"मुलाला महाराष्ट्र राज्याच्या इंजिनियरिंग सी.ई.टी. मध्ये १५० पैकी ९२ मार्क्स पडलेत. बारावीला पी.सी.एम ग्रुप मधे जेम तेम ७५ टक्के मार्क्स आहेत. याला इंजिनियरिंगची कोणती साईड द्यावी ?" एका मुलाचे पालक माझ्याशी चर्चा करत होते.
त्यांच्याशी बोलताना मला तो थ्री ईडीयट्स मधला सीन आठवत होता. ज्याला वाईल्ड फ़ोटोग्राफ़ीत रुची होती अश्या फ़रान कुरेशीला आपल्या वडीलांशी हे बोलायचे धाडस नसते. नाईलाजास्तव तो इंपेरियल इंजिनीयरीग कॉलेजमध्ये मॅकेनिकल इंजिनीयरीग शिकत असतो. सातत्याने शेवटच्या नंबरावर पुढे ढकलला जात असतो. यावर आणखी पुढे लिहायचे कारण नाही. तो सीन सगळ्याच्या लक्षात असेल.
सिनेमातच काय प्रत्यक्ष अनेक उदाहरणे अशी आहेत की वडीलांची डोनेशन देऊन प्रायव्हेट इंजिनीयरींग कॉलेजात मुलाला प्रवेश मिळवुन देण्याची क्षमता आहे म्हणुन मुले इंजिनीयरींग ला जातात. पुढे एक तर कमी मार्कस मिळवुन इंजिनीयरींग पदवीधर होतात किंवा चार वर्षाचा कोर्स कधी पाच वर्षात तर कधी सहा वर्षात पास होतात. पुढे कॉलेजच्या माध्यामातुन प्लेसमेंट त्यांना आणि त्यांच्या पालकांना हवीतशी डिझाईन किंवा आयटी मध्ये मिळत नाही. अनेकांचे व्यक्तीमत्व किंवा संवाद कौशल्ये सेल्स इंजिनीयर म्हणुन करीयर करण्यायोग्य नसतात. अनेकांचे व्यक्तीमत्व किंवा संवाद कौशल्ये परिणाम कारक असुनही त्यांनी आय टी किंवा डिझाईनमध्येच करीयर करायचे म्हणुन इंजिनीयरींग केलेले असते. काही ज्या पगारावर आय.टी.आय किंवा पदविका धारक नोकरी करतात अश्या मशीन ऑपरेटर्स च्या नोकर्या करतात किंवा आणखी पुढे शिकण्याला प्रवृत होतात.
यासर्वाच्या जोडीला रिसेशन नावाचा घटक असतो जो डिझाईन किंवा आयटी साठी लायक उमेदवारांच्या बाबतीत प्लेसमेंट होण्यास अडथळा बनतो तर इतरांच काय होणार.
या सर्व कारणांमुळे पालकांचा पैसा विनाकारण खर्च होतोच शिवाय हे इंजिनीयरींग शिक्षणात अमुल्य वर्षे खर्च झालेली असातात आणि पदरी निराशा आलेली असते. याच कारण आपल्या पाल्याची साधारण दहावीत केली जाणारी कल चाचणी पालकांनी केलेली नसते किंवा त्यात काही अर्थ नाही अस म्हणुन केवळ दहावीत जास्त मार्क्स आहेत म्हणुन उच्च माध्यमीक करताना ( एच. एस सी ) शास्त्र शाखेला प्रवेश घेतला जातो आणि किमान महाराष्ट्रात इंजिनियरिंगच्या जागा खाली रहातात म्हणुन किंवा डोनेशन भरुन प्रवेश मिळवला जातो. विद्यार्थ्यांच्याच काय तर पालकांच्यातच जर मुलगा किंवा मुलगी इंजिनियरिंगला गेली नाही तर समाजात पत जाईल असा न्युनगंड आजकाल दिसतो.
मग आमच्या मुलांनी इंजिनियरींग करुन आय.टी इंजिनीयर होण्याची स्वप्न पहायचीच नाहीत का असा एक सर्व साधारण प्रश्न पालक विचारतील ज्यात त्यांचे काही चुक आहे असे वाटत नाही. करीयर निवडण्यासाठी कल चाचणी करावी याबाबत पालकांचा कल याविषयीच्या माहिती अभावी पुरेसा प्रभावी नाही हा या लेखाचा उद्देश आहे. असे असताना शिक्षणाची दुकाने उघडण्याबाबत तथाकथीत शिक्षण महर्षींना आणि योग्य ते शैक्षणीक धोरण न राबवल्याबाबत सरकारला आपण दोष का द्यावा ?
प्रो हॉवर्ड गार्डनर या हॉवर्ड युनीव्हर्सीटीतील तज्ञाने मल्टीपल इंटेलिजन्स ही थियरी सिध्द करे पर्यंत जगभरात "आय क्यु" अर्थात ( इंटेलिजन्स कोशंट ) ही एकच बुध्दीमत्ता चाचणी जग प्रसिध्द होती. याचाही प्रसार भारतात आणि महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात यथातथाच होता. ही "आय क्यु" चाचणी म्हणजे ज्याला लॉजीकल मॅथेमॅटीकल टेस्ट म्हणतात. या चाचणीत १३० च्या पुढे गुण हे वैद्यकीय शाखेसाठी योग्य समजण्याची पध्दत आहे. तसेच १२० ते १३० गुण इंजिनीयर होण्याच्या पात्रतेचे समजले जातात. इतके सर्व उपलब्ध असताना एक ट्रेंड असा आला की आय टी क्षेत्रात जेव्हा कुशल लोकांची वानवा होती तेव्हा सरसकट सर्वच शाखेचे इंजिनीयर्स इकडे वळवले गेले आणि परिणामी इंजिनीयर झाले की आय.टी मध्ये नोकरी आणि गलेलठ्ठ पगार असे एक समीकरणच बनुन गेले.
यातुनच इंजिनीयरींग महाविद्यालये वाढली आणि आजची समस्या उदभवली. यात आपल्या पाल्याला कशात रुची आहे हे समजण्याची गरज कुणी लक्षातच घेतली नाही.
साल दोन हजारच्या आधी जर कुणी असा प्रश्न केला असता की माझ्या मुलाचा "आय क्यु" स्कोअर १२० च्या खाली आहे तर त्याने काय करायचे याचे समर्पक उत्तर तेव्हा नव्हते याच बरोबर इतरही क्षेत्रात ज्याला चांगल करीयर म्हणता येईल इतका विकास घडलेला नव्हता.आज ज्याला रोल मॉडेल म्हणता येईल अशी करीयरची अनेक क्षेत्रे खुणावताना दिसत आहेत.
आज प्रो हॉवर्ड गार्डनर यांनी विवीध आठ प्रकारचे इंटेलिजन्सची थेअरी लोकप्रिय होताना दिसते आहे. परदेशात तर याचा वापर अगदी लहानपणात आठ पैकी कोणती बुध्दीमत्ता प्रकर्षाने दिसते याची शोध पध्दती उपलब्ध्द झालेली दिसते.
हे विवीध आठ प्रकारचे इंटेलिजन्स म्हणजे नेमके काय ते आता थोडक्यात पाहु.
१) लॉजीकल मॅथेमॅटीकल इंटेलिजन्स ही बुध्दीमत्ता आठ पैकी एक प्रकारची बुध्दीमत्ता आहे ज्यात ज्याची अशी बुध्दीमत्ता जास्त तो कार्यकारण भाव जास्त वेगाने आणि चांगल्या पध्दतीने आकलन करु शकतो असे म्हणता येईल. या कौशल्याच्या योगे परिक्षण आणि चिकित्सा किंवा आराखडे बनवणे, इ कामे मोठ्या कौशल्याने करताना या व्यक्ती दिसतात.
२) लॅग्वेज इंटेलिजन्स ह्या प्रकारची बुध्दीमत्ता जास्त असलेल्या व्यक्तीत नवीन भाषा शिकणे. भाषेचा उत्तम वापर करणे. लिखाण करणे. व्याख्याने देणे याबाबतची कौशल्ये सहज विकास होताना दिसतात.
३) व्हीज्युअल स्पॅटीयल इंटेलिजन्स ह्या प्रकारची बुध्दीमत्ता जास्त असलेल्या व्यक्तीला नकाशे, चित्रे, रंगसंगती या बाबतचे कौशल्य जास्त असते जे आर्कीटेक्ट्स, पेंट आर्टीस्ट किंवा डिझाईन इंजिनियर्स यांना आवश्यक असते.
४) Bodily-kinesthetic इंटेलिजन्स ह्या प्रकारची बुध्दीमत्ता जास्त असलेल्या व्यक्तीला आपल्या शरीराच्यावर सुयोग्य नियंत्रण साधण्याचे कौशल्य जास्त असते. यामुळे क्रिडा प्रकारात नैपुण्य मिळवणे या व्यक्तींना सहज साध्य होते.
५) सांगीतीक ( Musical ) इंटेलिजन्स ह्या प्रकारची बुध्दीमत्ता जास्त असलेल्या व्यक्तीला संगीतात खास रुची असते. गाणे म्हणणे किंवा वाद्य वाजवणे किंवा संगीत रचना करणे हे लोक सफ़ाईने करु शकतात.
६) Naturalist इंटेलिजन्स ह्या प्रकारची बुध्दीमत्ता जास्त असलेल्या व्यक्तीला झाडे,पाने फ़ुले, पशु पक्षी यांच्या संदर्भात विषेश रुची असते. यामुळे शेती, प्राणी पालन किंवा प्राण्यांचे डॉक्टर बनण्यासाठीची पात्रता या लोकांमध्ये जास्त असते.
७) Interpersonal इंटेलिजन्स ह्या प्रकारची बुध्दीमत्ता जास्त असलेल्या व्यक्तीला अनेकांशी उत्तम संवाद साधता येतो. नेतृत्व करण्यासाठीच्या अनेक गुणांमध्ये हा गुण प्रामुख्याने असणे आवश्यक आहे. आज ज्याची चर्चा आहे असा भावनीक बुध्यांक ( Emotional Intelligence ) याच बुध्दीमत्तेचा एक भाग आहे असे तज्ञ म्हणतात.
८) Intrapersonal इंटेलिजन्स ह्या प्रकारची बुध्दीमत्ता जास्त असलेल्या व्यक्तीला संशोधनात जास्त रुची असु शकते. हे उत्तम सल्लागार बनु शकतात किंवा आर्टीस्ट असु शकतात.
Interpersonal आणि Intrapersonal याला खरे तर व्यक्तीमत्वाचा प्रकार असे पुर्वी म्हणले जायचे परंतु ही एक प्रकारची बुध्दीमत्ता आहे असे प्रो हॉवर्ड गार्डनर यांचे म्हणणे आहे.
ह्या बुध्दीमत्ता आणि त्याला आधारीत बुध्यांक कसा शोधायचा याबाबत बरेच मुलभुत संशोधन झालेले आहे. कोणत्याही सामान्य म्हणजे ज्याला मतिमंद म्हणता येणार नाही अश्या व्यक्तीत वरिल सर्व बुध्दीमत्ता काही प्रमाणात असतात परंतु आठ पैकी एक जास्त प्रमाणात असतो किंवा दोन तीन बुध्यांक सर्व साधारण पणे जास्त असलेल्या व्यक्ती सुध्दा असतात आणि त्याला पुरक असा व्यवसाय त्यांना मिळाला तर ते व्यावसायीक दृष्ट्या आनंदी ( Job Satisfaction ) असताना दिसतात. याही पुढे जाऊन असे म्हणता येईल की हे क्षेत्र माझ्यासाठी योग्य का ते क्षेत्र माझ्यासाठी योग्य याची निवड करण्यात फ़ार काळ न जाता त्यांना व्यावसायीक दिशा सापडु शकते.
या लेखाचा प्रमुख उद्देश्य वरील बुध्यांकांच्या प्रकाराची माहिती देणे आहे याच बरोबर कल चाचणीच्या माध्यमातुन आपल्या पाल्याचा कल शोधणे याची जागरुकता निर्माण करणे हा आहे.
वरील विवीध बुध्दीमत्तेच्या प्रकारांची माहिती खुपच त्रोटक आहे. प्रत्येक प्रकारची बुध्दीमत्ता आणि त्याला अनुरुप व्यवसाय असे आठ लेख विस्ताराने लिहले जाऊ शकतात. त्याच बरोबर प्रत्येक प्रकारची बुध्दीमत्ता व त्यांची परमिटेशन्स आणी कॉंबीनेशन यावर अद्याप मुलभुत संशोधन झाले आहे असे अजुन वाचनात नाही.
उत्तम, माहितीपूर्ण
उत्तम, माहितीपूर्ण लेख!
http://www.bbc.co.uk/science/humanbody/mind/surveys/careers/
छान माहिती. धन्यवाद.
छान माहिती. धन्यवाद.
उत्तम विषय. अजून वाचावयास
उत्तम विषय.
अजून वाचावयास आवडेल
चांगला विषय आणि लेखही छान
चांगला विषय आणि लेखही छान आहे.
आगाऊजी, धन्यवाद ! आपण दिलेली
आगाऊजी,
धन्यवाद ! आपण दिलेली लिंक नक्कीच उपयुक्त आहे.
चान्गला लेख ,उत्तम विशय
चान्गला लेख ,उत्तम विशय
चांगला लेख. उत्तम माहिती.
चांगला लेख. उत्तम माहिती.
छान माहिती. धन्यवाद. अजून
छान माहिती. धन्यवाद. अजून वाचावयास आवडेल
चांगला लेख. वेगळाच विषय.
चांगला लेख.
वेगळाच विषय.
छान लेख. उपयुक्त माहिती. मी
छान लेख. उपयुक्त माहिती.
मी आगाऊ यांनी दिलेली लिंक मधील टेस्ट सुद्धा दिली.
त्याचे रीजल्ट असे आले.
मी कसे काम करायला हवे - INVESTIGATIVE, ARTISTIC, REALISTIC
मी कसे काम करायला नको - ENTERPRISING, CONVENTIONAL
- बारावी पास अंड्या
नितीनचंद्र, हा विषय चर्चेला
नितीनचंद्र,
हा विषय चर्चेला घेतल्याबद्दल आभार.
डॉ. गार्डनर ह्यांनि स्वतः समजावुन दिलेलि थिअरी ऑफ मल्टिपल ईंटेलिजन्स
http://www.youtube.com/watch?v=GincrNxzTwo
आणि इथे त्यांच त्यापुढिल संशोधन.
http://www.youtube.com/watch?v=ZRUN1F4rWAE
धन्यवाद.
धन्यवाद.
छान माहीती , आगावा लिंकसाठी
छान माहीती ,
आगावा लिंकसाठी धन्यवाद !
छान माहिती !
छान माहिती !
छान
छान
उपयुक्त माहिती
उपयुक्त माहिती
Thanks a lot for nice n
Thanks a lot for nice n useful article, Nitin!! Adding it to my favorites!
नितीनचंद्र, माहितीपूर्ण
नितीनचंद्र,
माहितीपूर्ण लेख!
मला वाटतं पालक स्वतःसाठीही ही चाचणी घेऊ शकतात का? काम्काजाचे क्षेत्र बदलायाचे असल्यास आणि समोर बरेच पर्याय उपलब्ध असताना अशा चाचणीचा उपयोग होऊ शकतो का?
उत्तम माहिती ,
उत्तम माहिती , धन्यवाद!
"बोटांच्या ठश्यांद्वारे पर्सनॅलिटी, इंटेलिजन्स आणि करीयर मॅपिंग टेस्ट" याबद्द्ल काही माहिती आहे का ? कोणी करुन घेतली आहे का ही टेस्ट ?
माझ्या लेकीच्या शाळेत "ब्रेन स्केच सोल्युशन्स" ह्याच्यातर्फे ही टेस्ट करुन घेणार आहेत. फीज आहे ५०००रु...... अजूनतरी नाव नोंदवल नाही आहे...... ह्या टेस्टची विश्वासर्हता (बरोबर लिहीले आहे ??ऑथेनटिसिटी) माहित नाही आहे आणि अशाप्रकारच्या टेस्टची फी इतकीच असते का?
खूप आवडली ही माहिती.
खूप आवडली ही माहिती. नितीनचंद्र, अनेक आभार.
>>>वडीलांची डोनेशन देऊन प्रायव्हेट इंजिनीयरींग कॉलेजात मुलाला प्रवेश मिळवुन देण्याची क्षमता आहे म्हणुन मुले इंजिनीयरींग ला जातात. >>>>> माझ्या ओळखीत अशी अनेक उदाहरणे आहेत. आता अलिकडे माहित नाही पण काही वर्षांपूर्वी बर्याच मुली केवळ फॉरिनच्या नवर्यासाठी बीई झालेल्या माहीत आहेत. हा वादाचा मुद्दा होऊ शकतो. पण खरंच अशी माहिती आधी घेऊन शिक्षणाचा विचार झाला तर अनेक मुलींची होरपळ वाचेल. त्या मानाने अमेरिकेत शिक्षणाची परिस्थिती बरी आहे निदान अॅटिट्युड तरी खरी आवड असेल तरच शिक्षण घ्या असा असतो.
डेकेअर मधे काम करणार्या शिक्षिका सुद्धा खूप आवडीने त्या फिल्डमधे आलेल्या दिसतात. असो.
उत्तम लेख.
चांगली माहिती
चांगली माहिती
सर्वांचेच आभार, आपल्या
सर्वांचेच आभार, आपल्या प्रोत्साहनाने पुढिल लेख लिहायला उत्साह आलाय.
खूपच छान माहिती! "वरील विवीध
खूपच छान माहिती!
"वरील विवीध बुध्दीमत्तेच्या प्रकारांची माहिती खुपच त्रोटक आहे. प्रत्येक प्रकारची बुध्दीमत्ता आणि त्याला अनुरुप व्यवसाय असे आठ लेख विस्ताराने लिहले जाऊ शकतात." - नितीनचंद्र मग येउद्या की, वाचायला आवडेल! वाट बघतो आता....
माहितीपूर्ण लेख! त्या आठ
माहितीपूर्ण लेख!
त्या आठ लेखांची वाट पाहतोय..
खुप छान माहिती. अशा
खुप छान माहिती. अशा मार्गदर्शनाची सोय अनेक वर्षांपासून आहे, पण त्याबाबत लोकांना माहिती आणि जाणीवही नव्हती. ( माझेच उदाहरण बघा ! )
छान.. पुढील लेखांची वाट बघत
छान.. पुढील लेखांची वाट बघत आहे
फारच छान नितीनदा अजून लिहा,
फारच छान नितीनदा
अजून लिहा, वाट पहात आहे.
फारच छान लेख पुढील लेखांची
फारच छान लेख
पुढील लेखांची वाट बघतेय
छान लेख
छान लेख
खूपच उपयुक्त माहिती.
खूपच उपयुक्त माहिती. नितीनचंद्रजी, खूप खूप धन्यवाद!
Pages