Submitted by हर्ट on 29 October, 2012 - 11:41
नमस्कार,
मला आमच्या सिंगापूरातील ग्रंथालयासाठी एकूण २५ दर्जेदार दिवाळी अंक घ्यायचे आहेत. काहीतरी नवीन, वेगळी संकल्पना असलेले दिवाळी अंक हवे आहेत.
मौज, साप्ताहिक सकाळ, ललित, अक्षर .. काही नेहमीचे दिवाळी अंक घेणारचं आहोत आम्ही पण आजच्या काळाशी सुसंगत, परदेशातील मराठी लोकांना आवर्जुन आवडतील असे दिवाळी अंक इथे सूचवता का?
वाचनिय दिवाळी अंकाची यादी इथे हेडरमधे समाविष्ट करत आहे:
१) अक्षर २) मौज ३) ललित ४) साप्ताहिक सकाळ ५) शब्द ६) अक्षरगंध ७) मिळूण सार्याजणी ८) शतायुषी ९) अंतर्नाद १०) इत्यादी ११) निवडक अबकडई १२) अनुभव १३) चिन्ह १४) माहेर १५) मुशाफिरी १६) लोकसत्ता १७) महाराष्ट्र टाईम्स १८) तरुण भारत १९) अनुवाद २०) खेळ २१) वनौषधी २२) अभिधानंतर २३) अभिजात २४) पद्मगंधा २५) छंद २६) नीहार २७) किस्त्रिम २८) मेनका २९) कालनिर्णय ३०) अमृत ३१) किशोर
धन्यवाद.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
इथे लिहा.
इथे लिहा.
लेटेस्ट 'ललित' मागव बी. त्यात
लेटेस्ट 'ललित' मागव बी. त्यात सगळ्या दिवाळी अंकांची त्यांच्या या वर्षीच्या संकल्पनेसह जाहिरात आहे. त्यातून तुला निवडता येतील.
इथे लोकांना प्रत्यक्ष दिवाळी अंक पाहिल्याशिवाय कसं सांगता येणार 'काहीतरी वेगळी, नवीन' संकल्पना नक्की कोणत्या दिवाळी अंकांच्या आहेत ते.
कसा मागवू ललितचा ताजा अंक?
कसा मागवू ललितचा ताजा अंक? किंवा मला तेवढी पान स्कॅन करुन कुणी पाठवू शकेल का?
अंदाजे सांगते आहे. मागील
अंदाजे सांगते आहे. मागील वर्षीच्या अनुभवावरुन.
'चिन्ह', 'अनुभव', 'मिळून सार्याजणी', 'माहेर' नक्की घे.
बी, 'नीहार' दिवाळी अंक घे.
बी, 'नीहार' दिवाळी अंक घे. चांगला असतो.
धन्यवाद. कुणी शब्द वाचला आहे
धन्यवाद.
कुणी शब्द वाचला आहे का? कसा असतो?
फिरस्तीबद्दल एखादा अंक आहे का? प्रवासाशी निगडीत असा?
मी शब्द वाचला आहे..दर्जेदार
मी शब्द वाचला आहे..दर्जेदार लिखाण,खुपच छान अंक आहे.
बी, तुला येथे जे दिवाळी अंक
बी, तुला येथे जे दिवाळी अंक सुचवले जात आहेत, त्यांची यादी वर हेडरमध्ये टाकशील का?
शैलजा, हो टाकतो. छान कल्पना
शैलजा, हो टाकतो. छान कल्पना आहे.
सु, धन्स.
बी, दिवाळी अंक प्रकाशित
बी, दिवाळी अंक प्रकाशित झाल्यावर, लोकसत्ता सारख्या काही वर्तमानपत्रात अंकाची ओळख, खास सदरात करुन दिली जाते. त्यावरुन हे ठरवू शकतोस. दिवाळीनंतर निदान २/३ महिने, दादरला मॅजेस्टिकमधे त्यांचे प्रदर्शन / विक्री चालू असते. त्यांच्याकडे मागणी नोंदवल्यास, ते नक्कीच पाठवतात. त्यांची आणि आयडीयलची,
दिवाळी अंक भेट योजनाही असते. त्यात काही अंक, एकत्र मिळतात.
दिनेश, हो दिवाळी नंतर दिवाळी
दिनेश, हो दिवाळी नंतर दिवाळी अंकांबद्दल खूप काही वाचायला मिळतं. पण इथे वाचकांना दिवाळीच्या वेळेसचं दिवाळी अंक हाती हवा असतो. म्हणून तयारीला लागलो आहे.
पुण्यात दिवाळी अंक कुठे मिळतात आयडीयलमधे जसे सगळे दिवाळी अंक ठेवलेले असतात विक्रिला तसे?
लोकसत्ताची सध्या जी जाहिरात
लोकसत्ताची सध्या जी जाहिरात सुरु आहे ते पाहुन दिवाळी अंक छान असेल अस वाटतय.
काही अंक तर खुप उशीरा
काही अंक तर खुप उशीरा प्रकाशित होतात, खुपदा तर दिवाळी दिवशीच. त्यामूळे दोन भागात मागवले तर छान. म्हणजे ज्यांचे नाव आहे असे अंक, आधी आणि मग राहिलेले आणि तरीही चांगला प्रतिसाद मिळालेले, नंतर.
आपला मायबोलीचा अंक सुद्धा, ऐन दिवाळीला प्रकाशित होतो
बी, मायबोली खरेदी विभागात २५०
बी, मायबोली खरेदी विभागात २५० पेक्षा जास्त दिवाळी अंक उपलब्ध आहेत.
मागणी नोंदवल्यानंतर त्वरित मिळतात, असा माझा स्वतःचा अनुभव आहे.
मात्र तू भारताबाहेर असल्याने भर दिवाळीतल्या डिलीव्हरीबद्दल तू आधी त्याबद्दल माहिती करून घेणं, हे बरं.
.
.
दिनेशदा, कल्पना छान आहे - दोन
दिनेशदा, कल्पना छान आहे - दोन भागात - दिवाळी अंक मागवता येतात. विचार करेन नक्की ह्यावर.
साजिरा, मी अजयजींशी दोन आठवड्यांपुर्वी फोनवर बोललो माबोच्या खरेदी विभागातील दिवाळी अंकाबद्दल. कधी खरेदी विभागात अंक येतात ह्याची वाट बघत आहे.
पुण्यात एकाच ठिकाणी सगळे दिवाळी अंक मिळत नाहीत का?
मायबोलीच्या खरेदी विभागात अंक
मायबोलीच्या खरेदी विभागात अंक विक्रीला उपलब्ध झाले आहेत. पण पाठवण्याची प्रक्रिया मात्र दिवाळी सुरू झाल्यावरच होइल असे आलेल्या मेल मध्ये म्हटले आहे.
मेल? मला नाही आली बुवा कुठली
मेल? मला नाही आली बुवा कुठली मेल ह्यासंबंधी
http://kharedi.maayboli.com/s
http://kharedi.maayboli.com/shop/home.php
मं, धन्यवाद.
मं, धन्यवाद.
बी, बाजारात आल्यानंतर लगेचच
बी, बाजारात आल्यानंतर लगेचच अंक खरेदी विभागात उपलब्ध होतात. आता पर्यंत साधारण १० अंक उपलब्ध झाले आहेत. थोडक्यात आता लगेच (एवढ्या २-३ दिवसांत) निवडलेले अंक दिवाळीत तुला तिथं मिळू शकतील. तुझ्या निवडीतले अंक कधी बाजारात (म्हणजेच खरेदी विभागात) येतील हा खरा प्रश्न. परदेशी पाठवले जाणारे अंक साधारण अकराव्या दिवशी पोचतात- हे लक्षात ठेऊन तू निर्णय घे.
सा - धन्यवाद. वरची लिंक फारच
सा - धन्यवाद.
वरची लिंक फारच उपयुक्त ठरत आहे. मी अगदी अधाशीपणे वाचत आहे.
आवाजचे दोन दिवाळी अंक आहेत. ह्यापैकी चांगला कोणता? मला तो हवा ज्यात मधेमधे पाने कापून त्या पानाखाली विनोदी चित्र दिसायचे? तो जत्रा तर नव्हे ना?
भटकंती अंक कसा आहे?
@बी >>पुण्यात एकाच ठिकाणी
@बी
>>पुण्यात एकाच ठिकाणी सगळे दिवाळी अंक मिळत नाहीत का?<<
पुण्यात अप्पा बळवंत चौकात पूनम एजन्सीज आणि संदेश एजन्सीज इथे बहुसंख्य दिवाळी अंक मिळतात.
फक्त थोडी घाई करा.साधारण पाडवा/भाउबीज या काळात खरेदी करा.
आधी केल्यास अंक तोवर आलेले नसतात. आणि उशीर केल्यास चांगले अंक संपलेले असतात.
सूट साधारण २० ते २५ % या रेंजमधे मिळते.
प्रचारक, बरे केलेस सांगितलेस.
प्रचारक, बरे केलेस सांगितलेस. मला हे माहिती नव्हते. आता नंबर लावून ठेवतो.
बी , संदेश एजन्सीला सिंगापुर
बी , संदेश एजन्सीला सिंगापुर ग्रंथालय माहीत आहे... मी तिथुनच विकत घ्यायचे. ( त्यामुळे जास्तीचा डीस्कांउंटपण मिळेल.)
दिवाळी नंतर १०/१५ दिवसांनी अंक घेतल्यास अजुन स्व्स्त मिळतात ( त्यावेळी बजेट्चा प्रॉब.होता... आता काय परिस्थिती आहे ते माहीत नाही )
मला तो हवा ज्यात मधेमधे पाने
मला तो हवा ज्यात मधेमधे पाने कापून त्या पानाखाली विनोदी चित्र दिसायचे? तो जत्रा तर नव्हे ना?>>> तो आवाजच! पण आता फारसा दर्जा उरला नाहीये
'गंधाली, सुवासिनी' चा अंक पण
'गंधाली, सुवासिनी' चा अंक पण छान असतो
आवाजचे दोन दिवाळी अंक आहेत.
आवाजचे दोन दिवाळी अंक आहेत. ह्यापैकी चांगला कोणता?>> बी "पाटकरांचा आवाज" हा ओरिजिनल.
पण तुम्हा सर्वाना तो हवाच आहे का?
तो बर्यापैकी चावट विनोद असलेला असतो.
सर्वाना तो झेपेल, आवडेल अस सांगता येणार नाही.
तसही त्याची हल्ली क्वालिटी डाउन झाली आहे.
माझ्याकडे एक निवडक आवाजचा अंक आहे. (५-६ वर्षापुर्वी आलेला) त्यात खुप छान कलेक्शन आहे बर्याच जुन्या जुन्या आवाजच्या दिवाळी अंकातील लेख आणि खिडकी चित्रांचं.
त्यात बाळासाहेब ठाकरेंनी काढलेले खिडकीचित्र देखील आहे.
नवल आणि हंस, दीपावली. मस्ट
नवल आणि हंस, दीपावली. मस्ट आहे बी
बी, मधुकर पाटकरांच्या आवाज चा
बी, मधुकर पाटकरांच्या आवाज चा दर्जा आता चांगला राहिलेला नाही. पुर्वी चित्रे चावट असायची, आता ( गेल्या काही अंकातली ) बीभत्स वाटली. आवाजचे गेल्या काही अंकातल्या चांगल्या लेखांचे, संकलन बाजारात आले होते. ( माझ्या घरी असणार ते, पण आता उपलब्ध आहे का ते माहित नाही )
तूमच्याकडे भविष्य आणि पाककला या दोन विषयात रस असणारे लोक असतील, तर त्यांच्यासाठी भरपूर अंक असतात आता.
Pages