Submitted by शोभा१ on 17 December, 2012 - 03:32
दिनांक ११.१२.१२ ते १३.१२.१२ , संतोष हॉल, कर्वे रोड, पुणे, येथ जुन्या नाण्यांच प्रदर्शन होत. अस्मादिकांनी त्याला भेट दिली.
कुणाला सर्व फ़ोटो पहायचे असतील तर ही लिंक पहा.
http://www.flickr.com/photos/57204115@N08/
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वा शोभे मी पण साठवायचो
वा शोभे मी पण साठवायचो लहानपणी नाणी, घरीगेल्यावर जाऊन शोधतो कोणती सापडताय का ते आणि मग झब्बू देतो
केदार? काय लिहावे हे आठवत
केदार? काय लिहावे हे आठवत होतास का?
मस्तच!!
मस्तच!!
छान................. . . .माझ
छान.................
.
.
.माझ्या कडे सुध्दा जुनी आणि काही जुनी विदेशी नाणी आहेत
मी वाचले होते या
मी वाचले होते या प्रदर्शनाबद्दल. छान संग्रह आहे .
मस्तच
मस्तच
केदार, विजय, उदय, दिनेशदा,
केदार, विजय, उदय, दिनेशदा, झकासराव, धन्यवाद!
छान संग्रह आहे .>>>>>>कित्ती तरी अल्बम होते. सगळे बघायला वेळच नाही मिळाला.
मस्त आहेत फोटो. माझ्याकडे
मस्त आहेत फोटो. माझ्याकडे यातली भोकाचापैसा, ढब्बूपैसा, आणा, अशी काही नाणी आहेत. माझ्या एका आतेचुलत भावाला असली नाणी जमवायचा प्रचंड छंद आहे.
तिथे बड्डॅ नोट्स असा एक स्टॉल
तिथे बड्डॅ नोट्स असा एक स्टॉल होता का? १० रुपयाची नोट १०० रुपयाला विकत असतात.
नंदिनी, रोहन धन्यवाद! तिथे
नंदिनी, रोहन धन्यवाद!
तिथे बड्डॅ नोट्स असा एक स्टॉल होता का? १० रुपयाची नोट १०० रुपयाला विकत असतात.>>>>>>>>>तिथे बरीच नाणी आणि नोटा विकत होते. लिलावही चालू होता.
लिलाव असणारच.. अश्या ठिकाणी
लिलाव असणारच..
अश्या ठिकाणी खरेदि-विक्रीहोतेच.
व्वा मस्त फोटो.... शोभे, तो
व्वा मस्त फोटो....:स्मित:
शोभे, तो दोन हातात अंगठ्या आहे तो हात तुझा का?..... असेल तर मी म्हणेल, चला हात तरी बघायला मिळाला शोभाचा
शोभा, छान आहेत फोटो !
शोभा, छान आहेत फोटो !
शोभे, तो दोन हातात अंगठ्या
शोभे, तो दोन हातात अंगठ्या आहे तो हात तुझा का?..... असेल तर मी म्हणेल, चला हात तरी बघायला मिळाला शोभाचा फिदीफिदी>>>>>>>>>>>>स्मितू, तुझा अपेक्षाभंग केल्याबद्दल क्षमस्व.
एकही फोटो दिसत नाही
एकही फोटो दिसत नाही
एकही फोटो दिसत नाही
एकही फोटो दिसत नाही अरेरे>>>>>>>>>>>>तूही, दक्षीसारखी अमानवीय आहेस का?
अशी सुंदर प्रदर्शने आवर्जून
अशी सुंदर प्रदर्शने आवर्जून मुलामुलींना दाखविली गेली पाहिजेत....[पोस्टाचीही]. एक समृद्ध अशी परंपरा असते नाण्याना आणि त्याच्या इतिहासालाही.
प्रचि क्रमांक २३ इथे शोभा यानी 'एक पैशाचे नाणे' दाखविले आहे. त्याच्याबाबतीत त्या दशकात बाजारात विनिमय दराच्या प्रश्नावरून बराच गोंधळ झाला होता. फोटोतील १ पैशाला त्या काळी '१ नया पैसा' असे नाव होते आणि १०० नये पैसे = १ रुपया हा दर निश्चित झाला होता. पण त्या वेळी जुन्या नाणेप्रणालीतील आणा, दोन आणे, पावली, अधेली ही नाणीही अधिकृत होती. जुना आण्याचा दर होता १ आणा = ६ नये पैसे....२ आणे = १२ नये पैसे....१ पावली = २४ पैसे.
गोंधळ होवू लागला तो अशाबाबतीत की ४ पावल्या = १ रुपया हा रीझर्व्ह बॅन्केने मान्य केलेला अधिकृत दर. पण वरील नया पैशाच्या हिशोबाने ४ पावल्या = ९६ नये पैसे असा दर पडू लागला....म्हणजेच एखादा दुकानदार १ रुपयाचे नाणे वा नोट याच्या बदल्यात १ शेर तांदूळ देत असे पण एखाद्या ग्राहकाने ४ पावल्या दिल्या तर आणखीन् ४ नये पैसे द्या असे ग्राहकाला म्हणू लागला. भांडणाचे प्रसंग घडलेही.
स्मितू, प्रज्ञा, अशोकजी
स्मितू, प्रज्ञा, अशोकजी धन्यवाद!
अशोकजी छान माहिती. धन्यवाद!
मस्त आहेत फोटो. माझ्या
मस्त आहेत फोटो. माझ्या संग्रहातील काही फोटो टाकले तर चालतील का?
सामी धन्यवाद! माझ्या
सामी धन्यवाद!
माझ्या संग्रहातील काही फोटो टाकले तर चालतील का?>>>>>>>>>>>जरूर. आनंदच होईल आम्हाला.(नेकी और पुछ पुछ? )
आह्हा.. माझ्याही संग्रही आहेत
आह्हा.. माझ्याही संग्रही आहेत काही जुनी नाणी... वडिलांनी दिलेली..
खासकरून ते तीन पैशाचं , आम्हाला कित्ती अप्रूप वाटायचं त्याचं..
शोभा मस्तच आहेत फोटो.. काय काय पाहावं , किती किती पाहावं असं होत असेल नं???
खासकरून ते तीन पैशाचं ,
खासकरून ते तीन पैशाचं , आम्हाला कित्ती अप्रूप वाटायचं त्याचं.. >>>>>>>>>>>अग, म्हणजे तुम्ही नाही वापरली ही नाणी. आम्ही वापर्लीत. त्यामुळे त्यांच्याबद्दल जास्तच प्रेम.
शोभा मस्तच आहेत फोटो.. काय काय पाहावं , किती किती पाहावं असं होत असेल नं???>>>>>>>>>>>>हो ना. मी थोडीच नाणी पाहिली. आणि सारखे नंबर असलेल्या नोटा. शेवटचे नंबर १ ते १०० असलेल्या नोटा वगैरे बरंच काही होत. पण वेळे अभावी जेवढ बघता आल, ते बघून फ़ोटो काढले.
एकदम मस्तच
एकदम मस्तच
मी वापरलीत हि १/२/३ पैशाची
मी वापरलीत हि १/२/३ पैशाची नाणी. पण ती नंतर कायद्यानेच बंद झाली.
५ / १० पैसे मात्र भरपूर वापरलेत. मी ७ वी मधे असताना माझे बसचे तिकिट ५ पैसे होते, ते ९ वीत १० पैसे तर कॉलेजमधे ३५ पैसे होते.
माझा शाळेतला रोजचा पॉकेटमनी ३० पैसे होता तर कॉलेजमधे तो १ रुपया होता.
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/39689
जुनी नाणी
ह्या दुव्यावर जुन्या नाण्यांचा विषय निघाल्यावर मला माझ्या संग्रहातील जुनी नाणी आठवली!
ही पाहा!! तुम्हालाही नक्कीच मनोरंजक वाटतील.
.
http://nvgole.blogspot.in/ ह्या माझ्या अनुदिनीवरही आपले स्वागतच आहे!
मी वापरलीत हि १/२/३ पैशाची
मी वापरलीत हि १/२/३ पैशाची नाणी. पण ती नंतर कायद्यानेच बंद झाली.
५ / १० पैसे मात्र भरपूर वापरलेत. >>>>>>>>>>हो. पुढच्या पिढीला आता चार आणे आठ आण्याची नाणी पण अशीच संग्रहालयात पहावी लागणार. आणि १/२/३ वगैरे तर ऐतिहासिकच वाटतील त्याना.
व्वा! मस्तच! मी घेऊ का हा
व्वा! मस्तच! मी घेऊ का हा फोटो?
अरेव्वा! जाउन आलीस होय गं
अरेव्वा! जाउन आलीस होय गं प्रदर्शनाला.
पहिल्या फोटोतलं एक नाणं होतं आमच्याकडे, तांब्याचं. शिवाजी महाराजांच्या काळातलं होतं.
नवव्या फोटोतलं मधे छिद्र असलेलं पण होतं.
यात ढब्बु पैसा तो कुठला???
शोभीचा हात...! स्मिते, शोभीच्या हातात २ नै ४-४ अंगठ्या असतात.
शोभीच्या हातात २ नै ४-४
शोभीच्या हातात २ नै ४-४ अंगठ्या असतात. >>>>>>>>>>आर्ये, ४-४ काय ग? दहाही बोटात असता.
वा नरेंद्र. मस्तच संग्रह आहे.
वा नरेंद्र. मस्तच संग्रह आहे.
Pages