मुळात हा नविन बाफ उघडायचे कारण म्हणजे मला जुना धागा सापडला नाही. हे जुन्या धाग्यावर हलवले तरी चालेल. पुन्हा शोधताना सापडावा म्हणुन नविन धागा उघडला आहे.
सध्या आमच्या घरी सिंगल सिलेंडरचे कनेक्शन आहे. आणि सिलेंडरच्या ऑफिसमध्ये इतर ठिकाणी चालते तशी मनमानी देखिल आहे (प्रचंड प्रमाणात) कारण जवळपास १०००० ग्राहकापैकी ८० % हुन ग्राहक अगदी खेडेगावातील आहे. गेले वर्षभर दर महिण्याला वादावाद झाली नाही असे झाले नाही. मग मागच्या महिण्यात कुठेतरी वाचनात आले कि विदाउट सबसिडी आपल्याला पहिजे तितके सिलेंडर मिळु शकतात आणि प्रॉयॉरीटी बेसिस वर. (प्राधान्याने).
मग डिसेंबर मध्ये रेग्युलर सिलेंडर संपल्यावर नविन कनेक्श्न साठी भेटायला गेल्यावर त्यांनी मला तसे काही नसते, अजुन आम्हाला काही कळवले नाही अशी थातुर मातुर कारणे सांगीतली पण गंम्मत म्हणजे त्यांनी एक भरलेले सिलेंडर रेग्युलर किंमती मध्ये लगेच देउन टाकले. (असे गेल्या वर्षभरात झाले नव्हते). तेथुन घरी आल्यावर मी नेटवरुन पुण्याचा हेड ऑफीसचा नं. घेउन कॉल केला. त्यांनी सांगीतले कि तुम्हाला प्रॉयॉरीटी बेसिस वर विदाउट सबसिडी कनेक्श्न मिळु शकेल. मग त्यांच्यापुढे इथल्या मनमानी कारभाराचा पाढाच वाचला. साध्या साध्या गोष्टी साठी कितीतरी वेळा हेलपाटा पडतो, कितीतरी वेळ बसवुन घेतले जाते. शेवटी सांगितले कि आमच्या सारख्या शिकल्या सवरलेल्यांना इतका त्रास देत असतील तर कल्पना करा कि इतर अशिक्षित, खेडुत लोकांना किती त्रास होत असेल.
झाले, अर्ध्या तासात ऑफिस मधुन फोन आला, घरच्या नं. वर. कि रेशनकार्ड आणि ओळखपत्र घेउन या आणि कनेक्शन घेउन जा. फक्त येताना फोन करुन या म्हणजे जास्त वेळ लागणार नाही.
मग आज मुहुर्त लागला. दुपारीच सगळी कागदपत्रे (रेशन कार्ड ३ कॉपीज आणि पॅन कार्ड २ कॉपीज) घेउन ऑफीसमध्ये गेलो. तेथील संवादः ( आज बर्याच वर्षानंतर कोल्हापुरी भाषेचा वापर करावा लागला)
काय काम आहे.
नविन कनेक्शन पाहिजे होते.
२ तारखेनंतर या.
या अगोदर येउन गेलो आहे. कागदपत्रे घेउन आलोय.
अशी लगेच कामे होत न्हाइत, या नंतर.
मला नंतर यायला वेळ नसतो, आज सुट्टी आहे म्हणुन आलो आहे.
इथ आमाला भरपुर महत्वाची कामं असत्यात, जावा आता , २ तारखेला या जावा.
तोंड बंद. अजिबात एक शब्द देखिल बोलायचे नाही, जर समोरच्या व्यक्तीला आदर देता येत नसेल तर. मी तुमचा कस्ट्मर आहे. तुम्ही मालक आहात काय?
नाही.
मग मालकाने असेच बोलायला शिकवले आहे काय लोकांच्या बरोबर?
तेवढ्यात तेथिल क्लार्क मॅडम,
बघु कागदपत्रे, हां एक सिलेंडर पाहिजे की दोन.
दोन.
कोणाच्या नाववर घ्यायचयं.
बायकोच्या.
मग सही करायला?
घेउन येतो त्यांना लगेच.
मग तुम्हाला रबरी पाइप पाहिजे काय?
नको, पण सुरक्षा पाइप असेल तर द्या.
नुसती पाइप मिळत नाही, त्याबरोबर अॅप्रन, लायटर आणि काहितरी... घ्यावे लागेल.
मग काहिच नको.
शेगडी?
अजिबात विचारु नका. अगोदर्चे कनेक्श्न आहे, म्हणजे शेगडी असणार ना घरी.
बरं ५२१६ रु द्या. २०० रु. इंस्टॉलेशन चार्जेस आहेत त्यात. २ सिलेंडर भरलेले त्याचे १८३१ आणि २९०० रु डीपॉझिट, १५० रेग्युलेटर डिपॉझिट, ३५ रु कार्डाचे.
मग सिलेंडर कधी मिळतील?
हे काय घेउनच जावा. फक्त सही साठी मिसेसना घेउन या आणि येताना या पावतीची झेरॉक्स घेउन या.
तो पर्यंत मालक साहेब आले होते. दारातच त्यांनी विचारले, " झाले ना तुमचे काम?". त्यांना तोंड भरुन धन्यवाद दिले आणि अशीच सेवा इतर लोकांना द्यायची विनंती केली.
नंतर १५ मि. २ सिलेंडर आणि रेग्युलेटर घेउन घरी आलो.
घरी असलेलं आता सरंडर करेन. हां पण लागतील तेवढी सगळी सिलेंडर ९०० + लाच घ्यावी लागतील. पण होणार्या मनस्तापापेक्षा हे परवडते. फक्त वर्षाला २५०० रु जास्त द्यावे लागतात. (म्हणजे ६ सिलेंडर ची ४०० रु. प्रमाणे असलेली सबसिडी)
संबंधित लोकांनी योग्य बोध घ्यावा. आणि आपला कार्यभाग साधुन घ्यावा
अभिनंदन........... आमच्या
अभिनंदन........... आमच्या गृप मधे आपले हार्दिक स्वागत आहे
हबिनंदण
हबिनंदण
तुमच्याकडे(आणि आणखीही
तुमच्याकडे(आणि आणखीही कोणाकडे) एकापेक्षा एल्पीजी कनेक्शन्स नाहीत याची खातरजमा झाल्यावर तुम्हाला प्रतिवर्ष सहा सिलिंडर्स सब्सिडाइज्ड दराने मिळू लागतील.
http://articles.timesofindia.indiatimes.com/2012-10-31/pune/34836518_1_n...