पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२

Submitted by रूनी पॉटर on 10 March, 2011 - 17:20

या अगोदरचा पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१ धागा.
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्‍याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला कणकेच्या शंकरपाळ्यांची रेसिपी पाहिजे आहे. एक सापड्ली आहे. चारुलता यांनी लिहीलेली, बेक्ड शंपाची. मात्र त्यात कणिक व मैदा अर्धे अर्धे आहेत. संपूर्ण कणकेचे शंपा होतात का? इथे अशी रेसिपी आहे का? प्लीज!

मी थोबाडबाड (फेसबुक) वर पाककला नावाच्या एका ग्रुप ची सभासद आहे. त्यावर मायबोली वरील रेसिपी जश्या च्या तश्या कॉपी करून टाकलेल्या आढळल्या, अगदी फोटो सकट. हे सर्व मायबोली वरून घेतले आहे असा कोठेही उल्लेख नाही. मला हे खटकले. कोणाकडे तक्रार करावी ? मायबोली वरील माहितीचा कॉपीराईट कोणाकडे असतो ?
उदाहरणादाखल हे पहा http://www.facebook.com/photo.php?fbid=4022614960520&set=o.1573849810367...

तो ग्रूप क्लोज्ड म्हणून येतेय. ... बहुतेक इथले पोस्ट वाचून कोणीतरी घाबरून बंद केला लगेच.

तो क्लोज्ड युजर ग्रूप आहे म्हणजेच फक्त निमंत्रितांसाठी Happy
त्या ग्रूपात सहभागी होण्यासाठी विनंती करावी लागते.

माधवी,
वर्ख हवाच आहे का ? सध्या तो क्वचितच चांदीचा असतो. आणि ज्या धातूचा असतो, तो नक्कीच अपायकारक असतो. अगदी चांदीचा वर्ख देखील तयार करताना, वासराच्या कातड्यामधे तो ठेवून, ठोकून ठोकून करतात.
मी तरी तो वापरण्याचा सल्ला देणार नाही. सुशोभनासाठी, बदाम पिस्त्याचे काप, गुलाबकळी वापरता येईल.

हो का दिनेशदा!
बापरे तुम्ही सांगितलेले भयानकच आहे! मी एकदा हैद्राबादला मिठाईसाठी वर्ख बनवताना पाहिले होते. खुप ठोकुन ठोकुन करताना. तरिच मला वाटायचे एवढा चांदीचा वर्ख कसा परवडतो.
बरोबरच आहे, नकोच वापरायला. जरा सुशोभनासाठी कल्पना शोधायला हवी.

दिनेशदा,
माझ्याकडे गुलकंद आहे बराच तो मी मिठाईत वापरेन म्हणते, पण प्रमाण कळत नाहीये किती वापरु ते.
कसं ठरवु?

मी ग्रुप ची सभासद आहे. मी त्या व्यक्ती ला सरळ सरळच विचारले व कॉपीराईट च योग्य आदर करण्याबाबत ठणकावले. त्याने आता त्या सगळ्या पोस्ट (बहुदा चिडून) डिलीटल्या Happy

दिनेशजी तो वर्ख वासराच्या नव्हे बकर्‍याच्या आतड्यात ठेऊन वर ठोकतात. त्या आतड्याला वज्री असे म्हणतात. मी हे लोकप्रभा / दुसरे मराठी साप्ताहीक मध्ये वाचले होते. त्यामुळे शाकाहारी तर त्याच्या वाटेस पण जाणार नाहीत. आणी त्या आतड्यात ( उघड्यावर ) जंतु तर असणारच की.

माधवी गुलकंद ओल्या नारळ्याच्या करंजीत किंवा बर्फीत पण वापरता येईल, मात्र तो फार गोड असल्याने साखरेचे प्रमाण बघुनच घालावा लागतो.

शुगोल इथे बघा.

http://www.maayboli.com/node/2597 तुम्ही पाककृती गृपच्या सद्स्य असाल तरच नक्कीच मिळेल इथे ती रेसेपी, नाहीतर सदस्य व्हाच.

टुनटुन,
आणी त्या आतड्यात ( उघड्यावर ) जंतु तर असणारच की >>>
ईईईईईईईईईईईई! Sad
मी अजिबात विचार सोडुन दिलाय वर्ख वापर्ण्याचा! आणि मी आता मिठाईच्या दुकानात जाईल तर मला हे आठवेल Sad

हो मी पण बाहेरची मिठाई खाणे बंद केले त्यामुळे. मला वाटत हा वर्ख बनवण्याचा धंदा उत्तर प्रदेशात आहे. लखनौ किंवा कानपूर येथे.

गुलकंद, साखरेच्या प्रमाणातच घालायचा. त्यात जवळजवळ साखरच असते, गुलाबाच्या पाकळ्यांचे वजन नगण्य असते.

टुनटुन .. खाणारे तर वज्री सुद्धा खातात. कोल्हापूर भागात असते विकायला. पण आता वर्ख अल्यूमिनियमसारख्या हलक्या धातूचा केलेला असतो. नकोच तो खायला..

आता वर्खावरच आहोत तर थायलंडमधली एक आठवण..

गौतम बुद्धाचे आपण पुतळे बघतो ते नेहमीच सुडौल शरीराचे असतात. पण बुद्धाला आयुष्यात एकदा ऊपाशी राहून, ज्ञानप्राप्ती होते का, ते बघायचे होते. त्या मार्गाने शरीर तर खंगले , पण बहुदा ज्ञानप्राप्ती झाली नाही.
पुढे त्याने तो मार्ग सोडला.

थायलंड मधे तसा खंगलेल्या शरीराच्या बुद्धाचा पुतळा आहे. आणि तिथले भाविक त्यावर, नवस बोलून सोन्याचा वर्ख चढवतात. असे वर्ख चढवून चढवून, त्यांना त्या मूर्तीला सुडौल बनवायचे आहे.

( तिथे सोन्याच्या देखील खुप मोठ्या मोठ्या मूर्ती आहेत. )

चकली यांच्या ब्लॉगवर एक बेक्ड शंकरपाळ्यांची कृती आहे - मी पूर्ण कणीक अन त्यांनी दिलेल्या मापापेक्षा थोडं कमी तूप वापरून करते. बेकिंगला लागणारा वेळ सुद्धा त्यांनी लिहिल्यापेक्षा ५-७ मिनिटे कमी लागतो माझ्या ओव्हनमधे .
चकलि.ब्लॉगस्पॉट

डोशासाठी करतो ती नारळाची चटणी उरली आहे.काय करता येइल?<<<
पनीरच्या तुकड्यांना लावून ठेव आणि अर्ध्या तासाने थोड्याश्या तेलावर साँटे कर.

हो दिनेशजी काही लोक वज्री खातात हे पण माहीत आहे. पण तो पत्रा ( वर्ख) अल्युमिनीअम आणी चांदी असा मिळुन बनवतात असे वाचले होते. कदाचीत चांदीचा आहे असे समजून लोक पण दुर्लक्ष करीत असतील. पण जेव्हा संबंधीत मासिकांमध्ये माहीती आली तेव्हा मात्र बर्‍याच लोकांनी नाराजी दर्शवली होती.

थायलंड विषयी पण वाचले होते. पर्यटनाला जाणे झाले नाहीतरी वाचणे होतेच्.:फिदी:

बेसनाच्या वड्या कशा करतात?
मी नेहमी बेसन खमंग भाजुन लाडु करते. पण यंदा गणेशोत्सवात आणि त्यानंतर मुलांच्या एका कँपसाठी खाऊ म्हणुन जवळ-जवळ २०० लाडु एकटीनेच केले त्यामुळे आता दिवाळीत पुन्हा लाडु वळायचा कंटाळा आला आहे.

Pages