Submitted by गिरीकंद on 1 November, 2012 - 00:33
आज १ नोव्हेंबर, पुणे बस डे, अर्थात पुरेश्या बस एक दिवस. यावर वृत्तपत्रांमधुन बरीच सांगोपांग चर्चा झाल्यामुळे तेच पुराण परत उगाळत न बसता, आपापला अनुभव, अपेक्षा, यासाठी हा धागा आहे.
आपली मते कळु शकतील का?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आज सकाळी सकाळीच मी माणिकबाग
आज सकाळी सकाळीच मी माणिकबाग ते स्वारगेट मित्रमंडळ बसने प्रवास केला. गर्दी फारशी नव्हतीच शाळकरी मुलेच आणि त्यांना सोडायला येणारी पालक मंडळीच जास्त. बसस्थानकावर, बसमधे चढल्यावर आम्हाला वाहकाने नमस्कार करुन एक चांगले स्मित दिले. चला दिवसाची सुरवात तरी खुप चांगली झाली. असेच सौजन्य कायम राहो आणि जे नियमित प्रवास करतात त्यांना प्रवास सुखकर होवो हीच अपेक्षा. कंपनीत पण बसनेच यायचा विचार होता पण या मार्गावर बस नसल्याने कंपनीच्या गाडीने यावे लागले. पण मला आवडले असते.
अर्थात मी ज्या मार्गावरुन प्रवास केला तिथे कायमच बसची फ्रीक्वेंसी जास्त असते आणि आजतर जादा गाड्या होत्या त्यामुळे मला एकंदरीत सगळे सुखकर वाटले. पण जिथे बसची फ्रीक्वेंसी कमी आहे तिथल्या लोकांचे अनुभव वाचायला आवडतील.
सकाळ आणि पुणे बसडे ला मनःपुर्वक शुभेच्छा.
उपक्रम चांगला आहे, पण
उपक्रम चांगला आहे, पण रस्त्यांवर या बस मावत नाहीयेत, वाहतूक कोंडीला आमंत्रण
श्यामली, मला पण सकाळी सकाळी
श्यामली, मला पण सकाळी सकाळी हाच अनुभव आला.
अर्थात हे पहिले पाऊल आहे, पिएमटीचे.
पण मला प्रश्न पडलाय, उद्यापासुन काय? परत तेच, अपुर्या बसेस, थांब्यांवर गर्दी, दरवाजाला लटकलेले प्रवासी, नीट न दिसणार्या पाट्या, रस्त्यावरच थांबणार्या बसेस, प्रवासी बसमधे चढायच्या आधीच वाहकाने मारलेली बेल
बस डे म्हणजे रोज जाणार्या
बस डे म्हणजे रोज जाणार्या येणार्यांना सोयीचे व्हावे असे काहीतरी! आज रस्ते मोकळे असतील असे वाटले होते, पण तसे काही नाहीये. माझे ऑफिस आणी घर या ५ किमी मधे तीन बस बदलाव्या लागल्या असत्या, त्यामुळे माझी सखी, प्लेझरच बरी वाटली
बसमधे चढल्यावर आम्हाला वाहकाने नमस्कार करुन एक चांगले स्मित दिले>>> शुकु
गडबडून खाली उतरली नाहीस ना 
मी आज ३ बस बदलुन ऑफीसला आलो.
मी आज ३ बस बदलुन ऑफीसला आलो. मला तरी कुठल्याच स्टॉपवर ५ मि पेक्षा जास्त वेळ थांबाव लागल नाही. दररोज स्वतःच्या गाडीने मला यायला ३०-४० मि लागतात. आज १ तास लागला. पण येकंदरीत गाडी चालवताना होणारी चिडचिड तरी आज झाली नाही. घरी जाताना जर वेळेत बस मिळाल्या तर मी सध्या तरी महीन्यातुन येकदा NO VEHICLE DAY(monday to friday) पाळणार.
मला बस सोयीची नाही आणि अंतर
मला बस सोयीची नाही आणि अंतर टप्प्यातलं आहे त्यामुळे आज चालत ऑफिसला आले. ५० मिनीटे लागली. जाताना मात्र थोडं बस नी जायचा विचार आहे.
माझा तर रोजचाच दोन्ही वेळचा
माझा तर रोजचाच दोन्ही वेळचा प्रवास PMPMLने असतो... वनाज्-कोथरूड ते मनपा ...
आज माझा विकांत असल्यामुळे, अजुन तरी घरात बसून आहे...
पण गेले ५-६ दिवस जणावलेला फरक लिहितोय -

नविन बस-मार्ग सुरु केल्यामुळे, बसेसची संख्या वाढलेली आहे, सहाजीकच बस फेर्या देखिल वाढलेल्या आहेत... सकाळी-सकाळी बस-स्टॉप वर किमान २० मिनिटे थांबल्याशिवाय बस मिळत नव्हती... पण गेला पूर्ण आठवडा (शुक्रवार ते बुधवार) मला ५-५ मिनिटात बस मिळते आहे. फेर्या वाढल्यामूळे सकाळी शाळा-कॉलेज मधे जाणारे विद्यार्थी, आणी माझ्या सारखे कामावर जायला निघालेले 'कामगार'... फुटकळ बस-सेवेमुळे ओथंबून वाहणार्या निकामी बस... हे चित्र बर्याच प्रमाणात कमी झालेले दिसले... नविन कामगार भरती झाल्यामुळे, आजुन काही दिवस 'सौजन्य' मिळेल याची खात्री आहे, पण ते यापुढे कायम टिकावे हीच सदिच्छा...
त्याच बरोबर 'प्रवासी' म्हणून आपली देखिल काही कर्तव्ये आहेत, याची देखिल जाणीव ठेवणे गरजेचे आहे...
गिरी, काढलास का धागा? मला
गिरी, काढलास का धागा?
मला बस सोयीची नाही. खरं तर माझ्या एरियात इतक्या वर्षांमधे कधीच बस पाहिली नाही. पण बस असती तर आज एखादा दिवस गंमत म्हणुन बसने यायला आवडलं असतं ( भरपुर T & C सहित
).
काल, ३१ ऑक्टोबरला एक बस पाहिली, बसच्या दारातुन शाळेची मुलं आणि अजुनही काही माणसं लोंबकाळत होती. बस भीतीदायकरीत्या एका बाजुला झुकली होती. मला बघताना भीती वाटली कि एखादा खड्डा आला आणि बस पडली तर? ही परिस्थिती आजपासुन कि फक्त आजच दुर झाली आहे?
उपक्रमास शुभेच्छा !
उपक्रमास शुभेच्छा ! पी.एम्.पी.एम. एल ची लवकरच "बेस्ट" होवो ही सर्व नागरिकांच्या वतीने अपेक्षा.
मला बस सोयीची नाही . म्हणजे
मला बस सोयीची नाही . म्हणजे घर ते स्टॉप आणि स्टॉप ते ऑफिस हे अंतर मला चालत जायचे असेल तर ३० मि, चालत आणि २ मिनीटे बसमधे असे जावे लागले असते. म्हणुन मला २ व्हीलर बरी वाटली. जास्त अंतर जायचे असते तर बसचा विचार नक्कीच केला असता. ऑफिसमधील काही लोक मुद्दाम बसने आले. आज जाणवलेली एक गोष्ट म्हणजे प्रमुख रस्त्यांवर , सकाळच्या गर्दीच्या वेळेस सिग्नलवर रोजच्या तुलनेने कमी ट्रफिक दिसले.
९ च्या सुमारास मी रस्तावर आलो
९ च्या सुमारास मी रस्तावर आलो तेंव्हा अनेक बसेस औंध ते रक्षक चौक ह्या दरम्यान होत्या. बर्याच बसेस रिकाम्या होत्या. काही मात्र अगदी तुडूंब भरल्या होत्या. एकंदरीत इतक्या बस पाहून आनंद वाटला पण इतक्या की त्यांनीच सर्व रस्ता अडवला होता. तरी तो रस्ता सहा पदरी वगैरे आहे. पण वेस्ट पुण्यात तरी (औंध - बाणेर - जगताप डेअरी) बस डे मुळे ट्रॅफिक मध्ये फार फरक पडला आहे असे वाटत नाही. बाणेर रोड नेहमीसारखीच ट्रॅफिक होती आणि औंध ते विद्यापिठ दरम्यानही.
सुरूवात झाली हे ही नसे थोडके. पण बस डे ऐवजी बस सप्ताह / पंधरवडा राहिला असता तर लोकांना जास्त फायदा झाला असता कारण इतक्या बस दर ५ मिनिटाला पाहून लोक एक दोन दिवासांनी, "अरे आज बस ने जाऊ" असे म्हणून गेले असते कदाचित.
सुरूवात झाली हे ही नसे थोडके.
सुरूवात झाली हे ही नसे थोडके. पण बस डे ऐवजी बस सप्ताह / पंधरवडा राहिला असता तर लोकांना जास्त फायदा झाला असता कारण इतक्या बस दर ५ मिनिटाला पाहून लोक एक दोन दिवासांनी, "अरे आज बस ने जाऊ" असे म्हणून गेले असते कदाचित. >> अनुमोदन.
बस सप्ताह / पंधरवडा राहिला
बस सप्ताह / पंधरवडा राहिला असता तर लोकांना जास्त फायदा झाला असता कारण इतक्या बस दर ५ मिनिटाला पाहून लोक एक दोन दिवासांनी, "अरे आज बस ने जाऊ" असे म्हणून गेले असते कदाचित. >>>>> माझंही केदारला अनुमोदन.
आज रस्त्यावर कमी गर्दी असेल अशी अपेक्षा होती. पण काहीच फरक वाटला नाही.
आज रस्त्यावर कमी गर्दी असेल
आज रस्त्यावर कमी गर्दी असेल अशी अपेक्षा होती. पण काहीच फरक वाटला नाही >>> मलापण
नळ स्टॉप च्या सिग्नल ला SNDT
नळ स्टॉप च्या सिग्नल ला SNDT पासून डेक्कन ला जाणार्या बसेस नेहमी डावीकडच्या लेन मधे रांग लावून थांबलेल्या असतात (कारण अर्थातच उजवीकडे जाणारी वाहनं तेवढी एकच लेन मोकळी सोडतात). मी बर्याचदा ७ वगैरे बसेस ची रांग पाहिली आहे. आज काय परिस्थिती आहे काय माहित! (मी सुट्टी वर आहे आज
)
प्रत्येकान आपापल्या हापीसात
प्रत्येकान आपापल्या हापीसात किती % जनता आज बसन आलेत ते पहा म्हण्जे अदमासे तेव्हडे % ट्राफिक आज कमी.....पुण्यात कधी कुठ कीती ट्राफीक जाम असेल हे कुणीच सांगु शकत नाही......कारण ट्राफिकजामच्या कारणात वहानांच्या संख्येबरोबर अतिशय बेशिस्तपणा , सगळ्यांना असलेली घाई तितकिच कारणीभुत आहे.
आपल्याकड रोडवर वहान फक्त २ कारणांमुळच कमी असु शकतात... बंद किंवा क्रिकेटची म्याच... फायनल असेल आणि त्यात भारत असेल तर सगळीकड सामसुम असते.
बस डे संकल्पना मस्तच आहे. पण
बस डे संकल्पना मस्तच आहे.
पण अॅक्च्युअली (मला वाटते) की एकच दिवस असल्यामुळे जरा गोंधळच झाला सकाळी. बायको म्हणाली म्हणे ऑफीसला मी बसने जाते, आमचे सगळ्यांचे ठरले आहे, तर बस स्टॉपला सोड. म्हणून सोडायला गेलो.
तर इतर वाहने होतीच पण बसेस इतक्या होत्या की वाहतुक मुरंबा झाला होता. शिवाय पाहिजे ती बस नव्हती असे काहीतरी झाले.
पण उदाहरणार्थ 'एक आठवडा' वगैरे केले तर हे मस्त मॅनेज होईल बहुतेक. फायदाही आहेच. प्रदुषण जरा कमी.
या पेक्षा महिन्यातुन २ वेळा
या पेक्षा महिन्यातुन २ वेळा तरी बस स्वच्छ धुवुन...... वापरल्यात तरी.......बस वापरणार्यांची संख्या वाढेल
आमच्या इथे १०% लोक आज बसने
आमच्या इथे १०% लोक आज बसने आले आहेत . काही रोजच येतात त्यांना यात धरले नाही आहे.
मला आज कर्वे रोडवर तुलेनेने गाड्या कमी दिसल्या. मी ट्राफिक अगदी कमी नाही म्हणु शकत पण रोज मी ऑफिसला येताना ज्या दोन सिग्नलला (करिष्मा आणि कर्वे रोड) थांबते त्यात गाड्यांची रांग कमी होती.
मला आज कोल्हापूरची एसटी
मला आज कोल्हापूरची एसटी स्टॉपवर आल्या आल्या मिळाली. (अर्थात आमच्या बसच्या वेळेवर.) पण काल 'बस डे' च्या 'पुर्व डे'ला मला सकाळी व संध्याकाळी नेहमीची बस मिळाली नाही.(बंद पडल्यामुळे) त्यामुळे सकाळी ऑफिसला १५-२० मिनीटे उशीर झाला तर संध्याकाळी घरी पोहचायला ८ वाजले.
रस्त्यावर दुचाकींची संख्या कमी जाणवली. बसेसची संख्या जास्त होती. पौड रोड , कर्वे रोड, येथे स्टॉपवर, पोलिस, स्वयंसेवक वगैरेंची संख्या भरपूर होती.
<<<<<<<पण मला प्रश्न पडलाय, उद्यापासुन काय? परत तेच, अपुर्या बसेस, थांब्यांवर गर्दी, दरवाजाला लटकलेले प्रवासी, नीट न दिसणार्या पाट्या, रस्त्यावरच थांबणार्या बसेस, प्रवासी बसमधे चढायच्या आधीच वाहकाने मारलेली बेल >>>>>>>>गिरी, अगदी माझ्या मनातल बोललास. हे बस डे प्रकरण सुरू झाल्यापासून मी हेच बोलतेय. आणि आता उद्या रस्त्यावर बंद पडलेल्या बसची रांग दिसेल.
(मला आज सकाळीच एक बस बंद पडलेली दिसली.)
<<<<<<<<<प्रवासी बसमधे चढायच्या आधीच वाहकाने मारलेली बेल >>>>>>याबद्दल कंडक्टर रोज माझी बोलणी खातो.
<<<<<<<<<पण रस्त्यांवर या बस मावत नाहीयेत, वाहतूक कोंडीला आमंत्रण >>>>>>>>.मला अस हओईल अस वाटल पण आज ते चित्र दिसल नाही.
<<<<<<<,काल, ३१ ऑक्टोबरला एक बस पाहिली, बसच्या दारातुन शाळेची मुलं आणि अजुनही काही माणसं लोंबकाळत होती. बस भीतीदायकरीत्या एका बाजुला झुकली होती. मला बघताना भीती वाटली कि एखादा खड्डा आला आणि बस पडली तर? >>>>>>>>>>मने, ए आम्ही नेहमीच बघतो. आणि विद्यार्थ्यांसाठी शाळेने स्वतंत्र बसेस द्याव्यात असे म्हणतो.
<<<<<मला आज कर्वे रोडवर तुलेनेने गाड्या कमी दिसल्या. >>>>>सहमत.
बसेसची संख्या कायमस्वरूपी वाढावी, आणि नियोजनपूर्ण फेर्या व्हाव्यात यासाठी शुभेच्छा!
शुकु हाहा गडबडून खाली उतरली नाहीस ना खो खो>>>>>>>>>>:हाहा: ती ऑफिसपर्यंत नीट पोहचली हेच महत्वाच.
मी माझा खारीचा वाटा उचलला बस
मी माझा खारीचा वाटा उचलला बस ने प्रवास करून.
पण माझ्या olakhichyan मधे ज्यांना शक्य होत ते ही गेले नाहीत बस नी. '' एक दिवसानी काय फरक पडणारे'' म्हणत.
आपण एक दिवसही सहकार्य करू शकत नाही का?
ज्यांच्या कामाच्या ठिकाणी बस जात नाही ते सोडून इतरांनी वाहन काढायलाच नको होती. तरच तो खरा बस-डे वाटला असता आणि
प्रदुषण मुक्त ही राहिल असत पुणे काही प्रमाणात.
आज रस्त्यावर कमी गर्दी असेल अशी अपेक्षा होती. पण काहीच फरक वाटला नाही >>> मलापण
उपक्रमास शुभेच्छा.
फेसबुकवर धडाधड रस्ता किती
फेसबुकवर धडाधड रस्ता किती खाली आहे याचे फोटो टाकतायेत? कारण सकाळी ७:०० ते ७:३० च्या दरम्यान एक दोन बस अश्या पाहिल्या कि ज्यामधे ड्रायव्हर आणि बस कन्डक्टर असे दोघेच पाहिले.
आज मी बर्याच वर्षांनी बसने
आज मी बर्याच वर्षांनी बसने आले. खूप छान वाटले. अशीच फ्रीक्वेंसी राहील तर रोज बसने यायला आवडेल.
हो, मी पण पाहिल, कात्रज-निगडी
हो, मी पण पाहिल, कात्रज-निगडी बसेस एक मागे एक अश्या ४ होत्या आणि चवथ्या बस मधे ५-६ प्रवासी फक्त.
हा पेट्रोल-डीजल चा अपव्यय नाही का?
हो, मी पण पाहिल, कात्रज-निगडी
हो, मी पण पाहिल, कात्रज-निगडी बसेस एक मागे एक अश्या ४ होत्या आणि चवथ्या बस मधे ५-६ प्रवासी फक्त.
हा पेट्रोल-डीजल चा अपव्यय नाही का?
सार्वजनिक सेवेत असे घडणारच. आज किती लोक बाहेर पडतील याचा अंदाज सुरवातीच्या थांब्यावर येणे अशक्य असते. या उलट पकिल्याच थांब्याला बस भरली तर पुढे लोकांना लटकत जावे लागते.
हो, मी पण पाहिल, कात्रज-निगडी
हो, मी पण पाहिल, कात्रज-निगडी बसेस एक मागे एक अश्या ४ होत्या आणि चवथ्या बस मधे ५-६ प्रवासी फक्त.
हा पेट्रोल-डीजल चा अपव्यय नाही का?
>> हे जरा दोन्ही कडुन बोलन नाही झाल का? म्हणजे खुप प्रवाशी असतील तेंव्हा बस संख्या खुपच कमी असते आणि आता बसेस वाढवल्या तर डीजल चा अपव्यय, काय करायच त्यांनी तरी?
मला आज बरीच काम उरकुन ऑफीस ला ११ पर्यंत जायच होत म्हणुन २-व्हीलरवरच गेलो. बँकेत ९:३० ला गेलो तर साहेब यायचे होते. १०:४५ पर्यंत त्यांचा पत्त नव्हता. बसनेच आलो असतो तर बर झाल असत असा विचार करत होतो तेव्हढ्यात साहेबांच आगमण झाल, आल्याबरोबर म्हणतात कसे, आज बस डे म्हणुन बसनेच आलो त्यामुळे उस्शीर झाला!
आज बस डे म्हणुन बसनेच आलो
आज बस डे म्हणुन बसनेच आलो त्यामुळे उस्शीर झाला! >>>
मी आत्ता पुन्हा बाहेर गेलो
मी आत्ता पुन्हा बाहेर गेलो होतो तर कोथरुड बस स्थानक (म्हणजे पौड रोडवरचे) येथे कंप्लीट राडा झालेला आहे. त्या लोकांना प्रथमच समजत आहे की एकदम इतक्या 'बशी' रस्त्यावर आणणे म्हणजे रस्त्याचा व वाहतुकीचा बोजवारा उडवणे आहे. हेही नसे थोडके (हे शिक्षण / संशोधन)
आज सकाळी हडपसर गाडीतळावर
आज सकाळी हडपसर गाडीतळावर नेहमीपेक्षा वेगळे चित्र दिसले. एकतर प्रचंड संख्येच्या बशींमुळे कधी नव्हे तो वाहतुकीचा मुरंबा झाला होता, पण त्याच वेळेला आज नेहमीप्रमाणे प्रवाश्यांची गाडी पकडायला पळापळ नव्हती, किंवा लोकांची गर्दी रस्त्यावर सांडत नव्हती आणी पि.एम.पी.एम.एल. ने बसेसची ये-जा नियंत्रीत करण्यासाठी नियंत्रक नेमले होते, त्यामुळे खरेच बरं वाटले आज सकाळी. खोटे का बोलु?
त्या लोकांना प्रथमच समजत आहे
त्या लोकांना प्रथमच समजत आहे की एकदम इतक्या 'बशी' रस्त्यावर आणणे म्हणजे रस्त्याचा व वाहतुकीचा बोजवारा उडवणे आहे. >>> बहुतेक "चुकामधुन शिका" असे ध्येय असेल त्यांचे.
Pages