तर मायबोलीकरांनो, आता केवळ काही दिवसच उरले आहेत. निदान आता तरी सुधरु या.
थोडेसे सौजन्य दाखवूया. गेल्या १० वर्षांत जे होऊ शकले नाही, ते निदान आठवडाभर तरी
करु या. म्हणजे मायबोलीवर सौजन्य नव्हते / नाही असे नाही. तर सौजन्य सप्ताह कधी
झाल्याचे आठवत नाही. आता २१ तारीख जवळ येतेय, तेवढाच चांगुलपणा असावा पदरात !
आता सौजन्य म्हणजे काय रे भाऊ ? सौ + जन्य म्हणजे आपलेच अपत्य तर नव्हे, अशी
(मुंगेरीलाल टाईप ) कोटी करु नका. (विशिष्ठ उल्लेख कंसात करण्याचे कारण, अर्थातच सौ.स. )
तर सौजन्य दाखवायचे, म्हणजे काही पथ्य तर पाळावीच लागणार. मुख्य म्हणजे विचारसरणीत
बदल करावा लागणार. तशी आपल्याला त्याची सवय नाही, ( म्हणून तर असे सप्ताह पाळायचे
असतात. ) ( कंसाचे कारण वर लिहिले आहे तेच.)
१) टिंब. टिम्ब. टिंब....
२) आधी आपल्या ( आपापल्याच ) सदस्यत्वामधे जा. विशिष्ठ शहर, अतिविशिष्ठ शहर, बघायला
येणार आहात का ?, तूम्हाला काय करायचेय ? असे जे उल्लेख आहेत. ते नीट करा. ( नाहीतर
काढूनच टाका.)
३) पिन कोड द्यायचा असेल तर योग्य तोच द्या. ४२० ४२० असा पिनकोड नसतो. ( स्वभाव असतो.)
४) फ़ोटोपण टाकायचाच असेल, तर आपलाच टाका. करीना / कतरीना / सलमान / हृतिक हे मायबोलीकर
नाहीयेत हे सगळ्यांना, माहित आहे.
५) आता परत मायबोलीवर या.
६) फ़ुल्ली / फ़ुल्ली / फ़ुल्ली
७) आपापल्या विपू बघा. बाकिच्यांचा बघू नका. तूम्ही विपू केलीत तर ती त्या सदस्याच्या खात्यात दिसतेच.
त्याच्या खाली स्क्रोल करु नका.
८) येता जाता ऍडमिन साहेबांना विपू करु नका. त्यांना बाकीची कामे असतात. ( भांडायला काय लहान आहात.
त्यांना काय ती पोस्ट्स दिसत नाहीत. ) ( असो. कंसाचे कारण तेच.)
९) मोकळी जागा
१०) कुणाला ( दक्षे ) सद्या वगैरे हाक मारत असाल, तर या सप्ताहात सदाशिवरावभाऊ अशी हाक मारत जा.
११) "आली नाही आज आमची मोलकरीण, वेळेवर कामाला " अशी गझल कुणी ( प्राध्यापकांनी ) लिहिली तर
लगेच " आली नाही आज आमची लोकल टायमावर " असे विडंबन करु नका. ( त्यापेक्षा मोलकरीण हे कसले
रुपक असेल, यावर चिंतन करा. )
१२) ऑगस्ट पासून येणार येणार असे जाहीर झाले असले तरी साल जाहीर झाले नव्हते. त्यामूळे गुलमोहोरावरचे प्रत्येक लिखाण, तूम्हाला दिसणारच. त्या प्रत्येकावर प्रतिसाद द्या. गेल्या १० ( हजार / लाख / अब्ज / पद्म / निखर्व ) वर्षात असे ललित / कथा / कविता वाचले नव्हते असे लिहा. दहावर शून्ये आपापल्या कल्पनेप्रमाणे द्या.
१३) इब्लिस / डॅंबिस / विसरभोळा / खवीस हि त्यांची खरी नावे नाहीत. हे लक्षात ठेवा. ती लिहिताना मनात
जरी वाईट विचार आले तरी ( कानाच्या पाळीला हात लावून ) क्षमा मागा.
१४) कुणी काही क्रमश: लिहिले, तरी त्याला प्रतिसाद द्या.
१५) डुप्लिकेट आयड्यांनी, अकरा लाखात आपले कॉंट्रिब्यूशन नेमके किती, ते एकदा जाहीर करा(च).
१६) गप्पा मारताना, एकच धागा पकडून ठेवा. बाकीच्या धाग्यावर काय चाललेय त्यावर लक्ष ठेवू नका.
( ते काम ऍडमिन साहेबांचे असते.)
१७) मोकळी जागा.
१८) मोकळी जागा.
१९) आपण हे जेवलो / हे खाल्लं अशी पोस्ट करण्याआधी. बाळा / बाळे / बाबा / ताई जेवलास / जेवलीस का ?
अशी विचारणा करा.
२०) सावरकर / हिंदुत्व / जातीयवाद / इतर धर्म / शेजारी राष्ट्रे यांच्याबद्दल लिहिताना(ही) सौ.स. चे भान ठेवा.
२१) वरच्या क्रमांक १३ बरोबर, हे पण लक्षात घ्या, कि नावात काही नसते. ( एखाद्याच्या नावात दा असले म्हणून तो दादा नसतो आणि एखाद्याच्या नावात झणझणीत असले तरी तो कोल्हापूरचा नसतो.)
२२) मोकळी जागा.
२३) शाहरुख खान बद्दल लिहिताना, सलमान खान बद्दल सौजन्य ठेवा. आणि व्हाईस व्हर्सा. दोघेही मायबोलीवर नाहीत. ( पण त्यांचे पंखे आहेत ) याचे भान ठेवा.
वरती मोकळ्या जागा / टिंब / फ़ुल्ली का आहेत ? असा प्रश्न मनात आला तरी अजून विचारलेला नाहीत ( यालाच सौजन्य म्हणतात ) पण तरी मी सांगतोच ( यालाही सौजन्यच म्हणतात ) कारण प्रत्येकाची सौजन्याची कल्पना वेगवेगळी असते. तूमचे स्वत:चे नियम लिहिण्यासाठीच तशी सोय मी केली आहे. ( बरोबर, यालाही सौजन्यच म्हणतात.)
तर मायबोलीकरांनो, बघा हे जमतंय का ? आपण तर जमवाच आणि ज्यांना जमणार नाही त्यांना नम्रपणे सौ.स. चालू आहे, याची जाणीव करुन द्या.
पुढच्या आठवड्यात जगलो / वाचलेलो असू. तर मात्र एकमेकांना बघून घेऊ.. ( बरोबर, याला सौजन्य म्हणत नाहीत. कारण मग आपल्याला कुणाच्या बा ला घाबरायचे काही कारणच नसेल.)
लय भारी, आपण जमवणार!
लय भारी, आपण जमवणार!
नवीन कथालेखक, कवी,
नवीन कथालेखक, कवी, रहस्यकथालेखक, गझलाकार यांच्याबद्दल, लिखाणावर चांगले आणि प्रेरणादायी प्रतिसाद द्या हे राहीलेच की दिनेशदा
लोल्स मस्त
लोल्स
मस्त
दिनेशदा, अगदी खरं. गेल्या
दिनेशदा, अगदी खरं. गेल्या आठवड्यात त्या एका धाग्यावरची(२१ डिसेंबर) तुमची चर्चा वाचली तेव्हा हेच माझ्या मनात आलं होत. पण काही आयडींचा काही नेम नाही बघा. (हे मी सौ. स मध्येच बोलतेय. :स्मित:)
(No subject)
आणखी एक अॅड करा माझ्या
आणखी एक अॅड करा माझ्या बाजुने
कोणी तुम्हाला ताई दादा म्हणलं म्हणुन वस्कन अंगावर ओरडू नका
दिनेशदा, मी सौ. मायबोली असं
दिनेशदा, मी सौ. मायबोली असं वाचलं. मग मधला स दिसला तर त्याचा अर्थ लावत बसले. कळतच नव्हता.
माझी पोस्ट सौजन्यपुर्ण आणि प्रामाणिक वाटते आहे ना? नाहीतर 'सौ ची ऐ तै' होवुन जायची पहिल्या ५-७ प्रतिसादात. माझ्यामुळे सुरुवात नको.
भारीच दिनेशदा
भारीच दिनेशदा
लय भारी, आपण
लय भारी, आपण जमवणार!>>>>>>>>>विदिपा, शुभेच्छा!
मस्त लिहिलय दिनेशदा! एक आठवडा
मस्त लिहिलय दिनेशदा! एक आठवडा सौ.स. पाळायला हरकत नाही.
मस्त!! सौ.स.
मस्त!!
सौ.स.
आर्या "सौ" स पाळायला
आर्या "सौ" स पाळायला सांगत्येय ? सौ. ही पाळायची गोष्ट आहे की टाळायची ?
मस्त्!!...भारी लिहिलंय!!....
मस्त्!!...भारी लिहिलंय!!....
अतिशय छान दिनेशदा... तुमच्या
अतिशय छान दिनेशदा...
तुमच्या सुचनेप्रमाणे आता येत्याजात्या सगळ्या लेखांवर, कवितांवर (कवितासदृश मजकुरावर), गझलेवर, विनोदी लेखांवर (विनोदी भासणार्या लेखांवर), पाककृतींवर सगळ्यांवर प्रतिसाद देण्याचे ठरवले आहे.
जरी कुठल्या पामराला माझा प्रतिसाद दिसला नाही तरी तो आहे असे मानून चालावे (सौस आहे...विसरू नका...)
दिनेश दा.................."मी
दिनेश दा.................."मी जिवंत होणे" बंद करु का ?? .......:खोखो:
दिनेशदा, रोमात असणार्यानीं
दिनेशदा, रोमात असणार्यानीं कोणती सौस (पथ्य) पाळायची ???
लेखातील भाषाच सौजन्याने अशी
लेखातील भाषाच सौजन्याने अशी काही ओतप्रोत भरली आहे की तिच्यातील भावनांचा आदर न करणारा क्वचितच एखादा हिरण्यकश्यपू असेल.....तेही प्रत्येक नियमाला अपवाद असतो म्हणून.
बाकी सौ.स. असो वा नसो....मामाने आदराने टंकलेले त्यांचे पूर्ण नाव वाचून आमच्या येथील भाच्यांना चक्करच येण्याची दाट शक्यता आहे.
[दक्षीला उद्देश्यून मी 'नमस्ते दक्षिणा' असे लिहिले तर तिलाच चुकल्यासारखे वाटेल.]
अशोक पाटील
सौ.स. त ड्युआयड्यांनी आपले
सौ.स. त ड्युआयड्यांनी आपले खरे स्वरूप स्पष्ट करायला हवे ना?
त्या रिकाम्या जागी, आपापले
त्या रिकाम्या जागी, आपापले नियम टाका बघू. ( सोबत आणखी कागद जोडता येतील ! )
सस्मित, आशू.. खरेच द्या रे प्रतिसाद. कुणी सांगावे, भवसागर तरून जायला तिच काडी पुरेल.
किरणने सुरवात केलीच आहे !
रतन, रोमात असणार्यांनी ग्रीसात जाऊन, टर्की खावी !
अशोक, माराच हो एकदा प्रेमाने हाक. दोन दिवस हा(दा)तखिळी बसेल.
मामी, आपण, त्यांना का मन नसते, त्यांना का मत नसते, त्यांना का प्रतिसाद द्यावासा वाटत नाही, असे साने गुरुजींचे विचार मनात आणावे.
उदय - एकदा असेही जगून बघावे बरं.. काय सांगावे, याला(च) जीवन ऐसे नाव ! असेही वाटेल.
सौ.स. मधे कसे छान छान बोलायचे, छान छान वागायचे. सुलेखाताईंच्या रेसिपीतल्यासारखे !
मामी, आपण, त्यांना का मन
मामी, आपण, त्यांना का मन नसते, त्यांना का मत नसते, त्यांना का प्रतिसाद द्यावासा वाटत नाही, असे साने गुरुजींचे विचार मनात आणावे.
>>>> आणायचा प्रयत्न करते, दिनेशदा.
दिनेशदा, "समजा आलीच कोकण
दिनेशदा,
"समजा आलीच कोकण रेल्वे, अन गेलीच थोट्या दामूच्या परसातून तर त्यामुळे काय त्याच्या खांद्याला हात फुटणारेत का?"
या चालीवर
पाळलाच तुमचा सौ. सप्ता,
आन बोललोच नीट, दारू प्यालेल्या सापासारखा सरळ, तर काय त्या ४ दिवसाच्या पुण्ण्याच्या जोरावर 'स्वर्गात' मला इब्लिस आयडीने प्रवेश मिळणारे का?
(विंडोसीट-अॅडव्हान्स-बुकिंग-इन-नरक-वाला) इब्लिस
रच्याकने, १७ ते २१ चा सप्ताह कसाकाय झाला?
मायबोलीकर ना मी, आधी केले मग
मायबोलीकर ना मी, आधी केले मग सांगितले. माझा सप्ता सुरु झालाच.
आणि फलेषु कदाचन हो. आपण कसे (जिलेबीसारखे) सरळ वागायचे. जिथे मायबोलीकर तो (काय) स्वर्ग असणारेय... ( कंसाचे कारण वर दिलेय तेच ! )
ओ तुम्ही रूल मोडला माझ्या
ओ तुम्ही रूल मोडला
माझ्या प्रतिसादावर प्रतिसादच नाही दिला
फाऊल फाऊल फाऊल
दिनेशदा, लै भारीच. आवडल. मी
दिनेशदा, लै भारीच. आवडल. मी सौजन्यातच आता नव्या जोमाने..
रच्याकने नेहमी सौजन्यातच असणार्यांसाठी कोणती कन्सेशन्स. .. ???
दिनेशदा, आयडिया आवडली बर
दिनेशदा, आयडिया आवडली बर का.
चला सुरुवात झाली. तशी मी फार उखाळ्यापाखाळ्या न करता सौजन्यानेच वागते नेहमी. पण दुसर्यांचे वादविवाद चवीने वाचत बसणे हे पण या सौस मधे टाळलं पाहिजे ना!!
मला पण आवडेल सौ.स. पाळायला
मला पण आवडेल सौ.स. पाळायला जर बाकी सगळ्यांनी पाळला तर
वादविवादाच्या ओघात आपल्याकडून
वादविवादाच्या ओघात आपल्याकडून सौजन्याची लक्ष्मण रेषा ओलांडली गेली तर तत्परतेने त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करण्याचं तरी सौजन्य दाखवावं; खूप फरक पडतो अशाने.
दिनेश लेख वाचून पहिल्यांदा मी
दिनेश लेख वाचून पहिल्यांदा मी माझ्या सदस्यत्वात जाऊन कुठे फुल्या आणि ४२० चे आकडे नाहित ना? ते पाहून आले.
तसं सौजन्य दाखवायचं म्हणलं तर अजून हजार सुचना वर अॅड करता येतील.
पण बेसिक तुम्ही सांगितलेलं पाळण्याचा प्रयत्न करीन. तशी मी सौजन्यानेच वागते हो सर्वांशी अजून थोडं बाणविन अंगी.
लय भारी, आपण
लय भारी, आपण जमवणार!>>>>>>>>>विदिपा, शुभेच्छा!
आज्जे, शुभेच्छा देण्यावरून आपल्या मनात मला हे जमणार नाही ह्याबद्दल ठाम विश्वास आहे ह्याचे कौतुक वाटले.
दिनेश( सौ. स. असल्यामुळे वरील नियमावलीप्रमाणे 'दा' लावले तरी तो दादा नसतो ह्या न्यायाने एकेरीवर आलोय :D),
आज्जेंना उद्देशून वरील विधान आहे ना सौ. स. च्या आचारसंहितेत?
He bhale shaabbaas.
He bhale shaabbaas. Rachyakane ya lekhala saujanyapurna shaljodi ase nav dyave Kay?
Pages