"एऽ, त्यांच्यात ना बदामसातला सत्तीलावणी म्हणतात."
"हो! आणि गुलामचोरला गुल्लीदंडा, साताठला हातओढणी आणि बेरीज झब्बूला जपानी झब्बू म्हणतात."
"मग काय झालं? नावं वेगळी असली तरी खेळ तोच ना? चला! आपणही जाऊ त्यांच्यात खेळायला."
"एऽ, पण मला ते तीनपत्ती का काय ते येत नाही खेळायला."
"एऽ, तो मोठ्यांचा खेळ असतो. आपण हिम्याकाका नाहीतर परागकाकाला सांगू हळूचकिनी आपल्याला शिकवायला, काय?"
असे संवाद ऐकू आले म्हणजे जवळपास कोठेतरी पत्त्यांचा डाव रंगात आला आहे असे समजावे!
अगदी लहानपणापासून भिकार-सावकार, पाच-तीन-दोन, एकेरी झब्बू, गड्डा झब्बू, लॅडिज, मेंढीकोट, तीनशेचार, कॅनिस्ट्रा असे पत्त्यांचे वेगवेगळे खेळ तुम्ही नक्कीच खेळला असाल! बावन्न पत्त्यांच्या बावन्न तर्हा! लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना गुंगवून ठेवणार्या, गप्पांचा व आठवणींचा अड्डा जमविणार्या! नव्या ओळखी घडविणार्या व जुन्या खुणा जपणार्या!
या बावन्न पत्त्यांचे खेळही प्रांतांगणिक बदलतात. जितका वेगळा, नावीन्यपूर्ण खेळ तितकी डोक्याला चालना! एकेका डावासरशी रंगत जाणारे नाट्य, हमरीतुमरी, हुज्जत, सरशी - हार .... दरवर्षी सुट्टीत, प्रवासात या खेळांमध्ये पडणारी भर...
१२/१२/१२ रोजी इंडियन मॅजिक आय प्रा. लि. आणि अरभाट निर्मिती प्रस्तुत 'पुणे ५२' हा चित्रपट प्रदर्शित होतोय.
एका गुप्तहेराची ही कथा.
पत्त्यांच्या खेळातले सारे डावपेच, सारी मजा या कथेतही आहे..
'पुणे ५२'च्या निमित्तानं तुमच्या परिचयाचे, आठवणीचे पत्त्यांचे खेळ इथे लिहूयात.
तो एक जजमेंट नावाचा खेळही
तो एक जजमेंट नावाचा खेळही भारी असतो. >>>
येस्स्स.... इतके लिहिण्या इतका पेशन्स मजजवळ नाही. लिहा अजून कुणीतरी.
तोच तो खेळ आम्ही खेळलो होतो,
तोच तो खेळ आम्ही खेळलो होतो, आधी हात किती करणार ते सांगायचे आणि मग प्रत्यक्षात किती झाले, ते बघायचे...
वरील नावांपैकी, दोन नावे अशी आहेत ( ओळखा ! ) ज्यांनी आयूष्यात कधीही पत्ते खेळले नाहीत, त्या दिवशी देखील नाही !
आमची प्रॉबॅबलिटीमधली बरिचशी उदाहरणे, पत्त्यांच्या कॅटवर आधारीत असायची. ( त्या दोघांना मी त्या दिवशी हेच सुनावले होते ! )
३०४ माझा पण आवडता . लॅडीज
३०४ माझा पण आवडता . लॅडीज सारखाच पण थोडा अवघड
३०४ माझा पण आवडता. आणी जजमेंट
३०४ माझा पण आवडता. आणी जजमेंट पण.
मेंढीकोट, वख्खै आणि पाच तीन
मेंढीकोट, वख्खै आणि पाच तीन दोन खुपच आवडीचे.
मी कॉलेजला असताना एका
मी कॉलेजला असताना एका ओळखीच्या काकांकडे शिकवणीला जायचे. ते जीपीआरला मॅथ्सचे सर होते. प्रोबॅबोलिटीची गणितं सोडवताना "मला पत्त्यातलं काही कळत नाही" असं त्यानी सांगितल्यावर "अँ? पत्त्यात काय असते न कळण्यासारखे" असा प्रश्न मनात येऊन गेलेला.
बदाम सात, साताठ, पाच्तिन्दोन
बदाम सात, साताठ, पाच्तिन्दोन (असाच करायचा बरका उच्चार) मुंगुस, आणि रम्मी.
उन्हाळ्याच्या सुट्ट्या अशाच घालवल्यात. अजून एक भारी गेम म्हणजे चॅलेंज. २-३ कॅट एकत्र करून खेळायचा. निदान ५-७ जण असताना खेळायचा. चॅलेन्ज देणारा काय दिमाखात चाय्लेन्ज अस म्हणायचा/ची आणि चॅलेन्ज करणारा फसला तर तेवढ्याच दिमाखात समोरचा सांगणार उचलेंज
लहान्पण देगा देवा.
नॉट्-अॅट्-होम ===
नॉट्-अॅट्-होम === नाटे-काटे-ठूsssम... बेंबीच्या मुळापासून जोर काढून ओरडायचो...
जादू मधे 'दहाची जादू' आवडती...
सोबतच 'सातव्या-पानाची जादू' देखिल करुन दाखवायचो...
तो अजून एक डाव असतो ना सारी
तो अजून एक डाव असतो ना सारी रंगीत पाने आणि बदाम १०. एका रेषेत लावायची एका कलरची पाने..कोणी नीट सांगू शकेल का?
रमी - गम्मत म्हणून खेळली तर
रमी - गम्मत म्हणून खेळली तर पत्त्यातला एक मस्त खेळ.. आणि जुगार म्हणून खेळली तर वाट लावणारा खेळ..
मुंबईच्या लोकल, पुणे - मुंबई रोज अपडाऊन करणारे, पुणे लोकल ह्यात प्रचंड फेमस असलेला खेळ. तसेच अनेक क्लब हाऊस मध्ये दिवसरात्र खेळला जाणारा खेळ..
खेळायला लागणारे कमीत कमी पत्ते ५४ (५२ + दोन जोकर) आणि खेळायला लागणारी कमीत कमी माणसे २ जास्तीत जास्त कितीही.. जितकी वाढतील तसे कॅट वाढवायचे..
एकाने पत्ते पिसून खेळाडूंना १३ पत्ते वाटायचे.. त्याच्या डावीकडे बसणार्याने जोकर काढायचा आणि उरलेले पत्ते मध्ये ठेवून उजवी कडच्याने खेळ सुरु करायचा.. म्हणजे खाली उताणे असलेले पान जर हवे असेल तर उचलायचे नाहीतर समोरच्या गठ्ठ्यातून एक पान उचलायचे. ते जर हवे असेल तर ठेवायचे आणि हातातले नको असलेले पान टाकून द्यायचे किंवा ते पान नको असेल तर ते टाकून द्यायचे.. एका वेळेस काही झाले तरी हातात १३च पाने असायला हवी. हे करताना आपल्याकडे पानांचे सिक्वेन्स लागतील असे बघायचे आणि ज्याचे सिक्वेन्स आधी लागतील त्याची रमी लागली..
आता सिक्वेन्स लावायचा म्हणजे काय करायचे तर एकाच प्रकारची तीन किंवा चार पाने सलग हातात आली की एक सिक्वेन्स लागला (उदा. बदामची छक्की, सत्ती आणि अठ्ठी) .
१३ पानात शक्यतो असे चार सिक्वेन्स लावायचे. चार पानांचा एक आणि ३ पानांचे ३ ह्यात पुढचे प्रकार पण ग्राह्य आहेत. ५ पानांचे २ आणि ३ पानांचा १ किंवा ५ पानांचा १ आणि ४ पानांचे २.
हे सिक्वेन्स लावताना तुम्ही जोकर सुद्धा वापरु शकता.. तसे झाले तर तो प्लेन सिक्वेन्स पण जर सिक्वेन्स एकाच प्रकारच्या पानांचा असेल तर तो प्युअर सिक्वेन्स.. रमी पूर्ण होताना. जो खेळाडू रमी झाली असे सांगतो त्याच्या कडे एक प्युअर सिक्वेन्स असणे आवश्यक आहे.. तरच रमी लागली असे गृहित धरले जाते. सिक्वेन्स मध्ये ट्रायो सुद्धा चालतो.. म्हणजे तीन दुर्र्या किंवा तीन नश्श्या.. ट्रायो मध्ये सुद्धा जोकर वापरता येतो.
रमी लागल्यावर उरलेल्या खेळाडूंचे गुण किती ते मोजून मांडायचे. जो ती रमी जिंकला असेल त्याला अधिक गुण आणि बाकीच्यांचे वजा गुण.. असे काही डाव खेळून कंटाळा आलाच (पत्ते खेळताना कंटाळा यायची शक्यता जरा सुद्धा नसते) तर मग बेरीज करुन ठरवायचे कोण विजेता ते.. ज्याचे सगळ्यात जास्त प्लस गुण तो विजेता.
घरगुती खेळताना ७ पानी, १० पानी, १३ पानी असे प्रकार पण खेळता येतात.. तसेच खेळायला दोघेच जणं असतील तर जोकर ठरवताना त्यातही प्रकार करता येतात. जोकर म्हणून काढलेल्या पानाच्या विरुद्ध रंगाचा जोकर घेऊन खेळायचे जेणेकरुन खेळातली रंगत वाढते.. म्हणजे जर बदामचा एक्का जोकर काढलेला असेल तर त्या डावा पुरता इस्पिक आणि किलवरचा एक्का जोकर..
लंपन, मुंगूस ना तो ? तसाच
लंपन, मुंगूस ना तो ? तसाच बदाम सत्ती पण.
माझ्या माहितीप्रमाणे मुंगूसला
माझ्या माहितीप्रमाणे मुंगूसला पेनल्टी असेही म्हणतात.
-गा.पै.
नाही दिनेशदा मुंगुस वेगळा. मी
नाही दिनेशदा मुंगुस वेगळा. मी म्हणत आहे त्यात फक्त चित्र आणि बदामची दश्शी.
गा पै मुंगुस मधे असते पेनल्टी
गा पै मुंगुस मधे असते पेनल्टी जर पान लावले नाहीतर आणि ती सर्वांनी द्यायची असते.
हिम्सकूल लोकलमधे हाच खेळ
हिम्सकूल लोकलमधे हाच खेळ चालतो.
माझी आई मुगुंस खेळताना, आपले
माझी आई मुगुंस खेळताना, आपले पान प्रत्येकाच्या पानाजवळ नेऊन, तूला हवे का रे ? असे विचारत खेळायची. तिला कधीच पेनल्टी मिळायची नाही !
माझ्या लेकीचा आवडता खेळ, ऊनो... पण त्याचे पत्तेही वेगळे असतात.
उनो तर भन्नाट
उनो तर भन्नाट
मला या डावाच नाव आठवत
मला या डावाच नाव आठवत नाहीये.
१. पान ५२. जोकर घ्यायचा नाही. एक्याचा १ पाँईट बाकीचे दस्शीपर्यंत आणि गुलामचे ११ राणीचे १२ राजाचे १३
२. ५-६ जण खेळायचो. जेव्हडेजण गुणिले ३ डाव असायचे. ५ जण असतील तर १५ डाव प्रत्येकी ५ पान वाटायची.
३. ज्याला पहिल पान वाटलय तो ज्यान पान वाटली आहेत त्याच येक पान खेचुन घेणार. त्याच्याकडच्या ६ पानातल तो सगळ्यात भारी/जोड्/तिरट पान खाली टाकणार.
४. पुढच्याला २ पर्याय मिळणार. तो आधीच्याच्या हातातल येक पान खेचणार किंवा आधीच्याने टाकलेल्या पान घेऊन आपल्या हातातल भारी किंवा जोड्/तिरट खाली टाकणार.
५. असा गेम पुढे सरकत जाणार. येखाद्याला जर वाटल की माझ्या हातात सगळ्यात कमी पाँईट्स आहेत आणि त्याची पान खेचण्याची किंवा उचलण्याची बारी आली तर तो गेम डिक्लेअर करणार आणि त्याचे पान दाखऊन हातातले पाँईट्स सांगणार. त्याच्यापेक्षा जर सगळ्यांचे पाँईट्स जास्त असले तर बाकींच्याचे पाँईट्स मांडुन त्याला शुन्य पाँईट्स. जर त्याच्यापेक्षा येकाचे जरी कमी किंवा तेव्हडेच पॉंईट्स असले तर त्याला पेनल्टी पाँईट्स ५० आणि बाकीच्यांचे जेव्हडे असतील तेव्हडे पॉंईट मांडले जायचे.
६. प्रत्येकान कमीत कमी ३ वेळातरी डिक्लेर करायाल हव. जर येखाद्यान २ वेळेसच डिक्लेअर केल तर त्याला सगळे डाव संपल्यावर ५० पेनल्टी + डावाच्या सुरुवातीला ठरलेल अजुन काही पाँईट्स मिळणार. ज्याचे सगळ्यात जास्त पाँईट्स तो हारला.
तुम्ही तुमचा टर्न आल्यावर पान खेचण्याआधी किंवा पान उचलण्या आधीच डिक्लेअर करायच. मी पान टाकल्यावर किंवा पुढच्याने माझ्या हातातल येकमेव पान खेचल्यावर माझ्या हातात येकपण पान शिल्लक नसणार. पण मी लगेच डिक्लेअर करु शकणार नाही. मला माझा टर्न येईपर्यंत वाट पहावी लागणार. त्याच्याआधीच जर अजुन कोणाचे अजुन पान संपले तर मी डिक्लेअर करणार नाही तर आधीच्याच पान खेचणार किंवा त्यान टाकलेल खालच पान उचलणार.जर मी डिक्लेअर केल तर दुसर्याचे पण शुन्य पाँईट असल्यामुळ मला पेनल्टी बसणार.
कॉलेजला असताना जो हारेल तो चहा पाजणार / नाष्टा खिलवणार अस असायच आणि हारलेल्याकडुन ते वसुल पण केल जायचच.
सुशा असले काही नसते उगाच
सुशा असले काही नसते उगाच टाईपलेस एवढे
_सुशांत_ >>> असा गेम
_सुशांत_ >>>
असा गेम पाहिल्याचे किंवा खेळल्याचे अंधुकसे आठवतेय. पण गेम चे नाव माहीत नाही.
रमी पाचतीनदोन साताठ बदामसात ज
रमी
पाचतीनदोन
साताठ
बदामसात
जजमेंट
३०४
मंगूस (पेनॉल्टी)
भिकारसावकार
मेमरी
एकेरी आणि गड्डेरी झब्बू
मेंढीकोट
कॅनेस्ट्रा - २ कॅट्स घेऊन
नॉट अॅट होम
चॅलेंज
मेंढीकोट खेळताना माझी मामी पेपर घेऊन बसायची लोकसत्ता वगैरे कोणतातरी.. "तुम्ही करा उतारी, तोवर मी नि ही (पार्ट्नर) जरा पेपर वाचतो" म्हणून हळूच पेपराआडून खाणाखुणा करून हुकूम किंवा बाकीचे डाव तयार करायची. नुसती धम्माल!
हुकूम फोडायचा म्हणजे डावा
हुकूम फोडायचा म्हणजे डावा डोळा, उजवा डोळा, खालचा ओठ, वरचा ओठ... असले प्रकार व्हायचे. केवढं ते थिल !
एक पत्त्याच्या कॅट मी बघितलाय. त्याला मागच्या बाजूला एक संयुक्त पानाचे डिझाईन असायचे आणि त्याचे तेरा भाग असायचे. त्यापैकी एकात मधली शिर नसायची, त्यावरुन मागूनही ते पान ओळखता यायचे. पण बराच सराव आणि बारीक नजर, लागायची.
कालिनाला, सध्या जिथे कार शोरुम आहे ( आधी होंडाचे शोरुम होती ) तिथे मेट्रो प्लेयिंग कार्ड कंपनी होती, तिथे कार्डस छापली जात असत. ती कंपनी बंद पडूनही बरीच वर्षे झाली.
सात-आठचा सोप्पा खेळ मला व
सात-आठचा सोप्पा खेळ मला व बहिणीला दोघींना फार भांडाभांडी न करता खेळता यायचा, म्हणून आवडायचा.
दोन सत्त्या आणि सत्तीच्या वरची सर्व पाने खेळात घ्यायची. आलटून पालटून दोन खेळगड्यांनी सात किंवा आठ हात करायचे. पाने वाटल्यावर ज्याला आठ हात करायचे आहेत त्याने हुकूम सांगायचा. त्याप्रमाणे हात करायचे. ज्याचे हात कमी होतात त्याचे जितके हात कमी होतील तितके हात पुढच्या डावात ज्याचे हात जास्त झाले असतील त्याने ओढायचे. तो ''हात ओढणे'' हा वाक्प्रचार लै भारी व फारच आवडायचा! एकमेकांचे असे ''हात ओढायला'' टपलेलो असायचो. समोरच्याने हातांचा गठ्ठा केला की त्यातून आपल्या हातांची ''वसुली'' करताना मजा यायची!
सात आठ खेळताना, पहिली ५ पाने
सात आठ खेळताना, पहिली ५ पाने वाटून, हुकूम सांगितला, कि नंतरची दहा पाने वाटताना ती जमिनीवर पाच उलट आणि पाच सुलट अशी ठेवायचो. त्या प्रकारातही मजा यायची.
आम्ही त्यातले फक्त पहिल्या
आम्ही त्यातले फक्त पहिल्या पाच पानांना वाटून झाल्यावर ती बघून हुकूम सांगायचा प्रकार करायचो. पानं उलटी सुलटी ठेवा वगैरे नसायचे.
बरेच घरात मुलांना पत्त्ते
बरेच घरात मुलांना पत्त्ते खेळण्यावर मनाई असते.>> आमच्याकडे होता तो प्रकार.
पाच तीन दोन आणि सात-आठला
पाच तीन दोन आणि सात-आठला लॉटरी नाही का काढायचं कुणी ? चारही सत्त्या घेतल्या की दोन पानांची लॉटरी ठेवता यायची. ज्याच्यावर हुकुम त्याला ती मिळणार. ती घेणे किंवा न घेणे ऑप्शनल पण हातात एखादा रंग नसेल आणि तो लॉटरीत आला तर तो घेणे सक्तीचे. तसंच एखाद्या रंगाचे एकच पान असेल तर लॉटरीत रिप्लेस करुन कटाप करायला परवानगी नाही.
मला काही सॉलिड जादू पण यायच्या. आता साफ विसरलेय
सात आठ खेळताना, पहिली ५ पाने वाटून, हुकूम सांगितला, कि नंतरची दहा पाने वाटताना ती जमिनीवर पाच उलट आणि पाच सुलट अशी ठेवायचो. त्या प्रकारातही मजा यायची. >>> सात-आठ असंच खेळतात ना ? पाच-तीन-दोनला सगळी पानं हातात.
अगो +१
अगो +१
बरेच घरात मुलांना पत्त्ते
बरेच घरात मुलांना पत्त्ते खेळण्यावर मनाई असते.>> आमच्याकडे होता तो प्रकार.>>>>आमच्या घरीही पण उन्हाळी सुट्टीत आईची नजर चुकवून ५-३-२, मेंढिकोट, ७-८, जोडपत्ता खेळायचो.
जोडपत्ता
सात-आठ असंच खेळतात ना ?
सात-आठ असंच खेळतात ना ? पाच-तीन-दोनला सगळी पानं हातात. >> हो गं! पण हा आमच्या ''सोयीचा'' प्रकार होता आम्ही 'शोधलेला'!! इतर कोणाबरोबर कधी सात-आठ खेळायची फारशी वेळच आली नाही. मग मी व बहीण आम्हाला हवे तसे नियम बनवायचो!
Pages