Submitted by श्रीयू on 19 October, 2012 - 16:23
शत जन्म शोधिताना.. या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अजरामर काव्याचे रसग्रहण करण्यासाठी हा धागा सुरु केला आहे. मायबोली वरील मान्यवरांनी कृपया या कवितेचा अर्थ,संदर्भ,रसग्रहण इथे लिहावे. शिवाय या कवितेवरील माहिती, इतर संदर्भ, मान्यवर कवी/लेखकांनी केलेले रसग्रहण इथे टाकल्यास स्वागतच..
शत जन्म शोधिताना | शत आर्ति व्यर्थ झाल्या |
शत सूर्य मालिकांच्या | दीपावली विझाल्या ||
तेव्हा पडे प्रियासी | क्षण एक आज गाठी |
सुख साधना युगांची | सिद्धीस अंती गाठी ||
हा हाय जो न जाई | मिठी घालु मी उठोनी |
क्षण तो क्षणात गेला | सखी हातचा सुटोनी ||
कवी: स्वातंत्र्यवीर सावरकर
नाटक: सन्यस्तखड्ग
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी-भास्कर: आमच्या अकोल्याला
मी-भास्कर: आमच्या अकोल्याला मागे एकदा वसंत व्याख्यानमालेत मी प्रा. राम शेवाळकरांच 'सावरकरांचं साहित्य' या विषयावर व्याख्यान ऐकलं होतं. निव्वळ अविस्मरणीय !!
सावरकर म्हणजे जयोस्तुते,ने मजसी ने आणि माझी जन्मठेप एव्हढेच म्या पामराला ठाऊक होतं. पण शेवाळकरांच ते व्याख्यान म्हणजे माहितीचा अक्षरशः धबधबा होता.
सावरकरांच्या साहित्या बद्दल अप्रतिम विवेचन त्यांनी केला होतं.. त्या कार्यक्रमाची 'सांगता शत जन्म शोधिताना' या नाट्य गीताने झाली होती. पण या गाण्याबद्दल शेवाळकर बोलल्याचं स्मरत नाही.
तेव्हापासून या गाण्याबद्दल एक कुतूहल होतं. अनेक गायकांनी गायलेले हे गीत मिळाले पण त्याचा अर्थ किंवा संदर्भ मिळत नव्हता. आता मायबोली वर या गाण्याबद्दल खूपच माहिती मिळते आहे.
येथील मान्यवरांच्या मदतीने सुंदर रसग्रहण वाचायला मिळेल याची खात्री आहे.
हे गाणं जेव्हा ऐकतो तेव्हा एक विचित्र हुरहूर लागून राहते. त्यात हे गाणं भैरवी रागातलं.. सावरकरांचे प्रत्ययकरी शब्द आणि त्याला भैरवी च्या सुरांची झालर. क्षण तो क्षणात गेला या ओळी तर प्रत्येक वेळी एक वेगळाच अर्थ सांगून जातात.
जमेल तेव्हा संगीताच्या अनुषंगाने या गाण्याचं रसग्रहण लिहिण्याचा प्रयत्न करेन..
@आंबा१ | 27 October, 2012 -
@आंबा१ | 27 October, 2012 - 21:09
दामोदररावांचे कौतुक साक्षात भास्कराने करायचे!!!!! <<
जरा लक्ष देऊन वाचा. इथे दामोदररावांचे कौतुक केलेले नाही. इथे दामोदरसुताचे म्हणजेच विनायकाचे अत्यंत आदरपूर्वक कौतुक भास्कराने केलेले आहे.
आणी नंतर अक्षय जोग, दामोदरसुत
आणी नंतर अक्षय जोग, दामोदरसुत अशांचे लेख वाचून माझी ही इच्छा आणखीच वाढली. ती अशा धाग्यांमुळे पुरी होण्याची आशा वाटते.
आम्हाला वाटले, दामोदरसुत म्हणजे ते मायबोलिअवरचे दामोदरसुत !! ( त्याना आम्ही कधीकधी गडबडीत दामोदरच म्हणतो. ) नामसाधर्म्य !!
प्लिज या धाग्यावर या
प्लिज या धाग्यावर या काव्याबद्दलच बोला
बाकीच्या खोड्या एकमेकांच्या विपुत काढा.
'आर्ति' हा शब्द मराठीत फारसा
'आर्ति' हा शब्द मराठीत फारसा वापरात नसला तरी 'आर्त' मात्र वापरात आहे. 'आर्त जीवांचे,' 'आर्त स्वर' या शब्दांमध्ये तो दु:ख, दु:खी या अर्थाने वापरला जातो. आपट्यांच्या 'शब्दरत्नाकर'मध्ये 'आर्त'चा अर्थ "पीडलेला" आणि स्त्रीलिंगी असेल तर "उत्कट इच्छा" असा दिलेला आहे. 'आर्ति'चाही तोच अर्थ सांगितला आहे.
अश्विनी के | 28 October, 2012
अश्विनी के | 28 October, 2012 - 11:02 नवीन
प्लिज या धाग्यावर या काव्याबद्दलच बोला बाकीच्या खोड्या एकमेकांच्या विपुत काढा.
<<
१००% मान्य.
थोडे अवांतर : आरत्यांमध्ये
थोडे अवांतर : आरत्यांमध्ये ज्या आर्ततेने देवाची आळवणी केली जाते ते पाहाता आरती हा शब्द आर्त वरून आला असेल का?
अवल आणि चैतन्य, आर्ति
अवल आणि चैतन्य, आर्ति शब्दाच्या अर्थाबद्दल आभार.
आरत्यांमध्ये ज्या आर्ततेने
आरत्यांमध्ये ज्या आर्ततेने देवाची आळवणी केली जाते ते पाहाता आरती हा शब्द आर्त वरून आला असेल का? >>> हो.
आरती हा शब्द संस्कृत
आरती हा शब्द संस्कृत 'आर्तिक्य' ह्या शब्दावरून आला आहे (अथवा असावा)
पूजेच्या श्लोकात 'कर्पूरार्तिक्यं दर्शयामि' म्हणतात.
वर कंसात 'अथवा असावा' असे लिहिले ह्याचे कारण मोनेअर विल्यम्स डिक्श्नरीत 'आर्तिक्य' हा शब्दच मिळाला नाही. अर्थात, एका डिक्श्नरीत मिळाला नाही म्हणजे तो शब्दच अस्तित्वात नाही असे नाही, पण 'आर्तिक्य' संस्कृत शब्द वाटतो तरीही त्याचा धातू कोणता इ. बद्दल काहीच माहिती मिळत नाहिये.
थोडा शोध घेतला असता 'आरात्रिक' हा शब्द सापडला.आर्तिक्य किंवा आरती हा शब्द त्यावरूनच आला असावा असा अंदाज आहे.
एका लिंकवर 'आर्तिक्य'चा अर्थ मिळाला पण तोही बहुतेक 'मोल्सवर्थ'डिक्श्नरीतला (मराठी-इंग्रजी) वाटतोय.
http://www.marathidictionary.org/meaning.php?id=5136&lang=Marathi
चैतन्य म्हणतोय तसंच वाटतय
चैतन्य म्हणतोय तसंच वाटतय मलाही.
आर्त याच्याशी आरतीचा संबंध नसावा.
माझा तरी नक्की नाही
(अवांतर) 'आर्ति'क्युलेट
(अवांतर)
'आर्ति'क्युलेट आर्ग्युमेंट, चैतन्य!
@ भारती बिर्जे
@ भारती बिर्जे डि...
'जगन्नाथाचा रथोत्सव' चे रसग्रहण करण्याच्या विचारात असाल तर ती कविता पाठवीन.
मी भास्कर ! >> @ भारती बिर्जे
मी भास्कर !
>> @ भारती बिर्जे डि...
'जगन्नाथाचा रथोत्सव' चे रसग्रहण करण्याच्या विचारात असाल तर ती कविता पाठवीन.>>
खूप आश्चर्य अन आनंद. योग्यता बेताची आहे, पण प्रयत्न नक्कीच करेन. धन्स.
@भारती बिर्जे डि... | 29
@भारती बिर्जे डि... | 29 October, 2012 - 18:05 नवीन
मी भास्कर !
>> खूप आश्चर्य अन आनंद. योग्यता बेताची आहे, पण प्रयत्न नक्कीच करेन. धन्स.<<
सोबत काव्य टंकले आहे.
कृपया या रसग्रहणासाठी वेगळा धागा काढा म्हणजे त्या त्या काव्याला धरूनच चर्चा होईल.
जगन्नाथाचा रथोत्सव- स्वातंत्र्यवीर सावरकर
(अंदमानात जन्मठेप भोगत असतांना केलेले हे काव्य)
ऐश्वर्ये भारी। या अशा । ऐश्वर्ये भारी
महाराज, आपुली कथा ना कुठे निघे स्वारी ॥ध्रु॥
दिक् क्षितिजांचा देदिप्य रथ तुझा सुटता
ह्या कालपथाच्या अतुट उतरणीवरता
नक्षत्रकणांचा उठे धुरळा वरता
युगक्रोश दूरी। मागुती। युगक्रोश दूरी
महाराज, आपुली कथा ना कुठे निघे स्वारी?
(२)
पुसूं नयेचि परी। पुसतसे। पुसूं नयेचि परी
मिरवणूक ही किमर्थ अथवा कुठे निघे सारी
दुज्या कुण्या द्वारीं। जावया। दुज्या कुण्या द्वारीं
किंवा केवळ मिरवित येई परत निजागारी
ह्या सूर्यशतांच्या किति मशाली जळती
मधुनीच शतावधि चंद्रज्योति ह्या अडती
सरसरत बाण हे धूमकेतूचे सुटती
कितिदा आणि तरी। हीहि तैं। कितिदा आणि तरी।
उठे चमकुनी रात्रि पुरातन तिच्या अंधकारी
(३)
जीवाचीच किति। कथा या । जीवाचीच किति
रथासी जगन्नाथ , तुझ्या या ओढूं जे झटती
ज्वालामुखि पंक्ती-। पासुनी । ज्वालामुखि पंक्ती
मज्जापिंडापर्यंत प्रस्फुटीता जी जगती
उंचनिंच पाठीं। पुढति वा । उंचनिंच पाठीं
गति तितुकी तव रथ झटतसे ओढायासाठी
इच्छांत आणि या भूतमात्र वेगांच्या
ओवून लगामा तुझ्या परम इच्छेच्या
त्या अतुट उतरणीवरती हो काळाच्या
खेळत हा अतलीं। रथोत्सव। खेळत हा अतलीं
महाराज, आपुली कथा ना कुठे निघे स्वारी?
Heavy stuff ! धन्स मी भास्कर!
Heavy stuff !
धन्स मी भास्कर! माझी झोप उडालीच. :))
वेगळा धागा काढेन..
समग्र सावरकर वाङ्मय ७वा खंड
समग्र सावरकर वाङ्मय ७वा खंड काव्य-नाटक विभाग असा आहे आणि त्यामध्ये संन्यस्त खड्ग हे संपूर्ण नाटक
दिलेले आहे. य़ा नाटकाचे कथानक थोडक्यात असे आहे:
ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर गौतमबुध्द पित्याला भेण्यासाठी कपिलवस्तूत येतो.भेटीनंतर तो त्याची आई, पत्नी आणि
लहान मुलगा राहुल यांना बुध्द धर्माची दीक्षा देतोच पण शाक्यांचा सेनापती विक्रम(सिंह) यालाही बुध्द धर्माचा
स्वीकार करण्याचा आग्रह करतो. दुःख नाशासाठी बुध्दाने सांगितलेला मार्ग पटत नसतानाही आपल्या नका्रामुळे
त्याचा नवीन धर्म स्थापनेचा प्रयोग फसू नये म्हणून विक्रम संन्यास घेतो. त्यावेळी त्याचा मुलगा वल्लभ (सिंह) केवळ दीड असतो.
@मधुकर केळकर | 11 February,
@मधुकर केळकर | 11 February, 2013 - 21:14
समग्र सावरकर वाङ्मय ७वा खंड काव्य-नाटक विभाग असा आहे आणि त्यामध्ये संन्यस्त खड्ग हे संपूर्ण नाटक
दिलेले आहे. य़ा नाटकाचे कथानक थोडक्यात असे आहे:
ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर गौतमबुध्द पित्याला भेण्यासाठी कपिलवस्तूत येतो.भेटीनंतर तो त्याची आई, पत्नी आणि
लहान मुलगा राहुल यांना बुध्द धर्माची दीक्षा देतोच पण शाक्यांचा सेनापती विक्रम(सिंह) यालाही बुध्द धर्माचा
स्वीकार करण्याचा आग्रह करतो. दुःख नाशासाठी बुध्दाने सांगितलेला मार्ग पटत नसतानाही आपल्या नका्रामुळे
त्याचा नवीन धर्म स्थापनेचा प्रयोग फसू नये म्हणून विक्रम संन्यास घेतो. त्यावेळी त्याचा मुलगा वल्लभ (सिंह) केवळ दीड असतो.
<<
कथानकाचा पूर्ण मजकूर येथे आलेला दिसत नाही. कृपया य़ा नाटकाचे कथानक थोडक्यात द्याल का?. श्री चैतन्य दिक्षितांनी 'शतजन्म' पदाआधीपर्यंतचे कथानक थोडक्यात दिले आहे. पण पूर्ण नाही.
समग्र सावरकर वाङ्मय ७वा खंड
समग्र सावरकर वाङ्मय ७वा खंड काव्य-नाटक विभाग असा आहे आणि त्यामध्ये संन्यस्त खड्ग हे संपूर्ण नाटक
दिलेले आहे. य़ा नाटकाचे कथानक थोडक्यात असे आहे:
ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर गौतमबुध्द पित्याला भेण्यासाठी कपिलवस्तूत येतो.भेटीनंतर तो त्याची आई, पत्नी आणि
लहान मुलगा राहुल यांना बुध्द धर्माची दीक्षा देतोच पण शाक्यांचा सेनापती विक्रम(सिंह) यालाही बुध्द धर्माचा
स्वीकार करण्याचा आग्रह करतो. दुःख नाशासाठी बुध्दाने सांगितलेला मार्ग पटत नसतानाही आपल्या नका्रामुळे
त्याचा नवीन धर्म स्थापनेचा प्रयोग फसू नये म्हणून विक्रम संन्यास घेतो. त्यावेळी त्याचा मुलगा वल्लभ (सिंह) केवळ दीड वर्षचा असतो.
यानंतर चाळीस वर्षांचा काळ जातो. वल्लभाची शाक्यांचा सेनापती म्हणून नेमणूद झालेली असते.त्याने कोलीय
वशाच्या सुलोचना नामक स्रीशी विवाह केलेला असतो.त्यांच्या प्रीतिविवाहास एक वर्ष झाले आहे आणि सुलोचना
तो सण साजरा करण्यासाठी वल्लभाची वाट पहात असते. वल्लभ येतो,त्यांचे प्रेमालाप चालू असतात. कामदेवाच्या पूजेसाठी सुलोचना माला गुंफत असते. सोंगट्यांचा पटही तिने मांडून ठेवलेला असतो आणि
त्याचवेळी दरबारातून त्याला तातडीचे बोलावणे येते कारण शाक्य राज्यावर कोसलाचा राजा विद्युत्गर्भ याने
हल्ला केलेला असतो. क्षणाचाही विलंब न करता वल्लभ दरबारात जातो आणि सुलोचनेचा निरोप न घेताच
युद्धावर निघून जातो.युद्धात तो शत्रूचा बंदिवान होतो. ही बातमी सुलोचनेस मिळते (अंक ३ प्रवेश २रा) ती तिच्या
सखीस,नलिनीस म्हणते:की मीही आता वीरवेष धारण करून शत्रूवर हल्ला करणार. या तिच्या निश्चयानंतर
हे पद तिच्या तोंडी आहे.
आर्ति म्हणजे ओढ. अनंत काळ आणि अनेक जन्म मी माझ्या प्रियकराची-वल्लभाची वाट पाहिली तेंव्हा माझी
सुखसाधना सिध्दीस गेली प्रियकराशी मीलन झाले.पण हे मीलनही क्षणाचेच ठरले! मी उठून त्याला आलिंगन
देणार होते पण क्षण तो क्षणात गेला सखि हातचा सुटोनी.
य़ा पुढच्या नाटकाच्या कथानकाची ह्या पदाचा अर्थ समजण्यासाठी आवश्यकता नसल्याने येथेच थांवतो.
अंतरजालावर हे एक रसग्रहण
अंतरजालावर हे एक रसग्रहण मिळाले आहे #शत जन्म शोधितांना
शत जन्म शोधिताना- कवी स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर
शत जन्म शोधिताना | शत आर्ति व्यर्थ झाल्या |
शत सूर्य मालिकांच्या | दीपावली विझाल्या ||
तेव्हा पडे प्रियासी | क्षण एक आज गाठी |
सुख साधना युगांची | सिद्धीस अंती गाठी ||
हा हाय जो न जाई | मिठी घालु मी उठोनी |
क्षण तो क्षणात गेला | सखी हातचा सुटोनी ||
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनीं त्यांचे संगीत नाटक 'सन्यस्त खड्ग 'या साठी लिहीलेले हे नाट्यगीत आहे.पंडित दीनानाथ मंगेशकर, वसंतराव देशपांडे, प्रभाकर कारेकर आणि अन्य अनेक गायकांनीही हे गीत सुस्वर गायले आहे.केवळ स्वतंत्र गीतास समोर ठेवून या गीताचा अर्थ समजणे अशक्य आहे.त्यामुळेच असे प्रयत्न करून ही अर्थ समजण्याचे माझे प्रयास विफल झाले परंतु 'सन्यस्त खड्ग' नाटकाची पूर्वपृष्ठभूमी वाचल्यावर गीताचा अर्थ आपोआप स्पष्ट झाला आणि हे देखील स्पष्ट झाले की कुठल्याही कवितेचा संदर्भाशिवाय अर्थ लावण्याचा प्रयत्न करू नये.
य़ा नाटकाचे कथानक बुध्दकालीन आहे.गौतमबुध्द ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर पिता शुद्धोधन यास भेण्यासाठी शाक्यांची राजधानी कपिलवस्तूत येतो.त्याच्या वडील, आईस, पत्नीस आणि मुलगा राहुल यांना बुध्द धर्माची दीक्षा देतोच पण शाक्यांचा सेनापती विक्रम देव यालाही बुध्द धर्माचा स्वीकार करण्याचा आग्रह करतो.विक्रमदेव यांना मात्र निर्वाणाचा मार्ग उपदेशून सहस्त्रावधी लोकांस संन्यास देणे लोकविघातक वाटते.दुःख नाशासाठी बुध्दाने सांगितलेला मार्ग पटत नसतानाही आपल्या नका्रामुळे त्याचा नवीन धर्म स्थापनेचा प्रयोग फसू नये म्हणून विक्रम संन्यास घेतो.त्यावेळी त्याचा मुलगा वल्लभ केवळ दीड वर्षाचा असतो.राज्यातील अधिकांश जनताही सन्यास घेते.
चाळीस वर्षां नंतर वल्लभाची शाक्यांचा सेनापती म्हणून नेमणूक होते.त्यापूर्वी त्याने कोलीय वंशाच्या सुलोचना नामक स्त्रीशी प्रीति विवाह केलेला असतो.त्यांच्या प्रीतिविवाहास एक वर्ष झाले असून सुलोचना तो सण साजरा करण्यासाठी वल्लभाची वाट पहात असते.वल्लभ येतो आणि त्यांचे प्रेमालाप चालू असताना कामदेवाच्या पूजेसाठी सुलोचना माला गुंफत असते. सोंगट्यांचा पटही तिने मांडून ठेवलेला असतो आणि त्याच वेळी कपिलवस्तू दरबारातून वल्लभला तातडीचे बोलावणे येते की शाक्य राज्यावर कोसलाचा राजा विद्युत्गर्भ याने हल्ला केला आहे.शाक्यातील अधिकांश जनतेने संन्यास घेतलेला आणि कपिलवस्तू राजनगरी पराक्रमशून्य बनलेली असताना एक सरदार पुन्हा सेनापती वल्लभ कडे येतो.काहीही विलंब न करता वल्लभ दरबारात जातो आणि सुलोचनेचा निरोप न घेताच युद्धावर निघून जातो. ही बातमी सुलोचनेस मिळते ती तिच्या सखी नलिनीस म्हणते की मीही आता पुरूषी वेष धारण करून शाक्य सैन्यात दाखल होऊन शत्रूवर हल्ला करणार. हे पद सखीस उद्देशून सुलोचना म्हणते आहे.
शत जन्म शोधिताना | शत आर्ति व्यर्थ झाल्या |
शत सूर्य मालिकांच्या | दीपावली विझाल्या ||
तेव्हा पडे प्रियासी | क्षण एक आज गाठी |
सुख साधना युगांची | सिद्धीस अंती गाठी ||
हा हाय जो न जाई | मिठी घालु मी उठोनी |
क्षण तो क्षणात गेला | सखी हातचा सुटोनी ||
ती म्हणते की सखे! मी माझ्या प्रियकराचा शोध अनेक जन्मापासून घेत होते परंतु मीलनाची माझी उत्कट इच्छा एकाही जन्मात पूर्ण झाली नव्हती.माझ्या आणि प्रियकराच्या विरहाच्या या अनेक युगांच्या दीर्घ अवधीत सूर्याच्या भोवती अनेक खगोलीय ग्रह आणि उपग्रह आपापले प्रकाश पुंज घेऊन परिक्रमा करत राहिले परंतु माझी इच्छा अपूर्णच राहिली होती. माझी युगायुगांची साधना अचानक या जन्मी सिद्धीस आली आणि प्रियकराशी अल्पावधीसाठीच गाठ पडली.आज माझ्या प्रीतिविवाहाची पहिली वर्षगाठ साजरा करण्यासाठी मी उठून त्याला आलिंगन देणार होते पण आलिंगनाचा तो क्षण अचानक राजदरबारातून आलेल्या युद्धाच्या बातमीमुळे हातून सुटला आणि मीलनाची इच्छा पुनः अपूर्णच राहिली.
********************************************************************
न वा अरे सर्वस्य कामाय सर्वं
शतजन्म शोध
की एकाच वर्तुळाचा बिंदू ज्याला मिती नाही. .
सखा सखी द्वैतभाव
याज्ञवल्क्य मैत्रेयी संवाद
न वा अरे सर्वस्य कामाय सर्वं प्रियं भवति।
आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवति।।
" स्व " च्या शोधाला अनेक जन्म अपुरे आहेत. .
सख्यत्वा च्या जोडी चे रूपक वापरले आहे. .
शिव पार्वती या संकल्पनेत शिव हा सन्यस्त आहे. .
क्षणात् शक्ति मीलन दर्शवते. .
बाकी सर्व भासमय आहे. .
आत्मा जीवात्मा परमात्मा हा त्रैतवाद दोन पक्षी व आधारभूत शाखा. .
द्वा सुपर्णा सयुजा सखाया समानं वृक्षं परिषस्वजाते।
तयोरन्यः पिप्पलं स्वाद्वत्त्यनश्नन्नन्यो अभिचाकशीति॥
एके हाती दंतु। जो स्वभावता
एके हाती दंतु। जो स्वभावता खंडितु।
तो बौद्धमतसंकेतु। वार्तिकांचा॥
ज्ञानेश्र्वर हा विरोधाभास व्यक्त करते झाले.
शाक्य राजाच्या काळात खड्ग संन्यस्त झाले
परंतू परचक्रामुळे जी चर्चा उद्भवली त्याचे नाट्य अनादि आहे.
रामायण महाभारत याच बिंदू भोवती फिरते.
कवि यशवंत यांची " युगंधरांचे पालुपद " कविता याच बिंदू भोवती वेढे घालते.
शतआर्ति ह्या अनंत आहेत त्या स्वाभाविकत: व्यर्थ होण्यासाठी च असाव्यात.
Pages