Submitted by सतीश देवपूरकर on 14 November, 2012 - 10:25
गझल
कधी मी आगही प्यालो, कधी मी झोकला वारा!
कधी मी वेचल्या ठिणग्या, कधी मी वेचल्या गारा!!
गळाले फूल चाफ्याचे, तिच्या वेणीतुनी ऐसे;
अवेळी कोसळे कोणी नभामधला जसा तारा!
तिचे ते ओठ थरथरते, जणू वीणाच गाणारी!
कशा छेडायच्या आधी अशा झंकारती तारा?
कधी दिंडी, कधी माझी निघाली धिंडही येथे;
जगाला लाभला होता जणू हुकमीच डोलारा!
दिल्या हाका मला कोणी? कुठे मी चाललो आहे?
मला पाहून का केला दिशांनी आज पोबारा?
मलाही पेलवेना का स्वत:ची जिंदगी माझी?
असे का लागले वाटू? जणू मी वाहतो भारा!
-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी वाचली
मी वाचली
वाच्लेले पोचले!
वाच्लेले पोचले!
गझल वाचली समजले, पण पुढे काय,
गझल वाचली समजले, पण पुढे काय, वैभवा?
कधी मी आगही प्यालो, कधी मी
कधी मी आगही प्यालो, कधी मी हा*लो निखारे
अशी तरही घेउया काय?
अभिरुची वाखाणण्याजोगी
अभिरुची वाखाणण्याजोगी आहे........
तिचे ते ओठ थरथरते, जणू वीणाच
तिचे ते ओठ थरथरते, जणू वीणाच गाणारी!
कशा छेडायच्या आधी अशा झंकारती तारा? व्वा!
कधी दिंडी, कधी माझी निघाली धिंडही येथे; (ही ओळ जरा ठीक वाटली नाही. पण, मी सुचविणार नाही.)
जगाला लाभला होता जणू हुकमीच डोलारा! ....व्वा!
दिल्या हाका मला कोणी? कुठे मी चाललो आहे?
मला पाहून का केला दिशांनी आज पोबारा?
व्वा..!!
धन्यवाद जोशीबुवा!
धन्यवाद जोशीबुवा!