४ मोठे बटाटे (मी रसेट वापरते),
मैदा,
१ अंडे (ऑप्शनल),
मीठ चवीनुसार,
मिरेपुड, इटालियन ड्राईड हर्ब्ज (ऐच्छिक),
पार्मजान/पार्मसन चिज (ऐच्छिक)
हा करायला अत्यंत सोपा प्रकार आहे पण खायला तितकाच मस्त आणि शिवाय व्हर्सटाईल
मैत्रेयीचं चिकन न्योकी सूप बघुन इथे न्योकी ची पाकृ देत आहे.
*************
१. बटाटे कुकरमधे किंवा मावे मधे उकडुन घ्या. वेळ असेल तर मी बटाटे ओव्हनमधे बेक करुन घेते (चवीत फरक पडतो - जास्त मस्त लागते न्यॉकी ),
२. उकडलेल्या बटाट्यांची साले काढुन एका परातीत/बोल मधे ठेवा आणि पोटॅटो मॅशर किंवा खायच्या काट्याने बटाटे मॅश करुन घ्या... यात एकही गुठळी रहाता कामा नये... अगदी स्मुथ झाले पाहिजे,
३. यात आता चवीनुसार मीठ, मिरेपुड्/इटालियन हर्ब्ज/पार्मजान/पार्मसन चिज घालणार असाल तर घाला.
४. हलके फेटलेले अंडे घाला (घालणार असाल तर - नाही घातले तरी चालते),
५. मिश्रणात आता मैदा घालायचा. मैदा घालताना एका वेळेस थोडा थोडा घालायचा आणि हे मिश्रण हलकेच मळायचे,
६. मैदा जास्तही घालायचा नाही, अगदी जस्ट सगळं मिश्रण एकत्र येऊन मऊ गोळा होण्याइतपतच* या गोळ्याचे ४ भाग करा.
७. ओट्यावर थोडा मैदा भुरभुरवुन त्यावर एक भाग अगदी हलके मळुन त्याची अंगठ्याऐवढी जाड (साधारण दीड सेमी व्यासाची) सुरनळी बनवा (गोळा रोल करा). सुरीच्या पात्याला मैदा लावुन या सुरनळीचे इंच रुंदीचे तुकडे करा.
८. एका मैदा भुरभुरवलेल्या ट्रे मधे हे तुकडे वेगवेगळे मांडुन ठेवा. एकावर एक ठेवलेत तर चिकटतिल. उरलेल्या तीन्ही गोळ्यांच्या अश्याच सुरनळ्या करुन तुकडे करुन घ्या.
९. एका मोठ्या पातेल्यात पाणी उकळायला ठेवा. उकळत्या पाण्यात न्यॉकीचे गोळे एकावेळेस थोडे थोडे घाला...गोळे एकाच लेयर मधे असायला हवेत.. एकावर एक आले तर चिकटतिल.
१०. न्यॉकी आधी तळाला बसतिल पण लगेच मिनीटभरात पाण्यावर तरंगायला लागतिल. तरंगायला लागताच एका बटर/तेल लावुन ग्रीस केलेल्या बोलमधे न्यॉकी काढुन घ्या.
११. एका पॅनमधे बटर गरम करुन (थोडे जळवुनच) त्यावर तयार न्यॉकी घालुन परतुन गरम गरम खायला छान लागते.
१२. न्यॉकी सूप मधे किंवा पास्ता सॉस मधे घालुन खाता येते. बॅसिल पेस्टो आणि गरम न्यॉकी व त्यावर शेव्ड पार्मजान चिज... व्वा व्वा!!!!
१. अंडे घातल्याने मिश्रण लवकर बाईंड होते. पण नाही घातले तरी चालते.
२. *मैदा जास्त झाल्यास न्यॉकी 'दड्ड' होते... हेव्ही होते .
३. तयार तुकडे लगेच वापरणार नसाल तर त्यावर पीठ भुरभुरवुन फॉईल्/क्लिंगरॅप ने झाकुन ठेवा. आणि आयत्यावेळेस पाण्यात उकळुन शिजवा.
४. वेळ असेल तर न्यॉकीचा एक एक गोळा परत हलकेच मळुन त्यावर खायच्या काट्याने हलके दाबुन 'डिझायनर' न्यॉकी बनवता येइल. मी छोट्या मिनी न्यॉकीज पण बनवते - सूप मधे या चांगल्या लागतात.
५. न्यॉकी गरम गरम खायलाच छान लागते.
६. न्यॉकी पाण्यात न उकळता ओव्हनप्रुफ डिश मधे घालुन त्यावत ऑऑ, मिरेपुड घालुन खरपुस बेक करुन त्यावर चिझ सॉस घालुन पण यम्मी लागते
लाजो...मी आत्ताच न्योकी केलि.
लाजो...मी आत्ताच न्योकी केलि. मस्त झाली होती. नवर्याला खरच वाटत नव्हत की न्योकी घरी करता येते. मी अंडे घालून केली. आणी बटाते चीकट होते म्हणून मैदा जास्त लागला.
आम्च्या -(मोन्ट्रिअल) इथे छान
आम्च्या -(मोन्ट्रिअल) इथे छान न्योकी-पूटीन मिळतो..इथ्ल्या अपस्केल रेस्तोरा मध्ये...
न्योकि..थोड्यासा बादामि हल्क्या रन्गात बटर मधे सोते करून वरून त्यात होट सेन्ड्विच चा सोस आनि fresh cheese curds. खूप छान लागतो..Poutine is typical French quebecoise speciality
अगं ही आणि ती दुसरी उपासाची
अगं ही आणि ती दुसरी उपासाची न्योकी रेसिपी पाहून बटाटा आणि उपास भाजणीने ट्राय केली तर गरम पाण्यात ते तुकडे विरघळलेच..काहीच हातात आलं नाही. शेवटी उरलेल्या गोळ्याचे पॅटिस केले...
काय चुकवल?
वेका, कारणे - - बटाटे नविन
वेका, कारणे -
- बटाटे नविन होते का? उकडल्यावर चिकट झाले होते का?
- बटाटे गरम असतानाच मॅश करुन त्यात मैदा/भाजणी घातली होती का?
- कदाचित तुझा मैदा / भाजणी कमी पडली असेल.
- पाण्यात न्यॉकी टाकताना पाणी खळखळीत उकळते हवे.. आणि न्यॉक्या शिजुन वर येइपर्यंत गॅस अजिब्बात बारिक करायचा नाही.
- एका वेळेस थोड्या थोड्याच न्यॉक्या टाकायच्या उकळत्या पाण्यात, पहिली बॅच काढल्यावर दुसरी बॅच टाकायच्या आधी पाणे परत उकळायच्या स्टेज ला हवे.
ही एव्हढीच कारणं सुचतायत...
ओह...मला बटाटे नवीन होते का
ओह...मला बटाटे नवीन होते का हे कळणार नाही...(नवीन म्हणजे पीक नवीन वगैरे म्हणत असशील तर...)
बरं मैदा /भाजणीचं अंदाजे प्रमाण आहे का? म्हणजे किती कप बटाटा स्म्~अशला किती कप मैदा जाऊ शक्तो म्हणजे पुढच्या वेळी ते ठीक करता येईल...
आता आठवलं तर असं वाटतं की बहुतेक बटाटाचं स्म्~अश थोडं कोमट होतं मी पीठ घालताना आणि हे मी पुढच्या वेळी नक्की संभाळेन....पीठाच्या प्रमाणाचं जमलं तर मला ही रेसिपी एकदम मस्त आवडलीय....:)
आभार्स...
पीठाचे आणि बटाट्याचे प्रमाण
पीठाचे आणि बटाट्याचे प्रमाण असे नक्की सांगता येणार नाही कारण बटाटा आणि पिठात फरक असु शकतो.. काही चिकट जास्त असतात त्यांना जास्त पिठ लागते.
मळताना मिश्रण हाताला चिकटानासे झाले की साधारण तेव्हा पिठ बास होते... पिठ घालताना थोडे थोडे घालायचे.
मैद्या ऐवजि तान्दळाचे पीठ
मैद्या ऐवजि तान्दळाचे पीठ वापरता येइल का?
लाजो वाटतंय अगदी साधं प्रकरण
लाजो वाटतंय अगदी साधं प्रकरण , पण मी केलं तर वेकासारखी ट्रॅजेडी होण्याचीच शक्यता आहे. सावधपणे करून बघेन तरीही
सुरुचि, मैद्याऐवजी कणिक घालु
सुरुचि, मैद्याऐवजी कणिक घालु शकतेस पण तांदुळाचे पिठ चालेल की नाही महित नाही...
भारतीताई करुन बघा.... सोप्प्या आहेत न्यॉक्या करायला
हे धागा वर काढायला. करून बघेन
हे धागा वर काढायला. करून बघेन म्हणतेय.
करून बघितले. जमले आणि
करून बघितले. जमले आणि आवडलेही. फक्त दडस होण्याच्या भीतीने मैदा कमी घातला त्यामुळे फारच अलवार झाल्या
Pages