Submitted by जागू-प्राजक्ता-... on 29 November, 2012 - 14:04
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
२० मिनिटे
लागणारे जिन्नस:
क्रमवार पाककृती:
१) मिरच्या धुवुन, पुसून घ्याव्यात. एका मिरचीचे तिन तुकडे करुन ते मधून चिरावेत.
२) धणे, जिरे, बडीशेप, राईची डाळ वेगवेगळी थोडी तव्यावर परतून घ्यायची. हे सगळे थंड झाले की एकत्र करून मिक्सरमध्ये पूड करायची.
३) हळद थोड्या तेलावर परतायची.
४) एका ताटात मिक्सरमधून काढलेली पूड, मिठ, हळद एकत्र करून हाताने चांगले एकजीव करून घ्यायचे.
५) त्या एकजीव केलेल्या मिश्रणात लिंबांचा रस, गरम करून थंड केलेले तेल ओतायचे.
६) सगळ्यात शेवटी ह्या मिश्रणात मिरच्या ओतायच्या आणि चमच्याने ढवळून एकत्र करायचे.
हे लोणचे काचेच्या बरणीत भरून ठेवायचे. ५-६ दिवसांनी मुरल्यावर खायला काढायचे.
वाढणी/प्रमाण:
एका वेळि २०-३० माणसांना पुरेल
अधिक टिपा:
हे लोणचे टिकावू असते. जर वरून तेल कमी वाटले तर अजुन तेल गरम करून ते थंड करुन वाटलीत ओतायचे. लोणचे पुर्ण बुडू द्यायचे त्यामुळे ते जास्त टिकते.
माहितीचा स्रोत:
पुस्तकी ज्ञान
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जागु सुंदरच आहे लोणचं बडीशोपा
जागु सुंदरच आहे लोणचं
बडीशोपा आणी सरसो ऑईल चं काँबी 'बंगाली' लोणच्यांपुरतंच असतं वाटलं होतं
इथे तू कोणतं तेल वापरलंयस????
जागू, फोटोतल्या मिरच्या कमी
जागू, फोटोतल्या मिरच्या कमी तिखट आहेत का? मी आणलेल्याही अशाच दिसतायत. काल मोहरीची डाळ मिळाली म्हणून लगेच लोणचं घातलं. आता मुरत ठेवलं आहे. बडिशेपेचा वास चांगला येतोय.
जागु वाह! फोटो जबरदस्त!
जागु वाह! फोटो जबरदस्त! तोंपासु.... करून बघावं लागेल.
वर्षू मी सनफ्लॉवर ऑइल
वर्षू मी सनफ्लॉवर ऑइल वापरल.
सायो वरच्या मिरच्या गडद हिरव्या रंगाच्या मिरचीच्या तुलनेने कमीच तिखट असतात.
श्रुती धन्स.
मोहरीची डाळ म्हणजे काय आणि ती
मोहरीची डाळ म्हणजे काय आणि ती U.S मधल्या इंडियन ग्रोशरी मध्ये काय नावाने मिळेल. मला फक्त काळी मोहरी माहित आहे जी आपण फोडणीत वापरतो. मला दुकानात Yellow mustard seeds आणि black mustard seeds दिसल्या.
हे नक्की करुन बघायचय.
अमेरिकेतल्या इंडियन
अमेरिकेतल्या इंडियन ग्रोसरीमधे राई ना कुरिया नावाने मिळते मोहरी डाळ
धन्यवाद मेधा! फोटोत फार नीट
धन्यवाद मेधा! फोटोत फार नीट कळत नाहिये.. हि डाळ दिसायला कशी असते साधारण? shape, color etc. म्हणजे शोधायला सोप्पी जाईल.
ही मोहरीची डाळ रंगाने पिवळी (
ही मोहरीची डाळ रंगाने पिवळी ( हळदीसारखी), आकाराने चपटी आणी मोहरी एवढीच असते. ती घरी पण मिक्सरवर पण भरडुन काढु शकतो. सहज एक चमचा २ चमचे मोठी मोहरी चटणीजार मध्ये फिरवुन बघ एकदाच. ( १५ सेकंद)
जागु एकदम तोंपासु आहे हे
जागु एकदम तोंपासु आहे हे लोणचे. अगदी रसरशीत दिसतेय. दहीभाताबरोबर मला मिर्ची लोणचे अतीशय आवडते. आता २ दिवसात करतेच. मनापासुन धन्यवाद.
मकु ही बघ मोहरीची डाळ टुनटुन
मकु ही बघ मोहरीची डाळ
टुनटुन धन्स.
थँक्यु जागु आणि टुनटुन सगळ
थँक्यु जागु आणि टुनटुन सगळ सामान आता आहे. करुन बघते.
आता केवळ उत्सुकता म्हणुन विचारते, मोहरीची डाळ आणि मोहरी मध्ये स्वादामध्ये फरक असतो का? मोहरीच वापरली तर चव चांगली येत नाही का?
तोंपासूSSSSSSSSSSSSSSSSSSSSSS
तोंपासूSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSS
मी रेसिपि वाचून लोणचे केले..
मी रेसिपि वाचून लोणचे केले.. एकदम छान चव आहे..धन्स..
जागू ३ तार्खेला केले पण अजून
जागू ३ तार्खेला केले पण अजून मूरले नाही. मिरची कडक आहे. नवर्याने त्यात अतिउत्साहाने आंबेहळदीचे छोटे प्रमाणात तुकडे टाकले आहेत. [जास्त प्रमाणात माझा ओरडा खाल्ल्याने तुकडे कमी प्रमाणात आहेत]
पण चव भन्नाट मस्त आली आहे.
जागू, तुझे मासे जितके रूचकर
जागू, तुझे मासे जितके रूचकर दिसतात तितक्याच या मिर्च्या सुद्धा एकदम तोंपासु.
विनिता कडक असल्या तरी खाऊन
विनिता कडक असल्या तरी खाऊन बघ. चव छान लागते कडक मिरच्यांची पण.
निशिगंधा, दक्षिणा, साक्षि, मकु धन्स.
काल घातलय लोणच.. आता ५-६ दिवस
काल घातलय लोणच.. आता ५-६ दिवस थांबायच जिवावर आलय. खाऊन बघितल की सांगेनच
एकदम मस्त झालं हे लोणच
एकदम मस्त झालं हे लोणच
जागू, घरच्या रोपाला आलेल्या
जागू, घरच्या रोपाला आलेल्या लाल - हिरव्या मिरच्यांचे आज सलग दुस-या वर्षी या कृतीने लोणचे केले इतके आवडले हे लोणचे घरी. बडीशेपेचा छान वास आणि स्वाद येतो लोणच्याला. हा प्रतिसाद लिहितच होते तोवर न मु बाफ वर वाढदिवसाचे कळले. तेव्हा लगे हाथ इथेच - तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
धन्यवाद चंद्रा.
धन्यवाद चंद्रा.
छान रिसिपी. करुन पहातोच. हे
छान रिसिपी. करुन पहातोच.
हे लोणचे महिनाभर टिकते का?
या लोणच्याला गोडवा येण्यासाठी
या लोणच्याला गोडवा येण्यासाठी काय घालू? साखर?
आणि हे फ्रिजात राहिल की वरच ठेवायचं?
दक्शे, मिरचीच्या लोणच्यात
दक्शे, मिरचीच्या लोणच्यात कशाला हवाय गोडवा? झणझणीतच बरं की ते!
गप रे तू
गप रे तू
साखरेपेक्षा गुळ घातल्यास चव
साखरेपेक्षा गुळ घातल्यास चव चांगली येईलसे वाटते.
पण गुळ / साखर घातल्यावर किती टिकेल ते जाणकारांनीच सांगावे.
दक्षिणा मी थोडासा गुळ घातला
दक्षिणा मी थोडासा गुळ घातला होता.
आणि हे जास्त दिवस नाही टिकत १५ दिवस टिकत.
दक्षिणा तू इतकी गोड आहेस की
दक्षिणा तू इतकी गोड आहेस की तुला लोणच्यात साखर / गूळ घालायची गरजच नाही, तू केवळ कर ते आपोआप गोड होईल.
मी नाही टाकत मिरचीच्या
मी नाही टाकत मिरचीच्या लोणच्यात गूळ. (एक खुलासा - याचा मी गोड/अगोड असण्याशी काय्येक संबंध नाही. ह. घ्या! )
वापरात नसलेली बाटली फ्रीजमध्ये ठेवते. जागूने लिहिले तसे मिरच्या तेलात पूर्ण बुडतील एवढे तेल असेल तर फ्रीजबाहेर पण टिकते. माझ्याकडच्या ओल्या लाल आणि हिरव्या मिरच्यांचे मिळून दोन बाटल्या (मध्यम आकाराच्या) लोणचे होते. रंगीत छान दिसते. इथे फोटो टाकायची कला 'शिकायला' अजून वेळ झालेला नाही! कुणी केलेच तर फोटो डकवा
Pages