पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२

Submitted by रूनी पॉटर on 10 March, 2011 - 17:20

या अगोदरचा पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१ धागा.
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्‍याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अल्पना +१

ही सगळी खटाटोप माझ्या लहानपणी आईने केलेली आठवत्येय... किमान २५ एक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे... तेव्हा बाजारातुन काही आणण्यापेक्षा घरी करण्यावर जास्त भर होता... आणि मदतीला पण कुणी ना कुणी असायचेच Happy

मूळ यूरपमधे तो सिझनलच आहे. तिथली हि प्रथा. आले कि अमाप पिक येते ( म्हणून तर जिनामिदो मधला तो सण. ) शिवाय तिथे त्यांना, प्रत्येक पदार्थावर तो ओतून घ्यावा लागतो.

२००० च्या वर पोस्टी झाल्यात इथे....

पाककृती हवी आहे. माहिती आहे का? - ३ काढायला हवाय Happy

दिनेशदा +१ - हल्ली सगळीकडे कधीही मिळत असले तरी टॉमेटो सिझनलच फळ आहे... बर्‍याचवेळास बाजारात सिझनशिवाय मिळणारे टोमेटोज हे कोल्ड स्टोरेज मधे साठवलेले असतात.

आम्ही दुसर्‍या टोकावर म्हणजे घरी मॅक्डी ऑर्डर केले कि सॉसची पाकिटे किती नाही सांगितले तरी येतात. मग ती नीट ठेवून भाजीत घालून संपविते. सॉसची बाटली पण आणत नाही. हाइट ऑफ काटकसर. दोन लोकांच्या पास्त्याला एक सॅशे बरोब्बर फिट होते.

तो वरील सॉस फार मस्त लागतो दालचिनी लवंगेच्या स्वादाचा. पण बाटलीत थोडे ही पाणी असले तरी बुरशी येण्याचा खूप चान्स आहे. तेव्ढी मेहनत वाया.

अमा, Lol खरंच हाइट ऑफ काटकसर हां. पण कचर्‍यात फेकण्यापेक्षा हे खरंच चांगलं.

पण बाटलीत थोडे ही पाणी असले तरी बुरशी येण्याचा खूप चान्स आहे. तेव्ढी मेहनत वाया. >> हे माझ्या आईकडे एक-दोन वेळा पाहिलं होतं, म्हणुनच मी म्हटलं कि लार्ज क्वांटिटी बनवुन वाया जाण्यापेक्षा १-२ किलोचं एकावेळेस केलं तर चांगलं.

अल्पना, बचत हा मुद्दा असेल तर ठीक. मला वाटलं कि मुरायला हवं असा काही फंडा आहे. Happy

मंजुडी, तुला कसलं आश्चर्य वाटलं? टोमॅटो आपल्याकडे वर्षभर मिळतात की. Happy

हो, मिळतात की Happy पण त्यांची नोव्हेंबर - डिसेंबर महिन्यातली किंमत आणि मे-जून महिन्यातली किंमत सारखी असते का? Happy

पण त्यांची नोव्हेंबर - डिसेंबर महिन्यातली किंमत आणि मे-जून महिन्यातली किंमत सारखी असते का? >>> ते मात्र नाही माहित. तु म्हणतेस तर असेल तसं. Happy
माझ्या दृष्टीने सिझनल भाज्या/फळं म्हणजे त्या, ज्या इतर सिझनमधे दिसत/मिळत नाहीत. (टीन्ड मिळतात, पण मार्केटमधे मांडुन ठेवलेल्या दिसत नाहीत. Happy )

हल्ली बाजारात ओली हळद/आंबेहळद खुप येतेय. त्याचे काय प्रकार करता येतील? >>> साल वरवर काढून स्वच्छ धुवून छोटे पातळ काप करावेत अन ते हळद, चवीपुरते मीठ आणि लिंबूरस घालून अन बरेच पाणी हे काप डुबतील इतके घालून ठेवावे. २-३ दिवसात मुरतात. मग रोज जेवताना १/२ चमचे घ्यावे. ओली हळद अशी कोशिंबिरीटाईप खाणे चांगले असते. Happy

छुंदा करताना, कैरीचा किस निथळून जे पाणी राहते त्यात ओल्या हळदीचे काप ( तसेच ओले मिरीचे लोंगर, ओली बडीशेप ) घालून ठेवायचे. मस्त चव येते. पण आता कैर्‍या नसणार ना ?

आता त्यावाल्या कै-या नाहीत Sad

दिनेशदा तुम्ही लिहिलेले हळदीचे लोणचेही छान दिसतेय.. या रविवारी हळदीचे लोणचे करुन बघायचा मुड आलाय Happy

अशात एक गलगलचे (ईडलिंबु) लोणचे खाल्लेय. त्यात गलगलचे तुकडे, आल्याचे मोठे तुकडे, आख्ख्या हिरव्या मिरच्या, थोडंसं लाल तिखट, बडीसोप, मेथ्या, थोडीशी मोहरीचा डाळ इ. घातलंय आणि कदाचित थोडीशी शक्कर (गुळाची पावडर ) पण असेल कारण किंचीत गोडवा जाणवतोय लोणच्यात. अशा प्रकारामध्ये ओली हळद पण छान लागेल बहूदा.

आम्ही टोमॅटो सॉस आणि मिक्स फ्रूट जॅम कॉलेजच्या प्रयोगशाळेत बनवलेत. टी वाय बी एस सी (बॉटनी)... फ्रूट प्रिझर्व्हेशनचे प्रॅक्टिकल.

सॉस आणि जॅम ग्यासवर चढवला की समोरच्या तापडीयाकडून ब्रेड आणि सामोसे आणवले जात डिपार्टमेंटच्या खर्चाने. ताजा ताजा सॉस- गरम गरम सामोसे आणि ताजा ताजा जॅम ब्रेडला लावून. असं भरपेट खाण्याचे प्रॅक्टीकल असे. Proud

तापडीयाकडून ब्रेड आणि सामोसे आणवले जात डिपार्टमेंटच्या खर्चाने.>> खर की काय. गरवारेत डिपार्टमेंट काही खर्च करायचे वाचून भरुन की काय आले.

आम्ही टोमॅटो सॉस आणि मिक्स फ्रूट जॅम कॉलेजच्या प्रयोगशाळेत बनवलेत.>> हे आम्हालाही ९ वीमध्ये असताना, फुड प्रीजर्वेशनला होते. त्यात लिंबाचे गोड लोणचे, संत्र्याचा ज्यूस सुद्धा होता. जवळ जवळ सगळ्या मुलींचे पदार्थ चांगले बनले होते.

आम्हाला कध्धी कध्धी असल्या ईंटरेश्टींग गोष्टी शिकायला मिळाल्या नाहीत.

नुस्त्या मेल्या त्या ब्यालंस शिटा आणि कायद्याचे सेक्शन.

लक्की यु Happy

ताई हे इंटरेष्टींग शिकायच्या आधी झुरळं, उंदीर, जळवा, गांडूळ असं बरंच काही कापून काढलंय... Wink

गरवारेचं बॉटनी डिपार्टमेंट प्रेमळ होतं स्वाती.. सामोसे दिले आणि आमचे ४ जणींचे पहिल्या सेमचे मार्क्सच युनिव्हर्सिटीकडे पाठवायचे 'विसरले'. Wink

प्लीज मदत करा..... नवरयाला पोहे आणायला सांगितले तर तो लाल रंगाचे जाडे पोहे (कदाचित उकड्या तांदळाचे असावेत) घेउन आला. कसे संपवावेत कळत नाही. काय काय बनवून खपवता येइल?

कटलेट्स मधे घाला,

धिरडी - दही, कोथिंबीर, मिरची, आले इ इ घालुन.

उतप्पे - पोहे आधी दह्यात भिजवुन घ्यायचे आणि मग त्यात थोडे तांदुळाचे पिठ, मिठ, कांदा, मिरची, कोथिंबीर, टोमेटो इ इ घालुन उतप्पे बनवायचे.

चिवडा पण करता येइल... भाजुन / तळुन त्यात दाणे, आणि तिखट शेव घालायची. फोडणीत फक्त मोहरी, हिंग आणि कढीपत्ता.

दडपे पोहे पण होतिल की Happy

पोह्याची उकड - नानबा स्टाईल.

धन्यवाद मृण्मयी, लाजो. ब. ब्लु चा रंग कसला सही दिसतोय.. करुन बघते Happy आंबट चव आहे तर जरा शंका वाटतेय.

आसना, पोह्रे भाजके नसतील तर थोडे भाजून त्याला मिक्सरमध्ये फिरवून जिथे जिथे तांदळाची पिठी वापरत तिथेही खपवता येतील..जसं मासे तळताना किंवा वांग्याचे काप इ. करताना घोळवायला...;) हेल्दी पण होईल.. Proud

पोहे भिजवून त्याचा लगदा करून त्यात मीठ, तिखट, कांदा कोथिंबिर, ओवा इत्यादी गोष्टींचा भरणा करून जाडसर थालिपीठ लावता येईल. चविष्ट लागेल सोबत एखादी चटणी असल्यास.

आसना आमच्याकडे ह्या पोह्यांचे गोडे पोहे करतात. थोड्याश्या दुधात एकदम बारिक चिरलेला गुळ मिक्स करुन हे पोहे त्यात भीजवायचेत. चिमुटभर मिठ आणि वर ओल खोबर घालुन खावेत.

धन्यवाद सख्यानों, असेच काहि तरी करुन संपवावे लागणार पण अर्धा किलो आहेत कधि संपेल कोण जाणे Happy त्याचे लाडू पण करता येतिल ना?

मी अमि >> बिस्किट भाकरी रेसिपी
http://www.livemint.com/Leisure/vecK4AkgoQkrjKxik6l2tM/Rajasthan--Biscui...

एकदम छान होते. मी आजकाल थालिपीठाच्या पिठात थोडी कणिक घालून पण अशीच भाकरी करते. ह्यात ताजी किंवा कसुरी मेथी पण छान लागते.

मी कणिक आणि बेसन समप्रमाणात घेते आणि पाण्याने पिठ भिजवते.
एकदा उलटले कि थोडेसे तूप लावून भाजते

झुकिनी, ब्रोकोली, मशरुम्स, लाल-पिवळ्या, हिरव्या ढब्बु मिरच्या, स्वीट कॉर्न्स असं सगळं वापरून काय करता येईल? पास्ता, पिझ्झा नकोय. (याशिवाय घरात कांद्याची पात, टॉमॅटो, पुदिना, पत्ताकोबी, फ्लॉवर, मटर, गाजर झालच तर काकडी, कांदे-बटाटे, मेथी आहे.)

Pages