Submitted by जागू-प्राजक्ता-... on 29 November, 2012 - 14:04
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
२० मिनिटे
लागणारे जिन्नस:
क्रमवार पाककृती:
१) मिरच्या धुवुन, पुसून घ्याव्यात. एका मिरचीचे तिन तुकडे करुन ते मधून चिरावेत.
२) धणे, जिरे, बडीशेप, राईची डाळ वेगवेगळी थोडी तव्यावर परतून घ्यायची. हे सगळे थंड झाले की एकत्र करून मिक्सरमध्ये पूड करायची.
३) हळद थोड्या तेलावर परतायची.
४) एका ताटात मिक्सरमधून काढलेली पूड, मिठ, हळद एकत्र करून हाताने चांगले एकजीव करून घ्यायचे.
५) त्या एकजीव केलेल्या मिश्रणात लिंबांचा रस, गरम करून थंड केलेले तेल ओतायचे.
६) सगळ्यात शेवटी ह्या मिश्रणात मिरच्या ओतायच्या आणि चमच्याने ढवळून एकत्र करायचे.
हे लोणचे काचेच्या बरणीत भरून ठेवायचे. ५-६ दिवसांनी मुरल्यावर खायला काढायचे.
वाढणी/प्रमाण:
एका वेळि २०-३० माणसांना पुरेल
अधिक टिपा:
हे लोणचे टिकावू असते. जर वरून तेल कमी वाटले तर अजुन तेल गरम करून ते थंड करुन वाटलीत ओतायचे. लोणचे पुर्ण बुडू द्यायचे त्यामुळे ते जास्त टिकते.
माहितीचा स्रोत:
पुस्तकी ज्ञान
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आहाहा जागू, खुपच मस्त दिसतय
आहाहा जागू, खुपच मस्त दिसतय मिरचीचे लोणचे.
मस्त फोटो
मस्त फोटो
जागू, तुझ्या रेसिप्या तर छान
जागू, तुझ्या रेसिप्या तर छान असतातच, पण फोटोही एकदम कलरफुल, आकर्षक असतात. रेसिपीला चार चांद लागतात फोटोमुळे
झकास पाकृ. फोटो बघून तोंडाला
झकास पाकृ. फोटो बघून तोंडाला प्रचंड पाणी सुटलं.
बडीशेपेची आयडिया नवीन आहे.
बडीशेपेची आयडिया नवीन आहे. तोंपासू.
मस्त आहे .. दहीभाताबरोबर
मस्त आहे .. दहीभाताबरोबर खायला मजा येईल ..
वॉव , मस्त !
वॉव , मस्त !
सशल +१
सशल +१
तोंपासु!!! बडीशोप घालण्याचे
तोंपासु!!!
बडीशोप घालण्याचे नवीन समजले!
आई हिंग पण घालते.
झकास पाकृ. फोटो बघून तोंडाला
झकास पाकृ. फोटो बघून तोंडाला प्रचंड पाणी सुटलं.>>+१
मला मिरचीच्या लोणच्यात
मला मिरचीच्या लोणच्यात आल्याचे तुकडे , सळ्या खूप आवडतात.
हे लोणचेही मस्तच आहे.
मस्त रेसेपी, मिरचीच्या
मस्त रेसेपी, मिरचीच्या लोणच्यात लिंबांचा रस टाकायलाच हवा का? मार्केटमधे जे लिंबाचे लोणचे मिळते त्यात तिखट कमी आंबटच जास्त टेस्ट असते
प्रसिक लिंबामुळे लोणच्याची चव
प्रसिक लिंबामुळे लोणच्याची चव येऊन मिरचीचा तिखटपणाही काही प्रमाणात कमी होतो.
अनु, बेफी, मो, मृण्मयी, स्वाती,सशल, पल्लवी, बिल्वा, वत्सला, दिपा, साती धन्यवाद.
हा.... भन्नाट फोटो!!
हा.... भन्नाट फोटो!!
मस्तच. फोटो पाहुन तोंडाला
मस्तच. फोटो पाहुन तोंडाला पाणी सुटले
छान आहे कृती आणि फोटो.
छान आहे कृती आणि फोटो.
बघूनच तोंडाला पाणी
बघूनच तोंडाला पाणी सुटले.
बडीशेप घालून करतात हे माहित नव्हते. आता करून बघेन.
जागू फोटो खूप सुंदर, नेहमीप्रमाणेच.
तोंडाला पाणी सुटले
तोंडाला पाणी सुटले
सही! हीच रेस्पी शोधत होत्ये.
सही! हीच रेस्पी शोधत होत्ये. थँक यू!
वा!! मस्त. तोंपासु. आज बर्याच
वा!! मस्त. तोंपासु. आज बर्याच महिन्यांनी मायबोलीवर आले आणि एवढी छान पा़क्रु
आम्ही नुकतेच असे लोणचे बनवले.
आम्ही नुकतेच असे लोणचे बनवले. छान लागतय. आम्ही थोडीशी मेथी पावडर सुद्धा घातली होती.
मस्त रेसिपी!! एक्दम तोंपासू!!
मस्त रेसिपी!! एक्दम तोंपासू!! मात्र बडिशेप घालून कधी केलं नव्हतं. आता करून पाहीन.
आहाहाहाहाहा..... तोंपासु
आहाहाहाहाहा..... तोंपासु
तोंपासू.. ते बडिशेपेचं आवडलं.
तोंपासू.. ते बडिशेपेचं आवडलं. आणि फोटो मस्त.
श्या आता वेळ काढावा लागणार..
मला शोप आवडत नाही. बाकी
मला शोप आवडत नाही. बाकी आमच्याही घरचीच रेसिपी.
ओली हळद अथवा लिंबाच्या फोडीही मिक्स लोणचे करता येते.
मस्त रेसिपी! फोटो तर एकदम
मस्त रेसिपी! फोटो तर एकदम झकास!!
करून बघते लगेचच. सासुबाई पन असेच बनवतात पण त्या बडिशोप घालत नाहित आणी हिन्ग घालतात.
मस्त आणि सोपी रेसिपी..
मस्त आणि सोपी रेसिपी.. तोंपासु एकदम.
जागु, तुझ्या फोटो च्या चार चांद बद्दल मो ला अनुमोदन
मंजूडी, सस्मित, शमा, अखि,
मंजूडी, सस्मित, शमा, अखि, चिन्नु, धनश्री, अमि, शांकली, लाजो, संघमित्रा, इब्लिस, नीशी, माधुरी धन्यवाद.
अहा......एकदम रसरशीत दिसतंय
अहा......एकदम रसरशीत दिसतंय गं.. बडीशोपेची वेगळीच चव लागत असेल ना.... तोंडाला सुटलेलं पाणी आवरणं कठीण आहे
तोंडाला सुटलेलं पाणी आवरणं
तोंडाला सुटलेलं पाणी आवरणं कठीण आहे
Pages