त्रिवेणी - ५

Submitted by A M I T on 9 August, 2012 - 23:46

*

दुधभरल्या कपात मारी बिस्कीट बुडवताना क्षणभर वाटलं,
चांदण्यांच्या पाकात जणु चंद्रच बुडवून खात आहोत आपण

गुलजार वाचता-वाचता आज पहाट फटफटली होती.

*

कुणास ठावूक कुठे हरवलाय क्षण?
काळाचं बोट सोडून कुठे पसार झालाय क्षण?

माझ्या रिस्टवॉचमधील सेकंदकाटा कधीचा तुटून पडलाय.

*

स्वतःलाच शोधण्यास निघालेलो मी
पण गवसलोच नाही मलाच मी

स्वतःचाच नंबर डायल केल्यावर फोन व्यस्त असतो म्हणतात.

*

आज अलिशान फ्लॅटच्या खिडकीतून बाहेर पाहत चहा घेताना मोठं नवल वाटलं,
कधीकाळी इथं एक घनदाट जंगल होतं म्हणे..!

मग वर्तमानपत्रातील बॉम्बस्फोटाची बातमी वाचून तो शब्दकोडी सोडवू लागला.

* * *

त्रिवेणी - १ http://www.maayboli.com/node/21432
त्रिवेणी - २ http://www.maayboli.com/node/21449
त्रिवेणी - ३ http://www.maayboli.com/node/21766
त्रिवेणी - ४ http://www.maayboli.com/node/34010

Group content visibility: 
Public - accessible to all site users