मायबोली दिवाळी गटग मुंबई २०१२

Submitted by घारुआण्णा on 8 November, 2012 - 22:32
ठिकाण/पत्ता: 
छत्रपती शिवाजी स्मारक, मासुंदा तलाव , ठाणे (पश्चिम)

"आण्णा दिवाळीची काय तयारी?गटगच काही ठरलय का?
"कुठे , कधी केव्हा भेटायचयं,?" मालक गटगच काय करायचय?"
हे असे भ्रमण ध्वनी आणी समस गेले ८ दिवस सगळ्याच उत्साही माबोकरांकडुन आणि हो काही कार्यग्रस्त संयोजकांकडुनही येत होते.....तर
मुंबईकर मायबोलीकरहो प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही आपण दिवाळी गटग साठी भेटतोय , तीचे वेळ तेच
स्थळ
दिनांक: १४ नोव्हेंबर, २०१२(अर्थात बालदिन )
सकाळी १०.०० वाजता मायबोलीप्रमाण वेळेनुसार
छत्रपती शिवाजी स्मारक, मासुंदा तलाव , ठाणे (पश्चिम)

सर्व मुंबईकर,माबोकरांना सहकुटुंब सह परीवार हार्दिक आमंत्रण......
एकत्र भेटुन आमंत्रण्मध्ये (किंवा त्यावेळेस उपस्थित गण्संख्येच्या विचारानुसार कुठेही)अल्पोपहार.
पण घरचा फराळ मात्र आपण सगळे आणाल ही खात्री.
अधिक माहीतीसाठी संपर्क ९८१९९९३६३४

विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
Tuesday, November 13, 2012 - 23:30 to Wednesday, November 14, 2012 - 02:00
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुग्धा, सावली नंतर आम्हाला टेम्प्टेशनमध्ये जॉइन झाली Happy दाने दाने पे लिखा है.....

कविताशी मात्र काहीच बोलायला, भेटायला न मिळाल्याची रुखरुख लागली आहे. विनय आमंत्रणमध्ये बागडत होता आणि तो, मधुरा टेम्प्टेशनमध्येही होते त्यामुळे त्यांच्याशी जरा तरी बोलणं झालं.

तेवढ्यात लली आणि स्वाती आंजर्लेकर ह्या साडी परिधान केलेल्या छान ललना आल्या. <<<
लले, टळटळीत सव्वाष्ण Wink

योडीचा बड्डे सेलिब्रेट केलात की नाही?

नीरजा, ललीला ३दा पाहिलंय साडीत... नेहमीच्या कंडक्टरच्या एकदम उलट लुक! पण मस्त!! कुर्ला गटगला मध्यममार्ग होता तिचा. ती यायच्या आधी घारुने आम्हाला सांगितलं लली वर्तकनगरच्या देवळात जाऊन येतेय. मी आणि योडीने ४-४ वेळा त्याला "खरंच की काय?" विचारुन घेतलं. आमचा विश्वासच बसत नव्हता. नंतर ललीने आमची शंका रास्त असल्याचे स्पष्ट केले Proud

योडी आणि शिल्पाही साडी नेसून आल्या होत्या. शिल्पाची घारुने तिला सरप्राईझ दिलेली पैठणीही तिने दाखवायला आणली होती. तिच्या आधी आम्हालाच माहित होतं तिला पैठणी मिळणार आहे ते Wink

माझा प्लॅन बदलल्यामुळे साडीचा प्लॅन कॅन्सल केला मी. नेक्स्ट टाईम Happy पण धनत्रयोदशीला उत्सवी सिल्क साडी दिवसभर नेसली होती आणि तीही ट्रेनचा प्रवास आणि फिरत रहायची सेवा असतानाही Uhoh
.
योडीने चॉकलेट्स आणली होती ना! मी २ खाल्ली.. एक से मेरा क्या होगा?

लाजो, तुझा ऑस्ट्रेलियाचाही नंबर कोडसकट इमेलने पाठवून ठेव. काल रस्त्यात उभी असल्याने आणि हातात जिलबीचा उघडा खोका असल्याने काही ऐकू किंवा लिहू शकत नव्हते. पण मस्त वाटलं तुझा आवाज ऐकूनही Happy

धमाल गटग ...

केलकरांनी नवीव नाटक चालू करायच ठरवलय ... पारंबीचा घारु ... Proud

काहीही असो ...घारु द ग्रेट .... संयोजन कराव तर घारुने

मी उशीराच पोहोचलो , पण सगळे भेटले , मजा आली..

नीरजा Proud

आशूचा गेल्या आठवड्यात मेसेज आला होता, साडी नेसू या का? असं विचारणारा. म्हणून मी त्रैतायुगातली एक साडी इस्त्री करून ठेवली होती. आदल्या दिवशी रात्री तिचा पुन्हा मेसेज आला की साडी कॅन्सल, पण मग मी इस्त्रीचे कष्ट वाया जायला नकोत म्हणून तीच साडी नेसून गेले.

लली वर्तकनगरच्या देवळात जाऊन येतेय. >>> Rofl आण्णा, आपने हमें अबतक पयचानाहीच नहीं! देवळाचा आणि माझा काही संबंध आहे का आण्णा?

घारूचा फोन आला, तेव्हा मी रिक्षात होते आणि रिक्षा वर्तकनगरच्या सिग्नलला उभी होती. म्हणून मी त्याच्या "कुठे आहेस?" या प्रश्नाला "वर्तकनगरला, पोचते १०-१५ मिनिटांत" असं उत्तर दिलं. आता यात "देऊळ" कुठून आलं कोण जाणे Lol

पारंबीचा घारु .>>> Rofl घारु भेटला की त्याच्या पारंबीकडेच माझं न चुकता लक्ष जातं Proud मस्त वार्‍यावर भुर्भुरत असते.

संयोजन कराव तर घारुने >>> +१ अत्यंत साधेपणा आहे त्याच्यात. संयोजन करताना कुणाकडून काही चुकुन माकून बोललंही जात असेल त्याला, तरी तो कधीच मनात काही ठेवत नाही (कोब्रा असला तरी डूख धरत नाही), टोमणे मारत नाही, भडकत नाही... अत्यंत साधेपणा.

पारंबीचा घारु >>> Rofl

या नाटकाच्या ठरावापूर्वी 'गारंबीचा बापू'मधे अंगद म्हसकर बापूचं काम करतोय का गारंबीचं यावर एक परिसंवाद झडला Lol

आशू, अगदी!

अगं वर्तकनगर म्हटल्यावर त्याच्या डोळ्यासमोर साईबाबाच आले असतील आणि कानात देवळातली घंटा वाजली असेल.

वर्तकनगरला एक देऊळ आहे जिथे दिवाळीच्या दिवसांत आवर्जून दर्शनाला जातात - ही माझ्या सामान्यज्ञानात काल पडलेली भर आहे Proud

शुभ दिपावली लोक्स

मी नाही येवु शकले.... अचानक यायचा प्लान होता. पण बरेच लोकं सकाळ पासुन यायला लागले त्या मुळे वेळ मिळालच नाही. मज्जा केलेली दिसतेय !!! लली साडी नेसुन !!! बघितली आहे मागच्या गुरुपौर्णिमेला.....

दिवाळीच्या दिवसात असं नाही गं. पण साईबाबांचं मोठ्ठं, मस्त आणि ठाण्यात प्रसिद्ध देऊळ आहे. घारुला वाटलं असेल पाडव्याचं देवदर्शनाला गेली असशील Biggrin

या वेळेस संयोजनात पसारा नको म्हणून घार्‍याने आधीच शेंडीला गाठ मारुन ठेवली होती ...

पण आमंत्रण ची मिसळ बंडल असते अस माझ स्पष्ट मत आहे .... तरी दर खेपेस आपण तिथेच जातो ...

बघितली आहे मागच्या गुरुपौर्णिमेला.....>>>>> Uhoh :धाडकन बेशुद्ध पडलेली बाहुली: लले..लले.., काय ऐकतेय हे? वर्तकनगर देऊळ काय, गुरुपौर्णिमा काय??? ऑं? Lol मज्जा गं Happy

मीरा, मी ललीला काल कट्ट्यावर बसलो असताना विचारलं मीरा येणार आहे का? Happy

हो, हो, कालची मिसळ मलाही विशेष आवडली नाही.

विनय, पुढचं दिवाळी-गटग बोरिवलीलाच करू या ... Wink

आशू, गेल्या वर्षी आमच्या शाळेत गुरूपौर्णिमेचा कार्यक्रम होता. आम्ही माजी विद्यार्थी जमलो होतो. मग तिथे 'साधी राहणी, उच्च विचारसरणी' दिसायला नको? Wink म्हणून साडी नेसून गेले होते Proud

आयला माज्या डब्याचा अनुल्लेख Angry खाल्ल्या साखरेला, तुपाला न जागणार्‍यांचा झाईर णिसेद Proud

गप्पा कुणाशीच झाल्या नाहीत. सावली भेटली नाही म्हणून Sad

टेंप्टेशन मिस केलं पण तळलेले पॉफ्रेट, शिंपला मसाला, कोलंबीची खिचडी अस सामिष जेवण पोटभरुन हादडलं तोषाकडे. आमंत्रण मधे काही एक न जेवलेली सानु फिश करी राईस मनसोक्त जेवली Proud

गप्पा मारण्यासाठी एक गटग ठरवा याबायकांनो Wink

वृत्तांत आले का ! Happy
खरच मजा आली पण फारसे कुणाशीच बोलणे झाले नाही.

कविन, हो ना. आपण अगदी खो खो खेळलो. तुझी वाट पहात होते मी पण.
गप्पा मारण्यासाठी एक गटग ठरवा >> +१

कवे, मला मिळाला गं तुझा शिरा टेस्ट करायला. मस्त झाला होता Happy
तू खरंतर नंतरच जास्त एन्जॉय केलेलं दिसतंय Proud

लले, भ्याआअ कशाला? तू पण काल जायचंस की त्याच्याकडे Proud

त्या खादाडी पुढे तिला टेम्प्टेशनचं काय गं? टेम्प्टेशन कुठे पळून जात नाही Happy

पारंबीचा घारु किंवा घारंबीची पारु...

या नाटकाच्या ठरावापूर्वी 'गारंबीचा बापू'मधे अंगद म्हसकर बापूचं काम करतोय का गारंबीचं यावर एक परिसंवाद झडला >>> ह्या ठरावाचे आणि परिसंवादाचे डिटेल्स द्या की ! मी कुठे होते तेव्हा? Uhoh

Pages