Submitted by रूनी पॉटर on 10 March, 2011 - 17:20
या अगोदरचा पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१ धागा.
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल
इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्यास सोपे पडेल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तव्यावरच्या पिठल्यासाठी आई
तव्यावरच्या पिठल्यासाठी आई जरा खोलगट लोखंडी तवा वापरते. जरा सढळ तेलात मोहरी-हळद-हिंग फोडणी करुन त्यात लसणाच्या पाकळ्या घालायच्या. छान लाल झाल्या की फोडणीच्या तेलातच तिखट घालायचे. लगेच डाळीच्या पिठाचे मिश्रण घालायचे. भरपूsssर कोथिंबीर घालायची. भराभर हलवून वाफ आणायची. हे पिठले बर्यापैकी घट्ट असते. त्यामुळे पाणी जरा बेताने घालायचे. कोथिंबीर त्या मिश्रणातच घालून ठेवली तरी चालेल.
अंजली_१२ धन्सं, ट्राय करते
अंजली_१२ धन्सं, ट्राय करते
गोडाचा शिरा करायचाय. प्रमाण
गोडाचा शिरा करायचाय. प्रमाण वगैरे बरोब्बर आहे सगळं... पण बेसिकात जरा सल्ला हवाय. म्हणजे कसं... शिरा गार झाला तरी मऊमऊऽऽच राहील असा हवाय.

गिच्च गोळा नको, ढेकळासारखा होणारा नको, फळफळीत रवा लागेलसा मोकळा नको, आणि पुरेसा कोमट झाल्यावर वाडग्यात काढला तर गार झाल्यावर वाडग्याचाच आकार येईल असाही नको! तर, रवा कोणता घ्यायचा? जाड रवा की बारीक?
बाकी दूध-तूप सढळ हाताने आहे.!
जमणार नाही, खीर करा. थंड
जमणार नाही, खीर करा.
थंड (फ्रीजमध्ये) झाल्यावर पदार्थातले तूप थिजते, ते कोरडे दिसतात, भांड्याचा आकार येणे इ. त्यामुळे होते. दूध-तूप सढळ हाताने आहे म्हणताय तर गरम केल्यावर पुन्हा सगळे ठीक होईल.
गार शिरा खायला देऊ नका.
शोध मधे "दिवाळी फराळ" लिहीले
शोध मधे "दिवाळी फराळ" लिहीले तर दिसायला पाहिजे. ही घ्या लिंक...
http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/2438.html
प्रज्ञा, रवा जाडाच घे. सगळे तुप आधीच घालु नकोस. २-३ चमचे तुप शिरा होत आल्यावर घाल.
प्रज्ञा९, विद्याक +१ आणि
प्रज्ञा९, विद्याक +१ आणि तिप्पट पाणी+दूध.
धन्यवाद सिंडरेला! आता करुन
धन्यवाद सिंडरेला!
आता करुन बघेनच.
मंजूडी, तिप्पट पाणी? पण तिला
मंजूडी, तिप्पट पाणी? पण तिला खुप नरमही नको आहे. तेव्हा दुप्पट दुध ठिक आहे. मी सर्व दुधच (२%)वापरते.
विद्याक आणि मंजुडी, ना तेरा
विद्याक आणि मंजुडी, ना तेरा ना मेरा मी अडीच पट पाण्यावर फिक्स आहे सध्या... सढळ तूप असेल तर धिस वर्क्स..;)
आता प्रज्ञाला तीन प्रकारे करून एक कायते फायनल प्रमाण आम्हालाच सांगावे लागेल
वेका!!! स्मित!!! एव्हाना तिचा
वेका!!! स्मित!!! एव्हाना तिचा शिरा करुनही झाला असेल. आपण त्यापेक्षा तिच्याकडे शिरा चाखायलाच जाउ या. काय गं प्रज्ञा , येउ का आम्ही तिघी?
विद्याक मनापासून धन्यवाद!
विद्याक मनापासून धन्यवाद!
अजून रवा दुकानात आहे थंड
अजून रवा दुकानात आहे

थंड म्हणजे फ्रिजातला नाही, सकाळी करून डब्यात नेला तर ४ तासांनी मऊ राहील असा.
केला की सांगते प्रमाण
धन्यवाद सगळ्यांनाच!
----------------
जमला मला हवा तसा शिरा! आमटीची एक वाटी शिगोशीग भरून बारीक रवा (जाड रवा संपला होता. पुढच्या वेळी तो आणला की करीन) अर्धी वाटी तुपात मंद आंचेवर भाजून घेतला. तीन वाट्या दुधात शिजवला. दुधाच्या आधणातच केशरपूड, वेलची घातली. वाफ काढताना बदाम चुरा, बेदाणे. मग साखर अर्धी वाटी. आमच्याकडे बेताचंच गोड लागतं, नाहीतर अजून साखर खपेल. आणि शेवटी गॅस बंद करायच्या आधी ३ चमचे तूप बाजूने सोडून अर्धं मिनिट वाफ काढली. फार्फार छान!
प्रज्ञा, करताना पाणी+ दूध हे
प्रज्ञा, करताना पाणी+ दूध हे अगदी रव्याच्या दुप्पट न घेता जरा जास्तच घे तरच मऊ होईल तुला हवा तसा.
canned tuna चं tuna melt
canned tuna चं tuna melt सोडून आणखी काय करता येईल? नेहमी नेहमी तेच करून ़कंटाळा आला आहे. One dish
चालेल.
ट्यूनाचं फोडणीचं. चेष्टा
ट्यूनाचं फोडणीचं.
चेष्टा नाही. तेलात लसणावर परत, मालवणी मसाला घाल. चपातीबरोबर खा.
खरंच ़ काय? ट्राय करते. पण
खरंच ़ काय? ट्राय करते. पण त्याला काही आंबट नाही घालावं लागत?
नाही. पण लिंबू पिळला तरी
नाही. पण लिंबू पिळला तरी चालेल. मोठे चन्क्स असतील तर कालवणातही घालता येतील.
वेका, त्या कॅन्ड ट्युनाचं
वेका, त्या कॅन्ड ट्युनाचं फ्राईड फिश/ तुकड्या करता येतात का? शक्य असेल तर माझ्याकडे त्या मसाल्याची (साऊथ इंडियन स्टाइल) रेसिपी आहे. तुला लगेच नको असेल तर रात्री देऊ शकेन विपुत.
इथे ट्यूनापास्त्याची पाककृती
इथे ट्यूनापास्त्याची पाककृती आहे. करून बघितली तर कशी झाली ते कळव. मी पण करीन.
चालेल सायो...रेसिपी देऊन
चालेल सायो...रेसिपी देऊन ठेव..आजच करणार होते. पण माझ्याकडे हा ट्युना महिन्यांतून एकदा तरी असतो तेव्हा ट्राय करेन...
मृ पास्ता सध्या वेटींग लिस्टवर ठेवायला लागेल....कदाचीत माझ्या आधी तुझाच करून होईल...
लोला तुझी विपु बंद आहे म्हणून
लोला तुझी विपु बंद आहे म्हणून इथेच लिहिते फंडू रेसिपि आहे...काल केली होती ...एकदम हिट.:)
डोशासाठी करतो ती नारळाची चटणी
डोशासाठी करतो ती नारळाची चटणी उरली आहे.काय करता येइल?
उसळीला, भाजीला वाटण म्हणून
उसळीला, भाजीला वाटण म्हणून वापरता येइल.
कोणती भाजी?नवर्याने त्यात
कोणती भाजी?नवर्याने त्यात थोडा लसुण पण घातला आहे?
चटणी घालून पराठे पण चांगले
चटणी घालून पराठे पण चांगले होतील.
ओके करुन बघते..धन्यवाद
ओके करुन बघते..धन्यवाद
साधारण ज्या रस्सा भाज्यांना
साधारण ज्या रस्सा भाज्यांना वाटण लावत असाल त्या. किंवा ग्रीन बीन्स ची भाजी पण ह्या वाटणाची चांगली लागते. उसळीला तर सहज वापरता येइल. (मूग, मटकी, मसूर, चवळी)
गुडदानी... शेंगदाना आणी
गुडदानी... शेंगदाना आणी राजगीरा वापरुन करतात त्याची रेसिपी हवि आहे
अवल मी पण त्या पुर्या आणते.
अवल मी पण त्या पुर्या आणते. माझ्याकडे आहे फोटो मी टाकते. एक्दम बॉल सारख्या दिसतात. एकाच आकाराच्या!
बिग बझार मधे मेजरिंग कप
बिग बझार मधे मेजरिंग कप घ्यायला गेले तर २ वेगवेगळ्या रंगामधे वेगळे मेजर होते. १ मधे २५० मिली. तर दुस-यामधे २४० मिली. मग मैत्रिणीला फोन करुन विचारल तर तिच्या कडच्या कप मधे २०० मिली. तर मी असे कप न घेताच परत आली. कोणी सांगाल का कप वरच माप काय असते?
Pages