१२.१२.१२

Submitted by इब्लिस on 11 December, 2012 - 14:26

लोकहो,
१२.१२.१२ सुरू झाले.
जगबुडी अजून तरी आलेली नाही.
२१ ला उत्तरायण सुरू होते. तेव्हा येईल म्हणे Wink सो येत्या ९ दिवसांसाठी तुम्हाला शुभेच्छा.

या सगळ्या १२ मधे मधलाच २० का इसरताट कुनास ठाऊक

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<< ही चर्चा करून काय साध्य करण्याचा विचार आहे? >> माझ्यापुरतंच बोलायचं तर मला झेपेल अशी हलकीशी बौद्धीक कसरत ! Wink

१२.१२ ला असणारे दिग्गजांचा वाढदिवस
.
१) महामहाअति मानव...श्री श्री श्री श्री रजनिकांत (शिवाजीराव गायकवाड)

२) श्री युवराज सिंग

३) भरत जाधव

बारव म्हणजे विहीर बहुतेक.

दक्षिणाताई, चर्चा नाहि हो, गप्पा. थोडा टीपी.

डॉक्टर....

तुम्ही 'बारा' ची जी काही धाग्यात उदाहरणे दिली आहेत, ती सारीच 'वाईट' अर्थाने घेतली जात नाहीत....आणि घेऊही नयेत.

उदा.
१. बारा गावचे पाणी पिणे -- यात उलटपक्षी ज्या इसमाला उद्देश्यून असे म्हटले जाते ते त्याच्यातील अनुभवसंपन्नतेला दाद देण्यासाठीच म्हटले जाते. 'या वादात आपल्या रंगरावाचे मत विचारात घेऊ या पाटील. त्यो गडी बारा गावचं पाणी प्यालेला आहे...' इथे रंगराव नामक इसमाचे चांगल्या अर्थाने कौतुक आहे....वाईट नाहीच.

२. बारा पिंपळावरचा मुंजा -- भटक्याला उद्देश्यून असे म्हटले जाते. म्हणजे अमुक एकाचे बूड एका जागी स्थिर नसेल तर त्याच्या स्वभावाचा उल्लेख करायचा झाल्यास त्याच्याबाबतीत 'बारा पिंपळावरचा मुंजा' म्हटले जाते....त्यामुळे इथेही बाराचे प्रयोजन वाईट अर्थाने नाही.

बाकी उदाहरणे 'वाईट' अगदीच काळ्या शाईत रंगविण्यासारखी नसली तरी ती स्वीकारली तरी चालतील असे म्हणतो.

कोल्हापूरात एखाद्या टग्याचा उल्लेख......" त्येचं काय बी सांगू नकोस, गडी लई बारा बोड्याच्या हाया !" असा केला जातो. वरवर पाहता बाराबोड्याचा म्हणजे 'लई हुशार' असे म्हटले जाते....म्हणजे त्याच्या गर्दनीवर एक नाही तर बारा डोकी आहेत या अर्थाने. पण सूक्ष्म वा अती खोलात जाऊन पाह्यचे झाल्यास भलताच अर्थ निघतोही.

एखाद्या खटल्यातील साक्षीदाराची साक्ष बेभरवाशाची आहे आणि तो खरेदी केलेल्या गटातील आहे असे उलट पक्षाच्या वकिलाला म्हणायचे असल्यास ....'महाशय, अमुक यांच्या साक्षीवर विश्वास ठेवू नये. इथल्या प्रत्येकाला माहीत आहे की हा साक्षीदार बारा जिभेचा आहे....".

इथे 'बारा जिभेचा' म्हणजे या हाताची थुंकी पटदिशी त्या हातावर करण्यात पटाईत असलेला माणूस.

बारव म्हणजे विहीर बहुतेक...
पायर्‍यांच्या विहीरीला बारव म्हणतात....

भन्नाट पोस्ट्स सगळ्यान्च्याच Happy
>>>> १२ मती>>बारामती>>> म्हनणार्‍यांचा निषेध >>>> प्रचंड अनुमोदन <<<
हो ना, अगदी १२मती ते भानामती सारख वाट्ट! Proud

आज साहेबान्चाही वाढदिवस आहे म्हणे? खर का? असल्यास शुभेच्छा Happy

अगं भाचे.... तुला माहीत आहेच आपल्या कोल्हापुरी "बारा" च्या मिरचीचा ठेचा ! बाराबोड्यासारखाच आपल्याकडे 'बाराशिंग्या' चा एक टोला आहेच. अर्थ उलगडून सांगणे केवळ अशक्य.

तुला हेही माहीत असेल की, 'तुंबारा' असा एक शब्द आपल्या भागात आहे. त्याचा अर्थ परसाकडे, तसेच शेतवाडीत तुंबलेल्या पाण्याचा लोट. यातील 'बारा' ला 'बारा दिशेने आलेल्या पाण्यामुळे साचलेला भाग....'तुंब' ला साचण्याची छटा असल्याने 'तुंबारा'. आता चावडीवरील गप्पात एखादा पांडोबा धोंडोबाविषयी म्हणतो, "त्याला ईचारू नका, त्याचा तुंबारा लई दांडगा...." म्हणजे कोणतेही काम कसे होऊ द्यायचे नाही असाच विचार करण्यार्‍या इसमास 'तुंबारा टाकणारा' म्हणतात.

मी माहिती म्हणुन वाचते आहे. नविन नविन वाक्यप्रकार, शब्द कळताहेत. अशोकमामांच्या पोस्ट्स वाचल्याशिवाय हे असे स्थानिक शब्द आणि त्यातले दडलेले अर्थ कळलेच नसते. माझं मराठी यात भर घालु शकेल एवढ्या लायकीचं नाही, पण म्हणुनच मला तरी हा धागा आवडला. ( अजुन किती तरी नॉन्सेन्स धागे आहेतच, त्यापेक्षा इथे मराठी भाषेतले वेगवेगळे चांगले/वाईट शब्द तरी कळताहेत. )

12.12.12. ला महाराष्ट्र राज्य लोड-शेडिंग मुक्त करणार होते .............................

काय झाले त्या घोषणेचे?

......................................

धन्यवाद मनिमाऊ....

भाषेवर प्रेम असले की पुष्कळ झाले. भाषा ही निव्वळ पुस्तकी असून चालत नाही, भागतही नाही. तिची चौफेर अंगाने वाढ होण्यासाठी मग असे पुस्तकात चुकूनही सापडू शकणार नाहीत. त्यामुळे असले वाक्यप्रचार म्हणी ओतप्रोत भरलेल्या बोलीभाषेत सापडत असल्याने त्यानुसार त्यांचा धांडोळा घ्यावा लागतो.

नोकरीतील कामाच्या स्वरुपामुळे मला चारपाच जिल्ह्यांच्या तालुका तसेच ग्रामपंचायती पातळीवरील गावात जावे लागते. तिथे वेळप्रसंगी मुक्कामही करावा लागतोच. सायंकाळी कामे संपली की मग उगाच खोलीवर येऊन पडण्यापेक्षा चावडीच्या ठिकाणी असलेल्या पारावर सहजगत्या....कुणाला समजेल वा ना समजेल ... अशा रितीने येऊन बसले की बस्स. फक्त कान जागृत ठेवून तेथील ग्रामस्थांच्या गप्पा ऐकण्याचा आनंद मनमुराद लुटावा. एरव्ही कधीही लिखित स्वरूपात न सापडणार्‍या शब्दांचा खजिनाच असतो या लोकांच्या बोलण्यात. तोच लक्षात ठेवून त्यांचे अर्थ शोधत बसणे हा खूप विरंगुळ्याचा कार्यक्रम होऊ शकतो.

एकदा पारावर बसलो असता कानी पडले....."धुमाळाचा गणपा ? तो कडू आता कुठं सापडायचा आपल्याला ? बारा खुटावरचं बेनं त्ये.....". मला ते विशेषण नवलाचं वाटलं. सोबतीला असलेल्या ग्रामसेवकाला हळूच विचारलं..."हे खुट म्हणजे शेतात उसाचं असतं ते का ?" याला ग्रामसेवकाने उत्तर दिले....'अगदी तसंच नाही सर, पण गावातील बारा बलुतेदारांच्या दारात....सुतार, लोहार, कुंभार, चांभार आदींच्या घरासमोर कामाच्या जागी एक लाकडी बैठक असते, स्टुलासारखी. त्याला खुट म्हणतात. गावातील बिनकामाची माणसं, विडीकाडीसाठी मग त्या सुताराकडे लोहाराकडे चकाट्या पिटायला येतात, त्यावेळी त्या खुटावर बसून चुनातंबाखू चोळत आगापिछा नसलेल्या गावगप्पा मारत बसतात.....त्यावरून असल्या जागेचा नाद असलेल्या माणसाला 'बारा खुटावरचा' असेच नाव पडले...."

मस्तच भर पडली माहितीत.

अशोक पाटील

खुंटावरचे.
खुंट या शब्दाचा अर्थ चौक असाही होतो. साधारणत: या खुंटावर आजूबाजूचे लोक संध्याकाळी गप्पा वगैरे मारायला जमतात.

होय डॉक्टर.....पण "खुंट" चा ग्रामीण लेहजा 'खुट' असाच ऐकू येतो.....मी तसाच ऐकला असल्याने प्रतिसादात अनुस्वारीत उच्चाराला रजा दिली आहे.

[तसं पाहिलं तर न्हावी, सुतार, कुंभार याना कामाच्या ठिकाणी अशी दोनचार रिकामटेकडी डोकी - उच्चारी डोस्की - लागतातच लागतात. त्यांनाही तसल्या रसभर्‍या गप्पा ऐकताना आपल्या कामात काहीसा रीलिफ मिळाल्याची भावना होत असावी......गावातील राजकारण तर आवडीचा विषय, खुटावरील.]

बाय द वे.....हा बाफ "वाहता" झालाय का ? काही प्रतिसाद गायबल्याचे दिसत आहेत.

सामोपचार | 12 December, 2012 - 11:17
रि.न्हा.भिं.तु.ला. प्रकारचा बाफ.
<<
अगदी अगदी!
इथे काय गंभीर धर्मशास्त्रविनोद अपेक्षित होता काय तुम्हाला? Wink

पाटील सर बोडा हा शब्द आमच्याकडेही वापरात आहे.
'बारा बोडयाचा' आह़ेच
तसेच
'यडया बोडयाचा' आहे.

पण पाटलांच्या तोंडी सदोदित असणारा 'मारला माहया बोडयावं' हा जरा जास्तच प्रचलित आहे.

पण मग शेवटल्या बोडयाची संगती कशी लावणार?

शोधू जाता गुगलमहाराज कुचकामी ठरले. मग 'तुम ही उस वक्त याद आते हो जब कोई आसरा नहीं होता' अशी नेहमीचीच शरणागती पत्करत मोल्सवर्थऋषीची याचना केली.
तर
बोडा (p. 593) [ bōḍā ] m (Vulgar.) Membrum virile. असा दाखला मिळाला.
Membrum virile पुरेसा स्वयंस्पष्ट आहे
तरीही विकिपीडिया उद्धृत
Membrum virile - penis /pe·nis/ (pe´nis) the male organ of urination and copulation
हा ही दाखला देतोच।

मग आता 'मारला माहया बोडयावं' म्हणताना डोळे ओठ छाती भुजा यात त्वेष का संचारतो हेही आपसुकच उकललं.

चला यानिमित्ताने बर्‍याच दिवसांचं बोड्याबद्दलचं कुतूहल ऑथेंटिकली शमवायला वेळ मिळाला. शेवटी कळायला लागल्यापासून कानावर नित्यनेमाने पडणारा शब्द आहे तो.

pracharak2002....

तुम्ही चिकाटीने 'बोड्या' चा अर्थ संदर्भासहीत शोधून काढलात यावरून तुमची अभ्यासी वृत्ती दिसून येते असेच मी म्हणेन. मी वर आणखीन् एक प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे असे 'जरासे हट के' शब्द कानावर पडले की त्याचा जोपर्यंत सोदाहरण अर्थ समजत नाही तोपर्यंत मी अस्वस्थ होऊन जातो. [काही अर्थ असे काही उग्र असतात की इथे द्यायचे झाल्यास ते किती आणि कसे 'सौम्य' करायचे हे समजत नाही.]

एरव्ही कोल्हापूरात "अरे ए बाराबोड्याच्या....कुठं उलथला होतास येरवाळी ?" अशी सहज साद घातली जाते एखाद्याला. ज्याला ही शिवी दिली आहे त्यालाही यात काही मोठी आगळीक घडली आहे असे वाटत नाही, इतके हे विशेषनाम इथल्या मातीत रुतून बसले आहे.

निपाणी, बेळगाव सीमाभागात एखाद्या स्त्री विषयी दुसरी स्त्री च शेरा मारते, "काय बी सांगू नका सावीचं मला.....ती म्हणजे बारा टिकल्याची आवा हाया !"

इथे कुणा सावित्रीविषयी असे अनुदार काढले गेले आहेत की ती स्त्री उठवळ आहे. 'बारा टिकल्या' म्हणजे बारा पुरुषांची सोबत करणारी.

अशोक पाटील

माझे मोजून चार पैसे !

एक गाव बारा भानगडी... एक सुपरहिट मराठी चित्रपट

मला जाऊ द्या ना घरी, आता वाजले कि बारा... या गाण्यावर अमृता खानविलकर आणि यो रॉक्स ( स्वतंत्रपणे) नाचलेत.

बारा बजे कि सुईयो जैसे हम दोनो मिल जाते है - ऋषि कपूर किंवा जितेंद्रचे गाणे

रात के बारा बजे, चौक मे हुल्लड मचे - असेच एक गाजलेले गाणे

पाटील सर
'जरासे हट के' शब्द कानावर पडले की त्याचा जोपर्यंत सोदाहरण अर्थ समजत नाही तोपर्यंत मी अस्वस्थ होऊन जातो.
सेलिंग इन दि सेम बोट.
"अरे ए बाराबोड्याच्या....कुठं उलथला होतास येरवाळी ?"
येरवाळी??? यू मेड माय डे सर.
केंधूळ वाट पघत व्हतो हा शब्द आयकायची.
आमच्या म्हतारी आयी,मोठ्याई गऊआयी,कापसाय्काकू,सोनाय्काकू,दगडायवह्यनी,पार्बताय्वह्यनी, भागूआत्ती अशा अनेक आजी,काकू,आत्या, भावजयी तसेच आजोबा, काका, बंधू यांच्या तोंडी अशा अनेक गुळच्याट शब्दांचा झरा वाहायचा.

आता माझी सात वर्षीय कन्या मला म्हणते,
"बाबा आपण किती दिवसांबाद कॅरम खेळतोय ना?"
"आई मला बड्डेला पिवळावाला ड्रेस घेशील का?"
कालाय तस्मे नम:

रवी दाते.

Pages