Submitted by हर्ट on 5 December, 2012 - 02:04
जेंव्हा आपण एखादी चुक करतो आणि त्या चुकीनंतर आपल्यावर जर पश्चातापाची वेळ येत असेल. त्या पश्चातापाच्या आगीत जर आपण पोळत असलो तर त्यातून आपण बाहेर कसे पडावे? ह्यावर कुणी काही सांगू शकेल का? धन्यवाद.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
प्रायश्चित्त घेऊन.....
प्रायश्चित्त घेऊन.....
बी , चुकीमुळे जर तुमचे
बी , चुकीमुळे जर तुमचे सामाजिक आर्थिक नुकसान झाले तर त्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करा .
जर तुमच्या चुकीने कुणाचे आर्थिक नुकसान झाले असेल तर भरून द्या. जर कुणी दुखावलं गेलं असेल तर संबंधित लोकांची माफी मागा.
बोंबलत बसायचं, बाकी काहीच
बोंबलत बसायचं, बाकी काहीच हातात नसते.पुन्हा चुक करायची नाही. धीस ईज द फॅक्ट ऑफ लाईफ.
ज्याच्यावर अन्याय झालाय आधी
ज्याच्यावर अन्याय झालाय आधी त्याची माफी मागा आणि त्याची होता होईल तेवढी भरपाई करा. पुर्ण भरपाई करणे कधीच शक्य होणार नाही पण तुम्हाला मनापासुन पश्चाताप होतोय एवढे त्याला कळू द्या.
क्षमा मागायची, झालेच असेल तर
क्षमा मागायची, झालेच असेल तर नुकसान भरुन द्यायचे. परत कधीही अशी चूक करायची नाही.. आणि हे सगळे केल्यानंतर परत त्याच त्याच गोष्टीवर विचार करायचा नाही.
मी नुकसान वगैरे नाही केले
मी नुकसान वगैरे नाही केले कुणाचे फक्त बोलताना तीव्र शब्द वापरलेत. तेही सभ्य असे तीव्र शब्द.
बरेचदा डिलीटचं बटण नाही याची
बरेचदा डिलीटचं बटण नाही याची जाणीव होते.
जेव्हा आपली माणस अनंतात विलिन
जेव्हा आपली माणस अनंतात विलिन होतात.. तेव्हा त्यांच्याशी आपण कधीतरी वाईट,चुकीच वागलो होतो ..ते आठवुन बर्याच वेळा इमोशनल अत्याचार होत असतो.. पश्चातापाची भावना खुप प्रबळ असते... अश्या वेळी कितीही काहीही केल तरी व्हायचा तो त्रास होतोच... सो बेस्ट थिंग...परत स्वःताकडुन अस कधीच न घडु देण आनि दिनेशदा म्ह्णतात तस जास्त आनि सारखा सारखा विचार न करण
मी नुकसान वगैरे नाही केले
मी नुकसान वगैरे नाही केले कुणाचे फक्त बोलताना तीव्र शब्द वापरलेत. तेही सभ्य असे तीव्र शब्द.>>>
तुम्हाला मन येवढं खातय म्हणजे नक्कीच तुम्ही चुक केली आहे हे तुम्हाला व त्या व्यक्तिला ही माहित आहे. "सॉरी" हा शब्द जरी आपण सर्रास वापरत असलो तरी तो अश्या वेळी खुप अवघड शब्द आहे. ह्याचं कारण "इगो" ... हा इगो आपल्याला सॉरी चा वापर करु देत नाही.
बी...
ती व्यक्ति जर खरच तुमच्या द्रुष्टीने खुप महत्वाची असेल आणि केलेली चुक तुम्हाला येवढी डाचत असेल, तर सगळी हिम्मत गोळा करा, आणि त्या व्यक्तिला एकांतात "सॉरी" म्हणुन टाका. अगदी मना पासुन. आणि जर तुम्ही त्या व्यक्तिला जाहीर पणे तिव्र शब्द वापरुन अपमानीत केले असेल, तर जाहीर पणे माफी मागा.
कधी कधी आपण एखाद्या व्यक्तिला उगाचच अपमानीत करतो, पण जाउन "सॉरी" म्हणावे येवढी ती व्यक्ति महत्वाची पण नसते. उदा> दरावर येणारे सेल्स मन, वेगवेगळ्या स्कीम्स सांगणारे टेलीफोन्स... आपण कामात असलो की ह्या लोकांवर अगदी टिपेने ओरडतो. पण नंतर मन विसरुन ही जातं. पण कधी कधी ती व्यक्ति मात्र महत्वाची असते. तिकडे गोची होते.
बिन्धास्त सॉरी म्हणा.....
बी , तुझ्या लिखाणावरून तू
बी , तुझ्या लिखाणावरून तू अतिसंवेदनशील आहेस असं वाटत आलंय नेहमी.. आपल्या मनाला इतका त्रास होऊ देऊ नकोस, दिनेश दा ने सांगितल्याप्रमाणे सारखा तोच तोच विचार करणं प्रयत्नपूर्वक टाळ..
सॉरी म्हणायचं असल्यास म्हणून टाक मनापासून लगेच..
मी नुकसान वगैरे नाही केले
मी नुकसान वगैरे नाही केले कुणाचे फक्त बोलताना तीव्र शब्द वापरलेत. तेही सभ्य असे तीव्र शब्द. >>>> जर तुमचं मत तुम्हाला बरोबर वाटतय फक्त शब्द तीव्र वापरले असं वाटतय तर अशा वेळी मी त्या व्यक्तीला Sorry for the way I said it but not sorry for what I said) असं म्हणते.
१) समोरून सॉरी म्हणणे अवघड
१) समोरून सॉरी म्हणणे अवघड जात असेल तर एखादे सॉरी मेसेज असलेले भेटकार्ड देऊ शकतोस. किंवा त्या व्यक्तीला तिच्या कामाच्या ठिकाणी सरप्राईज म्हणून फुलांचा बुके ज्यात सॉरी मेसेजचे कार्ड खोचलेले असेल.
२) त्या व्यक्तीसाठी स्वतः रचलेल्या चार ओळी. भलेही ट ला ट आणि म ला म जोडून का होईना. मनापासून माफी मागावीशी वाटतेय हे त्यातून इनोसन्ट्ली प्रतीत व्हायला हवे.
अजून सुचले की लिहिते.
वा श्रुती. सुंदर
वा श्रुती. सुंदर वाक्य.
दुसर्याचा राग तिसर्यावर काढू नये कधी. ( आपण लहान मूलांच्या बाबतीत नेहमीच हे करतो. )
ज्याचे माप त्याच्या पदरात टाकावे. क्षमा मागायलाही धैर्य लागते, पण ती लढाई आपल्या स्वतःशी. आपण मनापासून क्षमा मागितली, आणि त्या व्यक्तीने केली नाही, तरी आपली लढाई, आपण जिंकलेलीच असते.
धन्यवाद. श्रुती तुझे उत्तर
धन्यवाद.
श्रुती तुझे उत्तर मलाही आवडले.
बी, माफी मागून टाका लगेच मला
बी, माफी मागून टाका लगेच मला सिच्युएशन माहित नाही काय आहे तुमची पण हाच सल्ला देईन.
हे डाचत राहणं फार वाईट... कारण मी यातून जातेय सध्या. अवांतर होतंय पण सांगितल्याशिवाय राहवत नाही.
माझी आजी होती ती आजारपणामुळे थोडी हळवी झाली होती. माझ्यावर आणि माझ्या मुलीवर आत्यंतिक जीव.
मी अमेरिकेला येताना तिला चालता येत नव्हतं तरी बिचारी काठी टेकत कशीतरी खोलीबाहेर आली.
हे मी तिथे असताना मला समजायचे नाही की ती प्रेमाला किती आसुसली आहे. सारखं एकाच खोलीत पडून किती कंटाळवाणं होत असेल, टीव्ही तरी किती बघणार, तिला वाटायचं नातीने येऊन गप्पा मारत बसाव्यात पण मी कधीच लक्ष नाही दिलं चिडायचे तिच्यावर सारख्या हाका मारते म्हणून, कधी धड बोलले नाही.
आणि मागच्या वर्षी मी भारतात जायच्या अगदी आदल्या दिवशीच ती वारली.
मी आत्ता त्या गोष्टीचा भयंकर पश्चात्ताप करत बसते पण आता ते कधी न भरून येणारी सल आहे
बी, तुम्हाला नंदिनीताईंना
बी, तुम्हाला नंदिनीताईंना माफी मागायची आहे का?
बी, या धाग्याला काही अर्थ आहे
बी,
या धाग्याला काही अर्थ आहे का?
बी - पश्चातापात होरपळत आहात,
बी - पश्चातापात होरपळत आहात, म्हणजे तुम्हाला तुम्ही चुकले हे जाणले आहे. हाच विजय आहे,
बी, तुम्हाला नंदिनीताईंना
बी, तुम्हाला नंदिनीताईंना माफी मागायची आहे का?
---- बोलताना तीव्र शब्द वापरलेत असे वर आले आहे ना.... लिहीताना तीव्र शब्द वापरले असते तर असे म्हणता आले असते.
सरसकट माफी मागायची आणि पश्चातापाच्या आगिमधुन बाहेर येण्यासाठी शुभेच्छा...
नंदीनीचा इथेच काहीच संबंध
नंदीनीचा इथेच काहीच संबंध नाही.
अंजली, खूप वाईट वाटलं तुझ्या आजीबद्दल ऐकून. तू म्हणते आहेस ते खरे आहे.
<कधी कधी आपण एखाद्या
<कधी कधी आपण एखाद्या व्यक्तिला उगाचच अपमानीत करतो, पण जाउन "सॉरी" म्हणावे येवढी ती व्यक्ति महत्वाची पण नसते. उदा> दरावर येणारे सेल्स मन, वेगवेगळ्या स्कीम्स सांगणारे टेलीफोन्स... आपण कामात असलो की ह्या लोकांवर अगदी टिपेने ओरडतो. पण नंतर मन विसरुन ही जातं. >
पटले नाही. शांतपणे त्या व्यक्तीला 'नाही' म्हणता येते ना? या आपल्यादृष्टीने बिनमहत्त्वाच्या व्यक्ती ही कामे हौसेने करत नसतात, तर पोटासाठी करतात. लोकांच्या शिव्या खाणे, त्यांच्याकडून अपमान करून घेणे हा कोणाच्या जॉब प्रोफाइलचा भाग आहे असे समजता येते का? न चिडता नाही म्हटले तर आपली आणि त्यांचीही ती दोन मिनिटे नीट जातील. की आपल्या दृष्टीने महत्त्वाच्या व्यक्तींवर आपल्याला चिडता येत नाही त्याची भरपाई आपण इथे करतो. (कृपया हे वाक्य पर्सनल घेऊ नका. अगदी माझे आईवडीलही असेच करतात आणि मी प्रत्येक वेळा त्यांना हेच समजावून सांगतो.)
मयेकर मी ही तेच म्हणते आहे.
मयेकर
मी ही तेच म्हणते आहे. की सर सकट आपण अशा लोकांचा अपमान नकळत पणे करत असतो. ते लोक निघुन गेल्यावर जाणवतं की "अरे उगीचच इतकं सुनावलं, शांत पणे सांगता आलं असतं" . क्षणिक राग गेल्या वर हताश वाटतं. पण म्हणुन आपण त्यांच्या मागे जाउन "सॉरी" म्हणत नाही. कारण ते आपल्या आयुष्यात तितके महत्वाचे नसतात. फार तर काय पुढल्या वेळी जर कोणी असे इन्टरॅक्ट झाले तर सौम्य शब्दात सांगायचे येवढे ठरवतो.
मी "महत्वाच्या व्यक्ति आणि बीन महत्वाच्या व्यक्ति" हे समजावण्या साठीच हे उदा घेतले.
( रच्याकने मी ही अती शांतपणे वैयक्तिक आयुष्यात ह्या लोकांना टाळते)