आमच्या गावात एक बाबू देवरुखकर म्हणून व्यक्ती आहे, वय ४५ . तसा मंदबुद्धीच आहे, गावात हमाली ,पेपर टाकणे वगैरे उद्योग तो करतो. पण त्याची स्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे .
लहानपणी शाळेत असताना त्याला मारकुटे मास्तर होते .त्यांच्या माराच्या भीतीने हा बाबू सगळी पुस्तके तोंडपाठ करून टाकी .म्हणजे अमुक धडा वाच,असे सांगितल्यावर पुस्तक नुसते समोर धरून तोंडपाठ धडा घडाघड म्हणून दाखवी.पण धड्यावरील प्रश्न विचारले असता त्यांची उत्तरे त्याला येत नसत ..............साहजिकच सतत नापास होत असल्याने चौथीतून त्याला शाळा सोडावी लागली.
पण गणितात मात्र प्रचंड हुशार! त्याला १ पासून कितीही संख्येचा पाढा विचार, क्षणात उत्तर तयार. १२८७ /१५४८९४ चा पाढा विचारा/, लगेच म्हणून दाखवणार. कितीही संख्येची बेरीज,वजाबाकी,गुणाकार,भागाकार,वर्गमूळ, वर्ग ,इत्यादी सगळे क्षणात उत्तर तयार. तुम्ही कॅल्क्युलेटर घेवून बसलात तरी तुम्ही कॅल्क्युलेटरवर गणित करण्या आधी त्याचे उत्तर तयार असते.
तुम्ही प्रश्न विचारल्यावर तो एक सेकन्दभर नजर आकाशाकडे करून बघतो. आणि उत्तर सांगतो. संख्या फार मोठी असेल तर फक्त तो आकडे म्हणून दाखवतो. उदा.२५ कोटी १२ लाख ७८ हजार ३९८ ही संख्या तुमच्या प्रश्नाचे उत्तर असेल तर तो २५१२७८३९८ असे एकेक आकडे सांगतो. तो जेव्हा आकाशाकडे बघतो, तेव्हा त्याला प्रश्नाचे उत्तर नजरेसमोर दिसते ,असे तो सांगतो.
"स्टार माझा " वाहिनीचे रत्नागिरी प्रतीनिधी सचिन देसाई यांनी नोव्हेंबर २००८ मध्ये या बाबू च्या अचाट आणि अतर्क्य चमत्कारावर आधारित एक मुलाखत घेऊन ती प्रसिद्ध केली होती. "स्टार माझा "वर ती प्रसारित ही झाली होती. त्यापूर्वी विविध स्थानिक वृत्तपत्रातून सुद्धा बाबू बद्दल माहिती प्रसिद्ध झालेली आहे
आधुनिक मेंदू-विज्ञानाला आव्हान ठरू शकणार्या आणि अतींद्रिय शक्तीच्या अभ्यासकांना एक चमत्कार म्हणून अभ्यास करण्यासारखे या बाबुकडे नक्की काहीतरी आहे. गरज आहे ती त्याची दाखल घेण्याची! नाहीतर गेली ४०-४५ वर्षे गावकरी त्याला वेडसर म्हणून दुर्लक्ष करत आहेतच!पण खरेच त्याच्यामध्ये संशोधन करण्यासारखे काही असेल,तर संशोधन व्हायला हवे,असे वाटते...................!धन्यवाद!
शिरीष चव्हाण उर्फ बाबू देवरुखकर
मु.पो.चोरवणे ,व्हाया-पाली
नाणीज जवळ- (रत्नागिरी -कोल्हापूर हायवे.)
ता.संगमेश्वर,जिल्हा-रत्नागिरी.
ह्म्म पण हा "सिनेस्थेसिआ" चा
ह्म्म पण हा "सिनेस्थेसिआ" चा प्रकार असण्याचीच शक्यता आहे - तसेच हे पहिले उदाहरण ही नाही, सिनेस्थेसिआ हा already known, researched and documented आहे. यात दोन किंवा जास्त इन्द्रियांचे "क्रॉस कनेक्शन" लागून त्या व्यक्तीला आकडे रंगीत दिसणे, तारखा 3D मधे दिसणे, सुरांना रंग किंवा वास असल्याचा भास होणे अशी ability तयार होते. मेंदूतला केमिकल लोचा
http://en.wikipedia.org/wiki/Synesthesia#Number_form_synesthesia
पण हा कोणत्याही साधनाशिवाय
पण हा कोणत्याही साधनाशिवाय गणिते सोडवतो मोठमोठी ! अगदी कागद-पेन सुद्धा लागत नाही त्याला ,आणि तेही तुम्ही कॅल्क्युलेटरवर गणित करण्या आधी!!!
होय , ते वाचले. सिनेस्थेसिआ
होय , ते वाचले. सिनेस्थेसिआ हे त्याचे कारण असू शकते, कल्पना करायला अवघड आहे हा प्रकार. पण .
आपण गणित करतो तसे ते करत च नाहीत मुळी. पेन कागद लागण्याचा प्रश्न च नाही.
अशी अजून माणसे आहेत जगात. उदा http://en.wikipedia.org/wiki/Daniel_Tammet या व्यक्तीचे डीटेल्स वाचलेत तर लक्षात येईल की त्याच्यात अन या तुम्ही म्हणताय त्या व्यक्ती मधे खूप साम्य आहे. या व्यक्तीला आकडे वेगवेगळ्या आकारात अन रंगात दिसतात अन त्याचमुळे गणितांचं उत्तर त्यांना इन्स्टन्ट "दिसतं"
"In his mind, he says, each positive integer up to 10,000 has its own unique shape, colour, texture and feel. He has described his visual image of 289 as particularly ugly, 333 as particularly attractive, and pi as beautiful. The number 6 apparently has no distinct image yet what he describes as an almost small nothingness, opposite to the number 9 which he calls large and towering.[7][14] In his memoir, Tammet states experiencing a synaesthetic and emotional response for numbers and words.[15]
Tammet holds the European record for reciting pi from memory to 22,514 digits in five hours and nine minutes on 14 March 2004.[16]"
ही 'केस' इडियो साव्हाँची आहे
ही 'केस' इडियो साव्हाँची आहे ( idiot savant)
http://en.wikipedia.org/wiki/Savant_syndrome
यात अतिंद्रीय काही नाही, पण अभ्यास करण्याजोगे नक्कीच आहे.
Rain Man. डस्टिन हॉफमन व टॉम
Rain Man. डस्टिन हॉफमन व टॉम क्रूझ चा पिक्चर. एक भाऊ ऑटिस्टिक आहे. गणित लै भारी. हा त्याला घेऊन लास वेगासला जातो. अन जिंकतो अशी काहीशी स्टोरी आहे. पिक्चर बघा.
हा चमत्कार वगैरे नाही. कसलीही शष्प अतींद्रीय शक्ती नाही. हा मेंदू नावाच्या इंद्रियाचा ट्विस्ट आहे. बाकी काही समजत नाही, पण एक फॅकल्टी भयंकर स्ट्रॉंग आहे. जसे अंधांना गाणे छान येते. किंवा वाद्य वाजवता येते. तसेच काहीसे.
मानवी मेंदूचा आपला अभ्यास
मानवी मेंदूचा आपला अभ्यास अपुरा आहे. आपल्याला मेंदू पुरता कळालेला आहे असं म्हणता येईल का ? अभ्यास अपूर्ण असणे म्हणजे शास्त्र फसलेय, अतींद्रिय शक्ती सिद्ध झाल्या असं म्हणता येत नाही. अतींद्रिय शक्तीच्या अभ्यासकांनी नक्कीच दावे करावेत. पण हा प्रकार अतींद्रिय शक्तीचा कसा याची समाधानकारक सिद्धता त्यांनी दिलेली नाही आजवर. शास्त्रात उत्तरे नाहीत म्हणजे पॅरानॉर्मल. खरे तर पॅरानॉर्मल सायकॉलॉजीचे अभ्यासक आहेत. ते तार्किक उत्तरे देतात. अर्थात ही शाखाही अपूर्ण आहे हे खरेच.
सध्या डाटा जमवणे आणि मेंदूची रहस्ये उलगडणे या टप्प्यात आपण आहोत. दावे नकोत कसलेच. अशी रहस्य उलगडायला किती वर्षे लागतील हे सांगता येत नाही. पण शास्त्राची नेत्रदीपक प्रगती पाहता तो दिवस दूर नाही.
मैत्रेयी, तुम्हाला कॉम्प्युटर
मैत्रेयी,
तुम्हाला कॉम्प्युटर 'पूर्ण' कळला आहे का हो?
उत्तर जर 'नाही' असेल, तर 'तुमचा' अभ्यास फसला आहे. 'आपला' नाही.
बघा मी काय म्हणतोय ते ध्यानी येतंय का ते.
इब्लिस, मैत्रेयी तेच
इब्लिस, मैत्रेयी तेच म्हणताहेत.
शास्त्र फसले नाहीच.
वरच्या माझ्या पोस्टमधे
वरच्या माझ्या पोस्टमधे वाक्यरचना थोडी चुकली आहे. क्षमस्व !
अतींद्रिय शक्तीच्या अभ्यासकांनी नक्कीच दावे करावेत. इथे नक्कीच दावे करतील असे म्हणायचे होते. शास्त्रात उत्तरे नाहीत म्हणजे पॅरानॉर्मल अॅक्टीव्हिटीजशी संबंध जोडून ते मोकळे होतात.
वरील वाक्ये अशी वाचावीत ही विनंती.
सुपर मॅन नावाची सिरीयर
सुपर मॅन नावाची सिरीयर डिस्कव्हरी ( बहुदा ) चालली आहे त्यावर ह्याच धर्तीचा एक सुपरमॅन काही दिवसांपुर्वी दाखवला. त्याला सुध्दा बारा आकडी संख्या गुणीले बारा आकडी संख्या कोणत्याही साधनाशिवाय कॉप्युटर पेक्षा जलद गुणाकार यायचा.
न्युरोलॉजीस्टच्या मते मेंदुत एक आकडेमोड करणारे केंद्र सामान्य माणसाच्या मेंदुत हे सर्व करते. पण या माणसाच्या बाबतीत मेंदुच्या कोणत्याही उपलब्ध्द पेशी हे कार्य करतात या करीता हे कार्य जलद होते.
या ही सुपरमॅनच्या बाबतीत असेच काहीसे असावे.
नाणीज जवळ आहे.. नरेंद्र
नाणीज जवळ आहे.. नरेंद्र महाराजांची कृपा असणार.
बाबुचे वय नरेन्द्र
बाबुचे वय नरेन्द्र महाराजापेक्षा जास्त आहे आम्बाभावु
त्याचा काय संबंध ??? नरेंद्र
त्याचा काय संबंध ??? नरेंद्र महाराजानी जन्माला येण्यापूर्वीच ही लीला केली असेही सांगता येइल की.. शेवटी कितीही झाले तरी ते म्हाराज आहेत.
हाँग काँग मधे अगदी लहान
हाँग काँग मधे अगदी लहान मूलांना अशी अवघड गणिते, क्षणार्धात करायचे प्रशिक्षण दिले जाते, अशी एक क्लीप मी बघितली होती. म्हणजे काही खास प्रशिक्षणाने, ही क्षमता मिळवता येते.. अर्थातच हि व्यक्ती दखल घेण्याजोगी नक्कीच आहे. चमत्कार म्हणण्यापेक्षा, काही विधायक कार्यासाठी, या क्षमतेचा वापर व्हायला हवा.
रतन उद्योग यांच्याशी संपर्क
रतन उद्योग यांच्याशी संपर्क साधला का ?
अशी माणसे ही पुर्वजन्मात खुप
अशी माणसे ही पुर्वजन्मात खुप हुशार असली पाहिजेत. आणि काही कारणाने या जन्मात ती सर्व हुशारी जाऊन फक्त एखादाच भाग चांगला शिल्लक राहिला असणार.