थोबाडीत ठेवून द्यावी

Submitted by एक प्रतिसादक on 9 November, 2012 - 11:46

म्हटलात जनाला तेव्हां
थोबाडीत ठेवून द्यावी
आंग्लांची भाषा आपुल्या
महाराष्ट्रामधुनी जावी

तुम्ही बसला होता तेव्हां
उंच मंचकावरती
खुर्ची मोडकी तिथली
तुम्ही जिंकून घेतली होती

त्या धुनकीमध्ये अलगद
तुम्ही केली ठरावबाजी
सीमेच्या प्रश्नावरती
केली हो डराव बाजी

म्हटलात जनाला जेव्हां
थोबाडीत ठेवून द्यावी
कडकडाट हो टाळ्यांचा
गायली मायेची गाणी

मग उठला कोणी पाजी
हळूच पुसता झाला
नातू सांगा वं तुमचा
साळंत कोणत्या गेला

त्या क्षणी उडाले बगळे
वाजले सूप सणाचे
अनुभवी मागचे हसले
म्हणे आधी बघू पोटाचे

- चक्रमचाचा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोण ? Uhoh

यात काव्य काय आहे ? पद्यात लिहीलं कि काव्य का ?
( कविता समजली याबद्दल धन्यवाद. पण प्रतिसाद नव्हताच समजला :हाहा:)

आश्चर्यकारकरित्या / अनपेक्षितरित्या उत्तम काव्य

कवी ग्रेस यान्च्या अवजड काव्यशैलीचे (काव्याचे नव्हे!) हलक्याफुल़क्या शैलीत विडम्बन करायचे झाल्यास असेच होईल
चक्रमचाचा अभिनन्दन !!

त्या क्षणी उडाले बगळे >>>वरून अन्दाज बान्धला आहे फक्त ...हा निष्कर्ष नाहीये..("कावळे उडाले स्वामी " या ओळीच्या लयीत वाचले ;))

मग उठला कोणी पाजी
हळूच पुसता झाला
नातू सांगा वं तुमचा
साळंत कोणत्या गेला

Proud .. मायबोलिवरही असले काव-बगळे असतात.

धन्यवाद सर्वांचे

वैवकु
एक मुलगा १२० फुटी हायवेवर सायकल शिकत असतो. रस्त्याच्या कडेला लांबवर एक दगड असतो. मुलाचे लक्ष त्या दगडाकडे जाते आणि त्याच्या मनात विचार येतो कि आपण त्या दगडाला जाऊन धडकलो तर ? त्या क्षणी त्या मुलाला १२० फुटी हायवेचा विसर पडतो आणि त्याला फक्त तो दगड दिसू लागतो. परिणाम ? तो दगडाला जाऊन धडकतो. आपणही त्या एकाच ओळीवर लक्ष केंद्रीत करू नये Lol

तब्येतीस जपा. काळजी घ्या Wink

एका साहीत्यसंमेलनाच्या अध्यक्षांनी आपल्या अध्यक्षिय भाषणात सांगितले होते कि इंग्रजी बोलला तर कानाखाली वाजवा. त्याच संमेलनात बेळगाव महाराष्ट्रात आले पाहीजे असा ठरावही पास झाला होता.

>> बेळगाव महाराष्ट्रात आले पाहीजे <<

चरायला कुरण पाहिजे दुसरे काय? आहे तो महाराष्ट्र आधी नीट चालवता येत नाही. आमचे कितीतरी मराठी नातेवाईक कर्नाटकात सुखाने राहतात. अगदी बेळगावात सुद्धा....

चरायला कुरण पाहिजे दुसरे काय? आहे तो महाराष्ट्र आधीनीट चालवता येत नाही. आमचे कितीतरी मराठी नातेवाईक कर्नाटकात सुखाने राहतात. अगदी बेळगावात सुद्धा....>>>>>>मग आपणही धारवाड बेळगावात जावे आणि भिशीबेळी अण्णा करुन खावे .कसे? Biggrin

चरायला कुरण पाहिजे दुसरे काय? आहे तो महाराष्ट्र आधीनीट चालवता येत नाही. आमचे कितीतरी मराठी नातेवाईक कर्नाटकात सुखाने राहतात. अगदी बेळगावात सुद्धा....>>>>>>मग आपणही धारवाड बेळगावात जावे आणि भिशीबेळी अण्णा करुन खावे .कसे? Biggrin

....>>>>>>मग आपणही धारवाड बेळगावात जावे आणि भिशीबेळी अण्णा करुन खावे .कसे? <<<<

छे छे ! माझे इथे मस्त चालले आहे. तुम्हाला बरीच माहिती दिसते. तुम्हीच का नाही जात... Biggrin

भिशीबेळी अण्णा>>>>> वा !!
प्रो. ऑ. ड्यु. हा पदार्थ मला खूप खूप आवडतो .नाव वाचूनच भूक लागली..पोटात कावळे ओरडताय्त

धन्यवाद

प्रो. ऑ. ड्यु. हा पदार्थ मला खूप खूप आवडतो .नाव वाचूनच भूक लागली..पोटात कावळे ओरडताय्त <<

"प्रो. ऑ. ड्यु." हा कोणता पदार्थ आहे?

वैभव वसंतराव कु... | 10 November, 2012 - 09:49 नवीन
भिशीबेळी अण्णा>>>>> वा !!
प्रो. ऑ. ड्यु. हा पदार्थ मलाखूप खूप आवडतो .नाव वाचूनच भूक लागली..पोटात कावळे ओरडताय्त
धन्यवाद>>>>
वैवकु घ्या खा इब्लिसलापण द्या. Wink

जेव्हा तुमची काविता वाचली
थोबाडीत आमच्याही बसली .
पोरांना मराठी येत नाही
वा धड हिंदी इंग्लिशही .

आपल्या अध्यक्षिय भाषणात सांगितले होते कि इंग्रजी बोलला तर कानाखाली वाजवा
>>
अहो त्यांनी बोलनार्‍याच्या नव्हे, अध्यक्षाच्या कानाखाली वाजवायला सांगितले होते Proud