पालक - एक जुडी, नीट निवडून
कांदे - दोन मध्यम आकाराचे, उभे चिरून
आलं-लसूण पेस्ट - दोन चमचे
गरम मसाला पावडर - एक चमचा
पाव कप दूध
पाव कप साय किंवा दहा बारा भिजवलेले काजू किंवा दोन मोठे चमचे मिल्क पावडर
साजूक तूप - एक मोठा चमचा
दहा-बारा पाकळ्या लसूण अगदी बारीक चिरलेला
हिरवी मिरची - एक (ऐच्छिक)
मीठ, साखर, तेल
१. पालकाची पानं स्वच्छ धुवून निथळत ठेवा.
२. कढईत तेल नीट तापवून त्यात चिरलेले कांदे, आलं-लसूण पेस्ट आणि हिरवी मिरची परता.
३. कांदा थोडा शिजला की पालकाची पाने हातानेच उभी आडवी कापून त्यात घालून व्यवस्थित परता.
४. आता कढईवर झाकण न ठेवता पालक-कांदा व्यवस्थित शिजू द्या.
५. पालक शिजला की त्यात गरम मसाला पावडर, चवीप्रमाणे मीठ आणि आवडत असल्यास साखर घालून व्यवस्थित ढवळून घ्या. पाच मिनीटांनी गॅस बंद करून ते मिश्रण थंड होऊ द्या.
६. मिश्रण थंड झाल्यावर ते मिक्सरमधे वाटून घ्या. काजू घालणार असाल तर आधी भिजवलेले काजू बारीक वाटून घ्या आणि मग त्यात पालक-कांद्याचं मिश्रण घालून वाटा. साय किंवा मिल्क पावडर घालणार असाल तर पालक-कांद्याचं मिश्रण वाटल्यावर त्यातच साय/मिल्क पावडर घालून वाटा. मग थोडं थोडं दूध घालत हवी ती कन्सिस्टन्सी येईपर्यंत मिक्सर फिरवत रहा.
७. आता भाजी तयार आहे. कढईत काढून घ्या.
८. फोडणीच्या पळीत साजूक तूप गरम करून त्यात बारीक चिरलेली लसूण घाला. मंद गॅसवर लसूण चॉकलेटी रंगाची होईपर्यंत चमच्याने ढवळत रहा. लसणीचा रंग बदलला आणि खमंग वास आला की पालकाच्या भाजीत घाला आणि नीट ढवळून घ्या.
ही भाजी झटपट होते. कांदा, लसूण सोलून चिरणे आणि भाजी शिजणे-थंड होणे-बारीक वाटणे याव्यतिरिक्त कष्ट लागत नाही. पालक शिजला की गळतो आणि नंतर मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचा आहे, त्यामुळे ती पाने हातानेच ओबडधोबड तोडून भाजीत टाकायची. कांदाही जाडाभरडा चिरून घेतला तरी चालतो.
यात उकडलेले बटाटे घातले तर लसूणी आलू-पालक आणि पनीर घातले तर लसूणी पालक-पनीर
मस्त वाटतेय रेसिपी. करुन
मस्त वाटतेय रेसिपी. करुन बघणार!! नि फोटो कुठेय???
छान वाटत आहे..अजुन वेगळे
छान वाटत आहे..अजुन वेगळे वेरीयेशन करता येतील ..करुन पाहेन
फोटो प्लीज
> दोन मोठ्या नगांसाठी फोटो
> दोन मोठ्या नगांसाठी
फोटो कुठायत म्हटल्याशिवाय फोटो द्यायचे नाहीत ह्या वृत्तीला काय म्हणावे?
छान आहे. लसूण वगळता अशी भाजी
छान आहे. लसूण वगळता अशी भाजी मी करतो. आता लसूण वापरुन बघायला हवी.
मला पालक जास्त खाऊन चलणार नाही.
फोटो कुठायत म्हटल्याशिवाय
फोटो कुठायत म्हटल्याशिवाय फोटो द्यायचे नाहीत ह्या वृत्तीला काय म्हणावे? >>
फोटो अपलोड न करण्याच्या कॉम्प्युटरच्या वृत्तीला जे म्हणावे तेच म्हणावे
प्रयत्न जारी आहेत.
अरे व्वा? मस्तच
अरे व्वा? मस्तच पाककृती
अवांतर - ऑफिसातील मैत्रीण हे चुकून ऑफिशियल मैत्रिण असे वाचले हा स्वभावदोष आमचा
याचे विडंबन करून पाहावे काय?
मस्तय गं. >>>>>> फोटो
मस्तय गं.
>>>>>> फोटो कुठायत म्हटल्याशिवाय फोटो द्यायचे नाहीत ह्या वृत्तीला काय म्हणावे? >>
फोटो अपलोड न करण्याच्या कॉम्प्युटरच्या वृत्तीला जे म्हणावे तेच म्हणावे >>>>>
छान पाकृ!
छान पाकृ!
मस्त मस्त "पालक छोल्यांच्या
मस्त मस्त
"पालक छोल्यांच्या कृतीसाठी प्राचीशी संपर्क साधा."
मध्येच पालक छोल्यांचा काय संबंध?
छान पाकृ!
छान पाकृ!
ख मं ग!!
ख मं ग!!
लसणीच्या फोडणीची आयडिया
लसणीच्या फोडणीची आयडिया मस्तच. नक्की करुन बघणार
मस्त. करून बघेनच. अमुलचे
मस्त. करून बघेनच. अमुलचे पनिर क्यूब्ज मिळतात रेडिमेड. पालक इज माह फेवरिट.
आत्ताच केली हि रेसिपी. आलू
आत्ताच केली हि रेसिपी. आलू लसुणी पालक. बटाटा घालायचा होता म्हणुन ग्रेवी प्रकारची केली.
मस्त लागतेय.
पाव कप दुध घालायला कसेतरीच वाटले म्हणुन फक्त एक चमचा घातले आणि साय घातली थोडी.
ह्या कृतीत प्रचंड काटछाट
ह्या कृतीत प्रचंड काटछाट मारुन आज पुन्यांदा पालक-पनीर-लसूणी. पनीर आणि क्रीमी पालकात लसणाची फोडणी बरी लागेल की नाही वाटलेलं आधी पण मस्त लागते एकदम. त्यामुळे आता नेहमीच थोडी भाजी वेगळी काढून आमच्यासाठी फोडणी घालते वरुन. हिरवी मिरची बारीक चिरुन घालते फोडणीत.
अरे, ह्यावर प्रतिक्रिया दिली
अरे, ह्यावर प्रतिक्रिया दिली होती आणि साफ विसरुन गेले होते. ह्या आठवड्यात नक्की करणार
काल केली होती लसूणी
काल केली होती लसूणी पालक....!!!! मस्त झाली होती एकदम.. :स्मितः
आत्ताच करून खालली. सोपी आहे
आत्ताच करून खालली. सोपी आहे आणि मस्त होते!
गेल्या आठवड्यात पुन्हा एकदा
गेल्या आठवड्यात पुन्हा एकदा अजिबात बदल, काटछाट न करता केलं होतं. यावेळी एका मैत्रिणीला दिलं तर तिला पण खूप आवडलं. रेसिपी फॉवर्ड केली आहे
सिंडे, मस्त दिसतो आहे
सिंडे, मस्त दिसतो आहे फोटो!
अवांतर - आपण सध्या रेस्प्यांचं बार्टर एक्स्चेंज करतोय बहुतेक. तू आंब्याची कढी आणि लसूणी पालक केल्यास, मी गेल्या आठवड्यात बटाट्याची खरपूस भाजी आणि काल पेन्सिल भाजी केली होती
आ दो स मै
आ दो स मै
मधला एक कसलासा तुकडा
मधला एक कसलासा तुकडा पोर्कसारखा दिसतोय सिंडे
तमालपत्र आहे ते
तमालपत्र आहे ते
हो का? अजिबातच ओळखता येत
हो का? अजिबातच ओळखता येत नाहीये
मंजू, परवा केली होती ही भाजी.
मंजू, परवा केली होती ही भाजी. झटपट झाली आणि खूप आवडली सग़ळ्यांना. पुरली नाही.
इतक्यात दोनदा या कृतीने भाजी
इतक्यात दोनदा या कृतीने भाजी केली. सर्वांना आवडली.
कालच्या पाहुण्यांना पण आवडली, पाहुणे इथे येउन लिहीणार होते , विसरलेले दिसतात
नाही, नाही पाहुणे विसरले
नाही, नाही पाहुणे विसरले नाहीत. बिझी होते जरा.
सही झाली होती भाजी. अगदी सुरेख हिरवागार रंग आला होता भाजीला.
परत एकदा केली! हिट्ट रेसिपी!
परत एकदा केली! हिट्ट रेसिपी!
आज ही भाजी केली होती, मला खूप
आज ही भाजी केली होती, मला खूप आवडली. मी काजू बहुतेक जरा जास्त घातले त्यामुळे रंग जरा फिकट आला. पण चव मस्तच.
केली, मस्त झाली होती. थँक्स
केली, मस्त झाली होती. थँक्स मं.