अध्यक्षीय निवडणूक जिंकल्यावर ओबामांचे विजयी भाषण.......

Submitted by रमेश भिडे on 7 November, 2012 - 10:31

माझ्या प्रिय बंधू भगिणीणो,

आज म्हंजी माझ्या आयुक्षातला एक लई म्हतवाचा दिवस हाय. जसा आणेक वर्सापूर्वी लांब तिकड भारतात रामान रावणाला बान मारून त्येच्याकडून विजय मिळवला तसाच विजय आज देवी यमाई कृपेन आमालाबी मिळाल्येला हाय. त्या रूमन्यान मायंदाळ परयत्न क्येला आमाला हरविन्याचा पण त्येला ठाव नाय की आमी बी लाल मातीत लंगोट लावून कुस्ती खेळल्याल पैलवान हाये. असा पट काढून दीन व्हय सुखासुखी....

बर त्ये सम्द जाऊद्या. आज मी हित तुमा समद्यानचे आभार मानायला आलेलू हाय. तुमी समद्यानी माज्यासाठी आपलेपनान वोटिंग क्येलत, काहीकाही ठिकाणी दोनदोनदा तीनतीनदा बी क्येलत त्याबद्दल मी तुमचा लई आभारी हाय. मायला, आता बगा मी तुमचा गाव कसा बदलून टाकतो. आज हितच या शुभमुहूर्तावर तुमच्या गावासाठी मी पंधरा संडास मंजूर करतोय. आजपासून या गावातला येक बी मानूस रस्त्यावर बस्नार न्हाई म्हंजे न्हाई. थांबा थांबा, इतक्यात टाळ्या नका वाजवू. अजून बाकी हाय. आज रोजी खास तुमच्यासाठी मी येक धरन बी हितल्याहित शांक्शन करतूय. गावात नदी नसली तर काय झालं? धरन पायजेल म्हंजे पायजेल. फूडल्या येळी निवडून आलो की नाय गावात नदी आणली तर नाव बदलून दीन.

बराय मंडळी आता रजा घ्येतो तुमची. असाच लोभ ठ्येवा गरिबावर. फूडच्या गावात जायचं हाय. तिथ बी लोक खोळंबलीयात......

आधारित*

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आनि, कार्यकर्त्या पोरानो, मटनाच्या बिर्यानीला जागलात म्हंजे मला बी फुडच्या विलेक्शनला तुमच्यासाठी आनखी मोठ्या पाकीटाची सोय करनं आलंच !!!