वटाण्याच्या शेंगा - अर्धा किलो
फोडणीचे साहीत्य -
तेल - चार चमचे
मोहरी - पाव चमचा
जिरे - पाव चमचा
हिंग - चिमूटभर
आलं लसून पेस्ट - एक चमचा
लाल तिखट - दिड टी चमचा ( तिखट जास्त हवे असेल तर जास्त वापरावे.)
हळद - चिमूटभर
गरम मसाला - चिमूटभर
धने पूड व जिरेपूड- प्रत्येकी अर्धा चमचा
मीठ - चवीनुसार
शेंगदाण्याचा कूट - एक चमचा
साखर- पाव चमचा
पोहे खाण्याचा चमचा हे प्रमाण वापरले आहे.
१) प्रथम वाटाण्याच्या शेंगा चांगल्या भरलेल्या निवडून घेणे. या शेंगा सोलायच्या नाही.(अळी असण्याची शक्यता असल्याने नीट पाहून घेणे.) निवडलेल्या शेंगा पाण्यात बुडवून ठेवणे.
२) कुकरमधे तेल तापवून त्यात मोहरी, जिरे, हिंग, लसून आलं पेस्ट टाकून परतणे, त्यातच हळद, लाल तिखट, गरम मसाला, धने जिरे पूड, शेंगदाण्याचा कूट टाकून पुन्हा परतणे.
वाटण्याच्या शेंगा निथळून फोडणीत टाकणे. पाखडल्या प्रमाणे कुकर हलवणे. यामुळे सर्व शेंगाना व्यवस्थीत मसाला लागेल. वरून मीठ, हवी असल्यास थोडी साखर घालून पुन्हा हलवीणे.
आता थोडसा पाण्याचा हबका मारून कुकरचे झाकण लाऊन एक शिट्टी करून गॅस बंद करणे.
पुन्हा कुकर हलवून घेणे.
कुकरची वाफ गेल्यावर शेंगा प्लेट मधे सर्व्ह करणे.
१) शेंगा चांगल्या दाणे असलेल्या बघून घेणे.
२) पाण्याचा केवळ हबकाच मारायचा आहे जास्त पाणी घालायचे नाही.
३) या शेंगांवरचा मगजही चवदार लागतो. शेंगा शेवग्याच्या शेंगेप्रमाणे खायच्या आहेत.
४) या शेंगा वाफवून त्यात मिरीपुड आणि मीठ टाकून देखील छान लागतात.
५) या शेंगा जास्त खाऊ नये.
(हा पारंपारीक यवतमाळचा पदार्थ आहे, पाककृतीत थोडेफार बदल करुन यवतमाळात प्रत्येक घरोघरी या शेंगा बनतात.)
(No subject)
हो मी पण करते ..अश्या
हो मी पण करते ..अश्या शेंगा...:स्मित:
पण शेंगा खुप बघुन घ्याव्या लागतात....
छानच प्रकार आहे. मुंबईत दोन
छानच प्रकार आहे.
मुंबईत दोन प्रकारच्या शेंगा मिळतात. एक पुणेरी आणि दुसर्या दिल्ली.. या दिल्ली टाईप असणार ना ?
वेगळा प्रकार. थोड्याश्या
वेगळा प्रकार. थोड्याश्या शेंगाचा करुन बघेन एकदा.
दिनेशदा, आमच्याकडे मिळणार्या
दिनेशदा, आमच्याकडे मिळणार्या शेंगा मध्यप्रदेशातून येतात त्यामुळे त्या दिल्ली की पुणेरी हे काही सांगता येणार नाही.
दिल्लीच्या शेंगा असतात त्याचे
दिल्लीच्या शेंगा असतात त्याचे साल जाड आणि गुळगुळीत असते आणि गोड लागते. पुण्याच्या असतात त्याचे साल पातळ, पांढरट, खडबडीत असते. ते जरा कडवट लागते. दिल्लीच्या शेंगेतले दाणे, शिजल्यावर अगदी मऊ होतात. त्यामूळे पॅटिस मधे वगैरे नाही वापरता येत.
अच्छा, मग या दिल्ली जातीच्याच
अच्छा, मग या दिल्ली जातीच्याच शेंगा आहेत.
आता कळेल, कुठल्या शेंगा
आता कळेल, कुठल्या शेंगा घ्यायच्या त्या
या शेंगा जास्त खाऊ नयेत.. ..
या शेंगा जास्त खाऊ नयेत..
.. ही बरी ' वैधानिक' चेतावनी दिलीस..
हो दिनेश दा.. या मटर ला लहानपणी,' सिमला मटर' म्हणत असत.. यू पी आणी एम पी मधे ..
या शेंगा तुम्ही जसं वर्णन केलं तश्याच मखमली हिरव्या आणी भरलेले , मोठे ,गोड मटर... आहाहा!!!
वर्षूताई
वर्षूताई
सारिका, आम्ही नुसते तूप आणि
सारिका, आम्ही नुसते तूप आणि मीठ घालून शेंगा परतून घेतो. हवेतर १-२ मिरच्याही परतायच्या. मग खाऊन संपवायच्या.
मस्त लागतात.
सातीताई, तुझी पद्धतही छानच
सातीताई, तुझी पद्धतही छानच आहे, एकदा अशाही करून बघेन.
सारिका, आम्ही नुसते तूप आणि
सारिका, आम्ही नुसते तूप आणि मीठ घालून शेंगा परतून घेतो. हवेतर १-२ मिरच्याही परतायच्या. मग खात जायचं. मस्त लागतात.
<<
कुठे?
इब्लीसदा
इब्लीसदा
सातीताई, मी पण तुझ्या
सातीताई, मी पण तुझ्या प्रमाणेच करते.
ह्या दिवसातच येतात ह्या
सोलायच्या नाहीत तर मग अळी आहे
सोलायच्या नाहीत तर मग अळी आहे का ते कसं नीट पाहाता येतं? जेन्युईन प्रश्न आहे.
छान रेसिपी ,करून बघणार.
छान रेसिपी ,करून बघणार.