Submitted by कौतुक शिरोडकर on 20 October, 2012 - 12:42
जाणिवांच्या कक्षात
लपंडाव खेळता-खेळता
एक थप्पा
जन्मजात 'ऑटीझम'च्या नावाने
..
.
एक 'ऑट' होताच
कैक इतर 'इझम' दाटीवाटीने
'राज्य' करू लागले
अस्तित्वाच्या परिघात
...
..
.
माझ्यातला 'ऑटीझम'
औटघटकेचा नसता तर...
......
आज माणसांच्या गर्दीत मीही
'विशेष' असतो.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
रिकाम्या जागा मुळे ऑटीझमला
रिकाम्या जागा मुळे ऑटीझमला उठाव आला आहे.
कौत्या अॅट हिज बेस्ट... वन्स
कौत्या अॅट हिज बेस्ट... वन्स अगेन ! आवडेश