माबोकर होण्यासाठी!

Submitted by चिखलु on 16 December, 2012 - 22:21

१. तुम्हाला ऑफिसमध्ये माबोचा अ‍ॅक्सेस असणे गरजेचे आहे. २४*७ आंतरजालावर पडीक राहायचा सराव हवा. अर्थात आयटी मध्ये बेंचवर आलात की कंपनीवाले नेटवर पडीक रहायची छान प्रॅक्टिस करून घेतात अशात. त्यामुळे फारशी अडचण येणार नाही

२. घरी इतरांची बोलणी खायची सवय व्हायला हवी (सारखा त्या कम्प्युटरला चिकटलेला , काही म्हणजे काही काम करत नाही, इ इ) महत्वाचे म्हणजे मोबाईलवरून नेट अ‍ॅक्सेस करता यायला हवे. जेवण कम्प्युटर समोर बसून २-२ तास रवंथ करता येणे अतिशय गरजेचे आहे. बरे, जेवण चालू असताना घरात चाललेल्या बडबडीकडे जसे कारट्या जेवण करून घे इ इ दुर्लक्ष करता यायला हवे

३. कोणत्याही धाग्यांवर वाद घालता यायला हवेत, मुद्दा असो व नसो आपले अस्तित्व दाखवून देता यायला हवे. मुद्दा नसेल तर काळजी नाही, निदान कुणालातरी अनुमोदन द्या, मोदक द्या. मतप्रदर्शन करणे ही काळाची गरज आहे हे पक्के ध्यानात ठेवा. रोमात राहून काही उपयोग नाही. इथे रुळणे महत्वाचे. दुसऱ्याचा प्रतिसाद थोडाफार बदलून स्वत:च्या नावावर खपवता यायला हवा.

४. स्मायलींचा अभ्यास हवा, प्रतिसादात तुम्ही किती स्मायली देता यावर तुमचे माबोवरचे वय ठरते. गुगल वरून चित्रे पोस्ट करता यायला हवीत. उत्तर काय द्यावे सुचले नाही तर हम्म, लिहू शकता किवा नुसती एखादी स्मायली चालेल. हसणारा बाहुला/बाहुली असे काहीबाही लिहू शकता. पण बाहुला असणे महत्वाचे. (ताठर बाहुला इ इ अश्लील प्रकार इथे चालत नाहीत, याची इच्छुकांनी नोंद घ्यावी )

६. इथले शब्द शिकून घ्या आणि योग्य वेळेस वापर महत्वाचा, जसे रच्याकने, गगो, हेमाशेपो इ इ कळायला हवे. नाहीतर पब्लिक मस्करी करते, मस्करी सहन करायची तयारी ठेवा. पण एकदा का हे शब्द शिकला कि तुम्ही हे शब्द नवीन मेम्बरची रेवडी उडवायला वापरू शकता. लक्षात ठेवा जे इथे कराल ते इथेच ठेवून घरी जायचं आहे.

७.. प्रत्येक धाग्यावरचे दादा लोक यांच्याशी जुळवून घेता यायला हवे. त्यासाठी दादा कोण ते समजून घेणे हे अतिशय महत्वाचे. त्यासाठी खोड्या काढा, ज्याची खोडी काढल्यावर बाकीचे उचकतील तो दादा. मग ते सगळे मिळून तुम्हाला धाग्याच्या बाहेर काढतील. पण घाबरू नका, सगळीकडेच चिक्कार असंतुष्ट आहेत, ते तुमची साथ देतील. मग तुमचा कंपू तयार होईल. विपुमध्ये जाऊन काड्या करता येणे गरजेचे आहे. आपला स्वत:चा कंपू करणे, शक्य नसल्यास दुसर्या कंपूत प्रवेश मिळवणे आणि एकदा का प्रवेश मिळाला कि मग नवीन मेंबरला त्या कंपूत प्रवेश करू द्यायला विरोध करता यायला हवा. हे एकदा व्यवस्थित जमले की मज्जा.

८. एकदा का प्रतिसाद, वाद, विपुची सवय झाली कि मग मात्र लेख छापून यायलाच हवा. एकदा कंपू झाला कि लेख पाडणे अतिशय सोपे. लेख लिहून आणि प्रकाशित करून भागत नाही, इथे रिक्षा चालवणे महत्वाचे आहे. जास्तीत जास्त प्रतिसाद येण्याच्या क्लृप्त्या, जसे लेख पुन्हा पुन्हा एडीट करणे म्हणजे मग तो पहिल्या पानावर राहतो, सोमवारी सकाळी प्रकाशित करणे, रिक्षा चालवणे, आपला लेख प्रकाशित झाल्यावर इतर कुठल्याही धाग्यावर प्रतिसाद न देणे त्यामुळे आपलाच धागा वर राहतो, धागा थंड पडला कि स्वत: प्रतिसाद देवून वर आणणे, इ इ उद्योग झेपायला हवेत महाराजा. नपेक्षा कंपूत कुणालातरी सांगून आपले जुने लेख वर आणता यायला हवेत. इथे प्रत्येक जणच तुकाराम आहे, सगळ्यांच्या गाथा कुठलातरी भगवंत वर आणतोच. पण आपला भगवंत ओळखता यायला हवा.

९. डु-आयडी ओळखणे ही एक महत्वाची पायरी आहे, एकदा का डु-आयडी ओळखता आले की तुम्ही माबोकर झालात हे खुशाल समजावे. मग यानंतर तुम्ही खुशाल डु-आयडी तयार करून विरोधकांवर शरसंधान करू शकता. डु-आयडी तयार करणे, पुनर्जन्म घेण्याचा हा सगळ्यात सोप्पा प्रकार आहे. आणि वर आपला अवतार आपल्याला ठरवता येतो, जसे लिंग(स्त्री, पुरुष, नपुसक) , नाव(ईश्वर पासून वडापाव), फॉर्म (मनुष्य , फळ, प्राणी इ इ ) काहीही शक्य आहे

१०. कुणी हमरी तुमरी वर आलेच तर बिनधास्त आपल्या एखाद्या शत्रुपक्षाचा मोबाइल क्रमांक देवून टाका. आणि वर असेल हिम्मत तर कॉल कर, बघून घेईल इ इ भाषा वापरा. म्हणजे एका दगडात दोन पक्षी. ते दोघेही एकमेकांना शिव्या घालतात, आपण आपले मजेत रहायचे. पण दोघेही तुमच्या पर्यंत पोहोचणार नाहीत याची काळजी घ्या. यासाठी माबोवर खरे नाव वापरू नका, नाहीतर एखादा डु-आयडी तयार करून त्यावरून बिनधास्त वाद घाला. जास्तच काळजी घ्यायची असेल तर, एखादा बंद पडलेला मोबाइल क्रमांक किंवा कुठल्यातरी ग्रामपंचायत किंवा एखाद्या आमदार खासदार असा नंबर देवून पहा.

११. विडंबन करता येणे हा एक महत्वाचा गुण आहे. तो असेल तर तुम्हाला मरण नाही, एखाद्या धाग्यावरचा फोकस हटवायला हे उपयोगी पडते, मग पब्लिक पण तुमच्या विडंबनाच्या मागे लागून मूळ धागा विसरते.

थोडक्यात काय, आपला धागा वर आणणे आणि इतरांच्या धाग्यांचा गुंता करणे एकदा जमले की मग तुम्ही अधिकृत माबोकर झालाच म्हणून समजा...

शुभेच्छा...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रत्येक जणच तुकाराम आहे, सगळ्यांच्या गाथा कुठलातरी भगवंत वर आणतोच. पण आपला भगवंत ओळखता यायला हवा.>> बरोबर आहे.

लिहीले तर मस्तच !

Lol हा पण लेख आवडला. पीएचडीची तयारी चालली आहे वाटतं? Happy बरंच मटेरियल जमा झालं आहे. काही काही पॉइन्ट्स फार मजेशीर आहेत.

१२. नवख्या डूआयचे लक्षण : कंपल्सरी इंग्रजीत टाईप करणे. लवकरच शिकतो म्हणणे अन "शिकल्या शिकल्या" दणाणा लिहू लागणे.
(प्रॉक्सी लावून लॉगिन झाल्यावरही मराटी टंकण्याच्या सोयी व आय्पी ट्र्याकर सुविधेसाठी विपुतून संपर्क साधावा. *Charges apply.)

तुमचं माबो वरील वय बघत तुमचा इथला अभ्यास दांडगा आहे असे दिसते. स्मित
>>> धन्स

सखोल आणि पुन्हा एकदा जबरी निरीक्षण चिखल्याशेठ, .. स्मित
>> धन्स डॉक

हाहा हा पण लेख आवडला. पीएचडीची तयारी चालली आहे वाटतं? स्मित बरंच मटेरियल जमा झालं आहे. काही काही पॉइन्ट्स फार मजेशीर आहेत.
>> धन्स...

१२. नवख्या डूआयचे लक्षण : कंपल्सरी इंग्रजीत टाईप करणे. लवकरच शिकतो म्हणणे अन "शिकल्या शिकल्या" दणाणा लिहू लागणे.
>>> "शिकल्या शिकल्या" मला "चिखल्या चिखल्या" वाटलं

चुकलेच चिखल्या चांगलं दणदणीत पूर्ण नाव लावून आले ते. असो असेही नमुने नमुन्याला हवेतच स्मित)
मस्त लिहिलं आहेस.
>>> धन्स...

अरेच्च्या, हा धागा नजरेतुन सुटला होता की... कसा काय बोवा?
असो.
>>>>> ७.. प्रत्येक धाग्यावरचे दादा लोक यांच्याशी जुळवून घेता यायला हवे. त्यासाठी दादा कोण ते समजून घेणे हे अतिशय महत्वाचे. त्यासाठी खोड्या काढा, ज्याची खोडी काढल्यावर बाकीचे उचकतील तो दादा. मग ते सगळे मिळून तुम्हाला धाग्याच्या बाहेर काढतील. पण घाबरू नका, सगळीकडेच चिक्कार असंतुष्ट आहेत, ते तुमची साथ देतील. मग तुमचा कंपू तयार होईल. <<<
हे भारी आहे...

मस्त, काही गोष्टी मनापासून पटल्या. मलाही काही शब्दांचे अर्थ माहीत नाही, जसे रिक्षा फिरवणे, हेमाशेपो वगैरे
पण लेख वाचुन मजा आली