Submitted by हर्ट on 29 October, 2012 - 11:41
नमस्कार,
मला आमच्या सिंगापूरातील ग्रंथालयासाठी एकूण २५ दर्जेदार दिवाळी अंक घ्यायचे आहेत. काहीतरी नवीन, वेगळी संकल्पना असलेले दिवाळी अंक हवे आहेत.
मौज, साप्ताहिक सकाळ, ललित, अक्षर .. काही नेहमीचे दिवाळी अंक घेणारचं आहोत आम्ही पण आजच्या काळाशी सुसंगत, परदेशातील मराठी लोकांना आवर्जुन आवडतील असे दिवाळी अंक इथे सूचवता का?
वाचनिय दिवाळी अंकाची यादी इथे हेडरमधे समाविष्ट करत आहे:
१) अक्षर २) मौज ३) ललित ४) साप्ताहिक सकाळ ५) शब्द ६) अक्षरगंध ७) मिळूण सार्याजणी ८) शतायुषी ९) अंतर्नाद १०) इत्यादी ११) निवडक अबकडई १२) अनुभव १३) चिन्ह १४) माहेर १५) मुशाफिरी १६) लोकसत्ता १७) महाराष्ट्र टाईम्स १८) तरुण भारत १९) अनुवाद २०) खेळ २१) वनौषधी २२) अभिधानंतर २३) अभिजात २४) पद्मगंधा २५) छंद २६) नीहार २७) किस्त्रिम २८) मेनका २९) कालनिर्णय ३०) अमृत ३१) किशोर
धन्यवाद.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
युनिक फीचर्सतर्फे यंदा पाच
युनिक फीचर्सतर्फे यंदा पाच दिवाळी अंक निघणार आहेत. त्यापैकी 'मुशाफिरी' हा भटकंतीला वाहिलेला आहे.
यंदा 'माहेर'च्या अंकात साजिरा, श्रद्धा, शर्मिला फडके, वरदा, ललिता-प्रीति, योगेश दामले या मायबोलीकरांचं साहित्य आहे.
'जत्रा'मध्ये ऋयामाचा मस्त लेख आहे.
याशिवाय 'माहेर'मध्ये यावर्षी उत्तरा बावकर, चित्रा पालेकर, प्राची दुबळे, सुरेश द्वादशीवार, मनस्विनी लता रवींद्र, मंगला गोडबोले, सुमित्रा भावे, सुनील सुकथनकर, डॉ. अनुराधा सोवनी, डॉ. मालती कारवारकर, अभिजीत ताम्हणे, तुषार जोग, सोनाली नवांगुळ, नागराज मंजुळे, अजेय झणकर, सुधीर गाडगीळ, राहुल सोलापूरकर यांचं लेखन आहे.
हे तिन्ही अंक मायबोलीच्या खरेदीविभागातून विकत घेता येतील.
मायबोलीच्या खरेदीविभागात एखाद्या नव्या दिवाळी अंकाचा समावेश व्हावा, असं वाटत असेल, तर तसं जरूर कळवा.
धन्यवाद चिन्मय. खूपचं छान
धन्यवाद चिन्मय. खूपचं छान माहिती दिलीस. अजून लिहि ना प्लीज. सर्वांचे खूप खूप आभार.
आवाजचे गेल्या काही अंकातल्या
आवाजचे गेल्या काही अंकातल्या चांगल्या लेखांचे, संकलन बाजारात आले होते>> हाच तो निवडक आवाज.
हार्ड बाउन्ड कव्हरसहीत.
माहेरचा अंक जबरी असणार वाट्टय
विज्ञानावर आधारित, निसर्गावर
विज्ञानावर आधारित, निसर्गावर आधारीत, फक्त कवितांवर आधारित अंक आहेत का?
आणि सामाजिक दिवाळी अंक आहेत
आणि सामाजिक दिवाळी अंक आहेत का?
निवडक अबकडई आलाय.
निवडक अबकडई आलाय.
अक्षरगंध बद्दल आजच्या मटा मधे
अक्षरगंध बद्दल आजच्या मटा मधे माहिती आली आहे
भटकंती अंक कसा आहे?>>>>बी
भटकंती अंक कसा आहे?>>>>बी भटकंती मासिक बंद झालंय. गेल्या वर्षीचा दिवाळी अंक शेवटचा होता.
महागुरु, धन्यवाद. अक्षरगंध
महागुरु, धन्यवाद. अक्षरगंध नक्की मागवणार आहे आता.
१) अक्षर २) मौज ३) ललित ४)
१) अक्षर २) मौज ३) ललित ४) साप्ताहिक सकाळ ५) शब्द ६) अक्षरगंध ७) मिळूण सार्याजणी ८) शतायुषी ९) अंतरनाद १०) इत्यादी ११) निवडक अबकडई १२) अनुभव १३) चिन्ह १४) माहेर १५) मुशाफिरी १६) लोकसत्ता १७) महाराष्ट्र टाईम्स १८) तरुण भारत
इतकेच अंक अद्याप मी निवडलेले आहेत. वर हेडरमधे टाकेन.
चांगली यादी आहे बी.
चांगली यादी आहे बी. 'दीपावली'ही टाकायला हरकत नाही यादीत.
शतायुषीचा अंक एखादा विषयला
शतायुषीचा अंक एखादा विषयला वाहिलेला आहे का हे तपासून घ्या. फार वर्षांपूर्वी त्यांचा एक दिवाळी अंक मी डोळे मिटून घेतला, तो बाळांतपण विशेषांक होता!
१) अक्षर २) मौज ३) ललित ४)
१) अक्षर २) मौज ३) ललित ४) साप्ताहिक सकाळ ५) शब्द ६) अक्षरगंध ७) मिळूण सार्याजणी ८) शतायुषी ९) अंतरनाद १०) इत्यादी ११) निवडक अबकडई १२) अनुभव १३) चिन्ह १४) माहेर १५) मुशाफिरी १६) लोकसत्ता १७) महाराष्ट्र टाईम्स १८) तरुण भारत १९) अनुवाद २०) उत्तम कथा २१) वनौषधी
मला अजून ४ हवे आहेत.
हंस, साधना, छोट्यांचा आवाज, दीपावली बोअर आहेत का?
अनुवाद आणि उत्तम अनुवाद असे
अनुवाद आणि उत्तम अनुवाद असे दोन वेगळे अंक आहेत. हे अंक अनुवादीत साहित्यावर आहेत का?
हंस-मोहिनी-नवल हे बरे
हंस-मोहिनी-नवल हे बरे असतात.
चिन्ह मायबोलीवर उपलब्ध आहे का? (यादी आकारविल्ह्यानुसार आहे की नाही ते नक्की कळले नाही). चिन्हच्या संकेतस्थळावर जाऊन आगाऊ मागणी नोंदवली तरच मिळतो ना तो?
ऋतुरंग
ऋतुरंग
पद्मगंधा अंक निर्विवाद चांगला
पद्मगंधा अंक निर्विवाद चांगला असतो. 'साहित्य', 'निसर्गसेवकचा अभिरुची 'हे अंकही मला आवडतात. 'मुक्त शब्द' चांगलाच असतो. 'छंद' चा अंकही चांगला असतो. कंटेम्पररी मराठी वाचायला आवडणार्यांकरता 'खेळ' आणि 'अभिधानंतर' हे अंक उत्तम.
दीर्घ कादंबरी वाचायची आवड असलेल्यांना 'चंद्रकांत' अंकही आवडेल.
'चिन्ह' अंकाची नोंदणी आगाऊ करावी लागते. < ९००४०३४९०३ > वर फोन करुनही तो मागवता येईल. मात्र हा अंक दिवाळी नंतर येतो.
दैनिक ‘सामना’ व व्यंगचित्र
दैनिक ‘सामना’ व व्यंगचित्र साप्ताहिक ‘मार्मिक’ दिवाळी अंक २०१२
स्वर्गीय दीनानाथ दलाल यांच्या कुंचल्यातून साकारलेल्या चित्राने ‘सामना’ दिवाळी अंकाचे मुखपृष्ठ सजले आहे. या अंकात प्रा. अनंत काणेकर, प्रा. मिलिंद जोशी, मधु मंगेश कर्णिक, डॉ. यु. म. पठाण, गिरीजा कीर, द. मा. मिरासदार, अरुण म्हात्रे, संतोष चोरडिया, संतोष पवार, आशिष पाथरे यांनी लिखाण केले आहे. अंकाची किंमत ६० रुपये आहे.
‘मार्मिक’ दिवाळी अंकात डॉ. रवी बापट, चंद्रकुमार नलगे, पांडुरंग संगा, विजय कापडी, डॉ. सतीष नाईक, दिलीप जोशी आदी मान्यवरांनी लेखन केले असून प्रभाकर वाईरकर यांनी मुखपृष्ठ रेखाटले आहे. या अंकाची किंमत ५० रुपये आहे.
दोन्ही अंकात कथा, लेख, कविता, या वाङमयीन फराळाबरोबरच व्यंगचित्रांचे फटाके आणि वात्रटिकांचे फवारे वार्षिक राशीभविष्याच्या सोबतीने आहे.
१) अक्षर २) मौज ३) ललित ४)
१) अक्षर २) मौज ३) ललित ४) साप्ताहिक सकाळ ५) शब्द ६) अक्षरगंध ७) मिळूण सार्याजणी ८) शतायुषी ९) अंतरनाद १०) इत्यादी ११) निवडक अबकडई १२) अनुभव १३) चिन्ह १४) माहेर १५) मुशाफिरी १६) लोकसत्ता १७) महाराष्ट्र टाईम्स १८) तरुण भारत १९) अनुवाद २०) उत्तम कथा २१) वनौषधी २२) एकता २३) संतकृपा २४) सुसंवाद २५) इंद्रधनू
शर्मिला धन्यवाद. फेरविचार करत
शर्मिला धन्यवाद. फेरविचार करत आहे.
नवीन यादी: १) अक्षर २) मौज ३)
नवीन यादी:
१) अक्षर २) मौज ३) ललित ४) साप्ताहिक सकाळ ५) शब्द ६) अक्षरगंध ७) मिळूण सार्याजणी ८) शतायुषी ९) अंतर्नाद १०) इत्यादी ११) निवडक अबकडई १२) अनुभव १३) चिन्ह १४) माहेर १५) मुशाफिरी १६) लोकसत्ता १७) महाराष्ट्र टाईम्स १८) तरुण भारत १९) अनुवाद २०) खेळ २१) वनौषधी २२) अभिधानंतर २३) अभिरुची २४) पद्मगंधा २५) छंद
काल मी चिन्हच्या सतीश
काल मी चिन्हच्या सतीश नाईकांना फोन केला होता. ते म्हणालेत अंक २२ पर्यंत पुर्ण होतील तोवर नाही. शिवाय बुक करुन ठेवला तरचं अंक मिळतो नाहीतर नाही. किंमत ५००च्या घरात आहे एका अंकाची. माझ्यामते इतक्या उशिरा अंक निघू नये. लोकांना दिवाळीत चार पाच अंकांवर पैसे खर्च केलेत की परत नवीन दिवाळी अंक घ्यायला फुरसत, उत्साह, पैसे सगळेच कमी कमी पडत जात.
शर्मिला तू चिन्ह मधे काम करतेस ना? आय मीन तू ह्या अंकाशी निगडीत आहेस ना?
'चिन्ह' हा दिवाळीत कधीही
'चिन्ह' हा दिवाळीत कधीही प्रसिद्ध होत नाही. कारण तो रुढार्थाने दिवाळी अंक नाही. ते कलावार्षिक आहे. अंकाची किंमत साडेसातशेच्या घरात असते (पाचशेच्या घरात ही सवलतीची, आगाऊ नोंदणीची किंमत आहे).
होय मी 'चिन्ह'शी निगडीत आहे.
चिन्हचे स्वरूप बघता (त्याची
चिन्हचे स्वरूप बघता (त्याची छपाई, दृश्यकलांबाबत असलेल्या चर्चेमधे हात राखून न ठेवता छापलेली आणि मूळ कलाकृतीशी अगदी अॅक्युरेट रंग असलेली अशी चित्रे) ५०० हे काहीच नाहीयेत.
चिन्हचे निवडक अंक पण निघाणार
चिन्हचे निवडक अंक पण निघाणार आहेत.
www.chinha.in हे चिन्हचे संकेतस्थळ आहे.
शर्मिला अभिनंदन पण तू नक्की चिन्हमधे काय काम करतेस हे ऐकालया आवडेल.
शर्मिला, चिन्ह हा एखाद्या
शर्मिला, चिन्ह हा एखाद्या विषयाला अनुसरून काढलेला अंक असतो ना? या वेळेस कोणता विषय आहे हे कळू शकेल काय?
बी, अंकाच्या नियोजन-संपादनात
बी, अंकाच्या नियोजन-संपादनात मदत आणि लेखन असं काम करते.
माधव, यावर्षीच्या अंकाकरता विशिष्ट संकल्पना नाहीये. अंकामधे काय असेल याची झलक या दुव्यावरुन मिळेल-
http://www.chinha.in/images/pdfs/Webdesign.pdf
निवडक चिन्ह चिन्हच्या
निवडक चिन्ह चिन्हच्या सुरूवातीपासूनच्या अंकांपैकी महत्वाचे लेख, चर्चा इत्यादींचे संकलन आहे.
ते प्रसिद्ध झालेय. आहे माझ्याकडे.
धन्स शर्मिला.
धन्स शर्मिला.
http://www.chinha.in/images/p
http://www.chinha.in/images/pdfs/Webdesign.pdf
शर्मिला सुरेख आहे ही फाईल. अशी माहिती मिळत गेली की थोड तरी ज्ञान मिळत की चिन्हमधे नक्की काय आहे. छान आहे तुमचा प्रयास. मी हे अंक मागवण्याचा प्रयास करत आहे.
प्रशासक तुम्ही चिन्ह पण ठेवा ना खरेदी विभागात.
Pages