कविता(!)

Submitted by श्यामली on 1 November, 2012 - 01:47

चंद्र कवितेतला
कोजागिरीही कवितेतलीच
आकाश तेही अर्थात तिथलंच
मग तिथे अवेळी येणारा पाऊस,
सगळ काही विस्कटून टाकणारी वादळं
त्यात फरफटत जाणारे आपण
शब्दही, आणि अर्थही तिथलेच
सगळ्या भावना, सगळी दु:ख
सगळा आनंद तिथलाच; असं जरी असलं आणि
आयुष्य म्हणजे एक कविताच असं म्हटल
तरी एक कविता म्हणजे सगळं आयुष्य नसतं
नाही का?
~~~

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शब्दही, आणि अर्थही तिथलेच
सगळ्या भावना, सगळी दु:ख
सगळा आनंद तिथलाच; ...

अगदी अगदी!!! एकदम पटलं.

आयुष्य म्हणजे एक कविताच असं म्हटल
तरी एक कविता म्हणजे सगळं आयुष्य नसतं
नाही का?

क्या बात है.... एकदम खरं Happy

फारा दिवसांनी श्यामलीचं पुनरागमन. जुन्या गुलमोहोर वर छान-छान कवितांचा मोहोर फुलायचा, सुजाण प्रतिक्रिया यायच्या, चर्चा झडायच्या, त्याची आठवण झाली.
- प्रभाकर [बापू] करंदीकर

>>तिथेही गोंधळच होता म्हणून कंसात

मग व्याकरणात चूक आहे... प्रश्णचिंन्ह हवे, कंसात ऩको. असेही ऊदगारचिंन्ह कंसात नसते तरी फरक नसता पडला.. Happy

असो..
कविता गंडलीये असे म्हणायचे होते.