रिसेल फ्लॅट विकत घेण्याबद्दल मार्गदर्शन/सल्ला

Submitted by रंगासेठ on 13 January, 2012 - 09:27

नमस्कार

मी पुण्यात रिसेल फ्लॅट विकत घ्यायचं ठरवलय. या संदर्भात आधिक माहिती हवी आहे. माझं बजेट ठरलय आणि त्यानुसार बर्‍यापैकी उपलब्धता आहे. अर्थात मी ही माहिती magicbricks.com, makaan.com, 99acres.com या संकेतस्थळाच्या संदर्भाने सांगतोय. दुसरं म्हणजे ठिकाण/लोकेशन पण काही शॉर्टलिस्ट केली आहेत. त्यामुळे त्याबाबतीतही जास्त शंका नाहीत.

रिसेलच फ्लॅट घेण्याविषयी अनेक धागे वाचलेत पण एकत्रित अशी माहिती मिळाली नाही. परत रिसेल फ्लॅट घेताना काय काळजी घ्यावी हेही सविस्तरपणे कळालं तर बरच होईल. विशेषतः ज्यांनी रिसेलचा फ्लॅट घेतलाय अथवा आपला फ्लॅट विकलाय. मी १-२ फ्लॅट्स पाहिलेत. पण जर या विषयावर आणखी माहिती मिळाली तर उत्तमच.

१) कोणकोणती कागदपत्रे तपासून पाहणे अत्यावश्यक आहे? ओसी, NOC, सेल्स डीड इ.
२) या व्यतिरिक्त लागणार्‍या मंजूर्‍या, जसे की सोसायटी कडून, तसेच वीजबील व मालमत्ता कर आपल्या नावे करणे इ.
३) किती जुन्या इमारतींचा विचार करावा? जसे की १२ वर्षं जुनी असल्यास नको त्यापेक्षा जरा नवीन इ.
४) बांधकामाचा दर्जा कसा तपासावा? कारण बांधून जुन्या झालेल्या घराचा दर्जा कसा तपासणार.
५) मी गृहकर्ज घेणार आहे तर बँकांच्या काय अटी असतात?
६) घरात काही रिनोवेशन करायचे असल्यास काय मंजुरी काढाव्या लागतात?
७) प्रॉपर्टी एजंट, वकील व वॅल्युएशन एजंट यांची कशी व कितपत मदत घ्यावी?
८) कार पार्किंग बद्दल देखील काय काळजी घ्यावी कागदपत्रात?
९) या फ्लॅटच्या किंमतीत व्हॅट, स्टँप ड्युटी व इतर काही खर्च पण येतात, त्यांना गृहकर्जात समाविष्ट करता येईल काय?

असे काही प्रश्न आहेत. इथे जर या प्रश्नांची उत्तरे व आधिक माहिती मिळाल्यास आनंदच होईल. Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्वप्रथम Index II चेक करावा...(deal करण्या पुर्वी)

विकणार्या व्यक्तिचे (व्यक्तीन्चे ) नाव, stamp duty, area, previous owner, ( and all the links to previous deals till builder)

Index II हा फ्लॅटचा आरसा / कुंडली असतो.
------------------------------------
डील ठरवुन मग टोकन मनी द्यावे...रीतसर एका कागदावर रेवेन्यु स्टँप चिटकवुन सही घ्यावी.
डील मधे खालील गोश्टी (?) याव्यात...
तुम्ही त्याना द्यावयचि रक्कम,
स्टँप ड्युटी / रेगिस्ट्रेशन कोण भरणार,
व्यवहार किति दिवसात पूर्ण करणार,
वीजबील व मालमत्ता कर भरला नसल्यास कोण भरणार,
सोसायटी चे ना हरकत प्रमाण पत्र (२५०००/- खर्च् ) कोण भरणार,
ब्रोकरेज कोण भरणार
पैसे कसे भरणार ( कॅश/ चेक/ डी डी)
------------------------------------
शेअर सर्टीफिकेट नावावर आहे का ?
सोसायटी चा मैन्टेनन्स till date भरला आहे का ?
सोसायटीचे बिल्डर+जागामालका बरोबर चे कन्वेयन्स डीड झाले आहे का ?
------------------------------------
कार पार्किन्ग अलोकेशन लेटर आहे का ? मॅप आहे का ?(पार्किन्ग लेआउट आणी तुमचे पार्किन्ग अधोरेखित)
-----------------------------------
कन्वेयन्स डीड झाले असल्यास कितिही जुन्या प्रोपर्टी चा विचार करु शकतो.( जितकी जुनी तितकी चांगली)
----------------------------------
शक्य असल्यास सोसायटी चेअरमन / सेक्रेटरी बरोबर चर्चा करुन सगळे पेंडिन्ग इश्यु माहित करुन घ्यावे.
----------------------------------
रिसेल फ्लॅट ला व्हॅट/सर्विस टेक्स लागत नाही.

shrikkk >> उपयुक्त माहिती...
Index II म्हणजे काय, कुठे मिळतो... कसा काढायचा?

अशातच सिंहगड रोडवर एक जुना प्लॅट घेतला. वर श्री ने दिलेली माहिती आहेच. पण महत्वाचे म्हणजे जुन्या घरातील भिंती किती भक्कम आहेत हे तपासून घेणारी एक एजन्सी असते. तीची फि २५०० च्या आसपास असते. ती तपासनी करूनच घ्यावी.

shrikkk धन्यवाद Happy केदार अशी कुठली एजन्सी माहिती असल्यास त्यांचा संपर्क क्रमांक देशील?
IndexII कुठे मिळतो? आणि रिसेल फ्लॅटला व्हॅट/सर्विस टेक्स लागत नाही हे ऐकून बरे वाटले. Happy

Index II म्हणजे फ्लॅटच्या व्यवहाराचा सारांश.

तुम्ही ज्या व्यक्ती कडुन फ्लॅट घेणार आहात त्यांच्याकडे Index II असणारच.

समजा बिल्डर ने फ्लॅट पहिल्यांदा मि. काळे यांना विकला - काळेंना बिल्डरसोबत अ‍ॅग्रींमेण्ट करताना Index II व बाकीचे पेपर मिळतील.

आणि मि. काळे यांच्याकडुन फ्लॅट मि. जोशी घेणार असतील तर जोशींना मि. काळें कडे Index II मिळेल - मागावा लागेल

९१५८७७६३२९ - श्रीकांत

ज्यांचा फ्लॅट तुम्हाला घ्यायचा आहे त्यांच्याकडे त्या फ्लॅटचे इंडेक्ष २ असते. ते तपासा.
आधी टोकन अमाऊंट देऊन एक असाईनमेंट अ‍ॅग्रीमेंट करुन ते पण फायनल अ‍ॅग्रीमेंट प्रमाणे रजिस्टर करुन घ्यायचे. त्यात तुमचा अन मूळ मालकाचा तिथे फोटो काढतात , फिंगर्प्रिंट घेतात, मग ते अ‍ॅग्रीमेंट रजिस्टर होते. अ‍ॅग्रीमेंट मधे किती रक्कम दिली, किती बाकी आहे, ती किती मुदतीत द्यायची आहे , हे सर्व वकीलाने लिहीले असते.
फ्लॅट फायनल झाला की प्रभात पेपेरम्,अधे नोटीस द्यायची म्हणजे कोणाचा त्यावर हक्क आहे का वगैरे तपासता येते तसेच मागाहून कुणी हक्क सांगू शकत नाही.
घराचा सर्व प्रॉपर्टी टॅक्स भरला असणे, वीज-पाणी बिले भरलि असणे, सोसायटी मेंटेनस चार्ज भरला अस्णे हे सर्व तपासावे लागेल.
लोन साठी मूळ घराची कागदपत्रे, सँक्शन प्लान, कमेम्न्स्मेंट सर्तीफिकेट , कंल्पीशन सर्टीफिकेट हे सर्व लागेत.
(खूप घाईत आहे, त्यामूले लिखाणात टायपो आहेत, काही माहीती लागली तर विचारा.)

सोसायटीकडून नो ऑब्जेशन लेटर आणि ट्रान्स्फर लेटर घ्यावे लागेल. त्यासाठी नो ड्ञुज करावे लागेल. ट्रान्सफर चार्जेस पुण्यात २५००० असतात. (इथे बंगळूरात १ लाख पण घेतात. :अओ:)

उपयुक्त धागा. मी सुद्धा पुण्यात ३ वर्षे जुना असलेला २ बी एच के फ्लॅट घेतोय. १०३५ स्क्वे.फुट. किती टक्के लोन मिळेल?

किती टक्के लोन मिळेल?<< किती टक्के हे लोन देणार्‍या संस्थेवर अवलंबुन आहे, साधारण पणे घराच्या किमतीच्या (घराची एकूण किंम्मत + स्टॅम्प डुटी) ८०-८५ % पर्यंत मिळते,
त्या प्रमाणे उरलेली रक्कम तुम्हाला २०-१५% जमा करावी लागते.
म्हणजेच सुरवातीला जागा फायनल केल्यावर १५% रक्कम जागा मालकाला देऊन साठे खत (Agreement to Sell) केले जाईल. स्टॅम्प डुटी मात्र घराच्या संपुर्ण किमतीवर भरून हे साठेखत रजिस्टर केले तरच ते बॅके मधे स्विकारले जाईल.
साठे खत करते वेळॅस वरिल सर्व बाबी तपासुन घेणे किंवा त्यात सोसायटी शेअर ट्रान्स्फर, विज मिटर ट्रन्स्फर, ई खर्च कोणी करायचा वगैरे बाबी लिहल्या जातात तसेच हा व्यवहार जर पुर्ण नाही झाला तर झालेला खर्च-भरपाई देण्या-घेण्या बद्दल पण त्यात नमुद करता येते.

बँकेकडुन लोन घ्यायचे असल्यास जागा विकत घेतल्यापासून सध्या असलेल्या मालका पर्यंतच्या सगळ्या व्यवहाराचे कागद पत्र गरजेचे असतात... तसे नसतील तर बँका लोन देताना प्रचंड वेळ लावतात... प्रत्येक वेळेस नवीन काहीतरी शंका काढत बसतात..

नादखुळा लोन किती मिळू शकेल ते जागेवर अवलंबून नसून तुमच्या मिळकतीवर अवलंबून असते.. तुम्हाला मिळू शकणारे लोन जर फ्लॅटच्या किमती पेक्षा जास्त असेल तर बहुतेक ठिकाणी फ्लॅटच्या किमतीच्या ७५% पर्यंत रक्कम लोन मिळते.

तुमच्या महिन्याच्या मिळकतीच्या साधारण ५०% टक्के केल्यास त्याच्या १०० पट लोन देतात.. उदा. महिन्याचा पगार ५००००, त्याच्या ५०% म्हणजे २५००० आणि त्याच्या १०० पण म्हणजे २५०००००. हे अगदीच ढोबळ आहे.. पण बहुतेक तेव्हढे लोन मिळते..

नादखुळा लोन किती मिळू शकेल ते जागेवर अवलंबून नसून तुमच्या मिळकतीवर अवलंबून असते.> लोन किती मिळू शकेल हे मिळकतीवर तर अवलंबून तर असतेच पण प्रॉपर्टी किती जुनी आहे यावरही अवलंबून असते.

हिम्स, स_सा धन्यवाद.
स्वाती, अगदी बरोबर. माझ्या एका मित्रानेसुद्धा मला ह्याबद्दल विचारले होते. मला त्याबद्दलच माहिती हवी होती. इथे बर्‍याच गोष्टी समजल्या. आता ह्या सगळ्या चर्चेच्या अनुषंघाने व्यवहार करायला हरकत नसावी. Happy

आम्ही ही इथं मुंबईत (ठाणे / डोंबिवली) २ बीएचके जागा नव्या / रिसेल पहातो आहोत. रिसेल प्रॉपर्टी घेताना किती वर्ष जुनी घ्यावी?

एमायडीसीतल्या जागा लीजवर असतात का?

नव्या जागांचा दर लोक काय वाटेल ते सांगतात. निगोसिएशन कसं करता येतं? आय मीन, रेडी रेकनर प्रमाणे ठरलेल्या भावाच्या दुप्पट भाव लोक सांगताहेत तर काय करावं?

संपूर्ण डील व्हाईटमध्ये करता येणं शक्य नाही का?

स्वाती, अगं ६.५ चा भाव सांगतात आणि अग्रीमेंट ३.५ ने + सोसा. चार्जेस, मेन्ट. , पा र्किंगचे २.५ / ३ वेगळे!

तू पुण्यात म्हणते आहेस ना? परांजपे वगैरे... ते जिथे बांधताहेत तिथले आवाक्यात नाहीत. इन फॅक्ट इथं ठाणे / डोंबिवलीत सुद्धा नवी प्रॉपर्टी ७० टच करते.

संपूर्ण डील व्हाईटमध्ये करता येणं शक्य नाही का?>> शक्य आहे की. आजकाल बिल्डर्स व्हाईट मनीच घेतात. म्हणजे मी जेवढे पाहिलेत ते तरी. ब्लॅक पण चालते, पण तुम्ही ते टाळू शकता.

MIDC साठी ही लिंक बघ. त्या साईट वरच्या लिंक्स चालतायत का? माझ्या इथे उघडत नाहीए.
http://www.midcindia.org/Pages/HelpDesk.aspx#

प्रॉपर्टी किती जुनी ह्यामुळे फार फरक प्रायव्हेट बँकेत लोन घेतल्यास येत नाही.. पण राष्ट्रीयकृत बँकेत फरक पडतो..

१००% व्हाईट मध्ये व्यवस्थित व्यवहार होतात... बर्‍याच वेळा विकणार्‍याला कसे पैसे हवेत ह्यावर अवलंबून असते.. आजकाल नवीन फ्लॅटचे व्यवहार तर बहुतेक व्हाईट मध्येच होतात.

रंगासेठ,
कारपेट आणि बिल्टअप एरिया सुद्धा आधि जाणुन घ्या काही ठिकाणी सुपर बिल्टअप ३० ते ३५ % इतका असु शकतो. त्या मुळे हातात येणारी जागा (कारपेट एरिया हा कमी असु शकतो

ज्या बँकेमधून लोन घेणार आहात त्या बँकेचे लोक येउन जागेचे valuation करतात आणि मग त्या आधारावर पण लोन किती मिळेल हे डिपेंड होते
रिसेल मध्ये जागा घेताना अग्रीमेंट करताना जास्तीत जास्त amount चे होईल अशी बोलणी करा. ex . ५० लाख किमत असेल तर ५ लाख black आणि ४५ लाख चे अग्रीमेंट.
बहुतेक owners 2० लाख वगरे black ने मागून फक्त 3० लाखाचे अग्रीमेंट करतात. black ने जास्त amount देत असाल तर किंमत कमी करता येऊ शकते.
शक्यतो nationalize बँकेतून लोन घ्या.

कार्पेट area सरळ सरळ मोजून घ्या. जुनी जागा असेल तर लोडिंग कमी असायची शक्यता आहे.
शक्यतो 2x2 च्या लाद्या असतात . त्यामुळे actual area मोजणे सोप्पे जाते

namaskar,
mala ek prashna vicharaycha ahe. resale chya flat che poorna paise ada kelya nantar, tya flat chya junya malakala sadharantha kiti diwas dyaave jenekarun to flat che possession deil?

Dhanyawad.

धन्यवाद, बरीच चांगली मिळतेय. बर्‍यापैकी एरिया ठरलाय, वाकड/पिंपळे सौदागर/बालेवाडी या भागात बघेन. आणि काही प्रकल्पांची माहिती मिळालीय, गणपती बाप्पांना निरोप दिल्यावर वेगात मोहीम सुरु करायची आहे. -)

सध्या रिसेल मार्केट कसे आहे. कोट्यानुकोटी उड्डाणे आहेतच अजून....>>>>

हो तर ... हल्ली फक्त कोटी... च ऐकायची सवय आहे..... बिल्डरांची क्रुपा....

मी १-२ महिन्यापूर्वी फातिमानगर्/वानवडी भागात ४३-४७ दरम्यानचे काही फ्लॅट्स पाहून आलोय. बरे होते. इन्वेस्टर्स फ्लॅट वर लक्ष ठेवलं तर कदाचित जास्त चांगली कल्पना येईल.

http://www.homebuyerscombine.com/index.php - ही कंपनी होम बायर्स ना एकत्र करुन डेव्हलपर वा बिल्डर कडुन बल्क डिस्काउंट करुन देते / स्वतः देते असे काहिसे आहे.

सहजच आजच्या फोर्ब्स मधे यासंबंधी वाचत होते व हा धागा माबोवर वर आलाय.

इथेही बरेच जण रियल इस्टेट मधे इंटरेस्टेड असतात अशांनी एकत्र येऊन अशा काही स्किम्स चा फायदा घेतला तर सर्वाना लाभ होऊ शकतो.

बँकेकडुन रिसेल असे जे फ्लॅट असतात त्या व्यवहारासंबंधी काही माहिती मिळेल का?? ते जर खरेदी करायचे असतील तर होम लोन मिळते का? आणी किती % मिळते??

Pages