पुणे बस डे - पुरेश्या बस एक दिवस

Submitted by गिरीकंद on 1 November, 2012 - 00:33

आज १ नोव्हेंबर, पुणे बस डे, अर्थात पुरेश्या बस एक दिवस. यावर वृत्तपत्रांमधुन बरीच सांगोपांग चर्चा झाल्यामुळे तेच पुराण परत उगाळत न बसता, आपापला अनुभव, अपेक्षा, यासाठी हा धागा आहे.
आपली मते कळु शकतील का?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गिरीश, पॉझिटीव थिंकिंग ! Happy तुझ्याशी अगदी अगदी सहमत आहे. आज पहिलाच दिवस आहे, तर त्यांना थोडं कन्सिडर करायलाच हवं. थोड्या फार मेसने फार काही फरक पडणार नाही. आपल्याला सवय आहेच. यामधुन काही सुधारणा होतील असं समजुन कन्सेशन द्यायलाच हवं.

गणपती विसर्जना दिवशी एका PMT ने माझ्या कार ला मागून ठोकले (ब्रेक फेल झाला होता PMT चा). प्रचंड ट्रॅफीक होते आणि हा PMT वाला अचानक येऊन धडकला. त्याच्दिवशी पोलिस स्टेशन मधे जबाब दिला. १५,५००/- खर्च आला. ईंशुरंस कंपनी ने ११,५००/- दिले वरचे ४,००० मला घालावे लागले. हे ४,००० मिळवण्यासाठी ईतके हेलपाटे मारलेत आणि फोन केलेत (अगदी त्या CMD जोशीला पण), तक्रारी केल्यात (online आणि लेखी). उपेग ०.

PMT कडे स्वतःच्या फार थोड्या गाड्या आहेत. बर्याच भाडेतत्वावर घेतल्या आहेत. अपघात झाला तेव्हा ह्या लोकांनी सांगितले धड्क दिलेली PMT भाडेतत्वावरची आहे तेव्हा contractor ला फोन करा. नंबर मागितला तर आजतागायत मेन मालक contractor चा नंबर मिळाला नाही. आगार प्रमुख ते जोशी ह्यातील सर्वांनी मालक contractor चा नंबर मिळू नये ह्याची पूर्ण खबरदारी घेतली.

तर आज एवढ्या PMT रस्त्यावर आहेत, अपघात झाले असणारच त्याची जबाबदारी तिथले अधिकारी घेणार आहेत का??

१० वर्षांपूर्वी BMCC ला असताना चिंचवडगाव ते वार्जे अशी २७६ नं. ची बस दर १ तासाने असायची, जी कधीच वेळेत यायची नाही. आज त्याच बसची वारंवारता १/२ ते पाऊण तासावर आली आहे (तब्बल १० वर्षांनंतर) ह्यातच काय ते आले..

visarjanachya gardeet Car vaaparaNe mhanaje too much... retrospect..

visarjanachya gardeet Car vaaparaNe mhanaje too much... retrospect.. >> ईलाज नव्हता म्हणून वापरावीच लागली. तुम्हाला बहुदा तात्पर्य लक्षात घ्यायचे नाहीये.

उपक्रम चांगला आहे. पण रस्त्यावर वाहनं कमी झाली नाही. संध्याकाळी अचानक गर्दी उसळते तेव्हा बसेस भरून वाहतील. इतर वेळी ब-याच बसेस मोकळ्या धावत होत्या. पुण्यात रहदारीच्या वेळा ठरलेल्या आहेत. सोलापूर रस्ता, कर्वे रस्ता आणि सिंहगड रस्ता या ठिकाणी गर्दी खूप असते. कर्वे रस्त्याला बसेसचे मार्ग सोयीचे आहेत. अंदाजे ७० % लोकांना कुठूनही कुठेही जाता येईल असे. फारतर एक बस बदलावी लागेल. सोलापूर रस्त्याला पण बसेसचं नियोजन चांगलं आहे. नगर रस्त्याच्या सर्व बसेस मनपाला यायला लागल्यापासून तिथल्या नागरिकांनाही एक बस बदलऊन कुठल्याही स्थळी जाता येतं. सातारा रस्ता तर बसमार्गाच्या बाबतीत सुदैवी आहे. त्यातच स्वारगेट स्थानक या रस्त्याच्या सुरुवातीलाच आहे. सिंहगड रस्त्याच्या लोकांना मात्र स्वारगेटला आल्याशिवाय गत्यंतर नाही. स्वारगेटवरून जाणा-या बसेस ब-याच लोकांना पुरेशा आहेत. पण ज्यांना मरकळ, विश्रांतवाडी, आळंदी अशा ठिकाणी जायचंय त्यांना मनपाला यावं लागेल. नगर रस्त्यावरूनही विश्रांतवाडीला थेट येता येत नाही. राजाराम पुलावरून अजून बसेस चे मार्ग सुरू झाल्याचं माहीत नाही. पुण्यातून पाषाणकर गॅरेज किंवा डीसके टोयोटाची बाणेरची शोरूम इथं कसं जायचं हे समजत नाही. या ठिकाणाहून कात्रजकडे जायला मार्ग नाहीत. ही काही उदाहरणं. अशा लोकांना बसडे सोयीचा नव्हता.

काहिहि फरक दिसला नाहि. वेळ लागायचा ठेवढा लागलाच.गर्दिहि तेवढीच.
फक्त ते पैशाचा हिशोब कधी देणार ते सकाळने सांगावे! Proud आणी मटाने जे नुकसान केले आहे ते किती भरुन निघाले तेहि सांगावे Proud

मटाने नुकसान? समजले नाही. हे काय नक्की?

***

असल्या विचित्र ठिकाणी राहून मग तितक्याच चित्रविचित्र ठिकाणी नोकरी कशाला करावी? @ चाचा

खूप वर्षांपूर्वी म्हणजे १९८२ चे एशियाड झाल्यानन्तर तेव्हा दिल्ली एशियाडकरता वापरलेल्या बसेस परत आल्यावर एस्टी महामंडळाने पुणेमुंबई रस्त्यावर वापरायला सुरुवात केली, अन बघता बघता "एशियाड बस" हेच एक ब्रॅण्ड नेम बनले. पुणेमुम्बई रस्त्यावरील टॅक्सीचालकान्ची मुजोरी व हायवेवरील दादागिरी दोन ते तिन वर्षात पार थन्डावली, किंबहुना पुढील काही वर्षात ही "टॅक्सी सेवा(?)' जवळपास बासनात गुण्डाळली गेली. त्याचबरोबर रेल्वेच्या अत्याधिक आगाऊपणाला व महाराष्ट्रात सेवा देताना करीत असलेल्या माजालाही चांगलाच आवर बसला इतका की त्याकाळी नन्तर नन्तर शताब्दी/डेक्कनक्विन वगैरे गाड्यान्ची प्रवासी संख्यादेखिल जाणवण्याइतपत कमी झाली, शताब्दी तर ६०% भरली तरी खूप झाले अशी अवस्था झाली. बाकी दरम्यान नतद्रष्ट अन भ्रष्ट सरकारने एस्टीमहामंडळच खा खा खाऊन गुन्डाळायचे ठरविल्यावर मग जे होत गेले तो नजिकचा इतिहास आहे.

हे सांगण्याचे कारण असे की, वरील बस डे वगैरे करून भविष्यात पुण्यातील तद्दन उद्धट व पिम्परीचिंचवडमधील "विनामीटर" आडमुठ्या रीक्षा सेवेला(?) ग्राहकांना रामराम ठोकता यावा, जसा तो पुणे-मुंबई टॅक्सीसेवेबाबत झाला.

मग पुन्हा पीएमपीएमएल नीट चालू नये म्हणून कुणी वाहननिर्माता पैसे वाटतो अशी आवई उठेल, मग पुन्हा संध्याकाळी ताटकळलेले बसस्टोप्स आणि चहाच्या टपरीवर लपलेले डाईवर कंडक्टर दिसतील, मग पुन्हा त्यांचेच सिक्स सीटर्स, अ‍ॅपे रिक्षा पळू लागतील... मग पुन्हा ये रे माझ्या मागल्या.. आणि मग पुन्हा कुठल्या तरी नेत्यावर आरोप होतील, मग पुन्हा बस डे साजरा होईल.

मी ऑफिसला सुट्टी केली असल्याने बस डे ला काही बस ने प्रवास करता आला नाही Sad पण आज मात्र मी मुददाम बस ने आले... तर परिस्थिती जैसे थे..अशीच होती... कंडक्टर काकानी.. बस सुरु झाल्यानंतर १० मिनिटांनी... आनि मी २ वेळा आवाज दिल्यानंतर तिकिट काढण्यासाठी जागेवरुन उठण्याचे कष्ट घेतले... Sad तीच गर्दी,तेच ट्रफिक, सगळ काही तेच...
बस डे १ दिवस साजरा करुन काही फरक पडणार नाही... किमान एक आठ्वडा तरी ठेवावा...
बाकी सकाळ ने लोकांना आलेले अनुभव , आनि त्याचे सल्ले सुदधा कुठल्यातरी अधल्या मधल्या पानात छापावे...चुकीच्या गोष्टीसहित...
मागचा महिनाभर आनि आजचा अमक्या तमकया ने बस ने प्रवास केला हे वाचुन वाचुन कंटाळ्ले मी.... Sad

मागचा महिनाभर आनि आजचा अमक्या तमकया ने बस ने प्रवास केला हे वाचुन वाचुन कंटाळ्ले मी. >>>>> +१

काल सामवर बरिच 'मोठी' माणसे - सुप्रिया सुळे, अभिजित पवार, बालाजी तांबे बसने प्रवास करताना किती छान वाटते हे सांगत होते., दाजीकाका गाडगिळांना कंडक्टरने हत देउन वर चढवले. हे सर्व पाहुन उर भरुन आला आणी खात्री पटली की सकाळने वहातुक प्रश्न एका दिवसात सोडवला आहे Proud

मी पण ६८ प, कोथरूड डेपो ते स्वारगेट, या दोन बस एकामागोमाग जाताना पाहिल्या. पहिलीत थोडी तरी माणसं होती. मागची मात्र पूर्ण रिकामी होती. दुसरी बस ताबडतोब न पाठवता १०-१५ मिनिटानी पाठवली असती तर, काही प्रवाशी तरी, त्या बसमध्ये बसले असते. आणि हे , एकाच मार्गावरच्या बस एका पाठोपाठ पाठवणे नेहमीचेच आहे,. आल्या की ३-४ बस एकदम येतात. आणि नंतर तास-दिड तास एकही बस नसत. नियोजनाचा अभाव. Sad

Pages