माहिती, शंका, प्रश्न, इत्यादी इत्यादी साठी इथे विचारा

Submitted by अवल on 14 December, 2012 - 01:32

इथे तुम्हाला पडणारे कोणतेही प्रश्न विचारा. हे गप्पांचे वाहते पान आहे हे लक्षात ठेवा. तुम्ही विचारलेला प्रश्न अन त्याचे उत्तर इथून वाहून जाऊ शकते. तेव्हा प्रश्न विचारल्यावर लगेच इथे उत्तर वाचायला या.
ब-याचदा आपल्याला किरकोळ प्रश्न पडतात. त्याची उत्तरेही तेव्हढ्यापुरतीच हवी असतात. अशा प्रश्नांसाठी हे वाहते सार्वजनिक पान.
धागा वाहता असल्याने कृपया प्रश्न, उत्तरे अगदी थोडक्यात लिहूयात.
शक्य असल्यास उत्तर प्रश्नकर्त्याच्या विपुत डकवू शकता. प्रश्नकर्त्याने देखील उत्तर वाहून गेले असल्यास विपु तपासावी.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वरदा....महेश....अश्विनी.....डॉक्टर....

थॅन्क्स अ लॉट. खरं सांगायचं झाल्यास ह्या संदर्भात मी काहीशी घाईच केली. मुलाने काही वर्षापूर्वी लॅण्डलाईन काढून टाकल्याने बीएसएनएलसमवेत नातेच संपुष्टात आले होते असेच म्हणावे लागेल. मग टाटा डोकोमो व आता एम.टी.एस. सेवा पत्करली. सुरुवातीच्या काळात त्या सेवेचे स्पीड पाहून खूपच प्रभावित झालो होतो....त्याला दुसरे कारण म्हणजे आमच्या सरकारी कार्यालयात त्यावेळी बीएसएनएलचे जे नेट कनेक्शन होते ते ब्रॉडबँड नव्हते....त्यामुळे अगदी स्नेल स्पीडने कामकाज चाले. त्या तुलनेत घरातील एमटीएस राजधानी एक्सप्रेसच वाटत होते.

महिना १०१०/- रुपये बिल येते. त्याबद्दल काही तक्रार करण्याचे कारण नाही, ती स्कीम माहीत होतीच. पण झाले आहे असे की महिन्याभराचा १२ जीबीचा कोटा दहा तारखेला संपला की मग हीच राजधानी एक्सप्रेस एका सेकंदात उरलेल्या वीस दिवसांसाठी बार्शी लाईट बनते.

बीएसएनएल अशा स्पीडच्या बाबतीत झकास दिसत्ये....एकसूरीच.

आम्हा दोघांचा मोबाईलसुद्धा बीएसएनएल चा आहे. पुण्यात खूप वाईट सर्व्हिस आहे पण कलकत्ता आणि उर्वरित देशभरात अतिशय उत्तम सर्व्हिस कायमच मिळालीये. अगदी खेडोपाडी तर हमखास. रोमिंग अ‍ॅक्टिव्हेशनची भानगड कधीच नव्हती. कसलेही छुपे चार्जेस नाहीत. कुठलीही तक्रार घेऊन त्यांच्या ऑफिसमधे गेलं तरी ५-१० मि.त त्याची तड लावली जाते असाच कायम अनुभव आहे Happy

आजपासून याहूच्या चॅटरूम्स बंद होणार अशी जोरदार बातमी होती. पण अत्तातरी रूम उघडी दिसतेय. कुणाला अधिक माहीती आहे का?

>>चला आज सावाईला एक गटग करूयात
पण तुम्ही आणि बाकीचे लोक कार्यक्रम कसा ऐकणार Wink

शिवाजीपार्कला रणगाडे तसेच इतर लश्करी हत्यारांच प्रदर्शन सुरु होणार होतं .... ते सुरु झालं आहे का? असल्यास त्याची वेळ काय आहे ?

बीएसेनेललाच वायफाय मोडेम मागावे > मायाकडच्या मॉडेम + वायफाय डिवासचा अनुभव मात्र काही फार चांगला नाहीय. वायफाय नेहेमी डिसकने़क्ट होत राहतं. Sad लॅन (वायर्ड) वर अस्लेल्या डेस्कटॉप ला काहीही प्रॉब्लेम नाही. एंजीनिअरला विचारलं तर म्हणे, वायफायला पासवर्ड नका ठेवू! (मॅड कुठचा)

तिकिटे कशी मिळवायची?? ><>>>>>>>> शिवाजी मंदीर ला फोन कर आणि बुक कर....फोन वर होतात वाटते

आजपासून याहूच्या चॅटरूम्स बंद होणार अशी जोरदार बातमी होती. पण अत्तातरी रूम उघडी दिसतेय. कुणाला अधिक माहीती आहे का?
>>> इब्लिस... ते अजुन सुरु आहे? मी चॅटरुम वापरुन जमाना झाला. मला वाटलेले कधीच बंद झाल्या असतील.

अबोली,
तुम्ही इंटरनेटच्या माध्यमातून काम शोधत आहात असे दिसते.
प्रयत्न ठीक आहे, पण जिथे कुठेही काम देण्याआधी तुमच्याकडे पैसे मागितले जातील, किंवा तुमच्या अकाउंट नंबर इ. अनरिलेटेड माहिती विचारली जाईल तिथे विचार करून पाऊल टाका. If it is too good to be true, it is NOT true. जर एकादी गोष्ट कल्पनेपलिकडील वाटतेय, -उदा. घरबसल्या एसेमेस वाचा अन ३०००० रुपये कमवा- तर ती खोटी आहे, हे लक्षात ठेवा.

मायबोलीवर तुम्ही सल्ला विचारत आहात ही चांगली गोष्ट आहे. इथे योग्य सल्ला मिळेल, ही खात्री बाळगा.
अन माझा सल्ला आहे, की आधी घराबाहेर पडा, रिअल लाईफ मधे रिअल जॉब घ्या, मगच नेटवर प्रयत्न सुरू करा.

तुम्हाला शुभेच्छा!

कळंबोली येथे लोकल ट्रेनचे स्टेशन आहे का? त्याचं काम पुर्ण झालय का?>>>

नाही. ते कोकण रेल्वे मार्गावरचं स्टेशन आहे. काही पॅसेंजर थांबतात तेथे. दिवा-पनवेल, वसई-पनवेल वगैरे.

Thanks iblis

मी २०१२ ऑगस्ट मधे फ्लॅट बुक केला. आज बिल्डरचा फोन आला की सर्वीस टॅक्स आधी मागील वर्षात २.६ % होता व बदललेल्या नियमाप्रमाणे नवीन वर्षात तो ३.२ झालाय तर फरकाचे पैसे लवकरात लवकर द्या...हे बरोबर आहे का? रिसिट वगैरे सगळे नीट मिळेल असे म्हणला.

हा धागा बंद करतो आहोत.

मायबोलीकर एकमेकांना नेहमीच माहिती देत असतात , मदत करत असतात. पण त्याच बरोबर एकाच प्रश्नाचं उत्तर परत परत द्यावं लागलं तर तो त्या मदतीचा आणि माहिती देणार्‍याच्या वेळेचा अपव्यय आहे. विचारपुशीत उत्तर दिल्यामुळे कुठलीही वर्गवारी होत नाही आणि शोध अजून अवघड होतो.
ही सोय प्रश्न विचारणार्‍या व्यक्तीसाठी खूप सोयीची असली तरी तोच प्रश्न असणार्‍या इतर १० जणांसाठी गैरसोयीची आहे. तसंच या धाग्यामुळे "मी काही शोधत बसत नाही, मलाच इथेच उत्तर आणून द्या आणि तोंडात घास भरवा" अशा सारख्या अपेक्षा वाढतात. प्रश्नकर्त्याचा वेळ तेवढा महत्वाचा पण उत्तर देणार्‍यांकडे भरपूर वेळ आहे असेही सूचीत होते. ज्याला प्रश्नाचे उत्तर हवे आहे त्याने किमान त्यासाठी आधीच त्याचे उत्तर कुणी दिले आहे का, किंवा कुठे प्रश्न विचारावे इतके तरी कष्ट घ्यावेत अशी अपेक्षा करण्यात काहीच चूक नाही.

याहून थोडे पुढे जाऊन असेही म्हणता येईल की हा ग्रूप देखील बंद करण्याची गरज आहे (पण लगेच करणार नाही आहोत.) कारण त्या त्या गावातल्या मदतीबद्दलचे प्रश्न त्या त्या गावातल्या ग्रूपमधे विचारले जाणे योग्य आहे. उदा. घरकामासाठी मुंबईमधे काही मदत हवी असेल तर ती चटकन मुंबईच्या ग्रूपमधे मिळेल. सगळ्या गावाबद्द्लची मदत इथे मागून एकतर ती पटकन मिळणार नाही आणि शोधायलाही अवघड जाईल. संगणकाबद्दलची माहीती संगणकाच्या ग्रूपमधे. गुंतवणुकीची माहिती गुंतवणुकीच्या ग्रूपमधे, चायनीज भेळ बद्दलची माहिती पाककृतींच्या ग्रूपमधे. पण सध्या हे सगळे विषय याच एकाच ग्रूपमधे विचारले जात आहेत ते योग्य नाही.