४ मोठे बटाटे (मी रसेट वापरते),
मैदा,
१ अंडे (ऑप्शनल),
मीठ चवीनुसार,
मिरेपुड, इटालियन ड्राईड हर्ब्ज (ऐच्छिक),
पार्मजान/पार्मसन चिज (ऐच्छिक)
हा करायला अत्यंत सोपा प्रकार आहे पण खायला तितकाच मस्त आणि शिवाय व्हर्सटाईल
मैत्रेयीचं चिकन न्योकी सूप बघुन इथे न्योकी ची पाकृ देत आहे.
*************
१. बटाटे कुकरमधे किंवा मावे मधे उकडुन घ्या. वेळ असेल तर मी बटाटे ओव्हनमधे बेक करुन घेते (चवीत फरक पडतो - जास्त मस्त लागते न्यॉकी ),
२. उकडलेल्या बटाट्यांची साले काढुन एका परातीत/बोल मधे ठेवा आणि पोटॅटो मॅशर किंवा खायच्या काट्याने बटाटे मॅश करुन घ्या... यात एकही गुठळी रहाता कामा नये... अगदी स्मुथ झाले पाहिजे,
३. यात आता चवीनुसार मीठ, मिरेपुड्/इटालियन हर्ब्ज/पार्मजान/पार्मसन चिज घालणार असाल तर घाला.
४. हलके फेटलेले अंडे घाला (घालणार असाल तर - नाही घातले तरी चालते),
५. मिश्रणात आता मैदा घालायचा. मैदा घालताना एका वेळेस थोडा थोडा घालायचा आणि हे मिश्रण हलकेच मळायचे,
६. मैदा जास्तही घालायचा नाही, अगदी जस्ट सगळं मिश्रण एकत्र येऊन मऊ गोळा होण्याइतपतच* या गोळ्याचे ४ भाग करा.
७. ओट्यावर थोडा मैदा भुरभुरवुन त्यावर एक भाग अगदी हलके मळुन त्याची अंगठ्याऐवढी जाड (साधारण दीड सेमी व्यासाची) सुरनळी बनवा (गोळा रोल करा). सुरीच्या पात्याला मैदा लावुन या सुरनळीचे इंच रुंदीचे तुकडे करा.
८. एका मैदा भुरभुरवलेल्या ट्रे मधे हे तुकडे वेगवेगळे मांडुन ठेवा. एकावर एक ठेवलेत तर चिकटतिल. उरलेल्या तीन्ही गोळ्यांच्या अश्याच सुरनळ्या करुन तुकडे करुन घ्या.
९. एका मोठ्या पातेल्यात पाणी उकळायला ठेवा. उकळत्या पाण्यात न्यॉकीचे गोळे एकावेळेस थोडे थोडे घाला...गोळे एकाच लेयर मधे असायला हवेत.. एकावर एक आले तर चिकटतिल.
१०. न्यॉकी आधी तळाला बसतिल पण लगेच मिनीटभरात पाण्यावर तरंगायला लागतिल. तरंगायला लागताच एका बटर/तेल लावुन ग्रीस केलेल्या बोलमधे न्यॉकी काढुन घ्या.
११. एका पॅनमधे बटर गरम करुन (थोडे जळवुनच) त्यावर तयार न्यॉकी घालुन परतुन गरम गरम खायला छान लागते.
१२. न्यॉकी सूप मधे किंवा पास्ता सॉस मधे घालुन खाता येते. बॅसिल पेस्टो आणि गरम न्यॉकी व त्यावर शेव्ड पार्मजान चिज... व्वा व्वा!!!!
१. अंडे घातल्याने मिश्रण लवकर बाईंड होते. पण नाही घातले तरी चालते.
२. *मैदा जास्त झाल्यास न्यॉकी 'दड्ड' होते... हेव्ही होते .
३. तयार तुकडे लगेच वापरणार नसाल तर त्यावर पीठ भुरभुरवुन फॉईल्/क्लिंगरॅप ने झाकुन ठेवा. आणि आयत्यावेळेस पाण्यात उकळुन शिजवा.
४. वेळ असेल तर न्यॉकीचा एक एक गोळा परत हलकेच मळुन त्यावर खायच्या काट्याने हलके दाबुन 'डिझायनर' न्यॉकी बनवता येइल. मी छोट्या मिनी न्यॉकीज पण बनवते - सूप मधे या चांगल्या लागतात.
५. न्यॉकी गरम गरम खायलाच छान लागते.
६. न्यॉकी पाण्यात न उकळता ओव्हनप्रुफ डिश मधे घालुन त्यावत ऑऑ, मिरेपुड घालुन खरपुस बेक करुन त्यावर चिझ सॉस घालुन पण यम्मी लागते
अरे व्वा. काय उरक आहे लाजो.
अरे व्वा. काय उरक आहे लाजो. तिकडे सूप की लगेच त्याची पूर्वतयारी आली पण![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
हे नक्की करून बघणार वेळ हाताशी असेल तेव्हा.
शूम्पी + १ आणि फारच बरं झालं
शूम्पी + १
आणि फारच बरं झालं न्यॉकींचं अंतरंग उलगडून दाखवल्याबद्दल. कारण आज पहिल्यांदा याबद्दल ऐकलं.
लाजो, सुपात घातल्या तर या न्यॉक्या विरघळणार नाहीत ना?
धन्स मामी, नाही विरघळत
धन्स![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मामी, नाही विरघळत न्यॉक्या...![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
तु इतक्या लवकर उठलिस
अर्रे वा !! हे काम सही केलेस
अर्रे वा !! हे काम सही केलेस लाजो! मी घरी करायचा विचार पण नसता केला पण आता करेन नक्की![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तच लाजो.. यम्म आहे
माझी आवडती डिश,पास्ता
माझी आवडती डिश,पास्ता सॉसबरोबर अप्रतिम लागते ! मस्त पाककृती, लाजो.
मी पुरणयंत्र वापरते बटाटे mash करायला.
>>>वेळ असेल तर मी बटाटे ओव्हनमधे बेक करुन घेते (चवीत फरक पडतो - जास्त मस्त लागते न्यॉकी ),>>> +१
अरे वा. सही आहे. वर वर तरी
अरे वा. सही आहे. वर वर तरी सोपी वाटतीये करायला. नक्की करणार.
मस्तच लाजो. आता करून बघायला
मस्तच लाजो. आता करून बघायला हवा हा प्रकार. तू हे सगळे प्रकार घरी करतेस त्याबद्दल _/\_
रच्याकने, बटाटे मॅश करण्यासाठी हे अतिशय उपयुक्त आहे. त्यात मी पुरणासाठी शिजवलेली डाळसुद्धा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मॅश करते
बिल्वा हो माझ्याकडे पण आहे
बिल्वा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हो माझ्याकडे पण आहे असाच मॅशर... पूरणयंत्रापेक्षा हा मला आवडतो कारण पटकन मॅश होतात बटाटे आणि शिवाय हातासरशी आणि साफ करायलाही सोप्पा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त आहे लाजो. माझी आवडती पण
मस्त आहे लाजो. माझी आवडती पण घरी नाही बनवत![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
मला मिनीस्ट्रोन सूप मधे घालून पण आवडते.
लाजो, न्योकी घरी करतेस म्हणजे
लाजो, न्योकी घरी करतेस म्हणजे ग्रेट आहेस. मी ट्रेडर जो ची न्योकी वापरते.
अग्दी सोपा दिसतोय प्रकार हा.
अग्दी सोपा दिसतोय प्रकार हा. माझ्याकडे पोटॅटो मॅशर पण आहे. या रविवारी करीन.
बिल्वा वरचा फोटोतला मॅशर
बिल्वा वरचा फोटोतला मॅशर कुठे मिळेल
लाजो , ग्रेट आहेस खरचं. घरी
लाजो , ग्रेट आहेस खरचं. घरी करायचं डोक्यात पण आल नव्हतं.
हे मला आमच्याकडे बोटवे करतात खीरीसाठी तस वाटल. फक्त ते खुप बारीक असतात.
हे मी नायजेला च्या शो मध्ये व
हे मी नायजेला च्या शो मध्ये व इटालिअन खाना मध्ये पाहिले आहे. ह्या बरोबर चिकनची काही रेसिपी आहे काय? चिकन सूप फॉर टीनेजर मध्ये घालून बघू का? मस्त लागत असणार. हो की.
बायांनो, उकडलेले बटाटे
बायांनो, उकडलेले बटाटे स्मूथली मॅश करून हवे असतील तर किसणीवर पटापट किसून घेऊन काम होतं. मोठी मोठी भोकं असलेला भाग वापरायचा. मी पराठ्याकरताही उकडलेले बटाटे असे किसून घेते. पराठे फाटत नाहीत.
मामी, मी पण आधी किसणी वापरत
मामी, मी पण आधी किसणी वापरत होते. पण यात उकडून घेतलेला बटाटा नुसता प्रेस करावा लागतो. फार म्हणजे फार सोप्पं काम आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
नांवावरुन मस्त वाटला.करायला
नांवावरुन मस्त वाटला.करायला सोप्पा आहे.करुन पहाणार्.टोमॅटो सुप मधे घालुन खाल्ले तरी छान लागतील ना?
अरे! लाजो ग्रेट आहेस हां
अरे! लाजो ग्रेट आहेस हां तू... मस्त पाककृती एकदम
तो पोटॅटो मेशर मस्त दिसतोय. तो कसा वापरायचा?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ऑर्डर दिली तर कोणी उसगावकरीण इकडे येताना घेऊन येऊ शकेल काय?
मस्तच प्रकार!! 'O Canberra
मस्तच प्रकार!!
'O Canberra here I come!' असं झालय अगदी मला!
मंडळी, खुप दिवसात केली नव्हती
मंडळी, खुप दिवसात केली नव्हती म्हणून आज केलीच न्यॉकी
हे घ्या फोटो![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बादवे... ती न्यॉकीवर ठेवलेली बॅसिल ची पानं माझ्या घरच्या बागेतली आहेत![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
फारच बरं झालं न्यॉकींचं
फारच बरं झालं न्यॉकींचं अंतरंग उलगडून दाखवल्याबद्दल. कारण आज पहिल्यांदा याबद्दल ऐकलं.>> मी ही.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
फोटो टाकल्यावर तर अप्रतिम
फोटो टाकल्यावर तर अप्रतिम भारी..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कय सही$$ पाकृ आहे. बटाटा एकदम
कय सही$$ पाकृ आहे. बटाटा एकदम आवडीचा नक्की करणार![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
लाजो किती उत्साही आहेस!
लाजो किती उत्साही आहेस!
अरे वा, फोटोपण आला का ! आता
अरे वा, फोटोपण आला का ! आता मला करावेच लागणार.
मला वाटतं, मैद्याचे प्रमाण, बटाटे किती ओलसर आहेत त्यावर ठरत असणार.
यम्मी ! महान उरकाची बाई
यम्मी ! महान उरकाची बाई आहेस तू![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धन्यवाद सगळ्यांना दिनेशदा,
धन्यवाद सगळ्यांना![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
दिनेशदा, बरोबर... बटाटे चिक्कट असतिल तर जास्त मैदा लागेल...
मी आज केलेल्या न्यॉक्या बीनाअंड्याच्या आणि चवीला फक्त मीठ घालुन केल्या आहेत.
मस्त अन सोपी पाकृ.
मस्त अन सोपी पाकृ.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मैद्याऐवजी कणीक वापरून करणार. वरच्या नॉक्या सारखे देखणे नाही दिसणार फक्त
लाजो, ग्रेट. मस्त दिसतायंत
लाजो, ग्रेट. मस्त दिसतायंत एकदम![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Pages