दक्षिण कोकण दुर्गमोहिम २ - पूर्णगड, भुईसपाट झालेला अंबोळगड आणि प्रमुख आकर्षण विजयदुर्ग

Submitted by आशुचँप on 24 December, 2012 - 13:13

आजच्या भ्रमंतीचे उद्दीष्ट होते किल्ले पूर्णगड, जवळजवळ भुईसपाट झालेला अंबोळगड आणि दक्षिण कोकण भटकंतीचे प्रमुख आकर्षण विजयदुर्ग

=======================================================================
दक्षिण कोकण दुर्गमोहिम - पहिला मान रत्नदुर्गचा
http://www.maayboli.com/node/38736
========================================================================

सकाळी लवकर उठून काका-काकूंच्या पाया पडून पावसची वाट धरली...आधीच ठरल्याप्रमाणे फक्त किल्ले हेच उद्दीष्ट ठेवल्यामुळे स्वामी स्वरुपानंदांच्या आश्रमात गेलो नाही आणि भाट्ये, कुर्ले, गणेशगुळे असे करत तिथून जवळच असलेल्या पूर्णगडात दाखल झालो...
पूर्णगड हा अतिशय इटूकला पिटूकला किल्ला आहे...लहान आकाराचा किल्ला म्हणून पूर्णविरामाच्या लहानश्या टिंबासारखा किल्ला म्हणून पूर्णगड नाव पडले. तर काहींच्या मते छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले बांधणीचे काम येथे थांबवले म्हणून हा पूर्णगड. विशेष म्हणजे किल्ल्याची बांधणी जरी शिवकालीन पद्धतीने (गोमुखी दरवाजा) झालेली असली तरी किल्ल्यात गोड्या पाण्याचे टाके किंवा विहीर नाही. जी विहीर आहे ती किल्ल्याबाहेर.
किल्ल्याच्या आजूबाजूला मस्त आमराई आहे आणि छान सुखद वातावरण सुद्धा...किल्ला बघायला आज जातानाच एक थोडे वयस्कर काका भेटले. त्यांनी न विचारताच इकडची तिकडची माहीती द्यायला सुरुवात केली. अर्थात आम्ही पुस्तक बरोबर घेऊनच हिंडत असल्याने अवांतर माहीतीची आवश्यकताच नव्हती पण तरीही अमेयने काही शंकांचे निरसन करून घेतले. पण त्या काकांना किल्ल्यापेक्षा मंदिराची माहीती देण्यातच जास्त रस होता.

किल्ला छोटासा असला तरी बर्यापैकी सुस्थितीत आहे...जांभ्या दगडात बांधलेला दरवाजा, बुरुज, पायर्या सगळी काही मस्त आहे...किल्ल्यावरून निळ्याशार समुद्राचे सुरेख दर्शन मिळते.
किल्ल्याचा थोडक्यात इतिहास म्हणजे पेशव्यांच्या आज्ञेने हरबाराव धुळप यांनी या किल्ल्याची बांधणी केली त्यासाठी ब्रम्हेंद्र स्वामी यांनी द्रव्य पुरवले होते. १८६२ च्या एक नोंदीनुसार किल्यावर ७ तोफा आणि ७० तोफगोळे असल्याची माहीती मिळते. पण सध्या गडावर एकही तोफ नाही.
'किल्ल्याच्या दाराजवळ मारुती मंदिर आहे.
प्रचि १

या जुन्या मंदिराची सध्या गावकर्‍यांनी रंगरंगोटी केलेली आहे. मंदिराजवळच पूर्णगडाचा दरवाजा आहे. शिवकालीन बांधकामाच्या वैशिष्टय़ांप्रमाणे हा दरवाजा लपवलेला आहे. दरवाजावर गणेश तसेच चंद्र- सूर्याची शिल्पे आहेत.
प्रचि २

प्रचि ३

प्रवेशद्वाराच्या आत पहारेकर्‍यांच्या देवडय़ा आहेत. येथेच दगडात कमळे कोरलेली पहायला मिळतात. येथे तटबंदीवर चढण्यासाठी पायऱ्यांचा मार्ग आहे. तटबंदीवरुन गडाची पूर्ण फेरी मारता येते. पश्चिम अंगाची काही तटबंदी ढासळलेली आहे. पण इतर तटबंदी काळ्या पाषाणातील असून अजूनही भक्कम अशी आहे. *किल्ल्याला पश्चिमेकडे लहानसा दिंडी दरवाजा आहे.
प्रचि ४

गडामध्ये गडकर्‍यांच्या वास्तूचे अवशेष तसेच इतरही अवशेष पहायला मिळतात. लहानसा आयताकृती आकार असलेला पूर्णगड पहायला अर्धा तास पुरतो'. (संदर्भ विकिपिडीया)
प्रचि ५

प्रचि ६

प्रचि ७

प्रचि ८

प्रचि ९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

पूर्णगडावरून गावखिंडीकडे जायला आता मस्त पूल बांधलाय...पूलावरून जाताना तिथल्या खाडीत बांधलेल्या या सुंदर मंदिराचे दर्शन झाले.
प्रचि १६

हे बांधणार्यांचे कौतुक आहे राव..काय सुरेख जागा निवडलीये बांधायला...तिकडे कसे जायचे याची चौकशी केली पण फार काही माहीती कळली नाही आणि आजचा पल्ला मोठा असल्याने जास्त वेळ न घालवता पुढे कूच केले...

तसे जाताना पहिल्यांदा यशवंतगड लागतो. पण तो येताना करायचे ठरवून पहिले किनाऱ्यावरचा गगनगिरी महाराजांचा आश्रम गाठला. महाराजांच्या कार्याबद्दल मला फारशी माहीती नाही पण त्यांना निसर्गसौंदर्याची नक्कीच चांगली जाणीव होती. त्यांचे सगळे आश्रम इतक्या नितांतसुंदर जागी वसवले आहेत यावरून त्याची प्रचिती येते. तिथल्या टळटळीत उन्हात फोटो काढणे हा वेडेपणाच होता पण तो केलाच.
प्रचि १७

ही जागा खास करून संध्याकाळी निरव शांततेत अनुभवावी अशीच आहे. नंतर तिथल्या रांजणातल्या गारेगार पाण्यानी ताजेतवाने होऊन आंबोळगड गाठला.
जरी आजच्या घडीला किल्ला म्हणून ओळख पटेल असे काहीसुद्धा उरलेले नसले तरी तिथे तो आहे हे माहीती असल्यामुळे त्याला भेट देणे हे क्रमप्राप्त होते.
एक कोरडी पडलेली विहीर आणि एक तुटकी फुटकी तोफ आणि ढासळलेली तटबंदी इथे कोणे एके काळी किल्ला होता याची साक्ष देते.
प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

नाही म्हणायला किल्ल्याच्या आत (म्हणजे परिघाच्या) एक डेरेदार वटवृक्ष उभा आहे. मग या वडआजोबांचे थोडे पोट्रेट्स काढले आणि यशवंतगड (जैतापूर) गाठला

प्रचि २१

यशवंतगड हा जैतापूर खाडीच्या उतारावर बांधला आहे. त्यामुळे एरवी डोंगरी किल्ल्याच्या उलट म्हणजे आधी बालेकिल्ला मग प्रवेशद्वार असे आपण करतो.
आख्खा किल्ला जांभ्या दगडात बांधलाय आणि अजून खणखणीत आहे.

प्रचि २२

किल्यात जाताच अवाढव्य बुरुजांनी आपले स्वागत होते. गडाला एकंदर १७ बुरुज आहे आणि सगळे चांगल्या स्थितीत आहेत. मध्ये मध्ये बेसुमार झाडी वाढलेली असली तरी किल्ला फिरायला काही अडचण येत नाही.
बालेकिल्ला पाहून खाली उतरले की घेरा यशवंतगड म्हणून वस्ती लागते. तसेच पुढे गेले की खाडी दरवाजा लागतो. तो झाला की किल्लाफेरी पूर्ण.

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५

किल्ल्यापासून ३किमी अंतरावर मुसाकाजी बंदर आहे. त्यामुळे त्याच्या सुरक्षेसाठी या गढीवजा किल्ल्याची निर्मिती झाली असावी. १६९० साली हा कान्होजी आंग्रे यांच्या ताब्यात होता त्यानंतर १८१८ मध्ये कर्नल इम्फाल याने हा किल्ला जिंकला. या किल्ल्याचा इतिहास फारसा ज्ञात नसला तरी या जागेचे मालक रघुनाथ पत्की यांनी इंग्रज अधिकार्यांची आणि सरकारची सेवा केल्यामुळे खुष होऊन त्याना हा किल्ला बक्षीस दिला. आयजीच्या जीवावर बायजी चे उत्तम उदाहरण.

प्रचि २६

आता ओढ लागली होती ती सागरी किल्ल्यांचा शिरोमणी विजयदुर्गची...

विजयदुर्गची माहीती मायबोलीकर जिप्सी याने http://www.maayboli.com/node/33535 इथे दिली असल्याने पुन्हा टाकत नाही. त्याचे फोटो बघून मला फोटो पण टाकावेत का नाहीत असा प्रश्न पडला होता. पण धाडस करून टाकले झालं.
प्रचि २७

प्रचि २८

प्रचि २९

प्रचि ३०

प्रचि ३१

प्रचि ३२

प्रचि ३३

प्रचि ३४

प्रचि ३५

प्रचि ३६

प्रचि ३७

प्रचि ३८

प्रचि ३९

प्रचि ४०

प्रचि ४१

प्रचि ४२

प्रचि ४३

प्रचि ४४

प्रचि ४५

प्रचि ४६

प्रचि ४७

प्रचि ४८

विजयदुर्ग करून सूर्यास्त झाल्यावर देवगडच्या दिशेने निघालो. हापूस आंब्यांचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध असलेल्या या गावाने मात्र आपली छाप अगदीच निराशाजनक सोडली.
एकतर गावात पोचलो तेव्हा रात्र झाली होती. एक दोन ठिकाणी चौकशी केली पण जागा मिळाली नाही. एका ठिकाणी खोली होती पण ती इतकी वाईट होती की तिथे राहणे शक्य नव्हते. तर एके ठिकाणी अवाच्या सवा भाडे.
जेव्हा त्या मालकाला आम्ही भाडे जास्त आहे म्हणून खोली नाकारली तेव्हा तो छद्मीपणे हसला आणि म्हणाला ठिक आहे तुमची मर्जी.
आणि त्याच्या छद्मी हसण्याचे कारण लवकरच उमगले. गावात २-३ लॉज होती पण प्रत्येक लॉजखाली देशी बार आणि तो सगळा दरवळ, खोल्यांच्या दारात बाटल्या, कोंबड्याची पिसे पडलेली. नरक म्हणावा असा सगळा माहोल.
शेवटी देवगड मध्ये न राहता पुढे जाण्याचा निर्णय घेतला. पण एका रिक्षावाल्याला काय वाटले काय माहीती. चला म्हणाला माझ्याबरोबर...
त्याने आपली वाट वाकडी करून एका एमटीडीसीच्या बंगल्यात नेले. बंगला होता एकदम मस्त आणि चक्क एक खोली रिकामी मिळाली सुद्धा. बाथरुम मात्र खोलीबाहेर होते ही एकच अडचण. पण आपल्याला चालेल असे म्हणत तिकडेच पडी टाकली. तत्पूर्वी त्या रिक्षावाल्याला धन्यवाद आणि थोडी टीप द्यायला विसरलो नाही.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर शब्द व प्रकाशचित्रण.
लहानपणी कोकणात जाताना विजयदुर्गला बोट किल्ल्याच्या तटानजीकच उभी रहायची. त्या आठवणीने मग अनेक वेळां विजयदुर्गला जाणं झालं. केवळ राष्ट्रीय महामार्गापासून दूर असल्यामुळेंच हे पर्यटनस्थळ झालं नसावं, हें आपल्या अप्रतिम प्रचिंमुळेही जाणवतं !

सुरेख फोटो. किती हिंडता तुम्ही. ग्रेट. पहिला छोटुकला किल्ला हिंदी सिनेमाच्या क्लायमॅक्स ला मारामारी असायची पूर्वी त्याला बरोब्बर फिट होईल. खूप आवडला तो किल्ला.

वा छान फोटो आणि माहिती. Happy
एवढी वर्षे कोकणात राहूनही हे पहाताच नाही आल. आता तुम्हा माबोकरांमुळे दुधाची तहान ताकावर भागवते. Happy

धन्यवाद मंडळी...

पहिला छोटुकला किल्ला हिंदी सिनेमाच्या क्लायमॅक्स ला मारामारी असायची पूर्वी त्याला बरोब्बर फिट होईल Happy Happy

हेम - टाकतो टाकतो...इतकी धमकीवजा विनंती नको

सुंदर Happy

धन्यवाद सर्वांना....

संदीप पांगारे -
ती नक्की कसली बांधकामे आहेत याची माझ्याकडे पण फारशी माहीती नाही. नकाशात धान्यकोठार आणि दारू कोठार अशी जुजबी नावे दिली आहेत.

हिम्सकूल - हम्म्म Happy

मस्त आहे रे भटकंती. आम्ही काही वर्षांपूर्वी तेरेखोल ते विजयदुर्ग अशी मोहिम पार पाडली होती. फार आवडला होता तो सगळा जिल्हाच.

प्रची ४२ , ४३ >> धान्यकोठार आणि दारू कोठार नाही आहेत. विजयदुर्ग किल्ल्यावरिल दारु कोठार हे अगदी व्यवस्थित छप्परबंद आहे.. शत्रुच्या तोफगोळ्याचा मार्‍यापासुन सुरक्षित राहण्याजोगे मजबुत छप्पर असल्याने ते आजही उत्तम स्थितीत आहे.. त्याचा माझ्याकडिल प्रचि टाकेन.. प्रचि ४३ माझ्या मते शासकीय इमारत आहे..
असो.. विजयदुर्ग येथे फिरताना तेथील पाटिल म्हणुन MTDC approved गाईड घ्यावेत.. खुप छान माहीती देतात.. आणि वेळे बद्द्ल बोलाल तर आपण दमे पर्यंत किंवा पुरे म्हणे पर्यंत ..:) दोन वेळा अनुभव घेतला आहे..

धन्यवाद सतिश - हो ती इमारत शासकीय कामासाठी नंतर वापरली गेली अशी माहीती मिळाली होती. त्याधीचे प्रयोजन काय होते ते माहीती नाही.

गाईड तिथे असतात याची माहीत नव्हती.

जीएस -
हो फार सही सही किल्ले आहेत. आणि एकदा जाऊन मन भरले नाहीये. त्यामुळे पुन्हा एकदा जाण्याचा प्लॅन करतो आहे.

मस्तच रे... आशु...

हो फार सही सही किल्ले आहेत. आणि एकदा जाऊन मन भरले नाहीये. त्यामुळे पुन्हा एकदा जाण्याचा प्लॅन करतो आहे.>>>>>>>>>>>>******** मला पण सांग... नक्की येइन... बाईक वर कोकणा फिरायला तर धमाल येते यार... गुहागर च्या जवळ्पास चा प्लान असेल तर माझ्या घरी राहण्याचि आणि जेवणा पाण्या ची पण सोय होईल... (तुला थोड लालच देतोय Wink )********

मस्तच रे आशु.... माझ्या गावाच्या जवळच असल्याने यशवंतगड-आंबोळगड भागात अनेकवेळा फिरलोय..
यशवंतगडावरून मुसाकाजीला जाताना उजवीकडच्या सड्यावर प्राचीन द्वीपगृह आहे (त्याकाळी बत्तीने पेटवायचे) तेही बघण्यासारखेच आहे.. त्याच द्वीपगृहाच्या पुढे सरळ गेल्यावर कड्यावरून समुद्राचा नजारा अफलातूनच दिसतो...

पुढचा भाग लगेच येऊदे..

धन्स,
गुहागर च्या जवळ्पास चा प्लान असेल तर माझ्या घरी राहण्याचि आणि जेवणा पाण्या ची पण सोय होईल.. Happy Happy Happy

यशवंतगडावरून मुसाकाजीला जाताना उजवीकडच्या सड्यावर प्राचीन द्वीपगृह आहे

हा हे पहायचे राहीले