इतकंच.!..

Submitted by तुष्कीनागपुरी on 11 December, 2012 - 09:56

काही नाही.. आठवण आली इतकंच.!..
काळजातली शिवण निघाली इतकंच.!..

डोळ्यांमध्ये कचरा गेला सांगितले ना
तिच्या सहीची वही मिळाली इतकंच.!..

तुझ्या विना हे जगणे आता शक्यच नाही
जातांना ती मला म्हणाली इतकंच.!..

आठवणींना माझी कधीच हरकत नव्हती
गालावरती येते लाली इतकंच.!..

वाट पाहणे जीव जाळणे संपत नाही
पाहता पाहता वर्षे गेली इतकंच.!..

~ तुष्की
नागपूर, ११ डिसेंबर २०१२, ०१:१५

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुमची कविता वाचल्याचे स्मरत नव्हते तुष्की वरून आठवले आता तुमचे इथले लेखन ढुंडाळीन
अतीशय उत्तम आहे कविता

पण .......ही गझल असती तर मला कित्ती आवडली असती म्हणून सांगू !!

मी परवानगी शिवाय प्रयत्न करून पाहिला ........ क्षमस्व!
तुमच्या विचारपूसमधून कळवतो आहे आवडल्यास कळवा

-वैवकु

वाह .....!

खुलासा:

मंडळी, या कवितेची पहिली ओळ मा़झी नाही. ममता ताईंनी त्यांच्या थोपू भिंतीवर ती ओळ लिहिली 'काही नाही आठवण आली इतकच' आणि काळजात काहीतरी हलले, आणि त्याच भरात मी एका दमात हे सगळे लिहून काढले. त्या वेळी पहिली ओळ काही नेह्मीच्या मीटरमधे नव्हती त्यामुळे मी पण फार मीटर चा हट्ट केला नाही. याच कारणाने मी हिला गझल म्हणायचे धाडस केले नव्हते, पण मला इथे स्वत:ला आवडेल इतकी गझलीयत नक्कीच मिळाली आहे.

सर्वांना अनेक धन्यवाद

त्याहीपेक्षा पुढचा खुलासा म्हणजे ही ओळ वैभव ने आधी फेसबुकावर शेयर केली, ममता ताईंनी त्याची ओळ आवडली म्हणून उधृत केली आणि अशी ती माझ्या पर्यंत पोचली.
.
थोडक्यात काय या अंतराळाचे माझ्यावर अनन्यसाधारण उपकार आहेत की मी अश्या प्रतिभावंतांच्या सावलीत आणि काळात जन्माला आलेलो आहे.
.
काही नाही आठवण आली इतकंच
.
(दहा वर्षांनी पुन्हा)
तुषार