स्केच

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

या जागेच पेंटींग केलं तर चांगलं वाटेल बहुतेक. एक स्केच करुन बघितलय. कुणाला ओळखिची वाटतेय का ही जागा?
Picture 1700.jpg

प्रकार: 

अवघड आहे जागा म्हणून ओळखणं. पण रेल्वेचा डबा वाटतोय.
बर्‍याच दिवसांनी तुमचं पेंटीग पहायला मिळालय पाटील.

>>> पण रेल्वेचा डबा वाटतोय <<< Proud
सुक्या, याचा अर्थ, शाळेत तुला चित्रकलेच्या शिक्षकान्नी दिलेले शून्य "भोपळ्यासारखे" वाटले असेल तेव्हा याची मला खात्री वाटतेय. Wink

मस्त चित्र. जागा ओळखीता येत नाही, पण काहीशी विश्रामबाग वाडा वा अशाच जुन्या वास्तुचे चित्रण वाटते. त्याच वेळेस खिडकीत वाळत घातलेल्या कपड्यान्मुळे गिरगावातील चाळही वाटू शकते.
आशा आहे की (खिडकीत वाळत घातलेल्या कपड्यान्मुळे) हा लालमहाल नसावा Proud

लिम्बु- बराचसा बरओबर आहेस. तुळ्सीबागेतल्या नगारखान्याच्या खीडक्या काढायचा प्रयत्न आहे हा. खालचे प्रवेश्द्वार आणी दुकान नाही काढले

आशा आहे की (खिडकीत वाळत घातलेल्या कपड्यान्मुळे) हा लालमहाल नसावा>>> मला ही आधी लालमहालच वाटला, पण कपड्यांनी त्यावर पाणी फिरवले.

छान आहे चित्र Happy

ओह, तुळशीबाग होय, बर एक सान्ग, तुळशीबागेच्या कोणत्या दिशेच्या दरवाजावर हा नगारखाना आहे? तो परिसरच माझ्या नजरेसमोर येत नाहीये Sad एक दरवाजा भाऊमहाराज बोळाकडे, तर दुसरा विरुद्ध दिशेला आयुर्वेदिक औषधान्ची दुकाने होती त्या रस्त्याला. (बहुधा खूप पूर्वी तुळशीबागेच्या बोळातुन पण आत जाता यायचे, नेमके आठवत नाही) तर विरुद्ध दिशेच्या फुलबाजाराकडच्या दरवाजावरील नगारखाना आहे का हा? (की दोन्ही दरवाजान्ना नगारखाने आहेत? ) साला इतका वेळा गेलो असेन, पण नजरेतून हा तपशील कसा काय सुटला?
असो.
वॉटर कलरची चित्रे मला आवडतात (फक्त बघायला हं, चित्र काढायला ते अवघड अस्तात).

पुण्याच्या बाबतीत मीही "दिशाहीन" आहे. या नगार्खान्या खाली पुरंदरे आणि सन्सचे दुकान आहे भांड्यांचे

स्केच ? मला तर छान चित्रच वाटतंय हें !
अर्थात, पाटिलनी नुसते ब्रशचे फटकारे मारले तरी त्यातून त्यांची 'मास्टरी' जाणवतेच !!!

सुरेख! मी तुमचं हे स्केच पाहून मनातल्या मनात तुळशीबागेचा फेरफटका करून आले.
नगारखाना तुळशीबागेत आत रामाच्या देवळाकडे तोंड करून उभे राहिल्यास उजवीकडे आहे. जिथे कमान आहे त्याच्यावर. त्याच्या बाजूच्या भिंतीवर पेंटींग्स आहेत. फुलबाजाराकडून येणार्‍या बाजूनेच.

सुरेख! मी तुमचं हे स्केच पाहून मनातल्या मनात तुळशीबागेचा फेरफटका करून आले >>>>>>>>>> मला पण एकदम अस वाटल की सगळ काम सोडून मस्त तुळशीबागेत खरेदीला जाव ,

खुप सुरेख आहे हे Happy

बिल्वा - बरोबर, बाजुच्या भिंतिवर आणि त्या खिड्क्यांच्या वर्च्या भिंतींवर चित्र आहेत.
सगळ्यांना धन्यवाद

मस्त.. आता पुढच्या वेळी जेंव्हा केंव्हा तुळशीबागेत जाईन तेंव्हा खास खिडक्या बघायला देखील जाईन.. Wink

उत्कृष्ट पेंटिंग.

पाटिलनी नुसते ब्रशचे फटकारे मारले तरी त्यातून त्यांची 'मास्टरी' जाणवतेच !!! >>>> +१००....