Submitted by राज on 17 October, 2012 - 10:09
२०१२ अध्यक्षीय निवडणुकीचे पडघम वाजायला लागेले आहेत. दोन अध्यक्षीय अणि एक उपाध्यक्षीय डिबेट्स हि पार पडले आहेत. डिबेट्स मध्ये कोण जिंकला वा हरला यापेक्षा रामनी/ओबामा या दोघांपैकी कोण जास्त लायक (केपेबल) आहे; अमेरिकन अर्थव्यवस्था, आंतरराष्ट्रिय पत पुर्नस्थापित करण्यासाठी या चर्चेसाठी हा धागा.
विषय:
प्रांत/गाव:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
हो बाईण्डर्स विसरलोच ते
हो बाईण्डर्स विसरलोच
ते जास्त पॉप्युलर होते नक्कीच.
ओबामाच परत ... असंच वाटतय
ओबामाच परत ... असंच वाटतय
निवडणुकीसंदर्भात एका छोट्या
निवडणुकीसंदर्भात एका छोट्या मुलीची प्रतिक्रिया
http://abcnews.go.com/Politics/video/colorado-girl-cries-over-presidenti...
बायन्डर्समधून बाहेर या.
बायन्डर्समधून बाहेर या.
आले की परत ओबामा...
आले की परत ओबामा...
शेवटी आला ब्रोंको बामा परत!
शेवटी आला ब्रोंको बामा परत!
हि क्लिप पाहिली असेलच... अॅबी खुष आता .. http://www.youtube.com/watch?v=OjrthOPLAKM
अपेक्षितच निकाल ! ओबामांचे
अपेक्षितच निकाल ! ओबामांचे अभिनंदन.
उषःकाल होता होता, काळरात्र
उषःकाल होता होता, काळरात्र झाली...
अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली....
असं म्हणायची वेळ लवकरच येणार नाहि अशी आशा करुया...
राज, काल पेडगावात क्लिंटन
राज,
काल पेडगावात क्लिंटन सत्तेवर आले तेव्हाची परिस्थिती आणि ओबामा सत्तेवर आले तेव्हाची परिस्थिती याची तुलना केली होती. तेव्हा विचारलं नव्हतं, पण आता विचारते are you serious?
क्लिंटन आले तेव्हा एक इराक युद्ध झालं होतं, रीसेशन होतं (unemployment around 7.5%), कर्जही होतं ( $4188 Billion). पण टक्केवारी काय होती?
ओबामा आले तेव्हा दोन युद्ध, ज्यांची तुलना व्हिएटनाम युद्धशी होत होती, रिशेशन (unemployment around 11.5%), बँका डबघाईला आलेल्या, ऑटो ईंडस्ट्री डुबत होती, हाउसिंग मार्केट कोसळलं होतं, कर्ज ($10. 627 Billion) अशा परिस्थितीतून वर यायला चार वर्ष कुणासाठी पुरेशी होती किंवा आहेत?
तरीही या चार वर्षात हाउसिंग मार्केट सुधारलं आहे. बेरोजगारी कमी होत आहे, ऑटो ईंडस्ट्री पुन्हा उभी रहात आहे. बँकाजवळ परत पैसा येतोय. ... सगळ्याच पॉलिसीज पटत नाहीत, पण they are working and we need few more days.
शिवाय ओसामाला ठोकलं हा बोनस
वेल सेड अंजली. ओबामा मनापसुन
वेल सेड अंजली.
ओबामा मनापसुन सर्व सामांन्यासाठी झटतोय. त्याच्या प्रयत्नांना नक्की यश मिळेल.
बाय द वे लायब्ररी कुठली शोधली.
माझा पहिला नारा खरा ठरला .
उषःकाल होता होता, काळरात्र
उषःकाल होता होता, काळरात्र झाली...
अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली.... >> ह्यात GOP समाविष्ट असल्यामुळे पेटवलेल्या मशाली इतरांच्या आयुष्याच्या असणार हे उघड आहे
अंजली, बरोबर आहे माझंच चुकलं,
अंजली, बरोबर आहे माझंच चुकलं, बिल क्लींटनशी ओबामांची बरोबरी करणं अन्यायकारक आहे.... ओबामांवर
असो, ओबामांची उणीदुणी काढुन आता कंटाळा आलाय, साला पब्लीकके पल्लेमे पडतायीच नै!
काल CNN वरच्या चर्चेत कानावर
काल CNN वरच्या चर्चेत कानावर पडले की "मतांचे पोलरायझेशन झाले आहे. आफ्रिकन अमेरिकन्सची, लॅटिनोजची मते बहुसंख्येने ओबामांना पडली. तर व्हाइट मतांचे पारडे थोडेसे रोम्नींकडे झुकले होते. आणि यापुढच्या काळात यातल्या कोणत्या गटातल्या मतदारांची संख्या वाढत जाणार आहे हे उघड आहे."
ही सगळी चर्चा/परिस्थिती किंवा तिचे आकलन काहीसे भारतातल्यासारखेच वाटले. अल्पसंख्य, दुर्बल, उपेक्षित मतदार ओबामांकडे झुकलेला. व्हाइट पुरुषांपेक्षा व्हाइट स्त्रियांची पसंती ओबामांना काकणभर अधिक होती.
मला पडलेला प्रश्न असा आहे की ओबामांच्या बाजूने आणि त्यांच्या विरुद्ध झालेले पोलरायझेशन ओबामांमुळे आहे? की डेमोक्रॅट्स वि. रिपब्लिक असे आहे? पुढच्या निवडणुकीत ओबामा नसतील तेव्हा हे पोलरायझेशन कायम राहील का?
अंजली, मस्त पोस्टं. मी
अंजली, मस्त पोस्टं. मी पाहिलीच नाही आधी. मी जाऊन वाचणार होतो नेमके स्टॅट्स काय होते त्यावेळी पण वेळ झाला नाही.
ओबामा म्हणजे "तुका म्हणे
ओबामा म्हणजे "तुका म्हणे त्यातल्या ..."
सगळीकडून सगले राजकारणी सारखेच.
आजचा दिवस ऐतिहासीक आहे असं
आजचा दिवस ऐतिहासीक आहे असं मानायला हरकत नाहि. आज उत्तर आणि दक्षिण कोरिया या दोन दुष्मन राष्ट्रांमध्ये शांततेचा करार झाला. नाहि म्हटलं तरी ट्रंप अॅडमिनिस्ट्रेशनने चीनच्या सहाय्याने केलेलं आर्म ट्विस्टिंग कामाला आलं असं मानायला हरकत नाहि...
कोरियन द्वीपकल्पात खरोखर
कोरियन द्वीपकल्पात खरोखर शान्तता आली, अण्वस्त्र मुक्त भाग झाला तर शान्ततेचे नोबेल ठेवलेले आहे.... केव्हाही या आणि घरी घेऊन जा... गॅरेन्टेड.
पण असे होणार का ? थोडा काळ थाम्बा.... उ. कोरियाला जे हवे आहे ते नाही मिळाले तर सम्पुर्ण डाव केराच्या टोपलीत जाणार.
थोडा काळ थाम्बा>> अगदी!!
थोडा काळ थाम्बा>> अगदी!!
किम जांग-युं चं टाळक परत
किम जांग-युं चं टाळक परत फिरलं तर प्लॅन बी, सी, डी... तयार असतीलंच.
मुद्दा हा आहे कि - सहा महिन्यांपुर्वि युद्धाची धमकि देंणारा, अणुचाचण्या, बलिस्टिक मिसल टेस्टिंग करणार्या हुकुमशहाला हि "नाक दाबलं कि तोंड उघडतं" हि मात्रा लागु पडते याचं हे एक चांगलं उदाहरण आहे. शांततेचं नोबेल मिळालेल्या ओबामाच्या टिमिड धोरणांपेक्षा ट्रंपचं सोकॉल्ड नुक्लियर बटनावर बोट ठेवुन राबवलेलं धोरण जास्त इफेक्टिव आहे असंच चित्र आतातरी दिसतंय...
नेक्स्ट स्टॉप इराण?..