पुण्यापासून अगदी जवळ असलेल्या सासवड गावी अनेक ऐतिहासिक वास्तु, देवळे, काळाच्या कसोटीवर खर्या उतरून अजुनही ताठ मानेने उभ्या आहे.
त्यापैकीच एक मंदीर आहे संगमेश्वर (अगदी बरोबर, नावात श्वर आले म्हणजे अर्थातच महादेवाचे...)
आधी वंदू गजानना! गाभार्याबाहेरच्या कोनाड्यातील गणपती!
महादेवाचे देऊळ आणि नंदी नाही असं कधी झालयं का कुठे! पण महाराष्ट्रात इतका मोठा नंदी फारच कमी ठिकाणी दिसेल....ह्या ठिकाणी आढळून आलेली अजुन एक गोष्ट म्हणजे देवळाच्या आवारात दोन नंदी आहेत.
मंदिरासमोर दोन-दुशीकडे दगडी दीपमाळादेखिल आहेत.
मंदीराचे बांधकाम काळ्या पाषाणातलेच आहे.
कोरीवकाम अगदी सुबक आहे
मला आपले असे वाटले की कळसाचे काम जरा वेगळ्या प्रकारचे वाटले.. म्हणजे पुर्णतः दगडी वाटले नाही.
जाणकार लोकांनी ह्या मंदीराची स्थापत्यशैली कोणती आहे यावर प्रकाश टाकला तर बरे!
असेही समजते की ह्या ठिकाणी 'वळू' नावच्या मराठी चित्रपटाचे अंशतः चित्रीकरण पार पडले होते.
छान! स्थापत्यशास्त्राचा मस्त
छान! स्थापत्यशास्त्राचा मस्त नमुना.
छान प्रचि. २ नंदिंचा ऐकत्र
छान प्रचि. २ नंदिंचा ऐकत्र प्रचि नाही का?
धन्यवाद टुनटून, खरेच छान
धन्यवाद टुनटून, खरेच छान वास्तुशिल्प आहे! मला स्वतःला हे याप्रकारच्या शैलीतील याभागातील अगदी एकमेव मंदीर वाटतेय. छोटे मिनार असल्यागत मुसलमानी शैलीचा प्रभाव असलेले.... (शेवटचे दोन फोटो बघितले असता कळू शकेल मला काय म्हणायचे आहे) माबोवरच्या जाणकारांनी अधिक प्रकाश टाकावा.
किशोर मुंढे - नाही हो एकच फ्रेममधला दोन्ही नंदींचा फोटो! दुसरा नंदी पहिल्या नंदीच्याच मागे पण उघड्यावर आहे. नक्की आठवत नाहीये पण बहुदा मुर्ती थोडी तुटलेली (दगडाचा टवका निघालेली) असल्याने देवळा-शंकरासाठी अ-ग्राह्य (बाद झालेला) असावा.
सुर्रेख प्र चि.
सुर्रेख प्र चि.
छान
छान
छान. हे मंदिर पुरंदरे यांच्या
छान. हे मंदिर पुरंदरे यांच्या मालकीचे आहे असं ऐकलं होत.

अशी बरीच मंदिरं आहेत सासवडमध्ये.
बाजुच्या संगमाचा फटु नाही का काढला?
तिथे पोरं मस्त पोहत असतात.
म स्त
म स्त
छान प्रकाशचित्रे!!
छान प्रकाशचित्रे!!
सुंदर आहे देऊळ. दीपमाळ तर
सुंदर आहे देऊळ. दीपमाळ तर खासच !
पुरंदरे शशांक, धन्यवाद, खरेतर
पुरंदरे शशांक, धन्यवाद, खरेतर ही सर्व प्रचि भर उन्हाची काढलेली आहेत. मला परत एकदा सक्काळीच किंवा उतरत्या उन्हात तिथे खास फोटो काढायला म्हणून जायचे आहे.
मार्को पोलो - आपल्याकडून आलेली दाद ही लाखमोलाची... मी स्वतः आपल्या 'अतुल्य भारत' चा चाहता आहे.
झकासराव, - हे फोटो काढले तेव्हा पाणी नव्हते जास्त, फारच रोडावलेला होता प्रवाह.. :(,
आणि हो त्या बाकीच्या देवळांमधे पण जायचे आहे एकदा, अधिक माहीती देऊ शकाल (म्हणजे नाव वगैरे) तर बहार येईल!
रोहित ..एक मावळा - हे देऊळ म्हणजे बोनस होता, मल्हारगड केल्यानंतरचा... (मल्हारगड फारच लवकर चढून झाला, वरही फार काही नव्हते दिवस घालवण्याजोगे, म्हणून मग सासवडकडे कूच केले आणि हे देऊळ पहायला मिळाले)
विजय आंग्रे आणि दिनेशदा - धन्यवाद आपला प्रोत्साहनपर प्रतिसाद नोंदवल्याबद्दल...:)
अरे झक्कास ठिकाण आहे की हे!!
अरे झक्कास ठिकाण आहे की हे!!
मस्तय
मस्तय
मस्तच फोटो छानच दिसतय
मस्तच फोटो
छानच दिसतय देउळ
जायला पाहिजे ....
सुंदर फोटो. मंदिराचे बांधकाम
सुंदर फोटो. मंदिराचे बांधकाम आणि दिपमाळ सुरेखच. !
सासवडमधेच थोडं गावाच्या
सासवडमधेच थोडं गावाच्या बाहेरच्या बाजूला वटेश्वर म्हणून याच मराठाकालीन शैलीतलं आणखी एक देऊळ आहे. अतिशय निवांत आणि रमणीय (माझ्या मते) ठिकाण आहे. तेही बघा जरूर
डबल पोस्ट
डबल पोस्ट
हम्म... पुरानी यादें ताजा !
हम्म...
पुरानी यादें ताजा !
सासवड हे आचार्य अत्रे यांचे गाव. त्यांचे पाच खंडातले आत्मचरित्र- "कर्हेचे पाणी" माझ्याकडे आहे. या पुस्तकाच्या जुन्या आवृत्तीच्या मुखपृष्ठावर या देवळाचे लांबून, तिरकस कोनात काढलेले चित्र आहे. मला ते फार आवडते. त्यामुळे एकदा सासवडला जाऊन मी त्याच अँगलने या संगमेश्वराचा फोटो काढला होता. तो अजूनही माझ्या संग्रहात कुठेतरी आहे.
सुरेख मंदीर आहे, खरंच !
छान, आवडली प्रचि
छान, आवडली प्रचि
सासवडमधेच थोडं गावाच्या
सासवडमधेच थोडं गावाच्या बाहेरच्या बाजूला वटेश्वर म्हणून याच मराठाकालीन शैलीतलं आणखी एक देऊळ आहे. अतिशय निवांत आणि रमणीय (माझ्या मते) ठिकाण आहे. तेही बघा जरूर >>> +१
गिरिश मातीची ओढ म्हणायचं का
गिरिश
मातीची ओढ म्हणायचं का याला?
वरदा - या देवळाचा खालील भाग
वरदा - या देवळाचा खालील भाग हेमाड्पंथी देवळांप्रमाणे वाटतो, पण वर गाभार्याबरोबरच सभामंडपावर असलेला कळस, व मिनरेट्स या मुळे ही एक वेगळीच स्थापत्यशैली असावी असे वाटतेय, यालाच मराठाकालीन शैली म्हणतात का?
वरदा / गिरीश - हे वटेश्वर गावाबाहेर म्हणजे नक्की कुठल्या बाजूला / रस्त्यावर आहे? कसे जायचे?
आनंदयात्री - हे ठिकाण म्हणजे शांत परिसर, वर्दळ नाही, देवळात गेल्यावर जी मनःशांती मिळते ती अवर्णनीय, नुसते झक्कासच नाही तर आनंददायी देखिल आहे!
ज्ञानेश - आपला प्रतिसाद वाचून, अत्र्यांचे जुने पुस्तक मिळवून बघायला हवे अशी ईच्छा होत्ये.
बाकी सर्व मंडळींनो धन्यवाद.
सुरेख फोटो आणि माहिती अशी
सुरेख फोटो आणि माहिती

अशी अनवट ठिकाणं पहायला आणि त्याबद्दल माहिती वाचायला नक्की आवडेल.
सासवडचे ग्रामदैवत
सासवडचे ग्रामदैवत श्रीभैरवनाथाचे मन्दिर खुप सुन्दर आणी प्रसन्न आहे ,आणी श्रीसोपानकाकाची समाधी पण सासवड मधे आहे.कह्रा आणी चाम्बळी च्या सन्गमावर संगमेश्वराचे मन्दिर आहे.
सासवडमधेच थोडं गावाच्या बाहेरच्या बाजूला वटेश्वर म्हणून याच मराठाकालीन शैलीतलं आणखी एक देऊळ आहे. अतिशय निवांत आणि रमणीय (माझ्या मते) ठिकाण आहे. तेही बघा जरूर >>> +१
खरच आमच्या सासवडचि मातीची ओढ जाणवलि हा धागा वाचल्यावर धन्यवाद.
दिपमाळ विशेष आवडली...
दिपमाळ विशेष आवडली...
आजच्या (त्रिपुरी
आजच्या (त्रिपुरी पौर्णिमेच्या) दिवशी ह्या मंदिरामधे जी दिव्यांची आरास करतात ती खरेच बघण्यासारखी असते.
छान. आवडले आजकाल लोकं मुर्ती
छान. आवडले
आजकाल लोकं मुर्ती आणी पुरातन बांधकामाला ऑइल्पेंट का बरे लावत असावेत. आणी त्यांचे मुळ सौंदर्य का नष्ट करत असावेत ?
अशी अनवट ठिकाणं पहायला आणि
अशी अनवट ठिकाणं पहायला आणि त्याबद्दल माहिती वाचायला नक्की आवडेल. - जिप्सी, मला पण आवडतील... अशा ठिकाणी जायला.... पण हा पण मधे येतो ना....:)
बोरावके - चांबळी नदीचे नाव लिहिल्या बद्दल धन्यवाद (कर्हेला कोणती नदी मिळते ते आठवतच नव्हते)
बोरावके / गिरीश - कुणीतरी काढा हो त्रिपूरी पौर्णिमेच्या दिव्यांच्या आराशीचे फोटो...किंवा काढलेले असतील तर ते तरी टाका
फॉरेनच्या मंडळींना भुरळ पाडण्याचे सामर्थ्य मराठी मातीतल्या देवळांमधे नक्कीच आहे हा समज दृढ केल्याबद्दल मार्को पोलो व जेम्स बाँड यांना धन्यवाद....:) दिवा का काय तो घ्यावा.
'आजकाल लोकं मुर्ती आणी पुरातन बांधकामाला ऑइल्पेंट का बरे लावत असावेत. आणी त्यांचे मुळ सौंदर्य का नष्ट करत असावेत ?' जेम्स बाँड - अहो त्यांना वाटत असते की ते देवळाचा उद्धार करत आहेत. (काही वेळा हे रंगकाम चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी म्हणून केले जाते, वाई जवळच्या मेणवलीला असे नेहेमी होते
तिथले (तुका म्हणे त्यातल्या त्यात) सुदैव हेच की तो रंग ऑईलपेंट नसतो)
सासवडमधेच थोडं गावाच्या
सासवडमधेच थोडं गावाच्या बाहेरच्या बाजूला वटेश्वर म्हणून याच मराठाकालीन शैलीतलं आणखी एक देऊळ आहे. अतिशय निवांत आणि रमणीय (माझ्या मते) ठिकाण आहे. तेही बघा जरूर >> वटेश्वर सुन्दर आहेस आहे... पण त्याला नविन रुप देण्याच्या नादात contractor ने देवळाच्या शिखराला पिवळा रंग फासुन ठेवला आहे, आणि मुळ रुप अगदीच घाण करुन ठेवले आहे.
आमच मुळ गाव सासवड त्यामुळे लहानपणापासुन वटेश्वरला जायचो....
वटेश्वर ते सोपान समाधि हा रस्ता पण मस्त आहे.... शेतातुन जातो...
सासवडचे ग्रामदैवत श्रीभैरवनाथाचे मन्दिर खुप सुन्दर आणी प्रसन्न आहे < +१
सुंदर मंदिर आहे. असेच एक
सुंदर मंदिर आहे. असेच एक त्र्यंबेकेश्वर मंदिर सावसवड जवळील हिवरे गावात आहे.