर्षांनी मसापचे यजमानपद रोटेट होत असते. मगच्या वेळी विदर्भ साहित्य परिषदेकडे होते. ह्या वेळी मराठवाडा साहित्य परिषदे कडे आहे. बहुधा पुढच्या वर्षी पुण्याकडे आहे.
मसापच्या बैठकीचा वृत्तांत मराठवाडा साहित्य परिषदे च्या कार्यालयाकडुन आला असल्यामुळे त्या बातमीच्या दुव्यात मराठवाडा दिसते आहे.

Back to top