..नमस्कार ..ब-याच दिवसांनी येथे येत आहे. आता रेग्युलर राहीन. माझी बदली दिल्लीला झाली बंगळूर सोडले त्यामुळे मध्यंतरी माबो वर नव्हतो..............
हल्लीच इंग्लंड बरोबरच्या झालेल्या क्रिकेट कसोटीत भारताला हार मानावी लागली व सचिन सामन्यात धावा काढू शकला नाही म्हणून विविध बातम्या देणाऱ्या वाहिन्यांनी दिवसभर व मध्य रात्री पर्यंत ह्या घटनेला अक्षरशः कुटून काढले. सचिनने संदीप पाटिलला केलेला फोन, त्यावर तो काय बोलला असेल ह्याच्या अटकळी ह्या वाहिन्या लावीत बसल्या होत्या. दुसऱ्या दिवशी वर्तमान पत्रात सुद्धा मोठाल्या बातम्या आल्या होत्या. बातमीत दिले होते, सचिन म्हणतो, "क्रिकेट सिलेक्टर्स् ना जर का वाटत असेल की मी धावा काढू शकणार नसेल तर त्याने भारतीय संघात माझा समावेश करू नये". सिलेक्टरस् हेही म्हणत होते की अजून दोन कसोट्या राहिल्या आहेत, कोलकत्याची इडन गार्डनवर होणारी व नागपूरची, ह्या दोन कसोट्यांमधून सचिनला धावा काढण्याची संधी मिळेल व तो येणाऱ्या कसोट्यां मध्ये धावा काढून खरा उतरेल.
ह्या पार्श्वभूमीवर कारगिलमधल्या ऑपरेशन विजय मध्ये लॉन्गरेंज पॅट्रोलवर गेलेल्या व पाकिस्तानच्या हातून पकडल्या गेल्यावर हालाहाल करून मारण्यात आलेल्या कॅप्टन सौरभ कालिया व त्याच्या बरोबरच्या जवानांची हृदयाचा ठाव घेणारी बातमी माझ्या कानावर पडत होती. वाटले सचिनला जशी कोठच्या कसोटीत धावा जमल्या नाहीत तर पुढच्या येणाऱ्या कितीतरी कसोट्यांना धावा काढायची एक, अजून एक, अशा कितीतरी संध्या मिळत राहतात. पण कॅप्टन सौरभ कालिया व त्याच्या बरोबरच्या जवानांना जीवनाच्या कसोटीत जिवंत राहायच्या धावा काढण्यासाठी अजून एकच संधी त्यांच्या सिलेक्टरने दिली असती तर किती बरे झाले असते. थोडी चूक झाली असेल, थोडा अंदाज चुकला असेल तेवढ्यात पाकिस्तानी रेंजरसने त्या पॅट्रोलला पकडले व त्यांना जीवनातूनच आऊट केले .....हालाहाल करून. सचिनला परत परत मिळणाऱ्या संधीला बघून आज दिवंगत कॅप्टन सौरभ कालियाच्या आई वडिलांना काय वाटत असेल.
आपण राष्ट्रव्रत घेतले का
त्या संबंधी येथे अजून वाचा
http://rashtravrat.blogspot.com/
आणि येथे
http://bolghevda.blogspot.com/
(मराठी ब्लॉग)
भावना बरोबर आहेत.
भावना बरोबर आहेत. अनुमोदन.
माझी बदली दिल्लीला झाली बंगळूर सोडले त्यामुळे मध्यंतरी मिपावर नव्हतो..............>>>>> हे मायबोली आहे.
चूक झाली भारतीय साहेब धन्यवाद
चूक झाली भारतीय साहेब धन्यवाद
रणजीत सर सचिनच्या
रणजीत सर
सचिनच्या निवॄत्तीच्या चर्चेची ही वेळ बरोबर आहे मात्र दोन्ही क्षेत्रांची तुलना चुकीची आहे असं नाही का वाटत ?
सायकोडी आपले अगदी बरोबर आहे.
सायकोडी आपले अगदी बरोबर आहे. मला पण वाटते सचिनने अजून खेळावे आपला मराठी माणूस काहीतरी चांगले करतो करुदेत पूर्ण आपले सगळ्यांच्या चांगल्या इच्छा आहेत. मला उगाचच वाटले सौरभच्या आईला वाटलेच असेल अजून एक दैवाने संधी दिली असती तर...
साहेब आपले बरोबर आहे
कारगिलमधल्या ऑपरेशन विजय
कारगिलमधल्या ऑपरेशन विजय मध्ये लॉन्गरेंज पॅट्रोलवर गेलेल्या व पाकिस्तानच्या हातून पकडल्या गेल्यावर हालाहाल करून मारण्यात आलेल्या कॅप्टन सौरभ कालिया व त्याच्या बरोबरच्या जवानांची हृदयाचा ठाव घेणारी बातमी माझ्या कानावर पडत होती. >>>> अरेरे रे, किती दु:खद बातमी. कॅप्टन सौरभ कालिया व त्याच्या बरोबरच्या जवानांना श्रद्धांजलि व सलाम.
रणजितसर, या कॅप्टनबद्दल (त्याच्या कर्तृत्वाबद्दल) अजून जास्त जाणून घ्यायला आवडेल, कृपया काही लिहिणार का या शूर-वीरावर ?
दोन्ही गोष्टींची तुलना करता
दोन्ही गोष्टींची तुलना करता येणार नाही... कालिया यांनी देशासाठी सर्वोच्च त्याग केलेला आहे तर आपला लाडका सचिन पैशासाठी अजुन नव-नवे रेकॉर्ड साठी लढतो आहे.
आता शेवटच्या कसोटीत अजुन एक निरुपयोगी शतक हाणल्यावर (अर्थात कसोटी अनिर्णित रहाणार) अजुन ४-५ कसोटीत स्थान बळकट रहाणार. सचिनचे ५० वे शतक होते, देश ठरवल्याप्रमाणे सामन्यांत हरतो, सचिनचे १०० वे कसोटी शतक हरते आणि देश पुन्हा ठरवल्याप्रमाणे हरतो. सचिनप्रेमींना देश हरण्यापेक्षा सचिनच्या शतकाचा आणि त्याने केलेल्या रेकॉर्ड्सचा आनंद जास्त. पाँटिंग निवृत्त झाल्याने सचिनने आता सुटकेचा निश्वास टाकला असेल. दिर्घकाळ कुणी त्याच्या रेकॉर्डला आता हात लावणार नाही...
कालिया यांना आणि त्यांच्या त्यागाला लोकं विसरतील... का म्हणुन लक्षात राहिल त्यांचा सर्वोच्च त्याग ?
सप्टेबर २००२ च्या अक्षरधाम हल्ल्यात जखमी झालेला आणि त्यानंतर अनेक अनेक महिने (जवळपास दोन वर्षे :अरेरे:) कोमांत असणार्या सरजसिंह भंडारी ह्या जवानाचे नावही आपल्या स्मरणांत नसते....
२६/११ च्या हल्लेखोरांचा निधढ्या छातीने सामना करणार्या उन्नीकृष्णन यांच्या घरी भेट द्यायला मुख्यंमंत्री गेले होते (कॅमेरासाठी नाटके करावे लागताट). तेथे उन्नीकृष्णन यांच्या वडिलांनी मुख्यमंत्र्यांना त्यांची जागा दाखवल्यावर मुख्यमंत्र्याची मुख्ताफळे वाचली होती? असे मुख्यमंत्री सत्तेत राहातात याला कारण लोकशाहीत जनतेने त्यांना निवडलेले असते.